Hot Posts

6/recent/ticker-posts

एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये कौशल्यविकासासाठी नाविन्यपूर्ण कार्यशाळांना विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद:तर१२० पेक्षा अधिक आर्टिकल्सची निर्मिती सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांच्या पुढाकारातून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 21 ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध कौशल्यविकास कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. ललिता भगत यांनी काम पाहिले.कार्यशाळांमध्ये लिपन आर्ट, रेसिन आर्ट, टाय-डाय प्रिंटिंग, कॅन्व्हास पेंटिंग आणि की-होल्डर मेकिंग यांसारख्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कला प्रकारांचा समावेश होता. फेविक्रील संस्थेतर्फे तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले, ज्यामुळे कला क्षेत्रातील नव्या संधी आणि उद्योजकतेचे दालन विद्यार्थिनींसाठी खुले झाले.या उपक्रमात ५० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्या कल्पकतेतून व मेहनतीतून १२० पेक्षा अधिक आकर्षक आर्टिकल्स साकारले गेले. निर्मित आर्टिकल्समध्ये सजावटी वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, भित्तीचित्रे, फॅशन अॅक्सेसरीज आणि कला-डिझाइनवर आधारित अनेक अनोख्या निर्मितींचा समावेश होता.विद्यार्थिनींच्या कलेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांच्या उद्योजकतेला बळकटी मिळेल आणि भविष्यात या कौशल्यांचा उपयोग करून स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी व्यक्त केला. पुढील काळातही विद्यार्थिनींच्या कौशल्यविकासासाठी अशा उपक्रमांचे सातत्य राखले जाईल, असेही त्यांनी सांगितले.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी कौशल्यपूर्ण पद्धतीने करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व फॅकल्टी यांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments