Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात 16 जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रे पहिल्या दिवशी निरंक असून, 17 जानेवारी रोजी सुध्दा निरंक; फक्त तीन वाजेपर्यंत आज अखेर एकूण 160अर्जाची विक्री          सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक साठी आज फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असता, जमा करण्यासाठी तीन वाजेपर्यंत आज निरंक असून, परंतु तीन वाजेपर्यंत 87 +73= 160अर्जाची आज विक्री झाली असून, तालुक्या मध्ये जिल्हा परिषदेचे चार गट व आठ गण आहेत, यामध्ये प्रामुख्याने 16 ते 20 जानेवारी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत वेळ असणार आहे, तर 21 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत वेळ असणार आहे. रविवारी या दिवशी 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने, नाम निर्देशन पत्र देण्यात येणार नाहीत, तर अर्जाची छाननी 22 जानेवारी सकाळी अकरा वाजले पासून ते उमेदवारी माघारीची अंतिम मुदत, 27 जानेवारी दुपारी 3, अंतिम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप 27 जानेवारी दुपारी 3, नंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत, तर मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 पासून, नवीन प्रशासकीय इमारत येथे प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी दिली. अनामत रक्कम उमेदवार सर्वसाधारण जिल्हा परिषद 1,000 रुपये ,पंचायत समिती 7,00 रुपये, अनुसूचित जाती जिल्हा परिषद 5,00 रुपये, पंचायत समिती 3,50 रुपये. अनुसूचित जमाती जिल्हा परिषद 5,00 रुपये, पंचायत समिती 3,50 रुपये. नागरिकांचा मागास प्रवर्ग जिल्हा परिषद 5,00 रुपये, पंचायत समिती 3,50 रुपये अनामत रक्कम असणार आहे. खर्चाची मर्यादा पुणे जिल्ह्यासाठी 75 चे जिल्हा परिषदे करिता 9,00,000 रुपये, पंचायत समिती करता 6,00,000 रुपये खर्च मर्यादा आहे ,एकूण मतदान केंद्र 2,35 असून, पुरुष मतदार 95, 271, महिला  मतदार 94,129 इतर मतदार 03 एकूण मतदार संख्याची 1,89,403 आहे, अशी माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी तहसीलदार विक्रम राजपूत यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली तर सोमवार पासून गर्दी वाढणार असून चांगलीच रंगत येणार आहेत.

Post a Comment

0 Comments