Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जवळाअर्जुन येथील सरपंचाला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जवळाअर्जुन ता. पुरंदर येथील सरपंच सोमनाथ कणसे यांना दारू धंदा बंद पाडल्याच्या कारणावरून, पिस्तुलाचा दाख दाखवून, शिवीगाळ करण्यात आली. याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळा अर्जुन येथे प्रशांत रमेश राणे राहणार जवळाअर्जुन यांनी त्याचा दारूचा धंदा बंद पाडल्याच्या कारणांनी राग मनात धरून, सरपंच सोमनाथ कणसे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली तसेच नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. याबाबतची फिर्याद सोमनाथ कणसे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे ,त्यानुसार राणेवर पुन्हा एकदा गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments