नामनिर्देशन पत्रातील माहिती सोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही तर शनिवारी दिनांक 15 रोजी देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नगरपरिषदा/ नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशक पत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे, त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर अपलोड करण्याची आवश्यकता नाही, संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशन पत्राची आणि शासनपत्राची छापील प्रिंट आऊट घेऊन व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रासह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे. असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे .राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या सदस्यासाठी आणि थेट अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता, नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हे https:/mahasecelec.in संकेत स्थळ विकसित केले आहे, त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नाम निर्देशन पत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत (print out) काढून त्यावर उमेदवाराची स्वतःची व सुचकाची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे, त्यानंतर त्या मूळ प्रतिसह अन्य आवश्यक कागद पत्राचा उदाहरण नगरपरिषद नगरपंचायतीचे नांदे प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा सवय घोषणा पत्र असल्यास जोडपत्र एक किंवा जोडपत्र दोन इत्यादी संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे. इच्छुक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासूनच सुरू केलेले संकेतस्थळ 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत 24 तास सुरू असेल, तोपर्यंत त्यावर इच्छुक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते, व नोंदणी करताना तयार केलेला लॉगिन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो, कारण नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते सही केलेल्या प्रिंटआउटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्राचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे सर्व कागदपत्रासह नाम निर्देशन पत्र शनिवारी 15 नोव्हेंबर 2025 या सुट्टीच्या दिवशी सुद्धा स्वीकारण्यात यावेत अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र रविवारी तारीख 16 ते स्वीकारणार नाहीत, इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे, परंतु या संगणक प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याचे, निदर्शनास आलेले असून, नामिवेषण पत्र सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत, अशा परिस्थितीमध्ये संगणकीयकरणावर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि संगणीकराचे उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून, देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोग खालील प्रमाणे निर्देश देत असून, दिनांक 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तीनही दिवस रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवार यांना दोन्ही पद्धतीने म्हणजेच संकेतस्थळावर तसेच पारंपारिक पद्धतीने सुद्धा आपले नामनिर्देशन पत्र आवश्यक कागदपत्राचा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावा येतील, याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना नियमित कराव्यात यासाठी राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार सूचना करण्यात आलेल्या आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments