Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रुती बुजरबरुआ" च्या गायनाने जिंकली रसिकांची मने.. सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.. भाग्यदलक्ष्मी बारम्मा.. झाले युवती मना या आणि या सारख्या सुंदर गीतांच्या सादरीकरणाने ठाणे येथील प्रथितयश गायिका श्रुती बुजरबरुआ यांनी संगीत प्रेमींची मने जिंकली. भजन, नाट्यगीते, होरी, बंदिश अशा स्वरूपातील अनेक रचना सादर करत त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. पुणे येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात प्रख्यात गायिका सानिया पाटणकर यांच्या प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन प्रस्तुत युवा कलाकार मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्रुती बुजरबरुआ व इंडियन आयडॉल शुभम खंडाळकर यांच्या सुरेल रचनांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. पटदीप रागातील गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली श्रृती व शुभम यांना हार्मोनियमवर यशवंत थिटे, तबला ताराशीष बक्षी, तालवाद्य महेंद्र शेडगे यांनी संगीत साथ केली. नितीन महाबळेश्वरकर यांनी समयोचित निवेदन केले . कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सानिया पाटणकर व त्यांच्या शिष्यगणांनी अष्टांग गायन सादरीकरण करत कार्यक्रमाची उंची वाढवली.फोटो १) श्रुती बुजरबरुआ गायन सादर करताना २) सानिया पाटणकर व शिष्य यांचे अष्टांग गायन

Post a Comment

0 Comments