नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता दोन डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे, याकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे .जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर ,चाकण, दौंड, फुरसुंगी -उरुळीदेवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर ,लोणावळा ,माळेगाव बुद्रुक, मंचर ,राजगुरुनगर, सासवड, शिरूर ,तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे ,मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना ,मतदारांना देखील लागू राहणार आहे.केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालय ,निमशासकीय कार्यालय ,सार्वजनिक उपक्रम बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील ,हे त्या दोन डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments