Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेसाठी अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवार आनंदी काकी जगताप यांचा व महा विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत मधुकर जगताप यांचा अर्ज जमा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रतिनिधीला वेग देत नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा आनंदी (काकी) जगताप यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या सासवड येथे आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली असून, काही दिवसापासून सासवड मधील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, भाजपने उमेदवारांचा निर्णय जाहीर केल्याने, नगरपरिषद निवडणुकीची रंगत अधिकच वाढत चाललेली आहे. दरम्यान, सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी दि. 17 रोजी अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 50 उमेदवारांनी अर्ज आपले दाखल केले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार करमणूक कर शाखा पुणे सतिश थेटे यांनी ही माहिती दिली. तर दि. 11 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी जमा झालेले अर्ज 8 तर प्रभाग क्रमांक 1 ते 11 मध्ये नगरसेवक पदासाठी 78 फॉर्म दि. 11 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत जमा झालेले आहेत, तर आज दि. 17 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी 6 फॉर्म तर नगरसेवक पदासाठी 50 फॉर्म जमा झालेले आहे, तर दि. 17 नोव्हेंबर अखेर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 14 फॉर्म जमा आहेत, तर नगरसेवक पदासाठी 128 फॉर्म जमा झालेले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी ही माहिती दिली.

Post a Comment

0 Comments