Hot Posts

6/recent/ticker-posts

एकल महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील.सीईओ गजानन पाटील यांचे प्रतिपादन ; परिंचे येथे एकल महिला शिबीर संपन्न. सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : महाराष्ट्र ग्रामीण जीवन्न्नोती अभियानातून महिला बचत गटांना शासन मोठ्या प्रमाणावर मदत करत असून प्रत्येक महिला बचत गटाला जोडली गेली पाहिजे. पुणे जिल्हा परिषद फंडातून शेती पीकावर औषध फवारणीसाठी प्रत्येक तालुक्याला २ ड्रोन देण्यात येणार असून या माध्यमातून शेती विकासाला चालना मिळेल. जिल्ह्यातील १५०० एकल महिलांना शिलाई मशीन देणे बाबत डीबीटीची कार्यवाही सुरु आहे. यामाध्यमातून एकल महिलांना समाजात मान सन्मान देतानाच आत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गजानन पाटील यांनी केले आहे.परिंचे ( ता. पुरंदर )येथे पुरंदर पंचायत समिती, एकात्मिक बालविकास विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत परिंचे यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महीला शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तहसीलदार विक्रम राजपुत, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे, गटशिक्षण अधिकारी वैभव डुबल उपस्थित होते.आयुष्यमान भारत कार्ड १०० % काढण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून या माध्यमातून औषधोपचारासाठी भरीव मदत होते. या शिबिरात प्राप्त झालेल्या विविध प्रस्तावांची दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी काय कार्यवाही झाली ? याबाबत गटविकास अधिकारी यांचे मार्फत आढावा घेण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी सांगितले.विधवा,परितक्त्या व घटस्फोटीत महिलांना पुढील प्रमाणे लाभ देण्यात आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मनोधैर्य योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना 4, लेक लाडकी योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना , राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -बचत गटांना कर्ज वाटप, विधवा पेन्शन योजना, कृषी सन्मान योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, सुकन्या समृद्धी योजना, आधारकार्ड पॅन कार्ड, डोमासाईल उत्पन्न दाखला काढणे, रेशन कार्ड काढणे, वारस नोंद लावणे, आयुष्मान भारत कार्ड काढणे, प्राथमिक आरोग्य तपासणी अंतर्गत नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान, रक्त तपासणी (कॅन्सर तपासणी) दंतरोग, आभा कार्ड ,आयुष्यमान कार्ड गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, इसीजी तपासणी, घरकुल योजना लाभार्थी निवड करणे अशा प्रकारे विविध योजनांचा लाभार्थ्यांना या शिबिरात लाभ देण्यात आलाबांधकाम उपअभियंता संजय गीते, विस्तार अधिकारी, सागर कांबळे, संतोष नेवसे, अभिजित जेधे, मंडल अधिकारी बसवंत बनसोड, प्राचार्या विद्या पवार, माजी सरपंच समीर जाधव, सटलवाडीचे सरपंच सागर करवंदे, सुशील चव्हाण, प्रवीण जाधव, गणेश पारखी, मनीषा जाधव, ग्रामपंचायत अधिकारी शशांक सावंत, एलआयसी प्रतिनिधी अभिजित बारवकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका माणिक रासकर त्याचप्रमाणे विविध गावचे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, केंद्रचालक आदीसह एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी प्रस्ताविक केले, पीएन वळकुंदे यांनी सूत्रसंचालन केले तर सुशील चव्हाण यांनी आभार मानले.फोटो ओळ ; परिंचे येथे एकल महिला शिबीर प्रसंगी उपस्थित मान्यवर.

Post a Comment

0 Comments