एम.ई.एस.इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड प्रशालेमध्ये बालदिन उत्साहात साजरा..... सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बालदिनाचे औचित्य साधत प्रशालेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा, इयत्ता पहिली व दुसरी साठी नाट्यछटा स्पर्धा तर तिसरी ते नववी साठी भारत सरकार आयोजित पत्रलेखन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी अज्ञात क्रांतिवीर, निसर्गातील विविध घटक, सकस आहार... इत्यादी वेशभूषा केल्या होत्या. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर नाट्यछटा सादर केल्या. तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला म्हणजेच देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आवडता क्रीडापटू , यांना अंतर्देशीय पत्र कार्डावर पत्र लिहिले व ते पोस्टाद्वारे त्यांना पाठवले. या सर्व उपक्रमांना प्रमुख पाहुण्या माननीय नीलम जाधव ( स्काऊट- गाईड पुरंदर तालुका प्रमुख ), प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनूर माननीय पर्यवेक्षिका सरोज जांगडा, परीक्षक भाऊसो येळे, नीता जगताप यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमांचे उत्तम नियोजन केले. पालकवर्ग व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments