Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पुरंदर विमानतळासाठी भरपाई मिळणार; ही डिसेंबर महिन्यापासून ;तर एमआयडीसी करणार 4,500 कोटीचे वाटप परवानगी मिळताच भरपाई प्रक्रिया सुरू होणार सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर येथे प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन मोबदल्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता बळवलेली असून ,राज्य सरकारने या प्रकल्पाची अधिसूचना 10 मार्च 2025 रोजी जारी केली होती ,त्यानुसार भूसंपादन पुनर्वसन, पुनर्व विकास अधिनियम 2013 अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणारआहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीत या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतलेला असून ,पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच भरपाई प्रक्रिया सुरू करता येईल ,आवश्यक असल्यास आम्ही तातडीच्या परवानग्या घेऊ,4,500 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार ,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एमआयडीसी विमानतळ प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमीन खरेदीसाठी सुमारे 4,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे ,या रकमेचा वापर शेतकऱ्यांना थेट भरपाई देण्यासाठी केला जाणार आहे ,एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जमीन संपादनासाठी एसपीव्ही स्पेसिकल आणि आर एफ क्यू प्रक्रिया एकच वेळी सुरू होईल ,पात्र शेतकऱ्यासाठी दुप्पट भरपाईचे नियम लागू राहतील ,ते घर, विहिरी, शेतीपंप ,झाडे, फळबागा आणि दहा टक्के विकसित जमीन असे विविध लाभही पुढे जाणार आहे, विमानतळासाठी 1285 हेक्टर जमिनीचे आवश्यकता,असून विमानतळासाठी एकूण 1285 हेक्टर जमीन लागणार असून यामध्ये खालील गावांचा समावेश आहे ,एखतपुर, खानवडी, कुंभारवळण, मुंजवडी ,पारगाव उदाचीवाडी आणि वनपुरी जमीन मालकांची संमती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, फक्त जमीन मोजणीसाठीच परवानगी शेतकऱ्यांनी दिली असून, पुढची प्रक्रिया विमानतळासाठी दुसरी, तिसरी बैठक अजून संपन्न होणे बाकी असून ,शेवटची मीटिंग ही चौथी सीएम साहेबांच्या पाशी होणार असल्याकारणाने ,विमानतळाचा निधी हा ठरवलेला नसता, कशा पद्धतीने डिसेंबर महिन्यापासून निधी दिला जाणार ही औचित्याचा विषय आहे ,विकास प्रक्रियेला गती मिळणार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विकसित प्लॉटची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार आधारित असावी ,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे ,डिसेंबर पासून प्रत्यक्ष निधी वितरण प्रक्रिया सुरू झाल्यास ,पुरंदर विमानतळ प्रकल्पाला मोठी गती मिळणार आहे, स्थानिक शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत केली मागणी, भरपाई चार पट नव्हे तर पाच पट त्या काही शेतकऱ्यांनी भरपाई ही सध्याच्या बाजार भावासी सुसंगत नाही ,असा आक्षेप नोंदवलेला आहे मागणी भरपाई चारपट ऐवजी, पाचपट असावी ,दहा टक्के विकसित प्लॉट्स ची अचूक किंमत निश्चित करावी ,जिल्हाधिकाऱ्यांनी डुडी यांनी सांगितले की ,सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची लाभ मिळतील याची पूर्ण खात्री आम्ही देऊ तसेच काही अडचण असल्यास उपविभागीय अधिकारी पुरंदर लांडगे मॅडम व माझी भेट घ्यावी अशी माहितीनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली.

Post a Comment

0 Comments