श्री शेत्र वीर याठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांचा यात्रा उत्सव यावर्षीचा संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र वीर तालुका पुरंदर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी हे अत्यंत जागृत असे तीर्थक्षेत्र असून, या ठिकाणी महाराष्ट्रातील इतर भागातून सुद्धा भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात, हा वीरचा यात्रा सोहळा पुरंदर तालुक्यातील बारा दिवसाचा मस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांचा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला. काशी खंडाचे काळभैरवनाथ श्रीनाथ म्हस्कोबा हे राऊत यांच्या शेतामधील बारा बैलांचा नांगर चालू असताना, प्रकट झाले असताना, अशी आख्यानक्य आहे, तर देव भाविक भक्ता बरोबरच गाईगुरांचे संरक्षण करत असतात, असेही मानले जाते, यात्रेची लगबग ही मागे पौर्णिमेच्या आठवडाभर आधीच सुरू होत असते, देवाचे मानकरी समजत $राऊत परिवार यांच्या वतीने देवाच्या मानाचा पोशाख, बाशिंग यांची खरेदी केली जाते, राऊतवाडी येथून देवाच्या मानाची हळद ढोल, ताशाच्या गजरामध्ये मानाचे निशाण, निर्वत देऊळ वाड्यामध्ये आणण्यात येत असते, राऊत परिवारातील सुवासिनींनी सर्वप्रथम देवांना हळद लावली जाते, यावेळी वीर पंचक्रोशीतील अनेक माता भगिनींची देवांना हळद लावण्यासाठी उपस्थिती असते वाद्यपौर्णिमेला मध्यरात्री देवाचा विवाह सोहळा संपन्न होत असतो, गावाच्या मानाच्या काठ्या पालख्या वीर मध्ये येत असतात, पंचमीला देवाची अमृतवाणी म्हणजेच भाकणूक अमृतवाणी होत असते, वर्षभराचे पीक पाण्याचे भाकीत कमल सिद्धनाथ यांच्या वारसदाराच्या वतीने तात्या बुरुंगले व दादा बुरुंगले हे करत असतात, मारामारी म्हणजेच रंग शिंपण सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असतो, राऊत मानकर यांचा भाचा समस्त जमदाडे मानकरी यांच्या वतीने देवावर व सर्व भक्तावर रंगाची शिंपण करून, यात्रेची सांगता करण्यात येत असते, देवाचा रंग अंगावर घेण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात, अनेकांचा जनसमुदाय हा या ठिकाणी उसळलेला दिसून येत आहे, नंतर तिसरी फेरी झाल्यानंतर, तीन वाजता बाहेर त्या ठिकाणी मानकरी मुळीक परिवाराकडून बगाडाला धार पाडण्यात येते, मानकरी रामदास मुळीक, कृष्णा मुळीक, सचिन मुळीक, गणेश मुळीक बगडाचे मानकरी वीर येथील असून, तर पत्रकार बापू मुळीक पिसे येथील असून, नितीन मुळीक वीर येथील असून, पिसे, वीर येथील मानकरी, पुरुष, महिला मंडळ आधी यावेळी उपस्थित होते, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे, विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर यांच्या प्रशासकीय आदेशानुसार, बाहेरील बगाडा शेजारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर ,कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड याच्या अधिपत्याखाली बगाडा शेजारी आठ पोलीस बंदोबस्त लावून त्या ठिकाणचे आलेले भाविक ,भक्त कांना त्या ठिकाणी नम्रपणे सूचना देऊन, त्या ठिकाणी मुळीक लोकांच्या बगडाला धार पाडण्याच्या वेळी दोन तास अगोदर त्या ठिकाणी पूर्णपणे गर्दी हटवून जागा मोकळी करून दिली होती, यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मोहन राव धुमाळ, व्हाईस चेअरमन अमोल धुमाळ व सर्व विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, यात्रा नियोजन व समितीचे सदस्य, सरपंच व ग्रामस्थ प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत यात्रा सुव्यवस्थित पार प पाडण्यासाठी मनापासून खूप प्रयत्न केले ,बगाडाचे मानकरी असणारे मुळीक परिवाराकडून प्रशासकीय अधिकारी व पोलीस खात्यांच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले, वीर या ठिकाणी शुक्रवार या दिवशी 13 फेब्रुवारी रोजी गादी पूजन करण्यात आले, तर महाशिवरात्र रविवार या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी संपन्न भक्ती भावाच्या रूपामध्ये होणार आहे, तर 17 फेब्रुवारी रोजी माध्य अमावस्या मंगळवार या दिवशी संपन्न होणार असल्याचे देवस्थानचे मुख्य विश्वस्त मोहनराव धुमाळ यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments