Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील वीर या ठिकाणी थकबाकीदारासाठी 50% सवलत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र वीर ता.पुरंदर येथील ग्रामपंचायत ने 31 डिसेंबरच्या आत घरपट्टी, नळपट्टी भरा आणि 50% सवलत मिळवा असे आवाहन, ग्रामस्थांना केलेले असून, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत, निवासी मालमत्ताधारकांना थकबाकीसह घरपट्टी आणि पाणीपट्टी भरल्यास 50% सूट मिळणार आहे, यासाठी शासनाने 31 डिसेंबर अंतिम मुदत दिली असून ,ही सवलत 2025- 26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेस थकीत कर भरण्यासाठी आहे, या अभियानाद्वारे कर वसुलीला गती देण्याचा शासनाचा एक प्रयत्न असून, त्यानुसार ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून 50% सवलतीचा देण्याचा ठराव केलेला असून ,सध्या वीर येथे 18 लाख 50 हजार घरपट्टी, तर 49 लाख 50 हजार एवढी नळपट्टी थकीत आहे, थकबाकी दारामध्ये दण दांडग्यांची संख्या जास्त आहे, त्यात राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ही समावेश आहे, दर पाच वर्षांनी सत्ता बदल होत असतो ,निवडणुकीमध्ये रोज नको म्हणून करा साठी तगादा लावला जात नाही ,परिणामी काहींची अनेक वर्षांनी थकबाकी आहे, गेल्या काही वर्षांपूर्वी वीर ग्रामपंचायतीचे थकीत वीज बिलामुळे दोन वेळा वीज जोडणी तोडली, गेली होती परंतु ,तात्पुरती नाम मात्र रक्कम भरून व राजकीय हस्तक्षेप करून, पुन्हा वीज जोडण्यात आली असून ,सध्या तीच परिस्थिती आहे ,ग्रामस्थांनी घरपट्टी आणि नळपट्टी भरली नाही, तर ग्रामपंचायत ग्रामस्थांना सोयी सुविधा कशा देणार ,याकडेही प्रशासनाने लक्ष वेधलेले आहे, वीर आणि परिसरामधील नागरिकांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत मिळालेल्या सवलतीचा लाभ घेऊन, थकीत घरपट्टी ,नळपट्टी भरावी तसेच गावात सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, प्रसाद सोले,ग्रामविकास अधिकारी वीर.

Post a Comment

0 Comments