मावळ मधील अधिकारी कर्मचारी निलंबनाच्या निषेधार्थ महसूल विभाग आक्रमक; तर महसूल कर्मचाऱ्यांचा सासवड मध्ये ठिय्या आंदोलन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात राज्य सरकारने चार तहसीलदार, चार मंडलअधिकारी व दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने, पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे, अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांचे मन्य ऐकून न घेता, त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आली असून, याचा निषेध करत जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बेमुदत काम आंदोलन सुरू केले आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुका आणि गाव पातळीवरील कामकाज ठप्प आहे, या आंदोलनात सुमारे अडीच हजार कर्मचारी अधिकारी सहभागी झालेले आहेत, या मागणीसाठी जिल्हा व राज्य महसूल कर्मचारी संघटनांनी सोमवारी दि. 15 डिसेंबर पासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन पुकारलेले आहे, या आंदोलनात सासवड येथील पुरंदर तालुक्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे, महसूल सहाय्यक, सहाय्यक महसूल अधिकारी तसेच नायब तहसीलदार आदी सहभागी झाले आहे. यासंदर्भात तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात सुमारे 90 हजार अनाधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याच्या प्रकरणात ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे, या प्रकरणात दोषी ठरवून चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी व दोन तलाठी अशा एकूण दहा जणांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केलेला असून, ते तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सासवड मधील पुरंदर तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सामूहिक रजेवर जात असल्याचे निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे .दुपारी साधारण साडेतीन नंतर सासवड येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून ,पुरंदर तहसील मधील महसूल कर्मचारी, संपामध्ये सहभागी झाले, निलंबन मागे घेईपर्यंत, आंदोलनात उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे व विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर यांच्या अधिपत्याखाली नायब तहसीलदार संघटना ,महसूल कर्मचारी संघटना, ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी संघटना, वाहन चालक संघटना, शिपाई संघटना आणि महसूल सेवक संघटना ,उपविभागीय कार्यालयात तील पुरंदर यांनी सुध्दा सहभाग या सर्व संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला आहे, या कारवाईमुळे महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकाऱ्यापासून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत नाराजी पसरलेली असून, भेटीचे वातावरणीय निर्माण झालेले आहे, त्यामुळे हे निलंबन तात्काळ रद्द करून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्व पदावर पदस्थापना देण्यात यावी, अशी मागणी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनेने महसूल मंत्र्याकडेही केलेली आहे ,याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांनाही देण्यात आलेले असून, यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम ,उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, तसेच निलंबन मागे घेईपर्यंत सोमवारपासूनच साधारणपणे सर्व अधिकारी व कर्मचारी सामूहिक रजेवर जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments