Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी 'टंग टाय 'शस्त्रक्रिया यशस्वी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये 'जीभ बांधणे' अर्थात 'टंग टाय 'या दुर्मिळ समस्येवर सुमारे 19 बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन आकमार यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला असून ,यामुळे गरजू बालकांना वेळेत आणि मोफत उपचार मिळण्यास मदत झाली आहे. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यमपल्ले, आणि जिल्हा रुग्णालय मेडिकल ऑफिसर डॉक्टर वंदना जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन गुजर शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर अर्चना झेंडे तसेच यवत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया शिबिरात सहभाग सक्रिय पद्धतीने घेतला, सासवड ग्रामीण रुग्णालयातील अन्य डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी ही उपक्रमामध्ये सहकार्य केल्याचे डॉक्टर आकमार यांनी सांगितले असून, या शस्त्रक्रियेमुळे परिसरातील नागरिकांचा रुग्णालया प्रतीचा विश्वास अधिक दृढ झालेला आहे, या यशस्वी उपक्रमामुळे टंग टाय असलेल्या 19 भागीकारांना बोलणे आणि अन्नग्रहण करण्यात येईल ,अडचणीवर मात करण्यास मदत मिळणार असून, सासवड ग्रामीण रुग्णालयाच्या सेवेतील हा एक नवा आणि महत्त्वाचा उपक्रमाचा टप्पा आहे डॉक्टर गजानन आकमार वैद्यकीय अधीक्षक सासवड

Post a Comment

0 Comments