Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण काय ? तर तालुक्यातील पंचायत समिती सभापती आरक्षणाची स्थिती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ,पुणे जिल्ह्यामधील 13 पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सन 2025 सालाकरिता आरक्षण ऑक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात आले होते ही, अधिसूचना महाराष्ट्र शासन यांच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून, महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण व निवडणूक नियम 1962 अन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती सह तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे, दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार आणि दिनांक 9 ऑक्टोंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या सोडतीनुसार, पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती यांच्या सभापती पदाचे आरक्षण मध्ये पुरंदर मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग हे सभापती पदासाठी आरक्षण आहे ही अधिसूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत, त्यामुळे आता संबंधित तालुक्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग प्रचंड आला आहे, आगामी पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार कडून, तयारीला सुरुवात झालेली आहे.

Post a Comment

0 Comments