Hot Posts

6/recent/ticker-posts

संविधानामुळे महिलांना समाजात न्याय मिळतो ;तर सासवडला संविधान दिनानिमित्त संविधान परिषद सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारत हा सर्वसामान्यांचा एक देश असून ,कोणत्याही आमदाराचा किंवा खासदाराचा देश नसल्याने, तरुणांना त्यांच्या भाषेमध्ये बोलले पाहिजे, हा लढा मानवतेचा आहे, आणि महिलांनी संविधान सांभाळले पाहिजे ,या संविधानामुळे महिलांना समाजात न्याय मिळतो ,असे मत लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले .सासवड ता. पुरंदर येथे सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने, संविधान दिनानिमित्त बुधवारी दि.26 रोजी संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी संपादक आवटे बोलत होते ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सिद्धार्थ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता अभिनेते लेखक व दिग्दर्शक डॉ. मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज धिवार यांनी प्रास्ताविकातून संविधानाची मूल्य सामाजिक बांधिलकी आणि प्रतिष्ठानच्या उपक्रमाची माहिती दिली. प्रथम सत्रात प्रमुख वक्ते लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी उपस्थित यांना संविधानातील मूलभूत अधिकार ,कर्तव्य आणि सामाजिक न्यायाची आवश्यकता, याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट महेंद्र कौचाळे यांनी न्यायव्यवस्थेची भूमिका संवैधानिक मूल्यांच्या संरक्षणावर प्रकाश टाकला, या सत्रास डॉ. प्रमोद धिवार ,सुनील लोणकर आदी उपस्थित होते .यानंतर सिद्धार्थ पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला, पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल शिवराज झगडे यांनी सिद्धार्थ पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच सिद्धार्थ समाजभूषण पुरस्कार वैभव गीते यांना ,सिद्धार्थ उद्योग रत्न पुरस्कार भूषण पुरस्कार उद्योजक विजय कटके यांना ,सिद्धार्थ शिक्षण रत्न पुरस्कार प्राचार्य संदीप टिळेकर यांना ,तर ग्राम महसूल अधिकारी प्रमोद झुरंगे यांना सिद्धार्थ प्रशासकीय सेवार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. देवानंद भालेराव यांनी सूत्रसंचालन केले .स्वप्निल कांबळे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments