Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from January, 2026Show All
सासवड येथे एनएसएस विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न                                                                       सासवड : बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                पुणे जिल्हा शिक्षण संस्थेच्या सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथील राष्ट्रीय सेवा योजना  (एन एस एस) विभागाच्या वतीने १८ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत सुपे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे येथे विशेष हिवाळी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर राष्ट्रीय सेवा योजना – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने राबविण्यात आले.“युवक, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन व पडीक जमिनीचा विकास – शाश्वत विकासासाठी” या विषयावर आधारित या सात दिवसीय शिबिरात एकूण ५० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, प्लास्टिक संकलन, जलसाक्षरता, आरोग्य तपासणी, औषधांविषयी जनजागृती, विविध सर्वेक्षणे, पथनाट्य व ग्रामजागृती उपक्रम राबविण्यात आले.शिबिराच्या पहिल्या दिवशी गाव परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. तिसऱ्या दिवशी बजाज पुणे ग्रँड सायकल टूर २०२६ निमित्त प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. चौथ्या दिवशी कालबाह्य औषधांचे दुष्परिणाम, योग्य औषधवापर व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन याविषयी घरोघरी सर्वेक्षण व प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. पाचव्या दिवशी स्वयंसेवकांनी बजाज पुणे ग्रँड सायकल टूर २०२६ दरम्यान स्वयंसेवक म्हणून सेवा बजावली.सहाव्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच ग्रामस्थ व स्वयंसेवकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेवटच्या दिवशी शिबिराचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी स्वयंसेवकांनी आपले अनुभव व्यक्त केले आणि पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.शिबिरादरम्यान योग, जलसाक्षरता, ग्रामविकास, महिलांचे स्वसंरक्षण, उद्योजकता व कृषी प्रक्रिया उद्योग या विषयांवर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, शिस्त आणि ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव निर्माण झाला.या शिबिराचे समन्वयक म्हणून प्रा. सुमित मुसळे, प्रा. हनुमंत पाटील व प्रा. प्रशांत गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच सुपे खुर्द गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले.
राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रि क निवडणुका मतदानाची दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी तर मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026रोजी                                                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         राज्य निवडणूक आयोगाचे संदर्भातील अनुक्रमांक 2 समोरील 13.1.2026 रोजीच्या पत्रान्वये राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, सदर निवडणूक कार्यक्रमांनुसार संबंधित जिल्हा कार्यालयांनी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी मागे घेणे ,आणि चिन्ह वाटपा नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदान,मतमोजणी व निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे, हे टप्पे पार पडणे शिल्लक आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2026 च्या पुढे दोन आठवडे ची मुदत दिलेली आहे, मात्र दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे, राज्य शासनाने संदर्भातील अनुक्रमांक 3 समोरील 28 जानेवारी 2026 रोजीच्या बिनतारी संदेश नावे राज्यात दिनांक 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत राज्यस्तरावरील दुखावटा जाहीर केला आहे, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उपरोक्त परिच्छेदातील नमूद कालावधीमध्ये प्रचार करणे सोयीचे होणार नसल्याचे परिणाम, मतदान व मतमोजणी इत्यादी निवडणूक टप्पे निश्चित केलेल्या दिनांकात पार पाडणे, शक्य होणार नाही, उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, महाराष्ट्र जिल्हा परिषदा मतदार विभाग आणि निवडणुका घेणे नियम 1962 तसेच महाराष्ट्र पंचायत समिती निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे नियम 1962 यामधील अनुक्रमे नियम 11(2 अ) आणि नियम 13 (3) मधील तरतुदीनुसार 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा परिच्छेद 1 मध्ये नमूद केलेल्या उर्वरित टप्प्यांचा निवडणूक कार्यक्रम नव्याने देणे आवश्यक झाले आहे, तरी या सोबतच्या परिशिष्ट 1 अनुसार सुधारित निवडणूक कार्यक्रम देण्यात येत असून, जिल्हाधिकारी यांनी सदर निवडणूक कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात यावा, तसेच जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करून, सदर कार्यक्रमास आवश्यकतेनुसार व नियमाप्रमाणे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू असून, निवडणुकीचा निकाल घोषित होईपर्यंत, अमलात राहील तसेच राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे जिल्हाधिकारी यांनी पालन करावे, सदरचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, राज्य निवडणूक आयोगाचे ,संकेतस्थळ व ई-मेल आयडी पुढील प्रमाणे आहे संकेतस्थळ: https:// mahasec. maharashtra. gov. in ई-मेल :sec.zpp@mah.gov.in जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची दिनांक 31 जानेवारी 2026 शनिवारपासून, मतदानाची दिनांक 7 फेब्रुवारी 2026 शनिवार सकाळी 7:30 ते संध्याकाळी  5:30 पर्यंत मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 सोमवार या दिवशी सकाळी दहा पासून पुढे तर निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे दिनांक 11 फेब्रुवारी 2026 बुधवार पर्यंत या संदर्भातील माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार सुरेश काकांणी सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी ही सर्व माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन बारामती जवळ विमान अपघात; तर महाराष्ट्रभर शोककळा राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण                                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेते अजित अनंतराव पवार यांचे मंगळवारी दि. 28 रोजी बारामती जवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन असे झाले असून, राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे, प्राप्त माहितीनुसार अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना, लँडिंग च्या वेळी त्यांच्या चार्टडॅ विमानाला अपघात झाला,अपघात इतका भीषण होता की, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर प्रवासी पाच मेंबर्स यांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे, यामध्ये अजित पवार यांच्यासह पांजन यांचा मृत्यू झाल्याची अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन ,अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके, तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असता, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे, नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अजित पवार हे त्यादिवशी बारामती परिसरात नियोजित कार्यक्रम बैठकीसाठी येत होते, त्यांच्या अचानक जाण्याने बारामती सह, संपूर्ण राज्यात शोकाचे वातावरण आहे, अनेक ठिकाणी कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांनी अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली, दरम्यान: राज्यपाल मुख्यमंत्री, केंद्रीय व राज्यस्तरीय नेते विविध पक्षाचे नेते तसेच सामाजिक संस्थांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राने एक कर्तृत्व निर्णयक्षम आणि धडाडीचा नेता गमावला अशा शब्दात अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, सासवड मध्ये आज सकाळी पासून 90% दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत, सर्व पुरंदर तालुक्यातील सामान्य जनतेवर शोककळा पसरलेली आहे, विविध पक्षाचे नेते, तसेच सामाजिक संस्थांनी अजित पवार यांच्या निधनाबदल तीव्र दुःख व्यक्त केले आहे, महाराष्ट्राने एक कर्तुत्व निर्णय क्षम धडाडीचा नेता गमावला असून, अशा शब्दांमध्ये अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केले आहेत .राजकीय प्रवास अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते, बारामती मतदारसंघातून अनेक वेळा ते आठ वेळा निवडून आलेले आहेत, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यासारखे जबाबदारी सांभाळत राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा, निर्णय क्षमता आणि प्रशासकीय पकडीसाठी ते ओळखले जात होते, शोक संदेश त्यांच्या निर्णयाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच नव्हे ,तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसलेला आहे, राज्यातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ,शासकीय पातळीवर शोक व्यक्त करण्यात येत आहेत, अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत  पुरंदर वर्षा लांडगे व तहसीलदार विक्रम राजपूत पुरंदर या कडून तीव्र दुःख व्यक्त शासकीय पातळीवरून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यात नव्या जुन्यांचा सामना असून, राजकीय रणसंग्राम तर पक्षप्रवेशांनी बंडखोरी पक्षांतर आणि विविध पंचरंगी लढतीने निवडणुकीची राजकीय समीकरणे विस्कळीत                                                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उंबाठा आणि काँग्रेस यांच्यात काट्याची व अत्यंत चुरशीची लढत रंगणार असल्याचे, चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, आता बंडखोरी आणि पक्षांतरामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापू लागलेले आहे,निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सर्वच उमेदवारांना समान संधी असल्याचे चित्र खऱ्या अर्थाने, आज पासूनच प्रचाराला प्रचंड वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील मनोमिलन, तालुका शिवसेनाप्रमुख हरिभाऊ लोळे यांचा भाजपमध्ये प्रवेश करून मिळालेली उमेदवारी, तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम (आप्पा) इंगळे यांचे निकटवर्तीय कैलास इंगळे यांचा भाजप प्रवेश व त्यांच्या मुलाला मिळालेली उमेदवारी यामुळे वातावरण तर ढवळून निघालेले आहे, वीर भिवडी गटातून हेमंत( कुमार )माहूरकर यांनी माघार घेतली नसून, या मतदारसंघांमध्ये सहा रंगी लढत होत आहे, याचा फटका कोणाला बसतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे, बेलसर माळशिरस गटात सुद्धा राजकीय भूकंप घडलेला आहे, राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार व माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांना उमेदवारी राष्ट्रवादीने नाकारली असून, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत, निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, याच गटात राष्ट्रवादीचे आणखी इच्छुक उमेदवार अमोल कामठे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली ,ते शिवसेना उंबाठा पक्षाकडून रिंगणात उतरलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित सात गावे या गटांमध्ये येत असल्यामुळे, ही गावी कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे, वीर गटात भाजपचा शिवसेनाला 'खो' शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वीर गटांमध्ये मोठी राजकीय उल्ताफालक पाहायला मिळालेली आहे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व इच्छुक हरिभाऊ लोळे यांची उमेदवारी नाकारल्याने, त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने, देखील क्षणाचाही विलंब न करता, लोळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करत राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडून दिली आहे, या घडामोडीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, भाजपचा याचा किती फायदा होतो,हे निकलातून स्पष्ट होईल, कारण या ठिकाणी भाजपचे पिनू काकडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होत आहे, गराडे गटात तिरंगी लढत निश्चित राजकीय दृष्टी अत्यंत महत्त्वाचे गटामध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजपने माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांची कन्या दिव्या जगदाळे यांना उमेदवारी दिली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार बापू पठारे यांच्या कन्या रूपाली अमोल झेडे तर शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती राजाराम झेंडे यांच्यात अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, निरा -शिवतक्रार गटात चौरंगी लढत निश्चित राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या निरा -शिव तक्रार गटामध्ये चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांची कन्या दुर्गाडे प्राजक्ता दिगंबर यांना उमेदवारी दिली आहे, तर धायगुडे सीमा संदीप यांना कमळ चे चिन्ह देऊन उमेदवारी दिलेली आहे, बरकडे सविता राजेंद्र यांची खून हात असून, त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिलेली आहे, तर अतुल म्हस्के शिवसेना (शिंदे गटाचे) पुरंदर तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सभापती यांच्या सुविद्य पत्नी मस्के भारती अतुल यांना शिवसेना (शिंदे गटाने) उमेदवारी दिलेली आहे, यामध्ये सुद्धा निरा-शिवतक्रार कोळविहीरे गटामध्ये व पंचायत समितीच्या निवडणुकीत अटीतटीची निवडणूक होणार आहे, 51 बेलसर माळशिरस गटात सर्वसाधारण मध्ये इंगळे अजय कैलास कमळ, इंगळे रमेश रामचंद्र धनुष्यबाण, कामठे अमोल दत्तात्रेय मशाल, कोलते गौरव विजय घड्याळ, कोलते शहाजी रत्नाकर झाडू, झुरंगे दत्तात्रय मारुती हात. 101 माळशिरस गणात सर्व साधारण कड अजिंक्य रामदास घड्याळ, काळाणे हनुमंत मुरलीधर हात, चौंडकर संदीप श्रीरंग झाडू, यादव न्यानोबा आप्पा कमळ, यादव शरद बाळासो धनुष्यबाण. 102 बेलसर गणात सर्व साधारण कोलते कुशाल संजय हात, जगताप कैलास पंढरीनाथ कमळ, जगताप निलेश कृष्णा घड्याळ, निंबाळकर माणिक बाळासो धनुष्यबाण. खेडेकर सुहास नवनाथ ऑटो रिक्षा. 52 वीर भिवडी गटात सर्वसाधारण जाधव पुष्कराज संजय घड्याळ, जाधव समीर अरविंद धनुष्यबाण, माळवे नवनाथ चंद्रकांत हात, लोळे हरिभाऊ कुंडलिक कमळ, धिवार अनिल लक्ष्मण गॅस सिलेंडर. 103 भिवडी गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग पोमण अनुजा अमोल घड्याळ, मोकाशी पूजा सागर धनुष्यबाण, शिंदे सायली मनोज कमळ. 104 वीर गणात सर्वसाधारण जगताप प्रवीण बाळासो धनुष्यबाण, धुमाळ उत्तम महादेव घड्याळ, धुमाळ महेश चंद्रकांत हात, धुमाळ सुधीर शिवाजी कमळ, वचकल किशोर विश्वास कपबशी. 50 दिवे गराडे गटात सर्वसाधारण महिला जगदाळे दिव्या संदीप कमळ, झेंडे ज्योती राजाराम धनुष्यबाण, झेंडे रूपाली अमोल घड्याळ. 99 गराडे गणात सर्वसाधारण महिला कटके अर्चना ज्ञानेश्वर घड्याळ, कटके ललिता दिलीप कमळ ,रावडे सुप्रिया विशाल धनुष्यबाण. 100 दिवे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग कामठे देविदास संभाजी कमळ, झेंडे अमित भाऊसो घड्याळ, मगर बाळासो दगडू धनुष्यबाण. 53 निरा -शिव तक्रार कोळविहीरे नागरिकांचा मागास प्रवर्ग दुर्गाडे प्राजक्ता दिगंबर घड्याळ, धायगुडे सीमा संदीप कमळ, बरकडे सविता राजेंद्र हात, मस्के भारती अतुल धनुष्यबाण .105 कोळविहिरे गणात सर्वसाधारण महिला खैरे रत्नमाला दिलीप हात, निगडे स्मिता संतोष घड्याळ, मस्के सीमा भाग्यवान कमळ, साळुंखे शीतल सतीश धनुष्यबाण. 106 निरा- शिवतक्रार गणात अनुसूचित जाती महिला कांबळे मोनिका स्वप्निल घड्याळ, केदारी रेखा नितीन धनुष्यबाण ,भोसले वंदना बाळासाहेब कमळ, सोनवणे गिता शुद्धोधन हात, भोसले अर्चना देविदास फुटबॉल. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बंडखोरी, पक्षांतर ,आणि प्रतिष्ठेच्या लढतीमुळे रंगतदार बनत चाललेली आहे, जुन्या, नव्यांचा सामना हा सुद्धा यांच्यामध्ये रंगणारा असून, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ पडते, याचा फायदा हा फक्त येत्या सात फेब्रुवारीलाच होणार आहे असे दिसून येत आहेत.
NiBM पुणेच्या विद्यार्थ्याची इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद*केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते गौरव                                                                      सासवड प्रतिनिधी :  बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                 पुणे  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर (NiBM), पुणे येथील अ‍ॅडव्हान्स अ‍ॅबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्याने आपल्या विलक्षण बौद्धिक क्षमतेच्या जोरावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानाची नोंद करून संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित विशेष समारंभात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री  मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील रहिवासी अर्णव रमेश वायकर याने केवळ एका मिनिटात २ अंकी × २ अंकी असे तब्बल २२ गुणाकार अचूकपणे सोडवून हा विक्रम प्रस्थापित केला. अर्णव हा कोरेगाव मूळ येथे  MSEB मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेले रमेश वायकर यांचा मुलगा आहे.अर्णवने ही उल्लेखनीय कामगिरी NiBM चे संस्थापक व मुख्य संचालक  नवनाथ हंबीर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली साध्य केली. तसेच या यशामागे वडील रमेश वायकर आणि आई सविता वायकर यांची खंबीर साथ, प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगण्यात आले.सन्मान समारंभात बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले,“आजच्या स्पर्धात्मक युगात मेंदूचा विकास, गणितीय कौशल्ये आणि एकाग्रता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. NiBM सारख्या संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत मोलाचे कार्य करत आहेत.”NiBM, पुणे ही संस्था अ‍ॅडव्हान्स अ‍ॅबॅकस, ब्रेन डेव्हलपमेंट आणि बौद्धिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती, एकाग्रता, आत्मविश्वास आणि तर्कशक्ती वाढविण्यावर विशेष भर देते. अर्णवच्या या यशामुळे पालक, शिक्षक तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये 34 अजॅ तर पंचायत समिती गणासाठी 65 अर्ज माघार तर निवडणूक  चिन्ह  आज वाटप                                                     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणधुमाळीमध्ये जिल्हा परिषद साठी 53  असणारे अजॅ मधून 34 अजॅ माघार  तर  शिल्लक  19 अजॅ पंचायत समितीसाठी 98 मधून 65 अजॅ माघार  घेतली  तर शिल्लक 33 यामधील जिल्हा परिषद गटासाठी 4 जागासाठी 19 अजॅ आहेत  तर पंचायत समितीत  गणातील  8 जागासाठी 33अजॅ  आहेत.  अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली. दिवे -गराडे 50 जिल्हा परिषद गटातून माघार अर्ज 3, बेलसर- माळशिरस 51 जिल्हा परिषद गटातून माघार अर्ज 8 ,वीर -भिवडी 52 जिल्हा परिषद गटातून माघार अर्ज 14 निरा शिवतक्रार -कोळविहीरे 53 जिल्हा परिषद गटातून माघार अर्ज 9 एकूण जिल्हा परिषद गटासाठी  अर्ज माघार 34 ठरले आहेत ,तर पंचायत समिती साठी गराडे गणासाठी 99 मध्ये 5 अर्ज माघार दिवे 100 गणासाठी 7 अर्ज माघार माळशिरस 101 गणासाठी 13 अर्ज माघार बेलसर 102 गणासाठी 9 अर्ज माघार भिवडी 103 गणासाठी 4 अर्ज माघार वीर 104 गणासाठी 5 अर्ज  माघार कोळविहीरे 105 गणासाठी 17अर्ज माघार निरा शिवतक्रार 106 गणासाठी 5 अर्ज माघार एकूण पंचायत समिती गणासाठी 65 अर्ज माघार ठरवण्यात आले आहेत ,तर मंगळवारी दि. 27 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत  माघार  झाल्यानंतर  निवडणूक  चिन्ह  वाटप  करण्यात  आले.त्यानंतरच प्रचाराची रणधुमाळी ठरणार आहे ,अशी माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी  विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर व प्रणोति श्रीश्रीमाळ अति सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी पुरंदर यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ 26 जानेवारी 2026 रोजीचा प्रशासकीय इमारत सासवड व पोलीस ग्राउंड, जुन्या तहसील कचेरी समोर: वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर यांच्या शुभहस्ते संपन्न                                                                     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ निमित्त 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर यांच्या शुभ हस्ते संपन्न. यावेळी महादेव जाधव नायब तहसीलदार, शुभांगी गोजारी नायब तहसीलदार निवडणूक, संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार पुरंदर, विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, मंडलअधिकारी, तलाठी, तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचारी वर्ग, सासवड मधील सामान्य नागरिक, पत्रकार आदी उपस्थित होते. भारताचा 77 वा प्रजासत्तक दिन समारंभ 26 जानेवारी 2026 रोजी चा पोलीस ग्राउंड, जुन्या तहसील कचेरी समोर 9:15 वाजता वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, राजेंद्रसिंह गौर भोर उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद, पुरंदर तालुका हा मुख्य ठिकाण असल्यामुळे, सासवड मधील व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, सामान्य नागरिक, जेष्ठ नागरिक, युवक वर्ग, विद्यार्थी, नगरसेवक /नगरसेविका सासवड, पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबल, हवालदार, तसेच भोर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड ,पुरंदर कॉलेज, वाघेरे कॉलेज, म.ए.सो वाघिरे हायस्कूल, कन्या प्रशाला, शिवाजी इंग्लिश मीडियम आधी विविध शाळांनी आजच्या या 26 जानेवारी साठी संचलन करण्यात आले, सागर जगताप यांनी या ठिकाणी सूत्रसंचालन केले.
सासवड येथील वाघीरे विद्यालयास पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार                                                                  सासवड प्रतिनिधी :  बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        राष्ट्रीय हरित सेना योजने अंतर्गत, पुणे जिल्ह्यात २५०  माध्यमिक शाळामध्ये इको-क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. या वर्षात पर्यावरणविषयक उपक्रम कशा प्रकारे राबविले त्याबाबत शाळांची तपासणी करुन उत्कृष्ट काम केलेल्या शाळांना सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने पंचताराकित हरित शाळा पुरस्कार देण्यात येतात. पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे  वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड या  शाळेची  निवड करण्यात आली होती.  दिनांक  २६ जानेवारी २०२६  रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग,  वानवडी, पुणे येथे  झालेल्या ध्वजवंदना नंतरच्या कार्यक्रमात विवेक खांडेकर प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे  यांच्या शुभहस्ते वाघीरे विद्यालयास पुणे विभागस्तरीय पंचताराकित हरित शाळा उत्तेजनार्थ पारितोषिकाचे   वितरण करण्यात आले.  यावेळी वाघीरे विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक शिक्षक शिवहार लहाने,  विद्यार्थी कार्तिक हिप्परकर व विद्यार्थिनी  अनुप्रिया पाडळकर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृतता निर्माण करणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. महाराष्ट्र सामाजिक वनीकरण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमात, विद्यार्थी निसर्ग अभ्यास शिबिरे, वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती आणि जलसंधारण यांसारख्या प्रत्यक्ष कृतींद्वारे पर्यावरण संरक्षणाचे धडे शिकतात. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. वाघीरे विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून  पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबविले जातात. सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूजा जोग, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेनेचे कामकाज शाळेत केले जाते. या पुरस्काराबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले यांनी  कौतुक केले आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये गुरुवारपासून भजन स्पर्धेचे आयोजन                                                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                 सहकार महर्षी स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त सासवड तालुका पुरंदर येथील संत सोपान काका महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात भव्य भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, येत्या गुरुवार आणि शुक्रवारी दिनांक 29 व 30 जानेवारी या स्पर्धा होणार असल्याची माहिती सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्र पंत जगताप यांनी दिली सासवड सांस्कृतिक मंडळ भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षापासून या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत यंदाही स्पर्धा खुला गट आणि लहान गट अशा दोन श्रेणीमध्ये पार पडणार आहेत पुरंदर हवेली येथील भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये आपली कला सादर करावी ,असे आवाहन आयोजकांनी केले आहे ,या स्पर्धेमध्ये विजेत्या संघासह उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या गायक, हार्मोनियम आणि तबला मुद्रुक वादकांनाही विशेष अशी बक्षिसे देऊन सन्मानित केले जाणार आहे, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक मंडळांनी बोपगाव भजनी मंडळ श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील वीर भिवडी गटातील व गणातील भारतीय जनता पक्षाच्या वीर भिवडी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा श्रीनाथ म्हस्कोबा वीर येथील मंदिरात प्रचाराचा शुभारंभ                                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           वीर भिवडी जिल्हा परिषद गटातील व वीर गणातील उमेदवार भाजपचे यांच्या प्रचाराचा शुभारंभाचा माजी आमदार संजय जगताप व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ श्रीनाथ म्हस्कोबा वीर येथील मंदिरात संपन्न झाला, श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरातील सांस्कृतिक हॉलमध्ये माजी आमदार अशोक टेकवडे बोलताना मनाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील भाजपचे उमेदवार प्रचंड विक्रमी मताने निवडून येणार आहेत, असे वक्तव्य माजी आमदार अशोक टेकवडे यांनी व्यक्त केले, कमळाचे चिन्ह हे पुरंदर तालुक्यातील घराघरात पोहोचवणे हे कर्तव्य समजून मतदान परावर्तित करून, प्रचाराचा शुभारंभ श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरातील चरणी सुरुवात करून, विजयात असेल म्हणून भाजपचे कमळ हे फुलवायचे आहे, त्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणे गरजेचे असून ,पुरंदर मधील या सर्व चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या गणासाठी सर्वसामान्य नागरिकांनी भरघोस मतांनी व विक्रमी मतांनी भाजपचे कमळ पुरंदर तालुक्यात फुलवायचे आहे असे माजी आमदार संजय जगताप यांनी आपले मत व्यक्त केले. वीर भिवडी गटातील उमेदवार हरिभाऊ लोळे यांनी सांगितले की, काम करत असताना, कोणतेही जात-पात न पाहता, सर्वांना सहमतीत घेऊन, अगदीच नम्र संयम पद्धतीने पंचायत समितीत कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असताना, काम केले आहे, त्याचाच भाग म्हणून त्यासाठी भाजपचेच कमळ फुलवायचे आहे, भाजपची जडणघडण हीच स्थिती महत्त्वाची आहे ह्या गटातील व गणातील मतदार हा कोणाच्या हाताला लागेल तो म्हणजे कमळ भाजपचे असे उदगार वीर भिवडी जिल्हा परिषद गटातील हरिभाऊ लोळे यांनी आपले मत व्यक्त केले. भिवडी गणातील सायली शिंदे व वीर गणातील सुधीर (आप्पा) धुमाळ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले, संकेत जाधव, दिलीप धुमाळ, माऊली वचकल, शैलेश तांदळे, भूषण ताकवले, ऋतुजा जाधव, संतोष धुमाळ, कुंडलिक जगताप आदींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, कुंडलिक (भाऊ )जगताप ,शैलेश तांदळे, दिलीप धुमाळ, मंजुषा धुमाळ सरपंच, संतोष धुमाळ, अमोल धुमाळ, संजय (काका) निगडे, भूषण ताकवले सरपंच, तुषार माहुरकर, मनोज शिंदे, समीर भिसे, डॉक्टर सुमित काकडे तुषार (बंटी) जगताप वीर भिवडी गटातील व गणातील सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला, युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने हॉल फुलगच्च भरल्याने, उत्कृष्ट असे प्रचाराचा शुभारंभ झाला यासाठी प्रामुख्याने भिवडी गणातील सायली शिंदे, वीर गणातील सुधीर (आप्पा) धुमाळ वीर भिवडी गटातील हरिभाऊ लोले, पत्रकार, बहुसंख्येने  श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात महिला, युवक वर्ग आधी उपस्थित होते. प्रास्ताविक अभिजीत धुमाळ यांनी केले, सूत्रसंचालन रुपेश धुमाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय (काका) निगडे यांनी मानले.
पुरंदर तालुक्यामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राजकारणात पैसेवाले यांचीच एट्री; तर सर्वसामान्य होतकरू युवक वेटिंग लिस्ट वर                सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीने पुरंदर तालुक्याचे रन गाजत आहे, या निवडणुकीसाठी स्वतंत्र असा सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसून आली असून, यामध्ये अनेक होतकरू युवकांना डावलले गेले आहे, बहुतांश ठिकाणी तर पैसेवाल्यांना आयात करून, उमेदवारी दिली गेली आहे, परिणामी होतकरू आणि सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना अपेक्षाप्रमाणे तिकिटे मिळालेली नाहीत, त्यांना 'वेटिंग लिस्ट वर' समाधान मानावे लागलेले आहे, पुरंदर तालुक्यातील माळशिरस, बेलसर, दिवे, गराडे, वीर ,भिवडी, आणि निरा  कोळविहीरे  अशा जिल्हा परिषद गट आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समिती गणाची निवडणूक सध्या रंगात आलेली आहे, शिवसेना (शिदे गट) भारतीय जनता पक्ष व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व काँग्रेस असे चौरंगी लढतीचे चित्र तालुक्यात स्पष्ट झाले आहे ,सर्वच पक्षात इच्छुक उमेदवारांची रांग लागल्याने, कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला नाही ?हा प्रश्न पुरंदर मधील सर्वच राजकीय पक्षासमोर उभा ठाकलेला आहे, यामुळे सर्वच पक्षांनी' वेट अँड वॉच ची' भूमिका घेतली होती, अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांना अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास दमछाक झालेली आहे, शेवटच्या क्षणी मात्र अनेक पक्षात बहुतांश ठिकाणी पैसेवाले उमेदवार पाहावयास मिळत असून, ऐनवेळी तिकीट न मिळाल्याने, इतर पक्षात तिकिटासाठी रांगच रांग दिसून आली, सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू युवकांना मात्र तिकिटे मिळाली नाहीत, काहींना जिल्हा परिषदेवरून पंचायत समितीची उमेदवारी घ्यावी लागली, तर काही युवकांना अखेरपर्यंत वेटिंग लिस्ट मध्ये समाधान मानावे लागले, उमेदवार आणि पैसेवाले असा नियम सध्या दिसत असल्याने, सर्वच पक्षात अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक दिसत आहे, 27 जानेवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे, या दिवसापर्यंत कोणता पक्ष आपल्या पक्षातील अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडेल, यावर पुढील राजकीय गणित व त्याची उत्तरे अवलंबून आहेत, तर बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटात व पंचायत समितीच्या गणामध्ये ही निवडणूक 'हाय व्होल्टेज झालेली आहे 'जिल्हा परिषद गटामध्ये फक्त तिरंगी लढत ही जोरात होणार आहे, यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) व काँग्रेस तर राष्ट्रवादी व शिवसेना उंबाठा गटाला खूप झगडावे लागणार आहे, कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्याबाबत जो काही गुन्हा दाखल झालेला आहे ,त्याबाबत त्यांची त्या ठिकाणी गुन्ह्याच्या संदर्भातून त्या ठिकाणी आत्तापर्यंत कोणतीही स्थिती मिटवण्यासाठी स्थिती झालेली नाही, पाचवा उमेदवार उंबाठा गटाचे यांची सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली असताना, बाकीचा पारदर्शक असा कोणताही कारभार बेलसर माळशिरस गणामध्ये झालेला नाही, फक्त नावासाठी व पैशाच्या जोरावरती ही निवडणूक लढवीत असून, त्यांच्याबद्दल खूप शंका, कुशंका या ठिकाणी मतदारसंघांमध्ये आहेत, फक्त त्या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक लढवून त्यांना मत मिळणं म्हणजे खूप अवघड झालेले आहे, विमानतळाच्या संदर्भात व सासवड सुपा रस्ता वरती रोडचे काम चाललेले  या प्रश्नावर चौथा उमेदवार व पाचवा उमेदवार कोणत्याही प्रश्नावर शेतकऱ्याच्या अडीअडचणीवर कुठल्याही पाणी प्रश्नावर, या ठिकाणी बेलसर माळशिरस गणामध्ये कोणतीही प्रतिक्रिया चौथा व पाचवा उमेदवार देत नाही, त्यामुळे त्यांना निवडणूक ही एवढी सोपी नाहीये,खुप झगडावे लागेल पत्रकार यांची हेटाई करत आहेत हे उमेदवार याचा परिणाम सोसावा या उमेदवारांना अडचणी पत्रकार याच्या नाही सोडवल्या तरर परिणाम वेगळे होतील
श्रीनाथ म्हस्कोबा वीर यात्रेच्या बारा दिवसाच्या काळामध्ये प्रशासनाच्या वतीने नियोजन व पूर्णपणे मदतीचे सहकार्य राहील; उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                                           श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा सोहळा दि. 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत असणारी, 12 फेब्रुवारी रोजी मारामारी म्हणून रोजी संपन्न होणार आहे, तर देवाचे लग्न 1 फेब्रुवारी रोजी वीर येथे संपन्न होणार आहे, या सोहळ्यासाठी पुणे जिल्हा व पुणे जिल्हा बाहेरून लाखो भाविक भक्त सोहळ्यासाठी व देवदर्शनासाठी येत असतात, सदर श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा सोहळा सुरळीत, पार पडावा व कायदा व सुव्यवस्था अबाधित रावी म्हणून, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित प्रशासकीय विभागाची नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय पुरंदर येथे दि. 24 जानेवारी रोजी 12 वाजता नियोजन बैठक संपन्न झाली. देवाची हळद दि. 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता राऊत मंडळी समवेत, देवाला हळद लावली जाते, दि. 1 फेब्रुवारी रोजी माध्य शुद्ध पौर्णिमा या दिवशी कोडीत येथील काठी पालखी संध्याकाळी सात वाजता वीर येथे वाजत, गाजत, देवाची धूप आरती करून मानकरी, पुजारी, सालकरी, देवस्थान विश्वस्त ,भाविक, ग्रामस्थ हे पालखी आणण्यासाठी जातात, त्यांची भेटाभेट होऊन, पालखी आपली तळावर स्थापन होते, रात्री साडेदहा वाजता राऊत मंडळांच्या वतीने देवाला पोशाख करून,मंडोळ्या बांधल्या जातात, रात्री अकरा वाजता कोडितची पालखी घेऊन बाहेरून, वीरची पालखी देवाचे मानकरी, सह फुलांच्या माळा घातल्या जातात, वाईची पालखी (सूर्यवंशी) व कनेरी (पाटणे) ची काठी यांची भेटाभेट होऊन, पालख्या भाविकासह देऊळ वाड्यात येतात, एकूण सात पालख्या मंदिरात असतात, रात्री एक ते दीडच्या दरम्यान, देऊळ वाड्यात व परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते, लग्न झाल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन, सर्व पालख्या काठीसह तुकाई देवी मंदिराकडून ग्रामप्रदक्षिणेसाठी जातात, पहाटे साडेपाच वाजता सर्व पालखी पुन्हा देऊळवाड्यात येतात व प्रदक्षिणा पूर्ण करून आपापल्या जागेवर स्थापन होतात, तत्पूर्वी एसटी महामंडळ, आरोग्य सेवा, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, बीएसएनएल, कृषी विभाग, पंचायत समिती, विद्युत मंडळ नगर परिषदेचा या सर्वांच्या यात्रा काळातील देवाची लग्ना अगोदरच्या सर्व प्रशासनाच्या सेवेवरती असणाऱ्या उपाययोजनावर नियोजन व आढावा बैठकीत योग्य त्या सूचना देण्यात आल्या, सध्या निवडणुकीचा धामधुम चालू आहे, आचारसंहितेचा कुठलाही भंग करू नये, यात्रा काळात पाणी, तंबू उभारण्यात येणारे स्वच्छता याबाबत काटेकोरपणे लक्ष देऊन, सुविधा द्याव्यात कायदा सुव्यवस्थेचा पालन वाहतुकीचा प्रश्न पोलीस प्रशासन यासाठी कायदा सुव्यवस्थेच्या कुठलाही असल्याचेही सांगण्यात आले, ग्रामसेवकांच्यासाठी यात्रा काळात स्वच्छता, देवस्थान कचरा उचलून, घंटागाडी 10 ते 12 दिवस यात्रा काळात ठेवणार असल्याचेही सांगण्यात आले, जर कुठलाही वीर यात्रा काळाच्या ठिकाणी बॅनर लावल्यानंतर, आचारसंहितेचे पालन करावे तसे झाले नाही तर कडक इशाराही विक्रम राजपूत यांनी ग्रामसेवकांना दिला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने असणारे खड्डे भरून काढणार आहेत, एकही खड्डा राहणार नाही, आज पासूनच सुरुवात करत आहे, कोडितीत येथील खड्डे पूर्णपणे भरले जातील, सासवड कोडीत येथील स्पर्धेतील गतिरोधक सुद्धा सुरळीत करून, होणारे अपघातापासून संरक्षण केले जाईल, याबाबत सगळी यंत्रणा कामाला लावली जाईल, एसटीची सेवा दिली जाईल, भाविक भक्तांनी पालखी वीरला पोहोचल्यानंतर एसटीने हरणे वाल्हे एक फेब्रुवारीला प्रवास सुरळीत करावे, एसटीची जागा निश्चित करावी, नगरपरिषदेकडून योग्य ती सोय करण्यात यावी, टॉयलेटचा मेंटनस होत नाही, पाणी,  स्वच्छता, विद्युत अशा प्रकारचा एक फेब्रुवारीला एसटीची सोय करावी, मारामारी नंतर सुद्धा वीर येथून कोडीतला एसटी चालू करावे, बैलगाडा ही आमची यात्रा, शौकीन सहकारी बुलेट गाडीवर फटाक्यांचा आवाज करत जाणे, प्रचंड आरडा ओरड करणे, वेडे वाकडे चाळे करीत रात्री अपरात्री दिवसा शांतता भंग करत जाणे, असा एक नवीन ट्रेड जो चालू आहे, त्यावर ताबडतोब बंद करावेत, नियमाचा भंग केल्यास बैल मालकावर फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावेत, गुलालाची तपासणी करावी, हॉटेलचे अन्नपदार्थ चेकिंग करावेत, बैलगाडी हा असथेचाच विषय आहे, प्रत्येक गाडीला नंबर देणार आहेत, मिरवणूक यावर बंदी व दंड करावेत, सात ते आठ हजार वाहने येतात, त्याची नियोजन सुरळीत पार पाडावे, बगाडाला धार पाडताना त्या ठिकाणची असणारी सध्या तरी टपरी त्वरित काढावी, अशाही सूचना तसेच मारामारी यावेळी बगाडा शेजारी पोलीस बंदोबस्त द्यावा, व्यसनमुक्ती बॅनर यात्रा काळात वीर  मध्ये लावले जावेत, त्याचे पालन हे झाले पाहिजे, वीर येथील यात्रा काळात बार पूर्णपणे बंद राहणार आहेत, असा नियोजन बैठकीत सूचना या कायदा व सुव्यवस्थेच्या पालन करून यात्रा शांततेत पार पाडली जावी यासाठी प्रशासनाचे पूर्णपणे सहकार्य राहील असे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी बैठकीत सांगितले. प्रामुख्याने वर्षातून यात्रा मोठी विरची असते, तर प्रशासनाच्या वतीने पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी उपस्थित नव्हत्या, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुद्धा उपस्थित नव्हते, आरोग्य विभागाचे , विद्युत मंडळ, एसटी मंडळ आदी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी पाठवून ,अनुचित राहिले, याला फक्त सार्वजनिक बांधकाम,  पोलीस प्रशासन अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी तथाप्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रकाश निगडे, सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश थोरात,वीर व कोडित येथील मंडलाधिकारी तलाठी,ग्रामसेवक, कोडित देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, आजी- माजी, सल्लागार मंडळ, वीर चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य ,आजी -माजी सल्लागार मंडळ, सालकरी, मानकरी, दागिनदार, पुजारी, ग्रामस्थ, पत्रकार शिवदास शितोळे, पत्रकार बापू मुळीक वीर ,कोडीत येथील बहुतेक बहुसंख्येने पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सासवड येथे निवडणूक कर्तव्यात कसूर...सहाय्यक निबंधकाविरुद्ध गुन्हा दाखल                                      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकृत कर्तव्यावर गैरहजर राहिल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नं. २७/२०२६ दाखल असून कलम १३४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पंचायत समिती पुरंदर येथील सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश दिनकर थोरात यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक १४ जानेवारी रोजी मतदान केंद्र सुविधा पथकात नोडल अधिकारी म्हणून नेमणूक झालेल्या थोरात यांच्यासोबत आरोपी यशवंती मेश्राम, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पुरंदर यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, दिनांक १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजल्यापासून आरोपी यशवंती मेश्राम या नेमून दिलेल्या निवडणूक कर्तव्यावर गैरहजर राहिल्या. त्यांच्याशी दूरध्वनी व व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे फिर्यादीत नमूद आहे. सदर प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या लेखी परवानगीने सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपीविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ चे कलम १३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.
पुरंदर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष व आम आदमी पक्षाची युती; एकत्रितपणे लढणार निवडणूक                          सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                         पुरंदर तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष आणि आम आदमी पक्ष यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुरंदर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे.या युतीची अधिकृत घोषणा करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश ढमाळ आणि आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली. आम आदमी पक्षाकडून माळशिरस जिल्हा परिषद गटासाठी शहाजी कोलते, माळशिरस गणासाठी संदीप चौंडकर तर बेलसर गणासाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून अमोल बनकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या निरा–कोळविहीर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सीमा निलेश भुजबळ यांना आम आदमी पक्षाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार या दोन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे.यावेळी बोलताना मंगेश ढमाळ यांनी सांगितले की, शेतकरी, कामगार, महिला, युवक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व जनहितकारी कारभार करण्यासाठी ही एकजूट करण्यात आली आहे. विकासकामे, पाणीप्रश्न, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत मुद्द्यांवर ठोस भूमिका घेऊन काम केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.“लढा जनतेचा – विजय निश्चित” असा नारा देत प्रहार जनशक्ती पक्ष व आम आदमी पक्षाची ही युती पुरंदर तालुक्यात निर्णायक ठरेल, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
वाघीरे महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त वाचन कट्टा उपक्रम उत्साहात संपन्न                                      सासवड पतिनिधी : बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज  :                                                          सासवड येथील वाघीरे  महाविद्यालयात पुरंदर कलामंच व मराठी विभाग यांच्या  संयुक्त विद्यमाने भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दि. १९/१/२०२६ रोजी  ‘वाचन कट्टा’ या उपक्रमा अंतर्गत अभिवाचन   हा उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  या कार्यक्रमास महाविद्यालयाचेप्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, पुरंदर कला मंचचे प्रमुख संजय  काटकर अभिवाचक प्रा. मधुसूदन जगताप, प्रा. संतोष तांबे, डॉ. किरण गाढवे , कवी देवा भालेराव, कवी शुभानन अरुण चिंचकर, तसेच पुरंदर कलामंच चे सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते.  या कार्यक्रमात पत्र, नाटक,कथा, कादंबरी,  कविता व आत्मचरित्र या विविध साहित्य प्रकारांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संजय काटकर यांनी केले. याप्रसंगी बोलताना पुरंदर कलामंच च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती सांगून समाज उपयोगी साहित्यिक उपक्रमाचे आयोजन करून समाज आणि साहित्य यांचा समन्वय साधण्यासाठी पुरंदर कलामंच  महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. वाढत्या माहिती तंत्रज्ञान च्या या जगात वाचकांना वाचकाशी जोडण्याचे काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी मांडले कार्यक्रमाच्या सुरुवातीस देवा भालेराव यांनी ‘पत्रास कारण की’ या पत्राने अभिवाचन कार्यक्रमाचीसुरुवात केली. तसेच’  नटसम्राट’ या वि. वा. शिरवाडकर यांच्या  नाटकातील ‘टू बी ऑर नॉटटू बी’ या  स्वागताचे अभिवाचन  करून विद्यार्थ्यांना या साहित्य प्रकाराचा परिचय करून दिला. प्रा. मधुसूदन जगताप यांनी ‘एकटा जीव’ या दादा कोंडके यांच्या आत्मचरित्रातील परिच्छेदाचे वाचन केले. या आत्मचरित्रात दादा कोंडके हे  लिहितात,  पद, पैसा, प्रसिद्धी या सगळ्यांपेक्षाही रक्ताच्या नात्याचे जीवनात अनन्य साधारण महत्व  अधोरेखित करतात. तर प्रा. संतोष तांबे यांनी ‘मृत्युंजय’ कादंबरीतील उताऱ्याचे वाचन करून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर होणारे बदल हे माणसाने स्वीकारून जीवन आनंदी जगण्याचे महत्त्व आपल्या आशयातून स्पष्ट करतात.  आत्मचरित्र कादंबरीतील आशयपूर्ण उताऱ्यांच्या वाचनातून जीवनमूल्ये, सामाजिकजाणीव व प्रेरणादायी अनुभव उलगडले गेले.  डॉ. किरण गाढवे यांनी शुभमंगल सावधान या संजय कळमकर यांच्या  कथेतून ‘लग्न’ या संस्थेविषयाचे भाष्य केले. . तर अरुण चिंचकर  (कवी शुभानन )यांनी कवितांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला भावनिक व कलात्मक रंग प्राप्त करून दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, अभिव्यक्ती कौशल्य, साहित्याची जाण व आत्मविश्वास वाढीस लागला. मराठी साहित्याची  वैविध्यपूर्ण  आणि समृद्ध परंपरा यांची ओळख करून देणे. हा याकार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय प्राचार्य डॉ. पंडित शेळके आणि उपप्राचार्य डॉ. संजय झगडे  यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागातील डॉ. सुवर्णा खोडदे (मराठी विभाग प्रमुख) डॉ. किरण गाढवे, डॉ. नूतन लोणकर  व हेमंत ताकवले, मोहन बागडे निलेश शिंदे कवी अनिल कदम आणि पुरंदर कला मंचाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे क्षण चित्र रूपाने जतन करण्याचे  काम  संतोष लोणकर यांनी केले.
चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ; तर तिघांवर गुन्हा दाखल                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील विवाहितेला चारित्र्याचा संशय, तसेच लग्नात मानपान दिल्याच्या कारणावरून, सातत्याने होणारी मारहाण व त्रासाला कंटाळून, सासरकडील पती, सासू,व नणंद  यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे, या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती सासवड पोलिसांनी दिली असून, भाग्यश्री हितेश पारगे सध्या राहणार बोपगाव यांनी सासरच्या होणाऱ्या छळाला, कंटाळून, पती हितेश शिवाजी पारगे, सासू इदूमती शिवाजी पारगे, राहणार डोणजे हवेली नणंद सिद्धी गणेश गोसावी राहणार सिंहगड रोड पुणे यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून, दिनांक 18 जून 2024 ते मे 2025 अखेर वारंवार चामड्याच्या पट्ट्याने, मारहाण करणे, माहेरकडील माणसांना वारंवार जीवे मारण्याची धमकी देणे, सोन्याची अंगठी, चांदीच्या भांड्याची मागणी करणे, चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक मानसिक छळ करणे, मंगळसूत्र व मोबाईल हिसकावून घेऊन, शारीरिक मानसिक छल करणे,मंगळसूत्र व मोबाईल हिसकावून घेऊन, शारीरिक गंभीर दुखापत केल्याबद्दल सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम पुढील तपास करीत आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या विशेष समित्यांच्या निवडी बिनविरोध                                    सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड तालुका पुरंदर नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडी शुक्रवारी दि. 23 रोजी नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत बिनविरोध करण्यात आल्या, नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती व इतर समित्यांचे सभापती यांचे पदसिद्ध सदस्य असतात, त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदी नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप यांची निवड झाली. सत्ताधारी भाजपच्या वतीने गटनेते अजित जगताप आणि शिवसेनेकडून विरोधी गटनेते मंदार गिरमे यांनी विषय समित्यांच्या सदस्यांची नावे पिठासिन अधिकाऱ्याकडे सादर केली, पीठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी काम पाहिले, माजी आमदार संजय जगताप यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला, विषय समिती पदाधिकारी पुढील प्रमाणे: महिला व बालकल्याण समिती सभापती प्रियंका साके जगताप, उपसभापती लीना सौरभ वढणे, सदस्य स्मिता सुहास जगताप, रत्ना अमोल म्हेत्रे, दिपाली अक्षराज जगताप, पाणीपुरवठा व जल संधारण समिती: सभापती न्यानेश्वर गिरमे, सदस्य शितल प्रवीण भोंडे, प्रदीप राऊत, प्रितम म्हेत्रे, सचिन भोंडे. बांधकाम समिती सभापती: ज्ञानेश्वर जगताप, सदस्य अर्चना चंद्रशेखर जगताप, प्रदीप राऊत, वैभव टकले, बाळासो भिंताडे, आरोग्य समिती सभापती: राजन जगताप, सदस्य स्मिता उमेश जगताप, मयूर चौखंडे ,माधुरी तेजस राऊत, हेमलता मिलिंद इनामके. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती तथा उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, सदस्य सोपान रणपिसे, स्मिता उमेश जगताप, मंदार गिरमे, शिल्पा संदीप जगताप, स्थायी समिती सभापती: तथा नगराध्यक्षा आनंदी काकी जगताप, सदस्य मनोर जगताप, प्रियंका जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, ज्ञानेश्वर जगताप, राजन जगताप,अजित जगताप.
सासवड येथील शेठ गोविंद रघुनाथ साबळे  फार्मसी महाविद्यालयात ‘निर्भया कन्या अभियान’ उत्साहात संपन्न      सासवड  पतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                            सासवड | पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलिटेक्निक, सासवड येथे निर्भय कन्या अभियान कार्यक्रम विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अर्थसहाय्याने घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रम मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून महाविद्यालयात उत्साहात पार पडला.त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांचे सक्षमीकरण, आत्मविश्वास व सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले.पहिल्या सत्रात डॉ. संध्या खळदकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, चिंतामणी हॉस्पिटल, सासवड यांनी “महिलांचे आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच जीवनशैलीतील सकारात्मक बदल यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली.दुसऱ्या सत्रात ॲड. उषा विजय लोमटे, जिल्हा व सत्र न्यायालय, सासवड यांनी “महिलांचे हक्क, कायदे व नियम” या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया व कायदेशीर अधिकार यांची माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना दिली.दुपारनंतर आयोजित तिसऱ्या सत्रात नमिता संतोष कामथे, क्षत्रिय तायक्वांदो अकॅडमी, सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वसंरक्षण प्रशिक्षण (तायक्वांदो) प्रात्यक्षिकांसह घेण्यात आले. या सत्राला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचा संपूर्ण समन्वय डॉ. प्रशांत खाडे तसेच प्रा. विशाखा गायकवाड (पॉलिटेक्निक विभागप्रमुख) यांनी प्रभावीपणे साधला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलात अत्तार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिल्पा कामथे यांनी मानले. हा उपक्रम महिलांमध्ये आत्मविश्वास, आरोग्यविषयक जागरूकता व कायदेशीर साक्षरता वाढविण्यास उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Load More That is All