पुरंदर तालुक्यातील सासवड येथे संत सोपान देव समाधीला पवमान अभिषेक ;तर सोपानदेव मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप समाधी उत्सवानिमित्ताने दिंडीची नगर प्रदक्षिणा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत सोपान महाराजांचा समाधी उत्सव शुक्रवारी दि. 12 पासून सुरू झाला आहे, आज पहाटे समाधीस्व पवमान अभिषेक घालण्यात आला, याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रमही मंदिरात झाले, सकाळी 9 ते 11 या काळात गेणबा पवार यांची कीर्तन झाले, त्यानंतर दुपारी हरिपाठ होऊन, दुपारी चार वाजता पालखी आणि दिंडीचा स्वाद्य नगर प्रदेशांना झाली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता दिंडी प्रमुखांचा सत्काराचा कार्यक्रम झाला, रात्री विशाल महाराज इंगळे यांचे कीर्तन झाले, आज सकाळपासून विविध भागातून दिड्या सोपानदेव मंदिरात आल्या, दिवसभर मंदिरात रांगा लावून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, भिवरी येथून चतुर्मुख भैरवनाथ सांप्रदायिक दिंडी सोहळा मस्कु महाराज कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड येथील सोपानदेव मंदिरामध्ये दाखल झाली. रात्री रांजणी ,खामगाव, आंबेट, कोंडगाव ग्रामस्थ तसेच सासवडकर व गणपती बुवा जाधव दिंडीचा जागर असे विविध कार्यक्रम झाले, ची माहिती संत सोपान देऊ ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली, यावेळी व्यवस्थापक हिरा काका गोसावी, चोपदार सिद्धेश शिंदे, हरिभक्त परायण अभय महाराज जगताप, श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश (कारभारी) जगताप पांडुरंग भोंगळे ,रवींद्र (पंत )जगताप, गावचे पाटील संग्राम जगताप ,वैभव (बापू )जगताप, विठ्ठल शिंदे ,रामभाऊ इनामके, विजय (बापू )जगताप, रामभाऊ भैरवकर, सुधाकर गिरमे ,अमित पवार आणि आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments