पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार पैकी दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तर दोन भाजपला जिल्हा परिषदेच्या जागा पंचायत समितीच्या आठ गणा मधील चार राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडे तर दोन भाजपला आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडे दोन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर मधील जिल्हा परिषद गटामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपले गड हे कायम राखलेले असून, दोन्ही पक्षांना प्रत्येकी जि.परिषद दोन जागा मिळालेल्या आहेत तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले आहे पंचायत समितीमधील राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आहेत, भाजपला दोन तर शिवसेनेला दोन जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत, गराडे जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली अमोल झेंडे यांना 21,768 मते मिळवत दणदणीत विजय मिळवलेला आहे, विरोधातील भाजपच्या दिव्या संदीप जगदाळे यांना 7, 750 मते मिळाली आहेत, तर झेंडे यांनी तब्बल 14, 018 मतांनी विजयी नोंदवला आहे, बेलसर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे अजय कैलास इंगळे यांनी 7,597 मते घेत विजय मिळवलेला आहे, काँग्रेसचे दत्ता झुरंगे यांना 6,153 मते मिळाली आहेत, इंगळे यांनी 1,444 मतांनी विजयी प्राप्त केलेला आहे, वीर जिल्हा परिषद गटामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली असताना, भाजपचे हरिभाऊ लोळे यांनी 11,591 मते मिळवत विजय मिळवलेला आहे ,तर शिवसेनेचे समीर जाधव यांना 11, 041 मते मिळाली आहेत, लोळे यांनी केवळ 5,50 मतांनी विजयी प्राप्त केलेला आहे, निरा जिल्हा परिषद गटामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांनी 13,449 मते मिळवत बाजी मारली असून, तर शिवसेनेच्या भारती अतुल मस्के यांना 7,785 मते मिळाली आहेत, दुर्गाडे यांनी 5,664 मताची भक्कम अशी आघाडी घेत विजय प्राप्त केलेला आहे, तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गड राखले असून, वीर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे प्रवीण बाळासो जगताप यांनी 5,921 मते मिळवत विजय प्राप्त केलेला आहे, त्यांचे प्रतिस्पर्धी सुधीर शिवाजीराव धुमाळ यांना 5,762 मते मिळाली असून, जगताप यांनी 1,59 मताची आघाडी घेतली असून, तसेच भिवडी पंचायत समिती गणांमधील भाजपच्या सायली मनोज शिंदे यांनी 6,766 मते मिळवत विजय प्राप्त केलेला आहे, त्यांच्या प्रतिस्पर्धी पूजा सागर मोकाशी यांना 5,912 मते मिळाली असून, शिंदे यांनी 8,54 मताची आघाडी घेतली आहे, दिवे पंचायत समिती गणामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भाऊसाहेब झेंडे यांनी 13,444 मते मिळवत मोठा विजय प्राप्त केलेला आहे, शिवसेनेचे बाळासाहेब दगडू मगर यांना केवळ 3,250 मते मिळाली झेंडे यांनी 10,194 मताची विक्रमी आघाडी घेतली आहे. गराडे पंचायत समिती गणांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना ज्ञानेश्वर कटके यांना 8,030 मते मिळून विजय प्राप्त केलेला आहे, शिवसेनेच्या सुप्रिया विशाल रावडे यांना 4,791 मते मिळाली कटके यांनी 3,239 मतांची आघाडी घेतली आहे, माळशिरस पंचायत समिती गणांमधील भाजपचे माऊली आप्पा यादव यांना 4,585 मतांनी विजय मिळवला, शिवसेनेचे शरद बाळासो यादव यांना 3,240 मते मिळाली यादव यांनी 1,345 मताची आघाडी मिळवून विजय प्राप्त केलेला आहे, बेलसर पंचायत समिती गणांमधील शिवसेनेचे माणिक बाळासाहेब निंबाळकर यांना 4,783 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश कृष्णा जगताप 4, 257 यांचा 5,26 मतांनी पराभव केला कोळविहीरे पंचायत समिती गणांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता संतोष निगडे यांना 5,708 मते मिळवत शिवसेनेच्या शीतल सतीश साळुंखे यांचा 1, 057 मतांनी पराभव केला, साळुंखे यांना 4,651 मते मिळाली, नीरा पंचायत समिती गणा मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका स्वप्निल कांबळे यांना 6,109 मते मिळवत विजय प्राप्त केलेला आहे, भाजपच्या वंदना बाळासाहेब भोसले यांना 3,141 मते मिळाली कांबळे यांचा 2,168 मतांनी विजयी प्राप्त केलेला आहे, या निवडणुकीमध्ये पंचायत समिती स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, जिल्हा परिषदेमध्ये भाजपने महत्त्वाच्या गटावर विजय मिळवत प्रभाव आपला कायम ठेवलेला आहे, शिवसेनेला काही गणामध्ये यश मिळाले असले तरी, अनेक ठिकाणी कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागल्या कारणाने शिवसेना शिंदे गटाची पुरंदर मधील पंचायत समिती हातून गेलेली आहे, तर जिल्हा परिषदेमधील सुद्धा पुरंदर मधील वर्चस्व शिवसेनेचे झिरो झालेली आहे, तर पुरंदर मधील पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा निकाल हा दिवंगत अजितदादांच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी यशस्वी झालेला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने भाजपने सुद्धा जिल्हा परिषदेवरती आपले व पंचायत समिती वरती आपले वर्चस्व आपल्या स्थितीमध्ये कायम चांगले राखले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments