Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from December, 2025Show All
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,011दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक    मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                              पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.31 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,011 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,011 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,900 तर सरासरी 3,455 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,700 तर सरासरी 3,000 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,  यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,300रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 2,14 बॉक्स 42 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,300 कमाल दर 3,800रुपये तर साधारण4,150 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,900,4,011,3,455. बाजरी 2,600,3,200, 2,900. गहू 2,700,3,300,3,000. तांदूळ - -3,000,4,500,3,750 -हरभरा 4,000, 5,200,4,600.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न
 सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:
सावित्रींचा महिमा !महाक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती                                                        सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव खानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे खानवडी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.भव्य-दिव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या जयंती सोहळ्यानिमित्त भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, तसेच निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी, पुणे जि.प चे कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, संचिता कुंभार उपस्थित राहणार असून, पद्मश्री शितल महाजन , प्रतिमा जोशी, सुरेखा यादव, आय. पी. एस शारदा राऊत, डॉ. शबनम शेख आदिंना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे . महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मभूमीमुळे पुरंदर तालुका पावन झाला असून, सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रात तालुक्याचा लौकिक वाढलेला आहे. याच पार्श्वभूमीवर ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती खानवडी येथे भव्यतेने साजरी करण्याच्या दृष्टीने गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सासवड येथील तुकाई मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली.या बैठकीत नवनाथ होले, यांनी प्रास्ताविकात जयंती उत्सवाचा सविस्तर आढावा घेत खानवडी येथे सुरू असलेल्या तयारीचा व विविध उपक्रमांचा वृत्तांत सभेपुढे मांडला. कार्यक्रम अधिक प्रभावी, वैचारिक व लोकप्रबोधनात्मक व्हावा यासाठी उपस्थित मान्यवरांनी आपापली मते व सूचना मांडल्या.या बैठकीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सासवडचे अध्यक्ष ॲड दिलीप निरगुडे, ज्येष्ठ पत्रकार नाना भोंगळे , वामनराव भोंगळे , अरविंद म्हेत्रे, ॲड बापू गायकवाड , गौरव चौखंडे यांचे सह विविध सामाजिक संस्था, शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा जागर, स्त्री-शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक समतेचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मराठी बाणा महाराष्ट्र ही मराठी भाषिकांची पवित्र भूमी आहे मराठी भाषेमुळेच                                                      सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                 महाराष्ट्राची घडण झाली. बहुसंख्य मराठी भाषिकांच्या ठाम भूमिकेमुळेच मुंबई महाराष्ट्रात सामील झाली आणि म्हणूनच मुंबई हा मराठी माणसाचा मानबिंदू आहे. राज्यातील प्रत्येक राजकीय पक्ष व प्रत्येक नेता मराठीचा आग्रह धरताना दिसतो. मात्र हा आग्रह केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतूनही प्रतिबिंबित होणे आज अत्यंत गरजेचे झाले आहे.  आज राज्यातील मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. हिंदीसह त्रिभाषा धोरणाचाअवलंब होऊ पाहत आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहेआणि येथे राहणाराप्रत्येक जण मराठी भाषिक आहे, असे गृहीत धरणे स्वाभाविक आहे.  मराठी भाषेला सुमारे दोन हजार वर्षांचा समृद्ध इतिहास असून तिला अभिजात भाषेचा मान लाभलेला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना मराठीचेआकलन असणे ही नियुक्तीची अत्यावश्यक पूर्वअट असली पाहिजे.  याच धर्तीवर महानगरपालिका निवडणुकांसाठी निवडणूक लढवणारा नगरसेवक हा मराठी भाषिक असावा, अशी स्पष्ट अट असावी, ही काळाची गरज आहे. या विषयावर सातारा येथेहोणाऱ्या नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठराव मांडून तो संमत करण्यात यावा,असे आवाहन व सूचना आहे. अशी माहितीदिलीप केशवराव निरगुडे सासवड अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्यपरिषद, शाखा सासवड यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
दिलीपआबांनी उभा केलेला वटवृक्ष भविष्यात कल्पवृक्ष बनवणार - आमदार विजय शिवतारे                             सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची आपातकालीन बैठक आज पार पडली. संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार आमदार विजय शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी संस्थेचे सरव्यवस्थापक योगेश महांगरे, संस्थेचे उपाध्यक्ष मुरलीधर यादव, संचालक कृष्णा मोरे, बबनराव यादव, माजी सरव्यवस्थापक धर्माजी यादव, रोहिदास अहिरे, उत्तम यादव , सुदाम कुंभार, ज्ञानेश्वर यादव, पोपट गायकवाड, बाळासाहेब राऊत, विलास वाघोले, रविंद्र यादव, दत्तात्रय यादव, हिराबाई काळभोर, मालती यादव, व्यवस्थापक मनोहर धुमाळ व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.               संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपआबा यादव यांचे नुकतेच निधन झाले. संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत दिवंगत दिलीप आबा यादव यांना श्रद्धांजली वाहून बैठकीला सुरवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना आमदार शिवतारे म्हणाले, १९९३ साली आबांनी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. संस्थेच्या एकूण ११ शाखा राज्यभर कार्यरत आहेत. आगामी कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच संचालक मंडळ ही संस्था अधिक समृद्ध करण्यासाठी कसोशीने कार्यरत राहतील असा विश्वास यावेळी शिवतारे यांनी व्यक्त केला. संस्थेच्या कामकाजावर यापुढे मी स्वतः बारकाईने लक्ष ठेवेल. सर्व सभासद, ठेवीदार आणि खातेदारांना अधिक सक्षमपणे आणि विश्वासार्ह सेवा दिली जाईल असे प्रतिपादन करीत शिवतारे म्हणाले आबांनी उभा केलेला हा वटवृक्ष भविष्यात कल्पवृक्ष बनेल. यासाठी आपण सर्वजण नेटाने कार्य करू.      यावेळी सरव्यवस्थापक योगेश महांगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापक मनोहर धुमाळ यांनी आभार मानले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम : डॉ. पंडित वि‌द्यासागर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उदघाटन                                      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          पुणे जिल्हा शिक्षण मंडळ उच्च प्रतिचे शिक्षण देण्यासाठी मूलभूत सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करत आहे. खेळात यश अपयशा पेक्षा व्यक्तिमत्त्व विकास हा महत्त्वाचा भाग असतो. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा महत्त्वाचा घटक असून, खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था अशा, क्रीडा स्पर्धातून करत आहे. ही बाब अभिनंदनास्पद आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित वि‌द्यासागर यांनी केले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित जिल्हा क्रीडामहोत्सवाचे आयोजन वाघीरे महाविद्यालय सासवड येथे करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडामहोत्सवाचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित वि‌द्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहायक क्रीडा संचालक प्रा. सुदाम शेळके, सासवडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंदीकाकी जगताप, जेजुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष जयदिप बारभाई, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पोलीस उपनिरीक्षक जोत्सना भालेराव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे उपस्थित होते. या प्रसंगी बंडूकाका जगताप, बाळासो भिंताडे, बाळासो कामथे, आझमभाई पानसरे, नवनाथ बोरावके,संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. संगीता जगताप, प्राचार्य डॉ. पंडीत शेळके, प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण त्याचप्रमाणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सामूहिक प्रयत्नातून नेत्रदीपक अशा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करते. यातून निच्छितच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वास आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक जोत्सना भालेराव यांनी संस्थेने क्रीडा स्पर्धांसाठी दिलेलेल्या प्रोत्साहनामुळे मी माझे करिअर घडवू शकले असे सांगितले.मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळात प्रोत्साहन मिळावे या हेतूने संस्थेच्यावतीने दरवर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात असून या स्पर्धेतून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत. या स्पर्धेत ४००० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धांचे फलित म्हणजे संस्थेच्या विविध शाखांतील खेळाडू राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळवत आहेत. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ७१ सुवर्ण,  ५२ रौप्य आणि २८ कास्य पदके प्राप्त केली असल्याचे सांगितले.कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छात्रसेना, स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी योगासने, मलखांब प्रात्यक्षिके, ढोल पथक, तसेच बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू गणेश तोटे व मिस्टर यूनिवर्स संकेत काळे यांनी खेळाडूंना शपथ दिली. यावेळी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘काही प्रॉब्लेम ये का?’ एकांकिकेने बाजी मारत महाराष्ट्रीय कलोपासक पुणे आयोजित हिरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत महाअंतिम फेरीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल प्राचार्य व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड, डॉ. किरण गाढवे यांनी केले. तर आभार प्राचार्य डॉ.पंडीत शेळके यांनी मानले. संस्थेतील सर्व शाखाप्रमुख आणि क्रीडाशिक्षक यांनी या क्रीडा महोत्सवाचे संयोजन केले आहे.फोटो ओळ – सासवड (ता.पुरदंर) येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना कुलगुरू डॉ. गोसावी, माजी कुलगुरू डॉ. पंडित वि‌द्यासागर, डॉ. पराग काळकर आणि मान्यवर ‎.
वाघिरे महाविद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन     सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                        सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या स्पर्धा दि सोमवार दि. २९ व मंगळवार ३० डिसेंबर रोजी सासवड येथील वाघीरे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.       या स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये प्रामुख्याने बुद्धिबळ, योगासने, कुस्ती, कराटे–तायक्वांदो, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारांचा समावेश असून ३,९११ खेळाडू थेट जिल्हास्तरीय फेरीत सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, गटस्तरीय फेऱ्यांमध्ये १५,००० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. सांघिक स्पर्धेत प्रथम आणि वैयक्तिक प्रकारात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणारे खेळाडू जिल्हा स्तरावर पात्र , अशी स्पर्धेची रचना निश्चित करण्यात आली आहे.या स्पर्धांचे उद्घाटन सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८.३० वा. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न होणार आहेत. सदर क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्राताई पवार (खासदार - राज्यसभा, अध्यक्ष बारामती टेक्स्टाईल पार्क, माजी सदस्य, मॅनेजमेंट कौन्सिल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) डॉ. सुरेश गोसावी (कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) डॉ. शैलेंद्र देवळणकर (संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र) डॉ. राजेंद्र विखे पाटील (कुलपती, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) हे उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. पराग काळकर, मा. सतीश राऊत  (जिल्हाधिकारी पुणे) या कार्यक्रमास पुरंदर तालुक्यातील  आमदार  विजय शिवतारे, श्रीमती आनंदीकाकी जगताप (नगराध्यक्ष, सासवड)  जयदीप बारभाई (नगराध्यक्ष, जेजुरी) डॉ. पंडित विद्यासागर (माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ) डॉ. दिगंबर दुर्गाडे (अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) डॉ. सुदाम शेळके (क्रीडा संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) डॉ. एम.जी. ताकवले  (माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) पै. अमोल बुचडे (महाराष्ट्र केसरी रुस्तम ए. हिंद) मा. अशोक टेकवडे (सी.डी.सी. सदस्य) मा. प्रदीप लांडगे (सी.डी.सी. सदस्य) मा.कल्याण जाधव (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ) तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडा व कला क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून हा सोहळा ग्रामीण क्रिडा संस्कृतीचा उत्सव असेल. या स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून करण्यात येते,  शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि क्रीडा संधींचे त्रिवेणी संगम असलेले व्यासपीठ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  नेतृत्वाखाली, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव ए.एम. जाधव, प्राचार्य, क्रिडा शिक्षक आणि सर्व शाखाप्रमुखांच्या अथक नियोजन व परिश्रमातून या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
पुरंदर तालुक्यातील फासे पारधी समाजाच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष द्यावेप्रत्येक गावातील वस्तीवर प्रत्यक्ष भेट देऊन समस्या नोंदवण्याची अनिकेत नितीन काळे यांची ठाम मागणी                                                             सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                              महाराष्ट्रातील भटक्या व विमुक्त जमातीतील फासे पारधी समाज आजही मूलभूत हक्कांपासून वंचित असून, शासनाच्या अनेक योजना कागदावर असल्या, तरी त्या प्रत्यक्षात या समाजापर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात फासे पारधी समाजाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, प्रत्येक गावातील फासे पारधी समाजाच्या वस्त्यांवर प्रशासनाने प्रत्यक्ष भेट देऊन ,लोकांच्या समस्या नोंदवाव्यात व त्यावर तातडीने निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणीअनिकेत नितीन काळे,पुरंदर तालुका उपाध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टयांनी केली आहे.ऐतिहासिक अन्यायाचा आजही समाजाला फटकाफासे पारधी समाज हा ब्रिटिशकालीन अन्यायकारक धोरणांचा बळी ठरलेला समाज असून, स्वातंत्र्यानंतरही अपेक्षित पुनर्वसन, सामाजिक न्याय आणि विकासाच्या संधी मिळालेल्या नाहीत. अनेक कुटुंबे गेल्या ३० ते ५० वर्षांपासून एकाच ठिकाणी राहत असतानाही, त्यांना अधिकृत अधिवासाची मान्यता नाही. परिणामी जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र यांसारख्या मूलभूत शासकीय कागदपत्रांपासून हा समाज वंचित आहे.पुरंदर तालुक्यातील वस्त्यांमधील विदारक वास्तवपुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये फासे पारधी समाजाच्या वस्त्या असून, त्या वस्त्यांमध्ये आजही —▪️ पाल, झोपड्या व पत्र्याच्या शेडमध्ये असुरक्षित वास्तव▪️ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी टंचाई▪️ वीज, रस्ते व स्वच्छतागृहांचा अभाव▪️ आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोच नसणे▪️ शाळाबाह्य मुले व शिक्षण सोडणारे विद्यार्थी▪️ बेरोजगारी व उपासमारीची परिस्थितीअशा गंभीर समस्या दिसून येतात. या समस्या केवळ फाईलमध्ये नाहीत, तर वस्तीवर जाऊन पाहिल्यावरच त्यांची तीव्रता लक्षात येते, असे समाज बांधवांचे म्हणणे आहे.दाखल्यांअभावी संपूर्ण पिढी अडचणीतशासकीय दाखले नसल्यामुळे फासे पारधी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण योजना, वसतिगृह सुविधा मिळत नाहीत. अनेक विद्यार्थी केवळ कागदपत्रांअभावी शिक्षण सोडण्यास मजबूर होतात. तरुण वर्गाला रोजगार, कौशल्य विकास व स्वयंरोजगार योजनांचा लाभ मिळत नाही. परिणामी गरिबी, मागासलेपणा आणि सामाजिक बहिष्काराचे दुष्टचक्र कायम राहते.‘समस्या निर्माण’ नव्हे, तर ‘समस्या समोर आणणे’ गरजेचेप्रत्येक गावातील वस्तीवर प्रत्यक्ष भेट दिल्यास नवीन समस्या निर्माण होणार नाहीत, तर वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या समस्या उघड होतील. त्यामुळे शासनाला वास्तव परिस्थिती कळून योजनांची योग्य अंमलबजावणी करता येईल. म्हणूनच वस्तीभेटी हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.मुख्यमंत्र्यांकडे ठोस व कालबद्ध मागण्याअठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशनच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांकडे पुढील ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत —पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात फासे पारधी समाजासाठी राज्यस्तरीय विशेष सर्वेक्षण व पाहणी मोहीम राबवावीप्रत्येक गावातील वस्तीवर प्रत्यक्ष भेट देऊन स्वतंत्र समस्या अहवाल तयार करण्याचे आदेश द्यावेतशासकीय दाखल्यांसाठी गावोगावी विशेष शिबिरे आयोजित करावीतपात्र कुटुंबांना प्रधानमंत्री, रमाई व शबरी आवास योजनांतर्गत हक्काची घरे तातडीने मंजूर करावीतभटक्या-विमुक्त समाजासाठी स्वतंत्र पुनर्वसन व विकास आराखडा जाहीर करावाआंदोलनाचा स्पष्ट इशारायासंदर्भात बोलताना अनिकेत नितीन काळे म्हणाले,“फासे पारधी समाजाच्या समस्या कागदावर नाहीत, त्या जमिनीवर आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून प्रशासनाला कामाला लावावे. अन्यथा समाजाला लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडावे लागेल.”मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे समाजाचे लक्षफासे पारधी समाजाला शासकीय दाखले, हक्काची घरे व मूलभूत सुविधा मिळाल्यास हा समाज शिक्षण, रोजगार व विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतो. त्यामुळे आता केवळ आश्वासन नको, तर मुख्यमंत्र्यांच्या थेट हस्तक्षेपातून ठोस निर्णय होण्याची अपेक्षा फासे पारधी समाजासह विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.
म.ए. सो. बाल विकास मंदिर सासवड शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात                                                                  सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कला सादर करून, उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी पारंपारिक लोकगीते, मोबाईलचे दुष्परिणाम , शेतकरी नृत्य ,पारंपारिक लावणी, लोककला, कॉमेडी, रिमिक्स गाणी, कोळीगीते, गोंधळ गीतांवर नृत्यकला सादर केली. हिंदी- मराठी गाण्यांवर चिमुरड्यांनी केलेल्या नृत्य कलेला रसिकांनी दाद दिली. सुमारे पाच तास चाललेल्या कार्यक्रमास पालक रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांपैकी अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून रक्कम दिली. शुक्रवार ( ता. २६ ) बाल विकास मंदिर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. शाळा समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून. कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी  विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला, तसेच शाळेत पालकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी अक्षय मांढरे, मुख्याध्यापक भाऊसो बडधे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी गोविंद लाखे, इंग्लिश मिडियम स्कूलच्या पर्यवेक्षिका सरोज मॅडम, रामदास अभंग, पत्रकार बापू मुळीक, पालक प्रतिनिधी विद्या टकले , शिक्षक प्रतिनिधी शितल चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस वाघोले, संजीवन, बोरकर, माही बडधे , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व परंपरेची जाणीव व्हावी, त्यांच्यातील विविध सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने शाळा दरवर्षी  वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करत असते. शाळेच्या माध्यमातून सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यास प्राधान्य दिले जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय दिपक कांदळकर यांनी करून दिला. राणी गिरमे यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे  जाहीर केली. विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस वाघोले याने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शार्वी धुमाळ, शिवम जगताप, माही बडधे, कस्तुरी निगडे, स्वाती बोरावके यांनी केले. आभार शीतल चौधरी यांनी मानले.
ओबीसी मराठा संघार्षावरील ग्रंथाचे प्रकाशनन्यायमूर्ती निरगुडेंच्या हस्ते मुंबईत होणार                                   सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                मुंबई मंडल आयोगप्रणित आरक्षण हे ओबीसींच्या विकासासाठी आहे. परंतू ओबीसी जातींचा विकास झाला तर आपल्या सत्तेला तडे जातील, असा न्युनगंड मनात बाळगणार्‍या उच्च जाती सत्तेचा गैरवापर करून, ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेले आहेत. त्यातून निर्माण झालेल्या जातीसंघर्षामुळे आज संविधान व लोकशाही धोक्यात आलेली आहे. या जाती-संघर्षाला जातीअंताकडे कसे नेता येईल याचे मार्गदर्शन करणारा ‘‘ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतीकारी पर्व’’ हा ग्रंथ सुनिल खोब्रागडे व प्रा. श्रावण देवरे यांनी लिहीला असून या ग्रंथाचे प्रकाशन 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व राज्य मागास आयोगाचे माजी अध्यक्ष माननीय आनंद निरगुडे यांची प्रमुख उपस्थिती या समारंभात आहे, अशी माहिती ओबीसी सेवा संघ, ओबीसी राजकीय आघाडी व माळी विकास मिशन यांनी संयुक्तपणे काढलेल्या पत्रकात दिलेली आहे.	या ग्रंथाबद्दल अधिक माहीती देतांना पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मुंबईतील जरांगेंच्या बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली येउन 2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा जातीचे सरसकट कुणबीकरण करणारा जी.आर. काढला असून हा जी.आर. जात बदलण्याची परवानगी देतो. भारतात जोपर्यंत जातीव्यवस्था जीवंत आहे, तोपर्यंत कोणालाही जात बदलता येत नाही. हिंसक मार्गाने जातीव्यवस्था निर्माण करणारे धर्मशास्त्र व लोकशाही मार्गाने जातीव्यवस्था नष्ट करणारे संविधान हे दोघेही जात बदलण्याची परवानगी देत नाहीत. जात नष्ट होऊ शकते परंतू जात बदलता येत नाही. आरक्षणासाठी जात बदलणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण सिद्धांत नष्ट करणे होय! हा जी.आर. केवळ ओबीसींचेच आरक्षण नष्ट करेल, असे नव्हे तर दलित-आदिवासींचेही आरक्षण नष्ट करणार आहे. त्यामुळे हा असंविधानिक जी.आर. त्वरीत रद्द झाला पाहिजे, अशी भुमिका या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथाच्या पहिल्या भागात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य जातींना आरक्षण का नाकारले’ याचे ऐतिहासिक विश्लेशन केलेले आहे. ग्रंथाच्या दुसर्‍या भागात  ‘कुणबी व मराठा या दोन भिन्न जातीतील संघर्षाचा इतिहास’ संदर्भ व पुरावे देऊन सिद्ध केलेला आहे. तिसर्‍या भागात ‘जात बदलून देणारा जी.आर. संविधानविरोधी आहे, हे सिद्ध केलेले असून न्यायालयीन युक्तीवादासाठी ठोस मुद्दे दिलेले आहेत.	ग्रंथ प्रकाशन समारंभात एड. प्रदिप ढोबळे, लता प्र.म., कल्याण दळे, राम वाडीभस्मे व एड. अरविंद निरगुडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच उपोषणकर्ते ओबीसी योद्धे प्रा. लक्ष्मणराव हाके, नवनाथ वाघमारे, रविन्द्र टोंगे, भरत निचिते, रामभाऊ पेरकर, प्रा. विठ्ठल तळेकर, प्रल्हाद किर्तने व एड. मंगेश ससाणे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.	सदरहू प्रकाशन समारंभ आझाद मैदानावरील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात 27 डिसेंबर, शनिवार रोजी संध्याकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास ओबीसी व पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती संयोजकांनी केलेली आहे.
पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धा 2025–26 मध्ये       सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सासवड या विद्यालयाने आपल्या कलागुणांचा ठसा उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तालुकास्तरावरील स्पर्धेत प्राथमिक गटाने द्वितीय क्रमांक पटकावला असून, या गटातील एकूण सहा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभिनय पुरस्कार प्राप्त होणे ही विशेष अभिमानाची बाब आहे. प्राथमिक गटाच्या नाटिकेचे कुशल नाट्यदिग्दर्शन सुनीता विकास नवले  यांनी केले.त्याचप्रमाणे माध्यमिक गटाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशपरंपरेत भर घातली आहे. या नाटकातील तीन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभिनय पुरस्कार प्राप्त झाले असून, ह्या नाटिकेची जिल्हा स्तरासाठी निवड करण्यात आली आहे.माध्यमिक गटाच्या नाटकाचे प्रभावी नाट्यदिग्दर्शन  शितल श्रीराम बोरुडे  यांनी केले.या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांसह विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंग मर्चंट मॅडम, उपप्राचार्य सुषमा रासकर , ज्युनियर कॉलेज इन्चार्ज उज्वला जगताप , प्री-प्रायमरी इन्चार्ज स्वाती जगताप  तसेच विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.ही घवघवीत कामगिरी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळालेली योग्य दिशा, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि विद्यालयातील सर्जनशील, संस्कारक्षम वातावरणाचे प्रेरणादायी प्रतीक ठरत आहे.
पुरंदर तालुक्यातील जितेंद्र कुंजीर यांची संचालक पदी बिनविरोध निवड शिक्षक संघातील स्वाभिमानी कार्यकर्त्याचा एक प्रकारचा विजय                                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी यादववाडी केंद्राचे केंद्रप्रमुख तथाशिक्षक नेते जितेंद्र कुंजीर यांची बिनविरोध निवड झाली, या निवडीमुळे शिक्षक संघातील निष्ठावंत कट्टर व प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, सेवानिवृत्त संचालक राजेंद्र कुंजीर यांच्या रिक्त जागेवर विरोधी पॅनल मधून पराभूत उमेदवारांना संधी देण्याचे डावपेच सुरू होते, मात्र संघटनेतील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न वेळीच हाणून पाडत जितेंद्र कुंजीर यांना पुढे करत संचालक पदासाठी अर्ज दाखल केला, शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांनीही अर्ज दाखल केला होता, परंतु पतसंस्था, ऐक्य, परंपरा व सहकार्याची भूमिका लक्षात घेत, त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने, जितेंद्र कुंजीर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली, सध्या पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघात विलीनीकरणानंतर, काही निर्णय निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, घेतले जात असल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे संघटनेत अध्याप मनोमिलन न झाल्याची चर्चा आहे, या पार्श्वभूमीवर संघटनेतील मरगळ झटकून, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जितेंद्र कुंजीर यांचे नेतृत्व निर्णायक ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त होत आहे, सहकार व संघटन क्षेत्रातील त्यांचा अनुभव पतसंस्था व शिक्षक संघाला नवी दिशा देईल, अशी चर्चा सध्या तरी चालू आहे.
भिवडी ग्रामस्थांकडून सासवड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक बाळासो भिंताडे यांचा सत्कार सन्मान सोहळा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      भिवडी ता. पुरंदर येथील ग्रामस्थाकडून नवनिर्वाचित नगरसेवक बाळासो भिंताडे यांचा उत्स्फूर्त असा सत्कार सन्मान सोहळा उत्साहात साजरा करताना, सासवड नगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये भिवडी गावचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासो बापूराव भिंताडे यांची नगरसेवक पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल, भिवडी ग्रामस्थांच्या वतीने सासवड नगरी मधील मोठ्या उत्साहामध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या सत्कार समारंभाच्या निमित्त गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होती, याप्रसंगी हरिभक्त परायण बापू महाराज भिताडे, विठ्ठल आबा मोकाशी, छगन खिल्लारे, साधू भाऊ दिघे, प्रशांत वांढेकर, अशोक चव्हाण ,निलेश पवार, डॉ. मनोज शिंदे, राहुल मोकाशी, सुदाम भिंताडे, संजय दिघे, विजय भिंताडे, दिलीप भिंताडे ,बाळासो शेडगे, सूर्याजी मोकाशी यांच्यासहसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना, नगरसेवक बाळासो भिताडे म्हणाले की, भिवडी गावच्या पाठिंबामुळेच मला हे मोठे यश संपादित करता आले, यापुढेही मी सैधव्य ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपलब्ध राहील, अशी ही ग्वाही त्यांनी दिली. या उपकारमुळे भिवडी गावात आनंद व उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते, अशी ही प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगरसेवक सासवड नगर परिषदेचे बाळासो भिताडे यांनी ही सर्व माहिती भिवडी गावकऱ्यांनी जो उत्स्फूर्त असा सत्कार सन्मान सोहळा साजरा केला, याची सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
वाघीरे महाविद्यालयात क्रीडा स्पर्धेचे आयोजन ॲड संदिप कदम                                                                       सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड ता. पुरंदर येथील वाघीरे महाविद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धा दि. २९ व ३० डिसेंबर रोजी सासवड येथील वाघीरे महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. असे पुणे जिल्हा  शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, यांनी माहिती दिली.     सासवड (ता .पुरंदर) येथील वाघीरे महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मानद सचिव अॅड. संदीप कदम, बोलत होते, ते पुढे म्हणाले,की       या स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक खेळा मध्ये प्रामुख्याने बुद्धिबळ, योगासने, कुस्ती, कराटे–तायक्वांदो, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारांचा समावेश असून ३,९११ खेळाडू थेट जिल्हास्तरीय फेरीत सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, गटस्तरीय फेऱ्यांमध्ये १५,००० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. सांघिक स्पर्धेत प्रथम आणि वैयक्तिक प्रकारात प्रथम दोन क्रमांक मिळविणारे खेळाडू जिल्हा स्तरावर पात्र ठरतील, अशी स्पर्धेची रचना निश्चित करण्यात आली आहे.या स्पर्धांचे उद्घाटन सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८.३० वा. खासदार  सुनेत्राताई पवार आणि प्रवरा मेडिकल संस्थेचे कुलगुरू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.      उद्घाटन सोहळ्यास राजकीय, सामाजिक, क्रीडा व कला क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ,हा सोहळा ग्रामीण क्रिडा संस्कृतीचा उत्सव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  नेतृत्वाखाली, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव ए.एम. जाधव, प्राचार्य, क्रिडा शिक्षक आणि सर्व शाखाप्रमुखांच्या अथक नियोजन व परिश्रमातून या स्पर्धा साकार होत आहेत.       या स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसून, ग्रामीण मातीतून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आयोजित केल्या आहेत, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. “या क्रीडा उपक्रमांतून पुरंदरच्या मातीतून जागतिक स्तरावरील खेळाडू घडतील,” असा दृढ आशावाद त्यांनी बोलून दाखवला.संस्थेच्या या शैक्षणिक व क्रीडा वाटचालीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि क्रीडा संधींचे त्रिवेणी संगम असलेले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. येणाऱ्या काळातही ही स्पर्धाअधिक व्यापक, गतिमान होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त  होत आहे. प्रास्ताविक वाघीरे कॉलेजचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेठ रघुनाथ गोविंद साबळे कॉलेजच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी आभार मानले.
सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शिक्षण विभागातील पंचायत समिती कार्यालय पुरंदर येथील शिक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजामध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप व ढवळाढवळ        सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शिक्षण विभाग यांच्याकडून पंचायत समिती कार्यालय पुरंदर येथील (शिक्षण) विभागाच्या दैनंदिन कामकाजामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप ढवळाढवळ होत असल्याचा, प्रकार हा वाढत चाललेला आहे, कारण शिवरी येथील शिक्षिका ही त्यांची नातलग असून, शिवरीतील घटना वर्षभर झाले शिक्षिकेच्या विरुद्ध गावकरी, यांचा आरोप अविश्वास असे विविध मुद्द्यांमध्ये समितीत अहवालामध्ये दोषी ठरल्याने, पुरंदरच्या पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ यांनी स्वत: अहवाल समितीचा प्राप्त झाल्यानंतर, शिवरी येथील शिक्षिकेची त्वरित बदली ही पोढे या गावांमध्ये केली असता, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शिक्षण विभाग राजेंद्र कुंजीर हे सतत शिक्षण विभागातील गटशिक्षण अधिकारी वैभव डुबल यांच्याकडे सतत वारंवार पोंढे गावाला बदली झालेली रद्द करण्यासाठी, फेऱ्या यांच्या वाढत चाललेल्या आहेत, शिवसेना पक्षाच्या पुढार्‍यांशी सलोखा ठेवून, गट शिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी यावर दबाव आणत आहेत, तरी योग्य वेळी स्वत: गट विकास अधिकारी प्रणोती श्री श्रीमाळ यांनी दखल घेतलेली आहे की, समितीतील अहवाल दोषी आल्यामुळेच, पोंढे येथे बदली केलेली आहे, जर पोंढे येथे जायचे नसेल, तर निलंबित करावे लागेल असेही त्यांनी सांगितलेले आहे. तर गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात विस्तार अधिकारी यांच्या येणे जाणे सतत असते, सदर प्रकार हा आर्थिक हित संबंधातून चालू असल्याचा दाट संशय येत आहे ,तर शिक्षण विभागाच्या व्हिजिट बुक मध्ये सदर कर्मचारी हा दररोज ज्या कामासाठी येतो त्याच्या नोंदी होतात का? हे सुद्धा शंकास्पद आहे, आपल्या कार्यालयाने याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासणी करावी, तसेच समितीतील त्यांची नेमणूक करण्यात येऊ नये ,असे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज दिला होता, त्यावर चौकशी समितीत नियुक्ती न केल्यामुळे, गावातील नागरिका विषयी त्यांच्या मनामध्ये आकस असल्यामुळेच, संबंधित शिक्षकांचे नातेवाईक असल्यामुळे, वारंवार शासकीय कामकाजात ढवळाढवळ करत आहेत, संबंधित शिक्षिका यांच्या बाबतच्या चौकशी अहवालातून बऱ्याच बेकायदेशीर गोष्टी यासमोर आल्या तरी त्यांच्या बचावासाठी हा सेवानिवृत्त कर्मचारी कायम शिवसेनेच्या पुढार्‍यांशी संगणमत करून, जो काही ढवळाढवळ करत आहे त्यावर कडक बंधनकारक कारवाई करण्यात येईल, कारण  पोढे येथे जी शिक्षकेची बदली केलेली आहे ना? त्यासाठी रीतसर पद्धतीने बदली केलेली आहे, पोंढे येथे जर शिक्षिकेला हजर व्हायचे नसेल, तर निलंबित करावे लागेल, याची दक्षता खुद्द सेवा निवृत्त कर्मचारी विस्तार अधिकारी यांनी नोंद घ्यावी. गजानन पाटील मुख्याधिकारी जिल्हा परिषद पुणे.
नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंदी बाजार उत्साहात संपन्न.                                                                            सुरेश म्हेत्रेअहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधि:               विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर नफा तोट्याचे गणित समजावे, व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने श्रीगोंदा येथील  नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या या उपक्रमास  पालक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे २४० फळे, भाजीपाला, स्टेशनरी, खेळ आणि खाद्यपदार्थांच्या छोट्या-मोठ्या स्टॉलच्या माध्यमातून तब्बल ३ लाख, ८२ हजार, ८६७ रुपयांची उलाढाल झाली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना अनुराधाताई नागवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, कुठलाही व्यवसाय करत असताना त्याचे मार्केटिंग करता येणे आवश्यक असते. तसेच व्यवसायामध्ये दैनंदिन होणारे बदल लक्षात घेऊन अपडेट राहणे आवश्यक ठरते. परिस्थिती समोर हार न मानता सामना करून यश मिळवून आनंदी राहावे हेच जीवनाचे सत्य असल्याचे सांगितले. केंद्रप्रमुख माणिक आढाव यांनी विद्यालयाची गुणवत्ता ही उच्च दर्जाची असल्याचे प्रतिपादन करून विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगती बाबत शालेय प्रशासनाचे कौतुक केले.प्रसंगी नाताळ सणाची आख्यायिका व देखावा सादर करण्यात आला. आनंदी बाजार या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस पी गोलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सूत्रसंचालन जयेश आनंदकर व धनश्री जोशी यांनी केले.
पुरंदर तालुक्यातील भिवरी कोंढवा रोडवर अपघातांची मालिका सुरूच...                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       सासवड कोंढवा रोडचे काम नव्याने चालू असल्यामुळे, सदर रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारचे गतिरोधक,  तसेच सूचनाफलक नसल्यामुळे, वाहनांचा वेग अतिशय वाढलेला आहे. त्यामुळे भिवरी परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रोज गंभीर, तसेच किरकोळ अपघात होत आहेत. आणि यात अनेक लोकांना गंभीर दुखापत, तर काहींची  प्रकृती चिंताजनक आहे.             यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण यांना रस्त्यावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक आणि भिवरी,बोपगाव, चांबळी व हिवरे या शाळांच्या समोर सूचनाफलक व गतिरोधक टाकण्यासंबंधी  दिलीप (आप्पा) कटके भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष पुरंदर तालुका तसेच माजी सरपंच भिवरी यांनी विनंती केली आहे अशी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे 24 डिसेंबर ग्राहक दिन साजरा ;तर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय पुरंदर व ग्राहक हक्क संरक्षण क्षेत्रातील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन प्रशासकीय इमारत सासवड येथे मोठ्या उत्साहात पार पडले, या उपक्रमास नागरिकांना त्यांच्या ग्राहक हक्क विषयी माहिती देणे व ग्राहक संरक्षण कायद्याची सखोल माहिती उपलब्ध करून देणे हा होता, दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून, कार्यक्रमास सुरुवात झाली, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार पुरंदर विक्रम राजपूत यांनी केले. प्रास्ताविक मध्ये तहसीलदार यांनी ग्राहकांना आपल्या हक्काबद्दल, जागृत राहण्याचे आवाहन केले. तसेच ग्राहक चळवळीतील संघटना यांना ग्राहक हितासाठी कार्य कक्षेमध्ये विस्तारित करण्याचे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य विकास महाजन यांनी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्याबाबतची पार्श्वभूमी सांगून, सन 2025 च्या राष्ट्रीय ग्राहक दिन, थीम डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्रम आणि जलद निपटारा या संकल्पनेचे विस्तृत स्पष्टीकरण केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व ग्राहक कल्याण फाउंडेशन चे संस्थापक व हरिभक्त परायण तुकाराम महाराज निंबाळकर यांनी ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा व त्यांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केले. ग्राहक हक्क संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महेश राऊत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुरंदर तालुका अध्यक्ष प्रसाद अत्रे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पत्रकार व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटक गिरीश झगडे, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष रामदास मेमाणे यांची विशेष उपस्थिती यावेळी होती, याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तहसील कार्यालय व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक, सदस्य, स्वस्त धान्य दुकाना आधार सह यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक कल्याण फाउंडेशनचे मार्गदर्शक संतोष काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राज्य सचिव संतोष मगर यांनी केले .यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे कोषाध्यक्ष उत्तमराव झेंडे, जिल्हाध्यक्ष संतोष कामठे, कार्याध्यक्ष सुभाष काळे इत्यादी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयाच्या वतीने अशा प्रबोधनात्मक उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला, ग्राहक हक्काची जाणीव निर्माण करणारी ही कार्यशाळा यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले, ग्राहक दिनाची सर्व माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सर्व प्रतिनिधीला दिली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप यादव यांचे निधन         सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           पुणे जिल्हा परिषदेचे वीर भिवडी तालुका पुरंदर गटाचे माजी सदस्य तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख दिलीप सोपानराव यादव( वय 65) यांचे निधन झाले. श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सण १९९३ मध्ये त्यांनी सामाजिक क्षेत्रात कामाला सुरुवात केली, तसेच सण २००२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने वीर भिवडी गणातून पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली, त्यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश करून, पुरंदर तालुकाप्रमुख पदावरून, पक्षाच्या कामाला सुरुवात केली, ते 2012 मध्ये भिवडी गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते, तसेच 2017 मध्ये वीर भिवडीे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते, माजी राज्यमंत्री तसेच पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी म्हणून, तसेच राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख त्यांची होती, त्यांच्या पश्चात मागे पत्नी, मुलगा, मुलगी ,भाऊ असा परिवार आहे.
पुरंदर विमानतळा संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील बैठकीला; गेलेल्या महिला शेतकऱ्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले                                                                      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                               पुरंदर विमानतळा संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेलेल्या, पुरंदर मधील कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील महिला शेतकऱ्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले, तर जिल्हाधिकारी यांच्या मर्जीतल्या व्यक्तींनाच फक्त प्रवेश दिला गेला, त्यामुळे मूळ शेतकरी लाडक्या बहिणी या मुंबई येथील विमानतळ संदर्भातील महिला शेतकरी म्हणजेच लाडक्या बहिणी मात्र वाऱ्यावर या मुख्यमंत्री, पुरंदरचे विद्यमान आमदार व जिल्हाधिकारी यांनी वाऱ्यावर सोडले, आत बैठकीसाठी महिलांना संधी दिली नाही, मात्र जिल्हाधिकारी व आमदार पुरंदरच्या यांच्या मर्जीतल्या व्यक्तींना बैठकीसाठी संधी देण्यात आली, ज्या अधिकाऱ्यांची विमानतळ संदर्भात नेमणूक झाली होती, त्यासाठी त्यातील अधिकारी सुद्धा उपस्थित नव्हते ,त्यांना सुद्धा संधी दिली नाही, विमानतळ बाधित महिला या गोरगरीब शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी मीटिंगला गेल्या होत्या, परंतु बैठकीसाठी आत जाण्यासाठी कट रचून, बाजूला ठेवण्यात आले. त्यासाठी बाधित शेतकरी महिलांच्या लाडक्या बहिणी म्हणून घेणाऱ्या भगिनींचा या सरकारने ,आमदाराने जिल्हाधिकारी यांनी एक प्रकारे अपमानच केलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी प्लॅनिंग पूर्वक हे कृत्य केलेले आहे, कारण सातही गावातील एजंट, दलाल, पुढारी हाताशी धरून, गावातील बैठक सरपंच ,शेतकरी यांनी घेऊन जी यादी दिली होती, त्यामध्ये नगण्य असे शेतकरी ,तर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मर्जीतल्या व्यक्तींना बैठकीसाठी संधी दिली, पुण्यातील 3 वेळा बैठक झाली त्यात सामान्य शेतकऱ्याला व्यथा आपल्या मांडण्यासाठी जशी संधी दिली नाही, तसेच मुख्यमंत्री, आमदार यांच्यासमोर मुंबई येथे शेतकऱ्याला सात विमानतळ बाधित काही बोलून दिले नाही, काही मागण्या मान्य झालेल्या नाहीत, शिक्का ,गुन्हा दाखल असलेल्या वर त्यावर फक्त मुख्यमंत्री यांनी सहमती दिली, तर रेट विषयी वाढवून देऊ असे म्हटले, तर जिल्हाधिकारी खोटी माहिती देऊन, खरे दाखवण्याचा जो काही प्रयत्न करत आहेत ,ना त्यासाठी सातही गावातील शेतकऱ्यांची मागणी एकच आहे जशी की संमती घेण्यासाठी आमच्याकडे आलात ना? तसे रेट ठरवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्हीही ,पुरंदरचे विद्यमान आमदार व जिल्हाधिकारी यांनी आमच्या सातही विमानतळ बाधित गावात यावे ,म्हणूनच पाहू जसे की संमती देण्यासाठी भुलवले तसे सामान्य शेतकरी विमानतळासाठी आता भुलणार नाही, बैठकीत कुठल्याही प्रकारचे आश्वासन हे दिलेले नाही,शेतकऱ्यांनी पाच ते सहा कोटीची एकरला मागणी केलेली आहे, तेव्हा मुख्यमंत्री यांनी सांगितले की तसं पाहिलं तर 50 लाख रुपयांचीच मर्यादा आहे, त्यामुळे त्यावर बघून नियमानुसार काय होईल ते  पहावे लागेल,लोकांचा यांच्यात शंभर टक्के तोटाच आहे ,असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले, त्यासाठी फक्त जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री यांची शाबासकी ,पाठीवर थाप करून, घ्यायची होती, म्हणून कुणीही काही बोलायचं नाही म्हणून असे कृत्य स्वत: जिल्हाधिकारी यांनी करून आणले आहे, फक्त कुंभारवळण व खानवडी येथील एक ते दोन शेतकरी बोलले, बाकीच्यांना बोलण्याची संधी दिली नाही, मुंबई येथे मुख्यमंत्री यांनी फक्त सांगितले की, गुन्हे मागे घेऊ, शिक्का मारलेले त्यावर विचार केला जाईल, एकरी दराबाबत ठोस असा काही निर्णय झाला नाही, बघू असे फक्त सांगितले, पोपटपंची करणारे जिल्हाधिकाऱ्यांचे फक्त निव्वळ एजंट होते ,तेच बोलणारे परंतु त्यांच्या हाती सुद्धा जसे की,निराशाच पसरली आहे. सात गावातील विमानतळातून फक्त कुंभारवळण सोडले तर, सहा गावात पुढारीतालाल अधिकारी यांच्यात शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतलेल्या आहेत, त्याचीच भाग भांडवल म्हणून जर पत्रकारांना पुरंदरच्या एजंट दमदाटी करत असतील, तर विमानतळ हा गाठ प्रामुख्याने पुढारी, दलाल, अधिकारी, एजंट मुळेच नांगर फिरवण्याचे काम सध्या तरी चालू आहे, जर एजंट ने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दमदाटी जर केली तर, पेपरमध्ये सहा गावातील पुढारी दलाल अधिकारी यांच्या किती जमिनी आहेत, ते नावानुसार प्रसिद्ध करावे लागेल त्यासाठी योग्य वेळीच जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मर्जीतल्या सदस्यांना आवरा असा बाधित विमानतळ लाडक्या महिला शेतकरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, जर सहा गावात शेतकऱ्यांची जमीन पुढारी ,दलाल, अधिकारी यांनी घेतलेली आहे ना ?मग सरकारने कुंभारवळण विमानतळातून वगळावे, कारण येथील शेतकऱ्यांनी जमीन पुढारी ,दलाल, अधिकारी यांना विकलेली नाही, शेती यांची 94% बागायत आहे, सासवड शहराशेजारी आहे ,मग विमानतळाला हा घाट कशासाठी ?अशी सुद्धा प्रतिक्रिया शेतकरी बांधव यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी सांगतात  की ,मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत ,खोटी माहिती जिल्हाधिकारी पसरवत आहेत ,गैरसमज निर्माण करत आहेत, सात बाधित विमानतळ गावातील शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की, जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जेथे विमानतळ करण्याचा कट रचला आहे ना ,तेथे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ,पुरंदरचे विद्यमान आमदार यांना बैठकीसाठी सात गावातील कोणत्याही एका ठिकाणी स्वत: जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन, विमानतळाचा रेट पहिला ठरवून दाखवावा .असा खडा सवाल लाडक्या महिला शेतकरी यांनी व्यक्त केलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी आत्तापर्यंत पुण्यातील 3 वेळा बैठक संमती मुंबई येथील बैठक स्वतःच्या मर्जीतल्या व्यक्तींना हाताशी धरून शाबासकी ,मुख्यमंत्री यांची मिळवण्यासाठी आतापर्यंत हे कृत्य केलेले असून, परंतु ते साफ खोटं आहे, खऱ्या प्रवाहात यावे, जिल्हाधिकारी यांनी आशा लाडक्या बाधित महिला शेतकरी सातही गावातील प्रमुख महिलांनी आपली मुंबई येथील अपमानाच्या बद्दल झालेली व्यथा ही त्यांनी मांडल्या ,त्या संदर्भात त्यांनी सविस्तर अशी माहिती ही प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,150 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक    मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                              पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.24 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,150 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,150 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,900 तर सरासरी 4,025 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,800 तर सरासरी 3,050 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,  यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,300रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 8,00 बॉक्स 1,60 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,300 कमाल दर 3,500रुपये तर साधारण4,000 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 3,900,4,150,4,025. बाजरी 2,500,3,300, 2,850. गहू 2,800,3,300,3,050. तांदूळ - -4,900,5,500,5,200 -हरभरा 4,600, 5,600,5,100.
अमित झेंडे फाउंडेशन तर्फे रायगड संवर्धन मोहीम          सासवड  प्रतिनिधी  : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                  स्वराज्य गडसंवर्धन मोहिमे अंतर्गत "युवकांना धरून हात स्वराज्याची चालू वाट" या संकल्पनेत अंतर्गत 21 डिसेंबर रोजी अमित झेंडे फाउंडेशन तर्फे पुरंदर तालुक्यातील 4000 महिला व पुरुषांना रायगडाची स्वराज्य गड संवर्धन मोहीम करण्यात आली.अडचणींवर मात करून संघर्षातून वाट काढून स्वराज्याची निर्मिती करून रयतेचे राज्य निर्माण केले. याच संघर्षाची युवकांना जाणीव होऊन प्रेरणा मिळावी, संघर्षाचे साक्ष असलेले हे गड किल्ले यांचे संवर्धन करून या मोहिमेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा व अजरामर संदेश युवकांच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेद्वारे महिलांना गडाची संपूर्ण माहिती हवी यासाठी गाईड्सचे नियोजन करण्यात आले होते. तसेच गडावर मर्दानी खेळ ठेवण्यात आले होते. व सर्व मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांसाठी जेवणाचे नियोजन करण्यात आले होते.चौकट : गडकिल्ले संवर्धन मोहिमेत माझ्यासह सहभागी झालेले प्रत्येक सेवक समानतेच्या पातळीवर काम करतात. प्रगती साधायची असेल तर सर्व धर्मीयांना सोबत घेऊन काम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची गरज आहे. त्यांचे विचार अभाधित ठेवायचे असतील आणि नव्या पिढीला पेरणा व ऊर्जा द्यायचे असेल तर गड किल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. अमित झेंडे फाउंडेशनचे अध्यक्ष अध्यक्ष अमित झेंडे. यांनी सांगितलेगड संवर्धन मोहिमेत गडाची पहिली पायरी चढताना वेगळी ऊर्जा प्रेरणा मिळते. अशा मोहिमांनी जगण्याला बळ मिळते. अशा मोहिमेद्वारे तरुणांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता व अभिमान निर्माण होतो. या मोहिमेत हजारो शिवप्रेमी नागरिक आणि तरुण व महिला मोठ्या संख्येने सहभागी होते.चौकट :    स्वराज्य गड संवर्धन मोहिमेअंतर्गत अमित झेंडे फाउंडेशन तर्फे सर्व युवक व महिलांसाठी अतिशय उत्तम असे नियोजन केले होते. गडाची संपूर्ण ओळख व माहिती देण्यासाठी गाईडचे नियोजन केले होते. अशा मोहिमांद्वारे तरुणांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता व अभिमान निर्माण होते.संतोष खेडेकर यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ : प्राचार्य विजय चिकणे                                           सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                  "विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हापातळीवर श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळदरीचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल. असे प्रतिपादन प्राचार्य विजय चिकणे यांनी आज केले.      काळदरी (ता.पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व व ज्युनियर कॉलेजमध्ये आज शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य चिकणे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी आदर्श शिक्षक संजय जगताप होते.       अशा प्रकारचे आगळे वेगळे शालेय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी जि प प्राथ शाळा काळदरी येथील सर्व विद्यार्थी, विद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच जि प प्राथ शाळा काळदरी येथील मुख्याध्यापिका जयश्री कुंजीर, शिक्षिका शैला जाधव, अंगणवाडी सेविका रेखा कारकर,  शितल कवितके आदी उपस्थित होते.      'विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत.' अशी अपेक्षा विद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख सुनंदा टकले यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी प्रास्ताविकात शासनाचा प्रदर्शन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला. प्रयोगशाळा विभाग प्रमुख पंडित चेंडके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.        प्रमुख पाहुणे  संजय जगताप व जि प प्राथ शाळा काळदरी येथील मुख्याध्यापिका जयश्री कुंजीर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात विद्यालयातील सर्व वर्गातील ९८ विद्यार्थ्यांच्या विविध वैज्ञानिक संकल्पनेवर आधारीत वैज्ञानिक प्रयोगांच्या उपकरणांची मांडणी करण्यात आली होती.         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक पांडुरंग दुर्गाडे, बाळू पोमणे, शिवाजी गोडसे, सुनिल घोडके, कविता शेलार, प्रमिला घोडके व संतोष दोडके यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पुरंदर तालुका उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा संतोष नवले यांनी केले तर आभार  पंडित चेंडके यांनी मानले.
निधन वार्ता                                                                     चंद्रभागा विष्णु शिशुपाल                                          सासवड प्रतिनिधी:                                                        दौंड तालुक्यातील पारगाव (सालु-मालु) गावातील श्रीमती चंद्रभागा विष्णु शिशुपाल (वय ९२ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,नातवंडे तसेच परतुंडे असा मोठा परिवार आहे.पारगावचे माजी सरपंच राजेंद्र शिशुपाल तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शिशुपाल व अशोक शिशुपाल, मंगल उबाळे व आंबळे ग्रामपंचायतच्या माजी सदस्या संजिवनी गायकवाड यांच्या त्या आई होत. तर पुरंदर तालुक्यातील आंबळे गावचे माजी सरपंच मंगेश गायकवाड यांच्या त्या आजी होत.
देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांची नेमणुकीसाठी कार्यक्रम जाहीर        सासवड प्रतिनिधी :  बापू मुळीक  मुख्य  संपादक पुरंदर प्राईम न्यूज :-                                                             पांगारे (ता पुरंदर )येथील श्री निष्णाई देवस्थान ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपुष्टात आल्यामुळे देवस्थानच्या वतिने सर्वसाधारण सभा शनिवार दि. 20 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती .यावेळी सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर नवीन विश्वस्त निवडीचा कार्यक्रम देवस्थानच्या सचिवांनी जाहीर केला . दि ६ जानेवारी २०२५ रोजी नवीन विश्वस्तांची निवड करण्यात येईल ,यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात येणार आहे .देवस्थान ट्रस्टवर काम करण्यासाठी पांगारे गावातील अनेक नागरिक इच्छुक असल्याचे यावेळी दिसून आले .त्या संदर्भात देवस्थान ट्रस्ट यांचेकडून असा खुलासा करण्यात आला .निवड / नेमणूक : श्री निष्णाई देवस्थान ट्रस्ट (रजि) पांगारेसन २०२६ - २०२७ ते २०३१ - २०३२ या कालावधीसाठीएकूण निवडावयाच्या विश्वस्तांची संख्या : कमीत कमी २५ जास्तीत जास्त ३१निवडावयाची पद्धत :शक्यतो सामंजस्याने बिनविरोध निवड व्हावी, नाहीच झाली तर सभेमध्ये उपस्थित असणारे सर्व सदस्यांच्या मतदानाने निवडणूक पद्धतीने .इच्छुकांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरून घ्यावेत . ५जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आलेल्या एकूण अर्जांची आणि उमेदवारांची नावाची यादी प्रसिद्ध केली जाईल .मुदतीनंतर आलेले व विहित नमुन्यात नसणारे फॉर्म बाद केले जातील आणि त्यानंतर कोणतीही तक्रार चालणार नाही .फॉर्म भरण्यासाठी सुरुवात : दिनांक २५ डिसेंबर २०२५अंतीम दिनांक ५ जानेवारी २०२६ संध्याकाळी ५ वाजे पर्यंत नोंदणी फी . १००० / - रू ( रु एक हजार फक्त ' ) इच्छुकांनी आपले विहित नमुन्यात असणारे अर्ज व त्यासोबत आधार कार्ड जोडून ट्रस्टचे सचिव यांचे कडे जमा करून त्याची पोच घ्यावी .  असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे .
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेने 21 डिसेंबरचा निकाल लागल्यानंतर सासवड मधील गुलाल नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी धुतला                                                  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                          निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर रस्त्यावर उधळलेला गुलाल आणि यामुळे शहर लाल झाले होते, मात्र सोमवारचा बाजार पुरंदर तालुक्यात सासवड या ठिकाणी असल्यामुळे, स्वत: हातात झाडू व टँकर घेऊन रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम सासवड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतली, सासवड मधील गुलाल हा सासवड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी धुवून काढला, यासाठी या कृतीचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे, सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी दि. 21 रोजी जाहीर झाला निवडणुकीमध्ये भाजपचे नगरसेवक/ नगरसेविका 13 तर सासवड मधील नगराध्यक्ष हे भाजपचे झालेले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे 9 नगरसेवक/ नगरसेविका झालेल्या आहेत, निकाल हा जाहीर होताच सासवड शहरात जल्लोष करण्यात आला ,तर गुलाल उधळून रात्री उशिरापर्यंत प्रत्येकाने प्रभागांमध्ये आपली मिरवणूक काढून, उत्सव हा सुरू होता, परंतु दुसऱ्या दिवशी साधारण सोमवार या दिवशी चित्र पलटले असून, रस्त्यावर साचलेला गुलाल यामुळे लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना श्वासनाचा त्रास होऊ लागल्यामुळे, ही बाब लक्षात घेऊन, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदी (काकी )जगताप यांच्या आदेशानुसार सर्वत्र, सासवड मध्ये ही मोहीम राबवण्यात स्वच्छतेची आली,भरपूर ठिकाणी गुलालाचा थर साफ केला असून, सोमवार हा सासवडचा तालुक्यातील बाजार असल्यामुळे, त्या ठिकाणी साफसफाई करणे खूप गरजेचे होते, गुलालामुळे डोळे आणि त्वचेला त्रास होत होता ,पण नवे कारभाऱ्यांनी तत्काळ दखल घेतल्याने, बरे वाटले अशी प्रतिक्रिया सासवड शहरातील सामान्य नागरिकांची उमटलेली आहे, नव्या कारभाऱ्यासमोर सासवड शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेत, विजयानंतर लगेचच स्वच्छता मोहीम राबवून त्यांनी सकारात्मक सुरुवात केलेली आहे, येत्या काळामध्ये सासवड शहर विकासाला गती मिळेल, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे, परंतु एक अनुचित प्रकार असा की सोमवार या दिवशी बाजार असल्याकारणाने, आत्तापर्यंत तीन ते चार महिन्यांमध्ये सासवड नगर परिषदेची कोणतीही मोहीम सासवड नगरपालिकेच्या गेट समोर फ्रुटची  हातगाडी असलेली यावर कुठलीही मोहीम हाती अजून आलेली नाही, कारण म. ए.सो वाघिरे विद्यालयातील लहान मुलांची शाळा ही साडेपाच वाजता सुटते, तर प्रत्येक व्यक्ती या आपल्या पाल्याला घेऊन घरी जाताना, सासवड नगरपालिकेच्या गेट्स समोर फ्रुटच्या गाड्या ह्या लागलेल्या असतात, ट्राफिक खूप जाम होते, लहान मुलांना गाडीच्या गर्दीच्या ठिकाणातून घेऊन जाताना, जर एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी सासवड नगरपरिषद जबाबदार असणार का? तीन ते चार वर्ष झाले सासवड नगरपरिषदेवर प्रशासकीय राज असल्यामुळे, या ठिकाणी सोमवारच्या बाजाराच्या दिवशी गेट समोर असणाऱ्या फ्रुटच्या  हातगाडीवर अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही, कारण ठेकेदाराकडून 50 रुपयाची पावती करून, त्या ठिकाणी नगरपालिकेला कर मिळत आहे, परंतु जर एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी सासवड नगरपालिका त्याची जबाबदारी घेणार का?परंतु पत्रकार महोदय यांनी सासवड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना फोन केला असता, या ठिकाणी म्हटले की, नगरपालिकेच्या गेट समोर फ्रुटची हातगाडी लागलेली असून, लहान मुलांना घरी घेऊन जाताना खूप ट्राफिक जाम झालेले आहे, लहान मुलांना घरी घेऊन जाताना खूप त्रास होत आहे, तर त्या ठिकाणी स्वतः पत्रकार महोदय यांनी सासवडचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस कुमार कदम यांना फोन केला असता, त्यांनी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस त्वरित सासवड नगरपालिकेच्या गेट समोर असणाऱ्या चौकामध्ये त्वरित पोलीस पाठवून त्या ठिकाणी असलेले ट्राफिक हे त्यांनी खुले करून दिले ,सासवड शहरातील नगर परिषदेमध्ये असणाऱ्या अडचणी वर ज्या काही गोष्टी असतील त्याची सोमवारच्या बाजाराच्या दिवशी त्याठिकाणी फ्रुटच्या हातगाडी या वेगळ्या ठिकाणी सोय केली जाईल, इथून पुढे विकासाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी नवे पर्व सुरू झाले असताना, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सासवड नगरपरिषदेच्या चौकामध्ये फ्रुटची हातगाडी येथून पुढे लावली जाणार नाहीत, त्याची योग्य अशी दक्षता घेऊन, त्यांना दुसऱ्या ठिकाणी योग्य अशी जागा दिली जाईल. नूतन नगराध्यक्षा आनंदी (काकी) चंदूकाका जगताप सासवड नगरपरिषद.
पुरंदर चं विमानशेतकऱ्यांच्या जमिनीवर उभं राहणारं स्वप्न की राजकारण्यांचं आणि अधिकाऱ्यांच्या स्वार्थाचं विमानतळ?शेतकरी संघषॅ समिती सात गावातील विमानतळ बाधित शेतकरी                                                                सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                       २०१६ साली पुरंदर येथे प्रस्तावित विमानतळाची घोषणा झाली आणि त्या क्षणापासून संपूर्ण परिसर अस्वस्थ झाला. विकासाच्या नावाखाली हजारो एकर सुपीक जमीन जाणार, ही भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली. याच भीतीतून अनेक आंदोलने उभी राहिली. ही आंदोलने केवळ विरोधासाठी नव्हती, तर आपल्या हक्कांसाठी, अस्तित्वासाठी होती.मात्र परिस्थिती इतकी टोकाला गेली की ड्रोन सर्वेच्या वेळी पोलिस बळाचा वापर करावा लागला. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, अनेकांची डोकी फुटली, रक्त सांडलं. प्रश्न असा उभा राहतो नेमकं असं काय घडलं? संवाद, समजूत आणि पारदर्शकता यांचा मार्ग का सोडला गेला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा लाठीचार्ज कोणाच्या सांगण्यावरून झाला?शेतकरी रस्त्यावर उतरले, पण निर्णय बंद दाराआड झाले. या सगळ्या घटनेनंतर फिल्डवर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित झाली का? कोणाचं निलंबन का नाही झालं.?की सगळी किंमत नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनाच मोजावी लागणार का.?“पुरंदर चं विमान” इथेच तपासलं जात आहे. विकास हवा आहे, पण तो अन्यायाच्या, दडपशाहीच्या आणि रक्ताच्या मार्गाने नको. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं, जखमांना न्याय आणि निर्णयांना पारदर्शकता मिळाल्याशिवाय हा प्रकल्प स्वप्न न राहता वेदनेची आठवण ठरेल. विमानतळासाठी आत्तापर्यंत झालेल्या या सर्वसामान्य शेतकरी यांना सहमतीत न घेता, मंगळवार या दिवशी जो काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत सात गावातील सर्वसामान्य शेतकरी यांना न घेता, जिल्हाधिकारी यांनी तीन वेळा जी मनमानी कारभार केलेला आहे, 96% विमानतळ सहमती झालेली अद्याप पर्यंत जिल्हाधिकारी यांनी माहिती दिलेली नाही ,तर आत्तापर्यंत स्वतःची अधिकारी हे तीन वेळा शाब्बासकी ही फक्त एजंटला हाताशी धरून करत आहेत ,एजंट हा सात गावातील शेतकऱ्यांचा मालक नाही, जिल्हाधिकारी यांनी कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील शेतकरी म्हणून यादीनुसार पाच गावातील सरपंच, शेतकरी गावकऱ्यांच्या तर्फे ठरवून दिलेल्या मध्ये मनमानी कारभार करून एजंटांची नावे ही स्वत :जिल्हाधिकारी यांनी ऍड केली आहेत, हे कशासाठी मंगळवार या दिवशी मुंबई येथे जी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर विमानतळ मीटिंग आहे ना? त्यात अधिकारी हे सात गावातील विमानतळासाठी मालक झाले आहेत का? जर एजंटला हाताशी धरताच ना ?तर त्यांची जमीन घ्यावी, आमच्या विमानतळ बाधित शेतकऱ्यांची जमीन अजिबात देणार नाही ,असे ठणकावून सर्वसामान्य शेतकरी यांनी जिल्हाधिकारी यांना स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे. जिल्हाधिकारी यांचा कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी पाच जणांची यादी ही मनमानी कारभार करून जिल्हाधिकारी यांनी केलेली आहे, तर उद्या बैठकसाठी अगोदर जिल्हाधिकारी व नेमलेल्या अधिकाऱ्यांनी पहिले सातही गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सोबत पहिली चर्चा करावी मगच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मुंबई येथे बैठक लावावी, यासाठी जिल्हाधिकारी यांचा अधिकार सर्वसामान्य शेतकरी यांनी केलेला आहे अशी सर्व माहिती सात गावातील शेतकरी संघर्ष समितीने केलेली सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली. तसेच अधिकाऱ्यांनी गावाने दिलेल्या शेतकऱ्यांच्या नावात बदल केले उद्या मीटिंग ला ते त्यांचे वाढीव प्रतिनिधी दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवणार शेतकरी फक्त उपस्थिती साठी असणार.फसवणूक चालू आहे.विचार करा लोकांना दलाल म्हणनारेच  खरे दलाल आहे.गावाने दिलेली नावे सोडून जर कोण तिथे असेल तर सगळ्यांनी मीटिंग वर बहिष्कार टाका ?नाहीतर मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट सांगा एक शेतकरी
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेवर भाजपच्या महिला नगराध्यक्षा आनंदी (काकी) जगताप तर नगरसेविका भाजपच्या सहा, नगरसेवक पदाचे सात उमेदवार एकूण भाजपचे 13 नगरसेवक/ नगरसेविका                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज  :                                                                                      सासवड ता. पुरंदर येथील सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणुकीमध्ये सासवडचे मतदान 33,656 असून पुरुष मतदान 16,818 पैकी 11,404 झाले,महिला 16,838 पैकी 11,153 झाले, यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान झाले होते, मतदान हे 22,557 झाले होते, त्यापैकी मतदान 67.02% झालेले होते, तर 4 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल होता काही, कारणास्तव महाराष्ट्रातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निकाल 21 डिसेंबर रोजी  असताना सासवड नगर परिषदेच्या सभागृहामध्ये रविवारी या दिवशी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली, असताना प्रभाग क्रमांक एक अ मध्ये हिवरकर सारिका हिरामण भाजप 957 मते तर राऊत माधुरी तेजस शिवसेना 1,209 मतांमध्ये 2,52 मतांनी विजयी शिवसेना ब जगताप मनोज गोपाळ अपक्ष 21 मते ,शुभम अ/निल ( बापू) जगताप शिवसेना 1,034 तर मनोहर जगताप 1,112मतामधून 78 मतानी भाजप  विजयी, वढणे लीना सौरभ भाजप 754 मधून 151 मतांनी भाजप विजयी 2अ दिनेश अण्णा भिंताडे 6,13 भाजप तर भिंताडे बाळासो बापूराव शिवसेना 7,55 मतांमधून 142 मतांनी विजयी प्रभाग क्रमांक तीन अ सकट छाया आप्पा उंबाटा 31 मते भोडे नंदा राहुल शिवसेना 6,29 मते तर भोडे शितल प्रवीण 1,013 मतांमध्ये 3,84 मताने भाजप विजयी ब भोंडे रोहित महादू अपक्ष 26 मते, माने सुरज चंद्रकांत शिवसेना 5,64 मते तर ज्ञानेश्वर (माऊलीकाका) गुलाब जगताप भाजप 1,069 मते 505 मतांनी भाजप विजयी ,प्रभाग क्रमांक चार अनिता पांडुरंग माने शिवसेना 9,40 मते तर रणपिसे सोपान एकनाथ भाजप 1,4 44 मतांमध्ये 5,04 मतांनी भाजप विजयी ब मधून स्मिता सुहास जगताप भाजप नगरसेविकापदी यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक पाच अ मधून अमृता बापूसो मेत्रे अपक्ष 1,20 मते, मोनिका मनोज भाजप 1,290 मते तर रत्ना अमोल मेत्रे शिवसेना 1,521 मतांमध्ये 2,31 मतांनी शिवसेना विजयी ब चौखंडे मयूर चंद्रकांत भाजप 1,310 मते तर गिरमे मंदार विजय 1,627 मतामधुन3,17 मतांनी शिवसेना विजयी, प्रभाग क्रमांक सहा अ जगताप सिंधू ज्ञानेश्वर शिवसेना 6,49 मते तर अर्चना चंद्रशेखर (बंडूकाका) जगताप भाजप 1,455 मतामधून 8,06 मतांनी भाजपच्या विजयी ब मधून जगताप अभिजीत गुलाबराव शिवसेना 6,22 मते तर जगताप राजन भैय्या चंद्रशेखर भाजप 1,490 मतामधून 8,68 मतांनी भाजप विजयी, प्रभाग क्रमांक सात अ टिळेकर विद्या श्रीकांत शिवसेना 1,002 तर जगताप स्मिता उमेश भाजप 1,459 मतांमधून 4,57 मतांनी भाजप विजयी ब मधून पवार प्रवीण काळूराम भाजप 1,196 तर टकले वैभव (राजाभाऊ) बबन शिवसेना 1,271 मता मधून 75 मतांनी शिवसेना विजयी, प्रभाग क्रमांक आठ अ मधून सुहास (बापू) लांडगे भाजप 7,97 तर मैत्रे प्रितम (पप्पू) सुधाकर शिवसेना  9,72 मतामधून 1,75 मतांनी शिवसेना विजयी ब मधून राऊत सुमाली संदीप भाजप 8,34 तर जगताप दिपाली अक्षराज शिवसेना 9,34 मता मधून 1,00 मतांनी शिवसेना विजयी, प्रभाग क्रमांक नऊ अ मधून भिंताडे मंगेश रमेश शिवसेना 5,83 तर प्रदीप (बंडू काका) काशिनाथ राऊत भाजप 6,84 मता मधून 1,01 मतांनी भाजप विजयी ब मधून डॉक्टर अस्मिता पोखरणीकर (रणपिसे) शिवसेना 3,17 तर जगताप प्रियंका साकेत भाजप 9,38 मता मधून 6,21 मतांनी भाजप विजयी, प्रभाग क्रमांक 10 अ मधून पवार सुनिल विनायक शिवसेना 9,09 तर गिरमे ज्ञानेश्वर( आबा) साधू भाजप 9,36 मतामधून 27 मतांनी भाजप विजयी, ब मधून सूर्यवंशी दिप्ती सुभाष भाजप 9,08 तर जगताप शिल्पा संदीप शिवसेना 9,54 मतांमधून 46 मतांनी शिवसेना विजयी, प्रभाग क्रमांक 11 अ मधून इनामके हेमलता मिलिंद न्याय प्रविष्ट निर्णय असलेला बिनविरोध निवड आज झाली असून, ब मधून डॉ. राजेश विजय दळवी शिवसेना 5,86 तर अजित (ऊर्फ हापू काका) जगताप भाजप 1,666 मता मधून 1080 मतांनी सासवड नगर परिषदेमध्ये भाजपचे नगरसेवक म्हणून सर्वात जास्त मतांनी निवडून आले आहेत, नगराध्यक्ष पदासाठी धोत्रे निकिता राजेंद्र अपक्ष 98 मते तर अभिजीत मधुकर जगताप उंबाठा6,82 मते भोंगळे सचिन सुरेश शिवसेना 10,271 तर आनंदी (काकी )चंदूकाका जगताप भाजप 11,362 मतामधून 1,091 मतांनी भाजपच्या नगराध्यक्षपदी आनंदी (काकी )चंदूकाका जगताप यांची निवड झाली आहे ,यामध्ये प्रामुख्याने शिवसेना महिला 5 नगरसेविका पदासाठी, तर 4 पुरुष नगरसेवक पदासाठी तर भाजपच्या महिला 6 नगरसेविका पदासाठी तर महिलाया नगराध्यक्ष पदासाठी आनंदी (काकी) जगताप भाजपची निवड झालेली आहे. पुरुष नगरसेवक 7 पदी नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे. यासाठी श्रीमती आरती भोसले निवडणूक निरीक्षक ,डॉ. कैलास चव्हाण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तर सतिश थेटे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पडली असल्याची व निवडणुकीचा निकालाची माहिती दिली .सदर याप्रसंगी राजेंद्रसिंग गौर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांनी पोलीस बंदोबस्त व होमगार्ड यांच्या मदतीनुसार निकाल शांततापूर्वक व सुव्यवस्थेमध्ये राखून व्यवस्थित रित्या पोलीस मित्र मंडळींनी कोणतेही गालबोट न लागता व्यवस्थितरित्या निकाल पार पडला, सासवड नगर परिषदेची रखडलेली सर्व कामे पूर्णत्वास भाजपच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण ,माजी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा, सासवडचा विकास हेच आमचे प्रमुख पाच वर्ष ध्येय असलेले व जनतेची सेवा व विकास कामे करणार असल्याचे नूतन नगराध्यक्ष आनंदी (काकी )चंदूकाका जगताप यांनी ही सर्व सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
Load More That is All