Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रशासनाच्या वतीने जयंत तयारी; तर सोमवारी या दिवशी पासून सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात सासवड प्रतिनिधी बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी दिनांक सात रोजी मतदान पार पडले, पुरंदर तालुक्यातील 68.32% मतदान झाले ,पुरुष मतदान 67, 997 महिला 61,408 एकूण 1,29,405 असून, 68.32 टक्केवारी झालेली आहे, मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष हे मतमोजणीकडे लागलेले आहे, ही मतमोजणी सोमवार या दिवशी सकाळी दहा वाजता सुरू होणार असून ,पुरंदरची प्रशासकीय इमारत पुरंदर या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर एकाच वेळी होणार आहे, मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केलेली आहे प्रत्येक मतमोजणी केंद्रावर हा कडेकोट पोलीस बंदोबस्त हा तैनात केलेला आहे, सीसीटीव्हीच्या देखरेखी खाली मतमोजणी ही होणार आहे,उमेदवारांची प्रतिनिधी ,निवडणूक कर्मचारी व माध्यम प्रतिनिधी साठी स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निकालाबाबत राजकीय वातावरण हे सध्या तरी खूपच तापलेले आहे, प्रमुख पक्षासह अपक्ष उमेदवारांची भवितव्य हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे, तर प्रामुख्याने पुरंदर तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, शिवसेना उंबाटा, आप आदमी ,अपक्ष यात चुरशीची अशी त्रिकोणी व चौरंगी लढत होत आहे, त्यामुळे मतदान झाल्यानंतर रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून, पुरंदर तालुक्यात सर्वत्र ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ता हा आमच्याच उमेदवार हा निवडून येणार आहे, असा उल्लेख करत आहेत, त्यामुळे निकालाबाबत सध्या तरी उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली आहे, यंदाच्या निवडणुकीमध्ये भावनिक अशी छाया दाखवण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण भावनिक झाले होते, त्यांचा मतदारावर किती परिणाम होतो हे पहावे लागेल, ते प्रामुख्याने आज सोमवारीच स्पष्ट होणार आहे, मतमोजणीसाठी प्रथम टपाली मतदानाची त्यानंतर ईव्हीएम मधील मताची मोजणी करण्यात येणार आहे, प्रत्येक फेरीचा निकाल हा अधिकृतरित्या जाहीर केला जाणार आहे ,निकालानंतर विजय मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आलेली आहे ,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रांत वर्षा लांडगे यांनी ही माहिती दिली. अनुचित प्रकार घडूनही या करता प्रशासनाच्या वतीने कडक अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आलेले आहे, सोमवारी दुपारपर्यंत पुरंदरचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता असून, सत्ता समीकरण कोणाच्या बाजूने झुकते, याकडे सध्या तरी पुरंदरच्या बाबतीत विद्यमान आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, पीडीसी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे माझी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे या सर्वांच्या पक्षाकडे महाराष्ट्रभर, जिल्हा ,तालुका भर लक्ष लागून राहिलेले आहे, याबाबत प्रशासनाची यासाठी संपूर्ण जयंत तयारी मतमोजणीसाठी झालेली आहे, अशी निवडणूक निरीक्षक विशाल नरावडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम राजपूत व अति सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी पुरंदर प्रणोती श्रीमाळ यांनी सविस्तर माहिती ही प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments