पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे ममता बाल सदन बालगृहात पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांचा जन्मदिन साजरा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ माई म्हणजेच ममतेचा एक अथांग असा सागर असलेला मुलासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला असून, व्याख्याने, प्रेरणा दिली आहेत, माईंनी मुलींना शिक्षण देणे, स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांच्या विवाहाची जबाबदारी घेतलेली आहे, त्यामुळे माई खऱ्या अर्थाने आई होत्या, तर ममता बाल सदन हे माईंच्या ममतेने आणि संस्काराने घडवलेले खरे माहेरघर आहे असे, प्रतिपादन आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी केले. कुंभारवळण ता. पुरंदर या ठिकाणी ममता बालसधन बालगृहात मध्ये पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ माई यांच्या जन्मदिनानिमित्त आणि बाल दिनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वाघमोडे यांच्या हस्ते दत्ता निवृत्ती भोसले यांना माहेरचा सन्मान देऊन, गौरव केला. यावेळी श्रीकांत साबळे, स्टेट बँकेचे अध्यक्ष निखिल वर्तक, ममता बालसदन संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, ममता सपकाळ, विनय सपकाळ, दत्ता भोसले, निखिल वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अधिकशिका स्मिता पानसरे, सुजाता गायकवाड, संजय गायकवाड, गोपाल गायकवाड, मंजू गायकवाड, ज्योती गायकवाड, प्रसन्न गायकवाड, पवन गायकवाड, रितेश जांभुळकर, मोनिका शिरसागर, संगीता कणसे, रवी ओव्हाळ, नाना कुंभारकर आणि मुलींनी केले. प्रास्ताविक अधिक शिका स्मिता पानसरे, सूत्रसंचालन मुकेश चौधरी, सारिका कुंजीर व मिनल सपकाळ यांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments