Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे जिल्ह्यामध्ये 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन होणार;तर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा धडक मोर्चा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी ,शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राज्यभर 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार असून ,पुणे जिल्ह्यातील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढणार आहेत ,यासाठीचे निवेदन पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले आहे .शिक्षक पात्रता परीक्षा टीएटी उत्तीर्ण करणे बंधनकारक करू नये, 15 मार्च 2024 चा संच मान्यता शासन आदेश रद्द करावा ,शिक्षकांना ऑनलाइन आणि अशैक्षणिक कामातून मुक्त करावे ,सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी द्यावी, वस्ती शाळा शिक्षकांची सर्व मान्यता देत त्यांची नियुक्ती दिनांक ग्राह्य धरण्यात यावा, शिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवावे, तसेच नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना एसीपी लागू करावी, या प्रमुख मागण्यासाठी शिक्षक संघटनाचे संयुक्त आंदोलन आहे, शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही ,अजून कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याकारणाने ,राज्यभरातील शिक्षक संघटना आंदोलनाच्या मार्गावर उतरलेल्या आहेत ,5 डिसेंबरला पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला असून, या बैठकीला शिक्षक संघाची राज्याध्यक्ष बाळासो मारणे, शिक्षक इतर महामंडळाचे राज्य सरचिटणीस शिवाजी खांडेकर ,मुख्याध्यापक संघाचे राज्य सरचिटणीस नंदकुमार सागर ,शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर ,केंद्रप्रमुख संघटना राज्याध्यक्ष राजेंद्र जगताप, मनपा संघाचे राज्य उपाध्यक्ष सचिन डिंबळे, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे ,शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप ,जिल्हा कोषाध्यक्ष सुनील लोणकर ,जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे ,उर्दू संघटनेचे मुस्तफा पटेल ,राज्यशिक्षक संस्थेने चे सुनील जगताप, रणजीत बोत्रे ,शिवाजी कामठे, के एस डोमसे यांच्यासह जुनी पेन्शन संघटनेचे जितेंद्र फापाळे, गोरख थोरात ,पी.डी .शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments