पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी पोलीस दलाचे पथसंचलन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील सासवड नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमी मध्ये शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सासवड पोलीस ठाण्याच्या वतीने, शनिवारी दि. 29 रोजी पथसंचलन करण्यात आले होते ,निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना दृढ करण्यासाठी आणि पोलीस दलाची सज्जत आदर्श होण्यासाठी,पथसंचलन करण्यात आले होते, या संचलनामध्ये एस आरपीएफ गट एक व दोन पुणे येथील एक अधिकारी आणि 35 कर्मचाऱ्यासह, पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक उपनिरीक्षक तसेच 12 बीट अंमलदार असे एकूण 50 पेक्षा अधिक जवान सहभागी झाले होते .जयप्रकाश चौक, अमर चौक, चांदणी चौक ,बादशाही मशिद, बहिरम पुरा चौक, नेताजी चौक या शहरातील प्रमुख आणि संवेदनशील मार्गावरून करण्यात आले होते ,पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, अर्जुन चोरगे ,अर्चना पाटील आदी उपस्थित होते. आगामी सासवड नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी केले आहे ,तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन शांततेत पार पडले, अशी माहिती गुप्तहर विभागाचे रुपेश भगत सासवड पोलीस स्टेशनचे त्यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments