एसपीपीयू स्टार्टअप बूटकॅम्प २०२६ उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पीडीईएचे सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयु) आणि वाधवानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एसपीपीयू स्टार्टअप बूटकॅम्प २०२६ चे आयोजन दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. या दोन दिवसीय उपक्रमामध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण विचारांची ओळख करून घेतली.कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने झाली. प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी स्टार्टअप व उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून डॉ. पंडित शेलके, प्राचार्य, वाघिरे कॉलेज, सासवड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नवकल्पना आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले.या बूटकॅम्पमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देविदास गोल्हार, संचालक – इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेंजेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच सदस्य – एनईपी टास्क फोर्स, महाराष्ट्र शासन यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक विचारांना आव्हान देण्याचे आणि अपयशाला शिकण्याची संधी म्हणून स्वीकारण्याचे महत्त्व सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.बूटकॅम्पच्या दुसऱ्या दिवशी डॉ. संतोष दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी,संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग ,एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी ,लोणी काळभोर, महाराष्ट्र यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच डॉ. गणेश निगडे, सहाय्यक प्राध्यापक व इनोव्हेशन अॅम्बेसेडर, पीडीईएचे एस.जी.आर.एस. कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड यांनी विद्यार्थ्यांना व्हेंचर आयडिया डेव्हलपमेंट, बिझनेस मॉडेल तयार करणे आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये याबाबत मार्गदर्शन केले.या बूटकॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी व्हेंचर निर्मिती, बिझनेस मॉडेल डेव्हलपमेंट आणि यशस्वी स्टार्टअप उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उद्योजकीय कौशल्यांवर प्रत्यक्ष सराव केला. संवादात्मक आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कौशल्ये आत्मसात करण्याची आणि प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव मिळवण्याची संधी मिळाली.या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. स्मिता देशमुख व डॉ. गणेश निगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार यांनी आभार प्रदर्शन केले. या यशस्वी उपक्रमासाठी आयोजक संस्थेने वाधवानी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे मोलाचे सहकार्य व पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments