पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील खून प्रकरणातील दोघांना अटक सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील प्रेयसीच्या ,पतीला डोक्यात कोयत्याने वार करून, खून करून फरार झालेल्या दोघांना जेजुरी पोलिसांनी 24 तासाच्या आत मध्ये जेहरबद्ध केले ,आरोपीचे नाव सुशांत संदीप मापारी रा. माळशिरस ता. पुरंदर जिल्हा पुणे असे असून, दुसरा आरोपी विधी संघर्षित बालक आहे ,याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ,पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील दीपक जगताप यांचा एक महिन्यापूर्वी पायल कांबळे यांच्याशी प्रेम विवाह झाला होता, पायल हिचा पहिला प्रियकर सुशांत मापारी याने दीपक व पायल यांना मोबाईलवर फोन करून मला पायल बरोबर लग्न करायचे आहे, तुम्ही दोघांनी लग्न केले ,तुम्हाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती, दि. 13 रोजी सुशांत याने दीपकला पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील रामकाठी शिवारात बोलावून घेतले होते ,त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्गुण खून केला होता, यावेळी आरोपींच्या सोबत एक विधी संघर्षित बालकही उपस्थित होता, खून करून हे दोघेही पळून गेले होते, दि.14 रोजी खुणाची घटना उघडकीस आली, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके पाठवली होती, आरोपी यवत परिसरामधील असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे ,पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महेश पाटील पोलीस हवालदार ,अण्णा देशमुख, तात्यासो खाडे आधीच्या पथकाने आरोपींना जेरबद्ध केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments