पुरंदर तालुक्यामध्ये भाजपाची स्वबळावर लढण्याची भूमिका:शेखर वढणे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर मधील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण स्वबळावर लढवण्याचा वरिष्ठ निर्णय पातळीवर घेतला जाणार असून, त्या दृष्टीने तालुका स्तरावर तयारी पूर्ण करण्यात आली आहे ,अशी माहिती भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी ही पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या ताकतीने लढवणार आहे, त्या अनुषंगाने शुक्रवारी दिनांक 16 रोजी पक्ष कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या ,महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या मोठ्या विषयाबद्दल माजी आमदार संजय जगताप यांनी सर्व विजयी उमेदवाराचे तसेच मतदारांचे आभार मानले.भाजप देशात क्रमांक एकचा पक्ष असून, पुणे जिल्ह्यातही पक्षाने भक्कम स्थान निर्माण केले आहे, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवून चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण मोठ्या ताकतीने जिंकून आणून, असा विश्वास माजी आमदार व भाजप नेते संजय जगताप यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे माजी माजी आमदार संजय जगताप ,माजी आमदार अशोक टेकवडे,जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे ,युवा नेते सचिन लंबाते, शैलेश तांदळे, संभाजी काळाणे, गिरीश जगताप यांच्यासह पुरंदर तालुका भाजपाचे सर्व पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments