Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामध्ये प्रिय करा कडूनच प्रेयसीच्या नवऱ्याचा वार करून निर्गुण हत्या सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील माळशिरस या ठिकाणी एका महिलेच्या पहिल्या प्रियकरांनी दुसऱ्याशी लग्न केल्याचा राग मनात धरून, तिच्या नवऱ्याचा कोयत्याने डोक्यात वार करून निर्गुण हत्या केल्याची घटना घडलेली असून, या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे, या घटनेमध्ये दिपक गोरख जगताप रा. राजेवाडी ता. पुरंदर यांचा खून झालेला आहे. तर आरोपी सुशांत संदीप मापारी रा. माळशिरस ता. पुरंदर मूळ रा. राहुरी ता. दौंड हा फरार झालेला आहे, या खुणाबाबत जेजुरी पोलीस आकडून मिळालेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील मयत दिपक जगताप याचा वाघापूर ता. पुरंदर येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी एक महिन्यापूर्वी प्रेम विवाह झाला होता, मयत दिपक जगताप हा उरुळी कांचन येथे खाजगी गॅरेजमध्ये नोकरी करीत होता, नोकरीच्या निमित्ताने लग्नानंतर सहा दिवसांनी तो पत्नीसह उरुळी कांचन येथे राहण्यास गेला होता, महिनाभर संसार सुरळीत चालू असताना, पायलचा प्रिय कर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाईलवर फोन आणि व्हाट्सअप कॉल करून, मी पायलशी लग्न करणार होतो, तुम्ही दोघांनी लग्न का? केले असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता याबाबत मयत दिपक ने आपल्या घरच्यांना ही माहिती दिली होती, दरम्यान, दि. 13 डिसेंबर रोजी मयत दिपक पायल सह राजेवाडी येथे आला पायल हिला घरी सोडून सुशांत मापारी सतत कॉल करून पायल चा मोबाईल माझ्याकडे आहे तो घेऊन जा, तसेच लग्नाचा वाद मिटवून टाकू, असे सांगत असल्याने, त्याला भेटून येतो, असे सांगून माळशिरस येथे गेला असता ,माळशिरस गावच्या हद्दीमध्ये रामकाठी शिवारात दिपकला बोलावून घेतले, याच ठिकाणी आरोपीने दिपकच्या डोक्यात मानेवर धारदार कोयतेने वार करून, त्याचा खून केला व कोयता जागेवरच टाकून आरोपी पसार झाला, दिपक जगताप घरी न आल्याने, आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने, नातेवाईकांनी शोध घेतला असता, माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्ता अवस्थेमध्ये दिपक चा मृतदेह आढळून आला, खून केला कोयता टाकून आरोपी प्रसार झाला, माळशिरस गावच्या हद्दीत रामकाठी शिवारात दिपकला बोलावून घेतले, याच ठिकाणी आरोपीने दिपकच्या डोक्यात मानेवर धारदार कोयत्याने वार करून, त्याचा खून केला व कोयता जागेवरच टाकून, आरोपी पसार झाला. दिपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी आढळून आल्या, याबाबतची फिर्याद मयत दिपकचे मामा संतोष शेंडकर राहणार चाबळी ता. पुरंदर यांनी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये ही माहिती दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments