पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी प्रचारामध्ये तक्रारीचा पाढाच वाचला जात आहे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सध्या येथील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे, सर्वच उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून, प्रभाग निहाय, कोपरा बैठका, पदयात्रा ,घरोघरी जाऊन वैयक्तिक गाठीभेटी आणि सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करत असून ,मात्र प्रचारादरम्यान कोपरा बैठकामध्ये मतदाराकडून घंटा गाड्यांची, अनियमयतापणा, अपूर्वा पाणीपुरवठा, रस्ते बंद पथदिव्य अशा सुविधा बाबत उमेदवारांकडे तक्रारीचा तर अक्षरशा: पाऊसच पडत आहे, ठिकठिकाणी आरोग्याच्या संदर्भातील ड्रेनेज लाईन, त्रिशूल सोसायटीतील चाललेल्या रोडचे निकृष्ट पद्धतीचे कामकाज ,तसेच कचरा या विविध प्रश्नावर सासवड या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रत्येक ठिकाणी ड्रेनेजच्या लाईनची व्यवस्था, पूर्णपणे विस्कळीत झालेली असून आणि पुरवठा सुद्धा विस्कळीत झालेला असून, त्या ठिकाणी प्रशासकीय बाजू गेली चार ते पाच वर्ष असल्यामुळे, बाकीच्या माजी नगरसेवकांना कुठल्याही प्रकारचे लक्ष देता येत नाही ,व कुठल्याही स्थिती वरती बोलता येत नाही, तर आत्ता सध्या तरी निवडणुका या सासवड नगर परिषदेच्या चालू असल्यामुळे, उमेदवारांना पूर्णपणे त्यांना तोंड द्यावे लागत आहे, घनकचरा व ड्रेनेज लाईनच्या संदर्भातील आरोग्याच्या बाबतीमध्ये, पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये सासवडमध्ये भरपूर समस्या असल्या कारणाने प्रत्येक उमेदवार हा त्या ठिकाणी विविध प्रकारच्या घोषणा देत असून, त्याचा निपटारा कशा पद्धतीने होईल, हे येणाऱ्या आगामी काळातील निवडणुकी मधील मतदानातून दिसेल, सासवड नगर परिषदेमध्ये मागील जवळपास चार ते पाच वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे, या काळामध्ये विकास कामे थांबलेली असून, निधी अडवल्यामुळे मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, पालिका प्रशासन पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहे, नागरिकांमध्ये असलेला तीव्र असा संताप आता उमेदवारांना तो प्रचारांमध्ये भोवत आहे, आणि त्या ठिकाणी पूर्णपणे रोशाला सामोरे जावे लागत आहे, उमेदवार यांनी पालिकेची तिजोरी भरलेली असून, निवडणुकीच्या निमित्ताने सासवड पालिकेच्या तिजोरीमध्ये मोठी भर पडली आहे, 7 ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये दहा दिवसांच्या कालावधीमध्ये पालिकेकडे 58 लाख 19 हजार 147 रुपये इतका विक्रमी कर जमा झालेला आहे, यामध्ये थकीत आणि चालू कराचा समावेश आहे ,यातील बहुतांश कर हा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालमत्तेचा जमा कर आहेत ,कर भरण्याबद्दल मतदारांमध्ये विशेष चर्चा असून, उमेदवारांच्या सूचकांना थकीत कर भरण्याची अट ठेवली असती, तर यात आणखी मोठी भर पडली असती, अशी मतदारात चर्चा सध्या चालू आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments