पुरंदर तालुक्यातील कानिफनाथ गडावर बिबट्याचा वावर वाढला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बोपगाव ता. पुरंदर येथील श्री क्षेत्र कानिफनाथ गडावर बिबट्याच्या वावरामुळे नागरिक आणि भाविक भक्तामध्ये भीतीयुक्त असे वातावरण निर्माण झालेले आहे, पुरंदर शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा भिवरी गावचे माजी सरपंच संजय कटके मनाले की ,आम्ही अभिषेकासाठी पहाटे श्री क्षेत्र कानिफनाथ गडावर गेलो असता, पहाटेच्या सुमारास आम्हाला बिबट्याची दर्शन झाले, कानिफनाथ गडावर येणाऱ्या भाविकांनी आणि गावातील नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कानिफनाथ गडावरील नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी अध्यक्ष माऊली फडतरे, उपाध्यक्ष दिपक फडतरे ,सचिव जयवंत फडतरे यांनी भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, तसेच बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, यासाठी वन विभागाकडे लेखी पत्रही दिले आहे,बोपगाव ,चांबळी गावच्या गायरान क्षेत्रातील हा डोंगराळ भाग आहे ,यामुळे या परिसरामध्ये पूर्वीपासून बिबट्यांचा वावर असतो, बिबट्या कानिफनाथ गड परि सरामध्ये आल्याचे नवनाथ पंचायत कमिटी ट्रस्टने सांगितले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments