पुरंदर तालुक्यातील सासवड कापूरहोळ रस्ता दहा डिसेंबर पर्यंत बंद राहणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय पुणे ग्रेड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसाठी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू असल्याने ,सासवड ता. पुरंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारी, मुख्य वाहतूक वळविण्यात आली आहे ,पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सासवड नारायणपूर ते चिवेवाडी घाट मार्गे ,कापुरहोळ हा मार्ग 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याची, माहिती पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली, या पर्यायी मार्गाचा वापर करावा कापूरहोळ कडे जाणारे सर्व नागरिक सासवड पांगारेपर्यंत, विर ,तोडल ,सारोळा मार्गे पुणे बेंगलोर महामार्गाचा वापर करावा, कापूरहोळ कडून सासवड कडे येणारी हलकी चार चाकी वाहने बेंगलोर महामार्गावरून पर्यायी घाट गराडे सासवड मार्गे तसेच चतुरमुख घाट पठारवाडी, भिवरी ,सासवड मार्गाचा अवलंब करावा, कापूरहोळ कडून सासवड कडे येणारी जड वाहने बेंगलोर महामार्गावरून, सारोळा, तोंडल ,वीर ,परिंचे ,सासवड मार्गे यावे ,किंवा कापूरहोळ, कात्रज घाट मार्गे पुणे या मार्गाचा वापर करावा, अशी माहिती सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments