श्रीक्षेत्र वीर मध्ये पारंपारिक मारामारी (रंगशिंपण) सोहळा उत्साहात साजरा'सवाई सर्जाचा जयघोष' वीर नगरीत दुमदुमला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मानाच्या काठ्या पालख्या मंदिरात उपस्थित 12 वा कोडित गावची काठी व पालखी प्रस्थान नंतर बाकी पालखीची काठीची उपस्थिती सकाळपासूनच भाविकांचा गुलाल खोबरे उधळून “सवाई सर्जाच चांगभल” चा जयघोष चालू होता. कोडीतची मानाची पालखी देऊळवाड्यात आली त्यापाठोपाठ कन्हेरी, वाई, सोनवडी , भोंडवेवाडी, राजेवाडी, कसबा पुणे या पालख्या ढोल ताशाचा गजरात अब्दागिरी, निशाण, छत्री, डोलारा, दागीनदार यांच्यासह मंदिरात दाखल झाल्या. देऊळवाड्यात तात्या बुरुंगले , दादा बुरुंगले यांच्या भाकनुकीचा कार्यक्रम होऊन दीड वाजता देवाचे मानकरी जमदाडे यांचेमार्फत रंगाचे शिंपण करण्यात आले. देवाचा रंग अंगावर घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी केली अनेकांचा जनसमुदाय उसळला होता,नंतर तिसरी फेरी झाल्यानंतर 3 वा. मानकरी मुळीक परिवारकडून बगाडाला धार पाडण्यात मानकरी रामदास मुळीक, कृष्णा मुळीक,सचिन मुळीक, गणेश मुळीक बगाडाचे मानकरी वीर येथील व पत्रकार बापू मुळीक,नितीन मुळीक वीर पिसे येथील मानकरी पुरुष महिला मंडळ आदी उपस्थित होते राजेंद्रसिह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार कदम, पोलीस निरीक्षक सासवड यांनी एक दिवस आधीच आज उसळणाऱ्या गर्दीबाबत विश्वस्त मंडळ सोबत बैठक घेऊन सुचना व नियोजन केले होते. उपविभागीय अधिकारी तथा प्रांत varsha लांडगे, विकम राजपूत तहसिलदार यांनी सुध्दा प्रशासकीय सहकायॅ केले. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांनी सर्व सहकारी विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, यात्रा नियोजन व समितीचे सदस्य, सरपंच व ग्रामस्थ, प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेसमवेत यात्रा सुव्यवस्थित पार पडण्यासाठी प्रयत्न केले. व केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments