Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पुरंदर मतदार संघामध्ये सोयीच्या युती व आघाड्या सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सासवड ,जेजुरी आणि फुरसुंगी उरुळी या तिन्ही नगरपरिषदांमध्ये राजकीय पक्षांनी आपापल्या सोयीनुसार युती व आघाड्या केल्या असून, सासवड येथे भाजप स्वतंत्रपणे लढत आहे ,तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत, महाविकास आघाडी देखील नगराध्यक्ष पदा सह चार जागावर निवडणुकीत उतरली आहे, जेजुरी येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत ,तर भाजप संपूर्ण पॅनेल उभा करून लढत आहे ,शिवसेना नगराध्यक्ष पदासह सहा जागावर निवडणूक लढवत आहेत ,फुरसुंगी देवाची उरुळी या हवेलीतील नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहेत, तर भाजप आणि शिवसेना शिंदे युतीतून निवडणूक लढवत आहेत, राजकीय सोयीनुसार केलेल्या या आघाड्याबद्दल मतदारांमध्ये जोरदार सध्यातरी बातचीत सुरू आहे ,तसेच या निवडणुकीतही रंगतही चांगलीच येणार आहे असे दिसत आहेच.

Post a Comment

0 Comments