आत्ता सध्या तरी पैसे असेल तरच निवडणूक लढवायची का ?तर सामाजिक कार्यकर्त्यांना सध्या तरी मतदारांचा पाठिंबा का नाही ? विद्यमान उपसरपंच एखतपूर मुंजवडी तुषार झुरंगे सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मतदारांनी विचार करण्याची गरज सध्या आहे, निवडणुकीमध्ये पैसे वाटणारे ,उमेदवार लोकांसाठी नव्हे, तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करत असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत ,तस तसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा अहिरणीवर आलेला आहे ,गाव पातळीवर वर्षानुवर्ष लोकांच्या सुखदुःखासाठी सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून जाणारे, समाजासाठी झटणारे कार्यकर्ते, निवडणुकीच्या वेळी मात्र मागे पडतात, तर पैशाची ताकद ,गटबाजी आणि दिखाव्याच्या बळावर उमेदवार मैदानात उतरतात, आणि निवडून येतात ,त्यामुळे मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की ,पैसे असेल तरच निवडणूक लढवावी का ?अनेक ठिकाणी निवडणुकीचा स्वरूप खर्चिक होत चाललेला आहे, प्रचारासाठी गाड्या ,पोस्टर, बॅनर, जेवणावळी माणसे फिरवणे यासाठी लाखोचा खर्च होत असल्याचे, ज्याच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकर्त्यांना सुरुवातीपासूनच स्पर्धेत अडचणी येतात, हेच कार्यकर्ते वर्षानुवर्ष सामाजिक कामात गुंतलेले असतात ,लोकांच्या अडीअडचणीत हजर असतात ,पण मतदानाच्या वेळी मतदार तो चांगला माणूस आहे ,एवढेच सांगतात पण मात्र पैशावर किंवा गटबाजीत आधारलेल्या उमेदवारांना देतात, त्यामुळे खरे सामाजिक कार्यकर्ते, निवडणुकीत कोलमडतात आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणार यांचा विजय होतो, लोकशाहीत मतदार राजा असतो, पण जर मतदारांनी सहजपणे विचार न करता पैशावर लाभावर आधारित मतदान केले ,तर विकासाच्या प्रश्नावर त्यांचे दूरगामी परिणाम होतात, निवडणुकीत पैसा वाटणारे, उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती वसुली करतात ,ही कटू वस्तुस्थिती आहे, समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना ,खरा पाठिंबा मिळावा यासाठी मतदारांनी आपली मानसिकता बदलण्याची आणि विकासाला प्राधान्य देणारे ,मतदान करण्याची गरज आहे, निष्ठावंताने पक्षासाठी आयुष्यभर सतरंज्या उचलाव्यात पण तिकीट मागूच नये का? अनेक कार्यकर्ते आपल्या गावात मतदार संघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात, परंतु तिकीट वाटपाच्या वेळी गटबाजी ,आर्थिक ताकद वरच्या स्तरावरील शिफारसी राजकीय सौदे यांना प्राधान्य दिले जाते ,बंद होतात, परिणामी जमिनीवर खऱ्या अर्थाने पक्षासाठी गाम गाळणारे कार्यकर्ते, उपेक्षित राहतात त्यांना तू तर आपला आहेस, या एका वाक्याला शांत केले जाते, हे कार्यकर्ते वर्षानुवर्ष नेतृत्वाची मान मर्यादा सांभाळतात ,सभा गाजवतात ,पोस्टर लावतात ,बॅनर वाहतात ,जनतेत प्रचार करतात ,पण निर्णय त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात, ही सर्वत्र गोष्ट चालू आहे. यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार आणि कार्यकर्त्यांनी सततपणे जागरूक राहिले पाहिजे याची दखल कार्यकर्ते व मतदारांनी जरूर घ्यावी,अशी स्थिती विद्यमान उपसरपंच एखतपूर मुंजवडी तुषार झुरंगे यांनी ही यात सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कोणता पक्ष संधी देतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशी माहितीनुसार व अनुभवानुसार पत्रकार यांना ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments