पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे अखेर अजय इंगळे माळशिरस बेलसर गटाचे व वीर भिवडी गटाचे हरिभाऊ लोळे भाजपचे नव नियुक्त उमेदवार शिलेदार पुरंदरचे ठरलेच सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: माळशिरस बेलसर जिल्हा परिषद गटात अत्यंत चुरशीची लढत ठरत, हायव्होल्टेज अशी लढत चुरशीची पाहायला मिळाली मतमोजणीच्या वेळी विविध टप्प्यावर विविध पक्षांच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने, समर्थकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या जल्लोष हा करण्यात आला, निवडून येण्याच्या अगोदर हा पुढे, तो पुढे, यामध्ये तर प्रामुख्याने अखेरच्या टप्प्यामध्ये तर भाजपचे अजय इंगळे यांनी निर्णय आघाडी अशी घेत विजयावर शिक्का मुहूर्त केले, अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव कोलते यांनी आघाडी घेतल्याने, त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला होता, दत्ता झुरंगे व अमोल कामथे यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी आघाडी घेतल्याने, जल्लोष साजरा करण्यात आला होता, परंतु याला अपवाद हा फक्त माळशिरस बेलसर गटाचे शिलेदाराचा मान हा फक्त अजय इंगळे यांनी अखेरच्या क्षणी टप्प्यामध्ये पार केला, काही अति उत्साही वातावरणामध्ये विजयाचे स्टेटसही पोस्ट केले होते, त्यानंतर बेलसर गणातील मतमोजणीला सुरुवात होताच काँग्रेसचे उमेदवार दत्ता झुरंगे यांनी आघाडी घेतली होती ,यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता, त्यासाठी अंतिम फेरीत भाजपचे अजय इंगळे यांनी जोरदार मुसंडी मारत 1,424 मतांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला व बेलसर माळशिरस या गटाचे शिलेदार म्हणून बनण्याचा मान मिळवला, माळशिरस गणातून अंतिम फेरीतून माऊली यादव यांनी जोरदार मुसंडी मारत प्रामुख्याने 1,595 मतांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला, वीर भिवडी जिल्हा परिषद गटातील लढत हाय व्होल्टेज बनली असताना, मतमोजणीच्या वेळी विविध टप्प्यावर प्रामुख्याने भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यातच आघाडी चित्र पाहायला मिळाले, त्यामुळे अखेरच्या टप्प्यांमध्ये वीर भिवडी गटातून भाजपचे हरिभाऊ लोले यांनी जोरदार मुसंडी मारली 5,57 मताने आघाडी घेत विजय प्राप्त केला, तर वीर भिवडी हाय व्होल्टेज गट बनलेला अखेरच्या टप्प्यामध्ये गटाचे मानकरी हरिभाऊ लोळे हेच अखेर ठरले, तर भिवडी गणातून अंतिम फेरीतून अखेरच्या टप्प्यातून सायली शिंदे यांनी प्रतिस्पर्धीवर मात करत 8,71 मतांनी आपला विजय प्राप्त केला, वीरगणातील निकाल तर अखेरच्या टप्प्यामध्ये सुधीर आप्पा धुमाळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करून, त्या ठिकाणी अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गट प्रवीण जगताप वीर गणातून 1,49 मतांनी विजय प्राप्त केला ,या ठिकाणी भाजपची घोर निराशा झाली, तर बेलसर गणातील भाजपचे उमेदवारी देताना गणित चुकले ,कारण या ठिकाणी युवक वर्गाला जर स्थान दिले असते ,तर नक्कीच बदल झाला असता, बेलसर गणामध्ये विजय प्राप्त करत असता, परंतु भाजपच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला म्हणून ,युवक वर्गाला उमेदवारी न दिल्यामुळेच येथे फटका बसला हाच निकालातून स्पष्ट भूमिका दिसत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments