एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ होम सायन्स ,एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे शैक्षणिक वर्ष २०२४–२५ साठीचा पदवी वितरण समारंभ दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या समारंभाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच याप्रसंगी डॉ. संजय नेरकर संचालक (परीक्षा व मूल्यमापन मंडळ, एसएनडीटी महिला विद्यापीठ), डॉ. पौर्णिमा मेहता (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य), डॉ. सुरेंद्र निरगुडे, (राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य), प्रा. सुभाष पाटील (विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग), प्रा. संगीता शिरोडे (प्राचार्य एसएनडीटी शिक्षणशास्त्र महाविद्यालय) संतोष परदेशी व प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण, प्राचार्य एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ होम सायन्स पुणे तसेच विविध संस्थांचे प्रमुख, शिक्षक, पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, संशोधन व नवोन्मेषाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.डॉ. करमळकर यांनी होम सायन्स अभ्यासक्रमाचे विशेष कौतुक करताना हे स्पष्ट केले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधीपासूनच गेली 58 वर्षे एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स पुणे मध्ये इंटर डिसिप्लिनरी व मल्टी डिसिप्लिनरी असे विद्यार्थिनी उपयोगी अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत.महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स तसेच फूड सायन्स विभागाच्या विद्यार्थिनी यशस्वीपणे काम करत असल्याबद्दल प्रशंसा केली. पदवी विभागाच्या ह्युमन डेव्हलपमेंट, हुमन इकॉलॉजी अँड कंजूमर सर्विसेस इंटिरियर स्पेस डिझाईन ,टेक्सटाईल सायन्स अँड अपरल डिझाईन हे अभ्यासक्रम सुद्धा व्यवसायभिमुक व करिअर साठी उपयुक्त असल्याचे नमूद केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी महाविद्यालयाचे अकॅडमिक, संशोधन, प्रकाशन, बौद्धिक संपदा अधिकार, अभ्यासपूरक व अभ्यासेत्तर उपक्रम, विद्यार्थिनी व शिक्षकांची संपादनूक याबाबतच्या कार्याची माहिती दिली. एकंदरीतच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वासाठी महाविद्यालय करीत असलेले उपक्रम याबाबत माहिती दिली. याबरोबरच चेतना मार्फत महाविद्यालयात चालवल्या जाणाऱ्या विविध कोर्सेसची उपयुक्तता सांगितली, तसेच महाविद्यालयातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कलारीपट्टू हा स्वसंरक्षणासाठी अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम अशाच कोर्सेसच्या माध्यमातून पूर्ण केला गेल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय नेरकर यांनी एस.एन.डी.टी विद्यापीठातील एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स हे एक महत्त्वपूर्ण व सतत नाविन्यपूर्ण उपक्रम अभ्यासक्रम राबवणारे महाविद्यालय असल्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनी, पालक, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments