Hot Posts

6/recent/ticker-posts

संविधान दिनानिमित्त पुरंदर तालुक्यातील माध्यमिक शाळांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकांची भेट सासवड पतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय संविधान दिन,याच पवित्र दिनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव आणि पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उरसळ यांचा वाढदिवस अत्यंत अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.भारतीय लोकशाहीची मुलतत्त्वे, नागरिकत्वाचे मूल्य आणि संविधानिक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांच्या वतीने व गुरुकुल करिअर अकादमीचे संस्थापक अध्यक्ष संदीप टिळेकर यांच्या सौजन्याने पुरंदर तालुक्यातील माध्यमिक शाळांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकांची भेट देण्यात आली.उद्देशिका म्हणजे भारतीय संविधानाचा हृदयस्पंदन.स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या चार आधारभूत मूल्यांची ओळख शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.सतीश उरसळ यांच्या मतानुसार“संविधान समजून घेणारी पिढी घडली, तर समाजात लोकशाहीची मुळे अधिक दृढ होतील.”या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित नंदकुमार सागर सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सतीशराव उरसळ याना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने शुभेच्छा देऊन “विद्यार्थ्यांना संविधानाची उद्देशिका देणे म्हणजे त्यांना जबाबदार नागरिकत्वाची पहिली गुरुकिल्ली देणे होय. हे पवित्र कार्य वाढदिवस आणि संविधान दिन या दोन महत्त्वपूर्ण दिवसांच्या संगमाने अधिक अर्थपूर्ण झाले आहे.”त्यांनी शिक्षणातील मूल्यांचे महत्त्व, शिक्षकांची भूमिका आणि संविधानिक विचारांच्या प्रसाराचे महत्व अधोरेखित केले.या प्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे,सेकंडरी सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते वसंतराव ताकवले,शिक्षक लोकशाही आघाडीचे तानाजी झेंडे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामप्रभु पेटकर,शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष शिवहार लहाने,माजी तालुकाध्यक्ष प्रल्हाद कारकर,सेवानिवृत्त संघटनेचे दिलीप पापळ,मुख्याध्यापक प्रदीप दुर्गाडे,कमलाकर कापडने,सुरवसे सर,चौरंगनाथ कामथे,हिरामन सहारे,अर्जुन शेंडगे तसेच पुरंदर तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.सतीश उरसळ यांना प्राप्त असलेला शिक्षणक्षेत्रातील मान आणि सर्वांनी व्यक्त केलेले कौतुक यामुळे कार्यक्रम अधिक ऊर्जित झाला.पुरंदर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिका भेट स्वरूपात देण्यात आल्या.शाळांच्या ग्रंथालयात, सभागृहात तसेच विद्यार्थ्यांच्या हातात या उद्देशिका पोहोचवल्या गेल्या.शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की, विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये समजावून सांगताना या उद्देशिका एक महत्त्वाचा संदर्भ स्रोत ठरणार आहेत.सतीश उरसळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरंदर तालुक्यात राबविण्यात आलेला हा उपक्रम हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर संविधानाच्या मूल्यांची पेरणी, लोकशाहीची जागरूकता आणि जबाबदार नागरिक घडविण्याची सुरूवात होती.

Post a Comment

0 Comments