Hot Posts

6/recent/ticker-posts

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे; या शिबिराचे उद्घाटन नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर मंगेश लिंगायत यांच्या हस्ते सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शिवाजी (आप्पा) पोमण मित्रपरिवार पुरंदर हवेली यांच्या वतीने, पदमभूषण शरदचंद्र पवार यांचे वाढदिवसाच्या निमित्त गेली 22 वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते, शिवाजी आप्पांच्या नंतर हा उपक्रम पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल गिरमे यांनी सातत्याने न खंड पाडता गेली पाच वर्ष मित्र परिवारांच्या वतीने सुरू ठेवलेला आहे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, या शिबिराचे उद्घाटन नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर मंगेश लिंगायत यांच्या हस्ते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, जालिंदर (भाऊ )कामठे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. डॉक्टर मंगेश लिंगायत बोलताना पुढे म्हणाले की, रक्ताचा पुरवठा कशासाठी करायचा, तर सध्याच्या युगामध्ये अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, त्याचे निवारण करण्यासाठी सध्या रक्ताची खूप गरज भासत असते, त्यामुळे कोणताही विचार न करता, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे त्यांचे त्यांनी प्रतिपादन केले, विजय कोलते, जालिंदर (भाऊ) कामठे, प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे,माजी आमदार संजय जगताप, सुदाम (आप्पा) इंगळे, माणिकराव झेंडे त्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिरामध्ये 256 रक्त पिशवीचे संकलन करण्यात आले. हे शिबिर पार पाडण्यासाठी अक्षय ब्लड हडपसर यांनी मदत केली, डॉक्टर प्रमोद खोजे, डॉक्टर कोमल पवार, अक्षय चौधरी, केतन सूर्यवंशी, चेतन अलवाल, किरण कोकणी, प्रथमेश शिंदे, धीरज पाटील ,शुभम कांबळे, राजकुमार शिंगटे, गोविंद मजावले, दिग्विजय देशमुख, किरण कदम आदींनी मदत केली. या शिबिरात भेट देणारे बबुसो माहुरकर, वामन (भाऊ) कामठे, विजय वढणे, रोहिदास कुंभार, पंकज धिवार, बबन (भाऊ) टकले, संदीप जगताप, संदीप राऊत, साकेत जगताप, भानू (काका) जगताप, गणेश होले, दिलीप झेडे, एम. के. गायकवाड, गौरव कोलते, रामभाऊ बोरकर, ईश्वर बागमार, शिवाजी साळुंखे, मनो हर (तात्या) जगताप, नवनाथ बोरावके, अरुण खेनट, विजय (बापू ) पोमण, दत्ता राऊत ,संजय टिळेकर, संजय (अण्णा) जगताप ,शंभू पोमण, शरयू शिवाजी पोमण (एमडी), धोंडीबा कटके, विनोद जगताप, सचिन वारघडे ,अरुण खेनट ,रामभाऊ झेंडे, गणेश मोरे, मिलिंद जाधव, सुहास पोमण, मुन्ना टिळेकर, पत्रकार बापू मुळीक, पत्रकार हनुमंत वाबळे आधी उपस्थित होते .रक्तदान केल्या नंतर चहा, केली, सर्टिफिकेट देऊन पाण्याचा जीआर सप्रेम भेट देण्यात आली. प्रास्ताविक ईश्वर बागमार यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय टिळेकर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन शिवाजी साळुंखे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments