पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे मंदिरामधून चोरी सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पांगारे ता. पुरंदर येथील ग्रामदैवत श्री निष्णाई मंदिरामध्ये चांदीच्या वस्तू ,तसेच दानपेटीची चोरी झाली असून ,देवीचे पुजारी राजेंद्र गुरव हे बुधवारी दि. 26 रोजी पहाटे साडेपाच वाजता पूजा करण्यासाठी आले असता, मंदिरातील विजेचे दिवे बंद होते ,ते सुरू केले असता, सुरुवातीला दानपेटी नसल्याचे लक्षात आले, देवीच्या मुख्य गाभाऱ्याचे कडी, कोयंडा तोडल्याचे आढळून आले, त्यामुळे त्यांनी तातडीने गावचे पोलीस पाटील तानाजी काकडे यांना या घटनेची माहिती दिली, या घटनेमध्ये चोरट्यांनी देवीच्या पादुका ,चांदीचे तीन कळस, चांदीचा मोठा चौरंग, लोखंडी दानपेटी व अंदाजे 45 हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची आढळून आले ,देवीचा चांदीचा देव्हारा तोडण्याचा प्रयत्न केला, पोलीस पाटील काकडे यांनी सासवड पोलिसांना या घटनेची माहिती दिली, परिंचे येथील हवालदार विशाल जाधव ,संदीप पवार यांनी घटनास्थळी प्राथमिक पाहणी करून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला प्राचारण केले, यावेळी बोटाचे ठसे, श्वान पथक पोलिसांनी चोरीचे सर्व पुरावे गोळा केले, दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक कुमार कदम, पोलीस हवालदार रुपेश भगत, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय चिल्ले यांनी या मंदिराची पहाणी केली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments