जलसंधारण खात्याचे दुर्लक्ष सासवड नगरपालिकेचे बंधारे जनतेने वर्गणीतून अडवले सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपालिका क्षेत्रातील बंधाऱ्यांची जबाबदारी जलसंधारण खाते घेत नाही. कारण ते फक्त ग्रामीण भागासाठी कार्य करतात. तालुका स्तरावर त्यांचे ऑफिस आहे . नागरिकांचा सासवड मधील बंधाऱ्यांबाबतचा अर्ज सुद्धा उप कार्यकारी अभियंता कार्यालय स्वीकारत नाहीत . सासवड मधील बंधारे हे मृदू व जलसंधारण कार्यालयाने बांधले आहेत. त्याचे ऑफिस सासवड म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी नाही . या कार्यालयाचे अधिकारी कधीही बंधारे गळत आहेत काय ?दुरुस्ती करावी लागेल काय ?अथवा दरवर्षी ढापे बसवणे आणि काढणे या पाहणीसाठी सुद्धा येत नाहीत . हे बंधारे त्यांनी नगरपालिकेकडे हस्तांतरित केले नाहीत. त्यामुळे नगरपालिका या बंधाऱ्यांची देखभाल करीत नाही. नागरिकांनी हे बंधारे फोडले आहेत . बंधारे वेळेवर अडवले जात नाहीत. कारण खर्च कोणी करायचा ? याबाबत संभ्रम आहे . काल एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली बातमी मध्ये पुणे जिल्हा परिषद बंधारे अडवण्यासाठी निधी देणार असल्याचे समजले . पुणे जिल्यातील बंधारे आणि तालुका निहाय यादीमध्ये पुरंदर तालुक्याचे नावाचं नाही . १,१३,७७,०००रुपये निधी पुरंदर तालुका वगळून मंजूर झाले आहेत की काय ? सासवड मधून वाहणारी कऱ्हा नदी व त्यावरील असणारे बंधारे आता अडवून आता उपयोग नाही. कारण नदी प्रवाहित होण्याचे थांबले आहे . अशाप्रकारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे. सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची?लोकप्रतिनिधी?विरोधी पक्ष ?कोणाकडे जायचे ?"हजार पक्ष /जनतेकडे नाही लक्ष//"सासवड.सिद्धेश्वर येथील बंधारा लोकवर्गणीतून अडवण्यात आला आहे कोणाचेही अर्थसहाय्य झाले नाही. संगमेश्वर येथील बंधारा अडवण्यास कोणी पुढाकार घेत नाही.६०टक्के सासवड नगरपालिकेचे क्षेत्र शेती झोन आहे.निवासी झोनसाठी असणाऱ्या सोई सुविधा (गार्डन,खेळाचे मैदान,लायब्ररी ) विकास आराखड्यात ठेवण्यात आल्या आहेत तशा शेती झोनला ठेवण्यात आल्या नाहीत .कोणताही कॅनॉल अथवा शेतीसाठी पाण्याची व्यवस्था विकास आराखड्यात दर्शवली नाही. शेतकऱ्यांना स्वतः खर्च करून बंधारे अडवावे लागत आहेत . सासवड मधील शेतकऱ्यांनी शेतीच करू नये असे सर्व शासकीय कार्यालयांचे धोरण दिसत आहे .याबाबत वृत्तपत्रांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज जाईल इतका आवाज शेतकऱ्यांसाठी उठवावा. असे डॉ . उदयकुमार वसंतराव जगताप यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments