Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from July, 2025Show All
सासवड सुपा रस्त्याच्या कामामध्ये चांगल्याच प्रकारची सुधारणा होत आहे                                                   सासवड प्रतिनिधी: सध्या रस्त्यावर सर्वत्र पसरलेल्या टोकदार, खडी, दगड, चिखलात घसरून पडण्याच्या भीतीमुळे सासवड सुपा रस्त्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याकारणाने, याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी ठेकेदाराचा हलगर्जीपणा, होणे बाबत आवाज उठवून पाठपुरावा केला होता, संबंधित कामाच्या व्यवस्थापकाकडे तक्रारीच्या सूचना केल्या होत्या, त्याप्रमाणे दक्षता घेतल्याने, बदल कामाच्या ठिकाणी दिसत आहेत,, केवळ दक्षता फलकाच्या अभावाने नाही, तर मातीचा आडवा बांध ना घातल्याने दुचाकी सह खड्ड्यात पडून युवकाला पारगाव राठी फार्म हाऊस या ठिकाणी जीव गमवावा लागला होता, यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता, या वृत्ताची दखल घेऊन लगेच राजपथ इन्फ्रा कंपनीने फलक लावण्याची दखल घेतली, पर्यायी रस्त्या जवळ मातीचा ढिगारा घालून, दुर्घटनेची सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला जात होता ,परंतु त्या ठिकाणी राजपथ इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक रोहिदास पिसाळ यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी उनिवा तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले व त्वरित फलक लावण्यात आले. शासकीय अधिकारी प्रतिनिधी कामाच्या दर्जाबाबत पद्धती बाबत ठेकेदाराला जाब विचारत नाहीत, विमानतळाच्या जीव घेण्या संघटने अगोदरच आम्ही त्रस्त आहोत ,मृत युवकांच्या परिवाराला भरपाई द्यावी, आवश्यकता असेल तर ठेकेदारावर सदस्य मनुष्यवस्थाचा गुन्हा दाखल व्हावा, असे नागरिक मागणी करत आहेत. युवराज मेमाणे सामाजिक कार्यकर्ते पारगाव. उकडलेल्या रस्त्यावर माती ऐवजी मुरमाचे आवरण, क्विचित दिसणारा रोड रोलर सातत्याने फिरत आहे, कामाचा रेंगाळलेला वेग वाढतोय, दक्षता फलक ठळक व स्पष्ट लोक वस्तीतून नंबर द्वारे गौण खनिज व वस्तूची होणारी वाहतूक शिस्तबद्ध झाली, पर्यायी रस्त्यांचा दर्जा सुधारतोय. उद्योगपती संतोष हरिभाऊ मुळीक पिसे. काम करताना यंत्रणे कडून सुरक्षितेबाबत काही होणे ,उणीवा राहिल्या असतील त्यामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनाबाबत खेद आहे, स्वत: लक्ष घालून सर्व खबरदारी घेतली आहे. काम पूर्ण होऊ शकेल, एवढाच रस्ता उघडला जाईल, असे राजपथ इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक रोहिदास पिसाळ यांनी ही सविस्तर प्रतिनिधीला माहिती दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड बस स्थानकाची मुंबईच्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी; तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सासवड बस स्थानकाला पास देण्यात आला       सासवड प्रतिनिधी: सासवड (ता. पुरंदर) येथील बस स्थानकातील स्वच्छता, वीज, पिण्याचे पाणी, प्रतीक्षालय व उपहारगृह आदी सुविधांचा राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या बसस्थानकाला राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीमती यामिनी जोशी प्रादेशिक महाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक एक तसेच वरिष्ठ अधिकारी मुंबई यांनी भेट दिली. त्यांनी येथे प्रवाशांना देत असलेल्या स्वच्छता, वीज, पाणी, प्रतीक्षा लय, व उपहारगृह आदी सुविधांची पाहणी केली राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाने हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सासवड येथील बस स्थानकामध्ये सुरेश लोणकर सांख्यिकी अधिकारी मुंबई सेंट्रल प्रवीण माळशिकारे स्थानक प्रमुख, संतोष शेगोेकार वरिष्ठ  अधिकारी ,दत्तात्रेय मदने सहाय्य कार्यशाळा अधीक्षक, पोपट जैनक वाहतूक नियंत्रक, कैलास जगताप वाहतुक नियंत्रक, महेश भोंगळे वाहतूक नियंत्रक, कैलास गिरमे प्रवासी मित्र ,पत्रकार बापू मुळीक आदी अधिकाऱ्यासोबत पाहणी करताना  उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी येथील सुविधा बाबत एक प्रकारे चांगले समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागामध्ये प्रवाशांचे सध्या हाल होत आहेत, सासवड बस स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मला एस टी व्यवस्थित लावल्या जाव्यात कारण, प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस याचा सामना करावा लागत आहे. काही वेळ प्रतीक्षाही करत, ताटकळत उभे राहावे लागते, याबाबत यंत्रणेकडे वारंवार मागणी करण्यात आलेली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे, काही पावले उचलली जावीत यासाठी आगार प्रमुखांनी कटाक्ष पद्धतीने लक्ष यामध्ये घालावे. अशा प्रकारची प्रवासी यांनी मागणी केलेली आहे, तर त्यामध्ये सासवड सुपा रोडवरील त्या ठिकाणच्या एस.टी प्रवासाच्या मध्ये अनुसूचित्ता आहे, त्यासाठी ग्रामीण भागामध्ये फेऱ्या वाढवाव्यात अशा सूचना स्वत: पत्रकार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडे तक्रारी सांगितल्या आहेत.
महसूल सप्ताहात पुरंदर तालुक्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन: तहसिलदार विक्रम राजपूत            सासवड प्रतिनिधी:    एक ते सात ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह होणार साजरा: एक ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिन आणि एक ते सात ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये महसूल सप्ताह 2025 साजरा करण्यात येणार आहे, या सप्ताहात प्रत्येक दिवशी तहसील कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीम कार्यक्रम, उपक्रम, शिबिर, महसूल अदालतीचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, तहसिलदार यांच्यासह सर्व महसूल अधिकाऱ्यांना व्हीसी द्वारे दिल्या, महसूल सप्ताह मध्ये विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असून, यात पुरंदर मधील विविध गावांमधील स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे, एम सेंड धोरणाची अमलबजावणी गावातील जे मोठे रस्ते, अतिक्रमण मुक्त झाले आहेत, तिथे दुतर्फ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 4 ऑगस्ट पासून ऑनलाईन सुनावणीस प्रारंभ भूसंपादनाची सॉफ्टवेअर सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याला पूर्णत्वाकडे नेणार असल्याचे महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मूळ सेवा पुस्तके, अद्यावत करण्याचे नियोजन केले असल्याची ही माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. महसूल सप्ताहातील कार्यक्रमाचे स्वरूप शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे ,या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन केले आहे. शनिवार २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून, रहिवासी प्रयोजनावृत्त, अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना, अतिक्रमित जागाचे पट्टे वाटप करण्यात येईल. रविवार 3 ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करून, त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, 4 ऑगस्ट सोमवार या दिवशी प्रत्येक मंडळ निहाय छत्रपती शिवाजी महाराज महारस्व अभियान राबविण्यात येईल. मंगळवार 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे थेट लाभ हस्तांतरण झालेले नाही, त्यांना घर भेटी देऊन, डीबीटी द्वारे अनुदानाचे वाटप केले जाईल. बुधवार 6 ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे, निष्का शीत करून, त्या अतिक्रमणे मुक्त केल्या जातील, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनी बाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे, सरकार जमा करणे, निर्णय घेतले जातील. गुरुवार ७ ऑगस्ट ला एम धोरणाची अंमलबजावणी करून, नवीन मानक कार्यप्रणाली अनुसार धोरण पूर्णत्वास नेले जाईल आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजित केला जाईल. या महसूल सप्तात पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे ,आवाहन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, करण्यात आले आहे .अशी सर्व माहिती पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांनी  पत्रकार परिषदेत माहिती दिली.
वीर देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष अमोल धुमाळ वर मोका अंतर्गत कारवाई करा: एडवोकेट मंगेश ससाने वीर गावातील अमानुष मारहाण धिंड प्रकरणातील पीडित युवकाची समता परिषदेची भेट                                                                       सासवड प्रतिनिधी: श्रीक्षेत्र वीर (ता, पुरंदर) येथील युवकाला हॉटेलचे बिलावरून केलेल्या बेदम मारहाण व धिंड प्रकरनी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आणि सोशल मीडिया वरतीही संताप व्यक्त केला जात आहे. त्याच अनुषंगाने महात्मा फुले समता परिषदेचे प्रवक्ते एडवोकेट मंगेश ससाने व पदाधिकाऱ्यांनी वीर येथे मारहाण झालेल्या सौरभ सुरेश वाघ या युवकाची भेट घेतली. व घडलेल्या घटनेचा निषेध करून संताप व्यक्त केला आहे. तसेच पीडित युवक व त्याच्या कुटुंबाला या गाव गुंडांपासून धोका असल्याने पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ संरक्षण पुरवावे. देवस्थान ट्रस्टचा उपाध्यक्ष अमोल आप्पासाहेब धुमाळ यांनी त्याच्या 20 ते 25 साथीदारासह अमानुष मारहाण केली यानंतर गुडघे टेकून माफी मागण्यास सांगितले तसेच जातीवाचक शिवीगाळ, वांशिक अपमान, तसेच परिसरातून मारत मारत धिंड काढण्यात आली. हे सर्व कृत्य जाती वर्चस्व मधून व सरंजामी मानसिकतेतून केले गेले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी व मुख्य आरोपी अमोल आप्पासाहेब धुमाळ हा सराईत गुन्हेगार असून याच्यावर यापूर्वी पत्रकारांना शिवीगाळ, धमकावणे दमदाटी यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अमोल हा त्याच्या 20 ते 25 साथीदारांसह टोळी चालवत असून त्याच्यावर (मोका) संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करावेत  असे महात्मा फुले समता परिषदेचे प्रवक्ते एडवोकेट मंगेश ससाने यांनी यावेळी सांगितलेभाग 1: 24 जुलै रोजी रात्री मला झालेली मारहाण आणि मारत मारत काढलेली धिंड यामुळे आजही मी भेदरलेल्या अवस्थेत आहे. जातिवाचक शिवीगाळ आणि गुडघे टेकून मागायला लावलेली भर चौकातील माफी हा प्रसंग माझ्या शरीरालाच नाही तर आत्म्यालाही वेदनादायी ठरला आहे. माझे शारीरिक खच्चीकरण या गाव गुंडांनी केले आहेच परंतु मानसिक खच्चीकरणही केले आहे त्यामुळे  मला न्याय मिळावा हीच अपेक्षा असे पीडित युवक सौरभ सुरेश वाघ यांनी सांगितले.या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान एडवोकेट मृणाल ढोले पाटील, ओबीसी नेते पांडुरंग अण्णा मेरगळ, समता परिषद विजय गिरमे, हर्षल बारवकर, सतीश वचकल, नामदेव गुळदगड, अमोल नवले, सतीश बुरुंगले, नितीन राऊत, प्रवीण होले, अक्षय शिंदे, निलेश कापरे, नाना वाघ, गणेश वाघ, वीरचे माजी सरपंच माऊली वचकल तसेच अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.सदर घटना घडल्यानंतर दोन्ही बाजूंना समजावण्याचा माझा प्रयत्न होता. त्या अनुषंगाने मी भूमिका घेतली तरीही यातून कोणाची मने दुखावले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कधीही जातीवाद केला नाही.माझे नाव राजकीय हेतूने घेण्यात आले आहे असे देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अमोल  धुमाळ यांनी सांगितले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमितपुरंदर शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रम...     सासवड प्रतिनिधी :शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरंदर तालुकाशिवसेनेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवूनत्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सासवड येथील कस्तुरबा आश्रम व पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कुंभारवळण येथील ममता बाल सदनातील मुलांना व निराधारांना शैक्षणिक साहित्य वाटप, काही मुलांच्या शैक्षणिक फी साठी आर्थिक मदत, दिव्यांग मुलांना आवश्यक ती मदत अशा स्वरूपातील तसेच काही ठिकाणी वृक्षारोपण करून वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला    शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास शेवाळे, तालुका प्रमुखअभिजीत जगताप, सासवड शहर प्रमुख राजेंद्र जगतापआरोग्य समन्वयक संतोष भोसले यांसह राहुल लिंभोरे, शुभम झिंजुर्के, सौरभ कुंभारकर, अक्षय गायकवाड,राहुलहोले, विश्वास गद्रे, बाळासाहेब कामठे, आदित्य कामठे यांसह अनेक शिवसैनिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
पुरंदर तालुक्यातील वीर या ठिकाणी हल्ला करणाऱ्या 18 जनावर गुन्हा दाखल                                                सासवड प्रतिनिधी: वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे दर्शन घेऊन, घरी जात असताना, दहा ते बारा जणांनी हल्ला केला. याबाबतची फिर्याद मंगेश महादेव धुमाळ (वय 36 रा. विर ता. पुरंदर यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये ही माहिती दिली. याबाबतची माहिती अशी की सोमवारी रात्री दिलीप विलास धुमाळ आणि चुलत भाऊ अमोल यांना जामीन मिळाल्यानंतर मंगेश धुमाळ व अजित विठ्ठल चव्हाण आणि कुटुंब श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास श्रीनाथ म्हस्कोबा मंगल कार्यालयासमोरून, मोटारीत बसत असताना 10 ते 12 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये आरोपी करण महादेव वचकल, साहिल सावता वचकल, विकास ठकसेन वचकल आणि सौरभ संजय नवले (सर्व राहणार वीर) यांनी मोटारीवर दगडफेक करून नुकसान केले. निलेश नाथाबा जमदाडे, सचिन नारायण वाघ, हनुमंत गोपाळ चौरे आणि सतीश महादेव वचकल हे काठ्या घेऊन त्यांचा पाठलाग करत होते. पिराच्या मंदिराच्या कोपऱ्यावर आदित्य भानुदास दुर्गाडे, जितेंद्र हनुमंत चौरे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटार अडवून, पुन्हा शिवीगाळ केली. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात आरोपी करण महादेव वचकल, साहिल सावता वचकल, विकास ठकसेन वचकल, सौरभ संजय नवले, निलेश नाथाबा जमदाडे, सचिन नारायण वाघ, हनुमंत गोपाळ चौरे, सतीश महादेव वचकल, आदित्य भानुदास दुर्गाडे, जितेंद्र हनुमंत चौरे, कल्पेश वचकल, योगेश वाचकल व इतर सहा अनोळखी इसम (सर्व रा. वीर तालुका पुरंदर) यांच्यावर  यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरी अन्य सहा अनोळखींचा शोध सुरू आहे, असे सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे पुढील तपास करीत आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा तर एकावर गुन्हा दाखल                                 सासवड प्रतिनिधी: सासवड पोलिसांनी मंगळवारी दि. 29 रात्री सव्वानऊच्या सुमारास सासवड (ता. पुरंदर) येथील पीएमटी स्टॉप जवळील मगरबेकरी मागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका दुकानावर छापा टाकत, विजय वसंत जाधव (वय 36 रा. यशराज हॉटेल, लांडगे अळी सासवड) याला अटक केली आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार विजय जाधव हा 'मेन बाजार' नावाचा मटका जुगार चालवत असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार सागर सावता कोरडे आणि पोलीस हवालदार अमोल लडकत यांनी दोन पंचासह  छापा टाकला. छाप्या दरम्यान, विजय जाधव हा एका कागदावर आकडे लिहून, लोकांकडून पैसे गोळा करताना रंग हात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून 'मेन बाजार' नावाचा मटक्याचा कागद, कार्बन पेपर आणि जुगारासाठी वापरलेली सहाशे दहा रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.अशी माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून मिळाली.
पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे एक अज्ञानाचा मृतदेह आढळला                                                               सासवड प्रतिनिधी: झेंडेवाडी( ता. पुरंदर) येथील क्वालिटी कंपनी मागे वाघजाई मंदिराच्या वरच्या बाजूला मंगळवारी( दि. 29) सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे 42 वर्षाच्या पुरुषाचा हा मृतदेह असताना, मयताची ओळख पटू शकली नाही. या मृतदेहा बाबतची तक्रार  पोलीस पाटील सारिका विकास झेंडे( रा. झेंडेवाडी ता. पुरंदर) यांनी दिली आहे. हा मृतदेह पूर्णपणे खराब झालेल्या अवस्थेत, मिळून आला आहे. मयत व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे :वय अंदाजे 42, नाव पत्ता माहित नाही, उंची अंदाजे पाच फूट सहा इंच, अंगाने मजबूत, केस बारीक काळे, अंगामध्ये  भायाचा मोरपंखी रंगाचा असलेला टी-शर्ट फुल काळी पॅन्ट असे आहे या मृतदेहाबाबत माहिती असल्यास किंवा त्याचे नातेवाईक मिळून आल्यास सासवड पोलिसांशी संपर्क करावा, सासवड पोलीस ठाणे 02115/ 222333 तेथे संपर्क करण्याचे आवाहन, सासवड पोलिसांनी केले आहे.
चिखल महोत्सवात खेळाडू रंगले                                 सासवड प्रतिनिधी:पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे "खेळातून वसुंधरेकडे" ह्या संकल्पनेतून "चिखल महोत्सव"  आयोजित करण्यात आला होत्या. सदर महोत्सवा अंतर्गत कुस्ती, कबड्डी, कोलांटी उडी शर्यत, पुश अप्स, सीट अप्स आदी खेळांच्या स्पर्धा चिखलाच्या हौदात आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर महोत्सवा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेत शिवम वडार ह्या पहिलवानाने पांडुरंग भोसले यास चीतपट करून मानाची ढाल जिंकली. शिवम वडार ह्यास मानाची ढाल व ३,०००/-  रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सहभागी खेळाडूनी चिखल महोत्सवाचा यच्छेद आनंद लुटला. महोत्सवाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी, "माती पासून आजचा युवक दुरावत चाललेला आहे. जीवनदायी मातीशी पुन्हा नाळ जोडण्यासाठी अशा उपक्रमांची आजच्या युगात गरज असल्याचे प्रतिपादन केले." निसर्गोपचार उपचार पद्धती मध्ये मड थेरपीचे फार मोठे महत्त्व आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. उपक्रमाचे आयोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.प्रितम ओव्हाळ यांनी केले तर आभार  डॉ. संजय झगडे यांनी मानले. सदर प्रसंगी लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे, डॉ. अनिल झोळ, रवि जाधव, अंकुश धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सासवड शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न                                               सासवड प्रतिनिधी: – पुरंदर तालुक्यातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सासवड शाखेचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि. २८ जुलै रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, माजी सहकार आयुक्त व निवडणूक आयुक्त अनिल कवडे, अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर व शैलेश कोतमिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप फरांदे यांनी करताना संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेने आजवर २५९ कोटींच्या ठेवी, १७२ कोटींचे कर्जवाटप व ०% एन.पी.ए. राखत सातत्याने नफा मिळवला असून, सभासदांना नियमित लाभांश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.उद्घाटक सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक करत "समता पतसंस्थेचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा," असे मत व्यक्त केले. “शाखा वाढवण्याऐवजी व्यवसायवाढीस प्राधान्य द्या,” असा सल्लाही त्यांनी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल कवडे यांनी प्रामाणिकपणावर भर देत, “प्रामाणिकपणा टिकवणे ही काळाची गरज आहे,” असे सांगितले. त्यांनी ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली. “अवयवदान ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे,” असे आवाहन करत समाजप्रती जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे मत मांडले.अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर यांनी “समता पॅलेस” सभागृहाच्या निर्मितीचे कौतुक करत, संस्थेच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली. “गेल्या दोन वर्षांत एकही त्रुटी नसलेली ही संस्था आहे,” असे त्यांनी सांगितले. माजी अप्पर आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी संस्थेची आर्थिक स्थिती सक्षम असून, भविष्यातील वाटचालही सुदृढ दिशेने चालू असल्याचे नमूद केले.या प्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, उपनिबंधक मिलिंद सोबले, सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम, ज्येष्ठ नेते विजय कोलते, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, सतिश काकडे, प्रमोद काकडे, दत्ता चव्हाण, राजेश काकडे, विराज काकडे, शैलेश रासकर, आर. एन. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यालय निरा येथे असून, बारामती हडपसर तर आता चौथी शाखा सासवड येथे नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. या पतसंस्थेची संपूर्ण माहिती, लेखाजोखा, अहवाल,ताळेबंद, सविस्तर माहिती युवराज फरांदे सचिव तथा मुख्य व्यवस्थापक यांनी ही माहिती दिली.  यावेळी पुरुषोत्तम जगताप, माणिक झेंडे, राजन शहा, राजेंद्र जैन, डॉ. निरंजन शहा, मनोज शहा, नितांत चव्हाण, हरिश भुजबळ, अंकुश खोत, पोपट धायगुडे, राजेंद्र कोरडे, डॉ. माधुरी राऊत, ज्योती लडकत, पतसंस्थेचे सर्व संचालक, राहुल ढोले व्यवस्थापक, कर्मचारी, दैनिक बचत प्रतिनिधी, शाखेचे निरा, बारामती, हडपसर, सासवड पतसंस्थेचे सभासद, ग्राहक व बाकी आलेले सर्व पै पाहुणे यावेळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप( दादा) फरांदे संस्थापक अध्यक्ष यांनी केले, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले, तर आभार उत्तमराव आगवणे व्हॉइस चेअरमन यांनी मानले.
भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निवेदने सादर         सासवड प्रतिनिधी:सासवड येथे ३० जुलै रोजी भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने सासवड शहरातील नागरिकांच्या हितासाठी आणि शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. आज, सासवड शहरातील अपघातग्रस्त क्षेत्रांबाबत उपाययोजना राबवण्यासाठी, तसेच शहरात सिग्नल बसवण्याबाबत तातडीने कारवाई करण्यासाठी आणि तहसील कार्यालयातील जुन्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगदरम्यान गहाळ होण्याच्या समस्येवर उपाय करण्यासाठी, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली.या संदर्भात, भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने,  पोलीस उपनिरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन यांना अपघातग्रस्त, क्षेत्रांबाबत उपाययोजना राबवण्याची विनंती करण्यात आली. तसेच, सासवड शहरात रस्ते सुरक्षिततेसाठी सिग्नल बसवण्याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी  मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय, तहसील कार्यालयात जुन्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करताना होणारी गहाळ होण्याची समस्या रोखण्यासाठी तहसीलदार, तहसील कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले.या प्रसंगी भारतीय जनता पार्टी, सासवड शहराचे अध्यक्ष  आनंद जगताप,  उपनगराध्यक्ष  अजित जगताप, भाजपा राज्य परिषद सदस्य  शैलेश तांदळे, मध्य हवेली अध्यक्ष  धनंजय कामठे,  मयूर जगताप,  जयेंद्र निकम,  संतोष जगताप,  तुषार जगताप,  राहुल भोंडे,  उदयराज जगताप,  ओंकार महागांवकर,  मयूर महागांवकर, इ. उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने सासवड शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. यापुढेही नागरिकांच्या हितासाठी अशा प्रकारच्या उपाययोजना आणि कारवाईसाठी पक्ष सक्रिय राहील.
पुरंदर तालुक्यात ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती कार्यक्रम...                                              सासवड प्रतिनिधी: जागतिक निसर्ग संवर्धन दिवस व नाग पंचमीच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन 21जुलै ते 28जुलै या कालावधीत करण्यात आले होते. पाणी पंचायतच्या ग्राम गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या उपक्रमात २६ शाळांतून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला निसर्ग संवर्धन विषयक मार्गदर्शन, विषारी व बिन विषारी साप, त्यांच्या विषयी माहिती, घ्यावयाची काळजी, मानव व साप संघर्षावर उपाय, सापांबद्दल समज, गैरसमज व शंका निरसन अशा स्वरूपातील हा उपक्रम खूपच यशस्वी ठरला.   प्रतिष्ठानच्या या उपक्रमात वाघीरे महाविद्यालय, इला फाऊंडेशन, स्वराज्य संस्था, महाराष्ट्र वन विभाग आदी संस्थानी मोलाचा वाटा उचलला. या विविध संस्थांमधीलराजकुमार पवार, ऋषिकेश जगताप, योगेश मगर,प्रशांतबोरावके, सागर भोंडे, शुभम ठोंबरे, दौलत कुंभार, मानसी नाईलकर यांनी या उपक्रमात बहुमोल माहिती देऊन विद्यार्थ्यांस निसर्ग संवर्धन करण्याची शपथ दिली.
शेतरस्ते अडविल्यास फौजदारी गुन्हे दाखल करावेत; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे                                                सासवड प्रतिनिधी: राज्यातील सर्व शिवपाणंद रस्ते आणि शेत रस्त्यांचे हदद निश्चित करून, त्यांची कामे दर्जेदार रित्या पूर्ण करावीत, अशा सूचना प्रशासनाला देतानाच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेत रस्ते बंद करणाऱ्या वर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शिव पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत, पब्लिक डोमेनच्या माध्यमातून, नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या, त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पाणंद रस्ते सार्वजनिक वही वाटांच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल, असेही सांगून बावनकुळे म्हणाले की, अशा रस्त्यांच्या नंबरींगचे सर्वेक्षण करून, नंबरिंग हटवणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, रस्त्याच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर,त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे, सांगून बावनकुळे यांनी शेत रस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय, वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये, यासाठी ही शासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
आचार्य अत्रे यांच्या आदर्शांचा स्वीकार करुन विद्यार्थ्यांनीस्वतःला घडवावे - प्रा सुधीर गाडे                 सासवड प्रतिनिधी: सासवड ही साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांची जन्मभूमी आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन स्वतःला घडवावे असे प्रतिपादनआचार्य अत्रे यांचे गाढे अभ्यासक प्रा सुधीर गाडे यांनी केले आहे. सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानव सासवड साहित्य परिषद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अत्रे साहित्य लेखन, वाचन, परीक्षण अंतर्गत राबवलेल्या उपक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुखअतिथी म्हणून ते बोलत होते. सासवडच्या वाघीरे विद्यालयातील अत्रे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासविद्यालयाचे प्राचार्य दत्ताराम रामदासी, उपप्राचार्य शंतनू सुरवसे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष अँड दिलीप निरगुडे उपस्थित होते. उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व यशोगाथा पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.    आपल्या प्रमुख मनोगतात गाडे यांनी अत्रे यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत मुलांना उत्तुंग स्वप्ने पाहण्याचा आणि ती सत्यात उतरवून यशस्वी होण्याचा सल्ला दिला. सध्याचर्चेत असलेल्या ए आय (कृत्रिम बुद्धीमत्ता) यावरही त्यांनी उत्तम प्रबोधन केले.विद्यार्थ्यांच्यात वाढणाऱ्या आत्महत्या यावर त्यांनी उपस्थित मुलांना उत्तम मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व उपक्रमाचे आयोजक सतीश पाटील यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश, सहभाग या विषयावर माहिती दिली प्राचार्य रामदासी, ॲड दिलीप निरगुडे याच बरोबर स्पर्धक म्हणून उपस्थित असलेले डॉ सरला जोशी, रेखा चौधरीसाक्षी खैरे, डॉ सुभाष तळेकर ऐश्वर्या भुजबळ, जय भोईटेआदींनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.    कार्यक्रमास ॲड अण्णासाहेब खाडे, दिलीप वारे, केशव काकडे, रमेश कानडे, प्रा ज्ञानदेव कोराळे, प्रा संतोष आटोळे , सदानंद करंदीकर, बाळासाहेब कुलकर्णी यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हेमंत ताकवले यांनी सूत्र संचालन केले. बंडूकाका जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर प्रा संदिप टिळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही: माजी खासदार समीर भुजबळ                                                        सासवड प्रतिनिधी: सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या भाटिया आयोगाच्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, गेली दोन वर्षे आपण न्यायालयांमध्ये लढा देत असून, ओबीसी समाजावर अन्याय होऊ न देता आरक्षण टिकवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे समता परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यव्यापी आढावा बैठका सध्या सुरू असून, याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा, ग्रामीण तसेच महिला आघाडीची संयुक्त बैठक सासवड या ठिकाणी शासकीय विश्रामगृहात पार पडली. यानंतर समीर भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते ,ते म्हणाले की, या बैठकीमध्ये जातनिहाय, जनगणने संदर्भातील केंद्र सरकारचा निर्णय ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती आणि संघटनेची भविष्यातील भूमिका यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जात नाही, जनगणने संदर्भात निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वांची जात नाही, जनगणनेतून आकडेवारी समोर येणार आहे. संघटनेमार्फत महात्मा ज्योतिबा योजनेचा लाभ, शैक्षणिक व राजकीय हक्क सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, यासाठी विशेष मोहिमा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटना अधिक बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, या बैठकीला समता परिषदेचे समीर भुजबळ,मंजिरी घाडगे महिला प्रदेश अध्यक्ष, बापूसो भुजबळ कार्याध्यक्ष, प्रितेश गवळी विभागीय अध्यक्ष, सोमनाथ भुजबळ विभागीय संघटक, रवीभाऊ सोनवणे सरचिटणीस, अनिल लडकत जिल्हाध्यक्ष, निलम होले महिला जिल्हाध्यक्ष, चंद्रकांत गिरमे पुरंदर तालुका अध्यक्ष, दत्ता झुरंगे माजी जि. सदस्य,आबासो भोगळे माजी तालुकाअध्यक्ष, कैलास जगताप  जिल्ह्यातील कार्यकर्ते  पदाधिकारी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. बैठकीतील आगामी निवडणुका संदर्भातील रणनीती, संघटनेची कार्यपद्धती आणि यावरही भरपूर प्रमाणात चर्चा करण्यात आली. खानवडी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी त्या ठिकाणीही भेट देण्यात आली, वीर या ठिकाणची जी घटना घडली होती त्यावरही त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली व त्या ठिकाणी पुढील पद्धतीने पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सांगण्यात आले अशी सविस्तर माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
एम.ई.एस इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन व नागपंचमी सणाचे औचित्य साधून  पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन -      सासवड प्रतिनिधी:      २९ जुलै २०२५ रोजी सासवड येथील एम.ई.एस इंग्लिश मीडियम स्कूल व पाणी पंचायत खळद यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी या सणानिमित्त मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते ऋषिकेश जगताप यांनी नागपंचमी सणाचे ग्रामीण भागातील सांस्कृतिक महत्त्व नमूद करताना सापाच्या विविध प्रजातींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये बिनविषारी साप, निमविषारी साप व विषारी साप कसे ओळखावेत तसेच त्यांची शास्त्रीय माहिती, सापाबद्दल समाजामध्ये असणारे गैरसमज व त्यातील तथ्य, सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाच्या प्रथमोपचाराची माहिती अगदी प्रात्यक्षिकासहीत सांगितली.प्रशालेचे हितचिंतक व विद्यार्थीहीत डोळ्यासमोर ठेवून नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे पालक प्रतिनिधी  संतोष जगताप यांचे देखील मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.  भाऊसो येळे यांनी सूत्रसंचालन केले तर रुचिरा गार्डी  यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
तोंडल गावच्या सर्वसामान्य नागरिकांनी शाळेला टाळे लावले; दोन वर्षापासून शाळेसाठी पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय त्यामुळे ग्रामस्थांची आक्रमक भूमिका सासवड प्रतिनिधी: तोंडल (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळेला गेली दोन वर्षापासून पदवीधर शिक्षक नसल्याने, विद्यार्थ्यांची खूप गैरसोय झाली आहे. त्यामुळे पालक वर्ग, ग्रामस्थ खूप आक्रमक होऊन, शाळेला टाळे लावले. वीर केंद्रात जिल्हा परिषद शाळा ही एकमेव सातवी पर्यंत वर्ग असणारी शाळा आहे, जिल्हा परिषदेत मॉडेल स्कूल अंतर्गत नुकतीच शाळेची निवड केली असून, जवळपास शाळा सुधारण्यासाठी 64 लाख रुपयांची निधी मंजूर झाला आहे. असे असताना गेली दोन वर्षात शिक्षक शाळेला पदवीधर नाही, सर्व ग्रामस्थांनी मिळून  टाळे लावले, या शाळेची इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत 66 पटसंख्या असून, सहावी, सातवीचे 18 विद्यार्थी आहेत, परंतु संच मान्यतेनुसार पाचवी पर्यंत 60 विद्यार्थी असतील ,तर तीन शिक्षक असतात व 26 सातवी ला 21 विद्यार्थ्यांचा वरती विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक त्या ठिकाणी असू शकतात, परंतु पाचवीपर्यंत 66 विद्यार्थी असूनही, दोनच शिक्षक उपलब्ध आहेत. सहावी व सातवीच्या वर्गात 18 विद्यार्थी आहेत, तर पदवीधर शिक्षक हा आवश्यकता असताना देखील अजून पर्यंत शिक्षक उपलब्ध नाही. याचा परिणाम म्हणून, पालक मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी चिंतेत असून, पालक आपल्या मुलांना जवळच्या पाच किलोमीटर अंतरावरील वीर किंवा नहावी सांडस येथील हायस्कूल मध्ये पाठवत आहेत, याबाबत शाळा समिती कमिटी सरपंच, उपसरपंच, पालक व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांची एकत्रित मीटिंग घेऊन, तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु, यामध्ये गावकरी यांनी लोकवर्गणीतून एक खाजगी शिक्षक देण्याचे ठरले व एक कायमस्वरूपी पदवीधर शिक्षक देण्याचे ठरले होते. परंतु तसे काही आतापर्यंत झाले नाही पुरंदर पंचायत समितीतील गटशिक्षण अधिकारी डुबल यांच्याकडे सुद्धा वेळोवेळी जाऊन, सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी कंटाळून, शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला, तरी या ची पालकांमध्ये संभ्रमावस्था झालेली आहे, तरी पुरंदरचे गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी तोंडल गावाला आले नाहीत, पुरंदर तालुक्यातील शेवटचे टोकाचे गाव असल्यामुळे, या ठिकाणी शिक्षक येण्यासाठी तयार होत नाही, असे गटशिक्षण अधिकारी सांगतात. मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता नुकसानास शासनच जबाबदार आहे, यावेळी सरपंच शरद वनवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केशव वनवे, पूजा तुंगतकर, शाम नागरगोजे, कैलास वनवे, शामकांत वनवे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी, जावेद इनामदार, प्रतीक भोसले, अश्रू वनवे, बळीराम वनवे, तानाजी वनवे, ज्ञानेश्वर वनवे, बबन मोरे, स्वाती वनवे, शिवाजी वनवे, बाळासो बाबर, शिवा वनवे, लक्ष्मी वनवे, राकेश तुंगतकर, चेतन वनवे, रामभाऊ नागरगोजे, गोरख वनवे तसेच तरुण मंडळ हे मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. ग्रामस्थांची मागणी शाळेला त्वरित पदवीधर शिक्षक मिळावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवले पाहिजे, शिक्षक जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सर्व ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत, असा निर्धार ग्रामस्थांनी एक प्रकारे व्यक्त केला, यासाठी आमदार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, पत्रकार यांना सर्व हाकिकत सांगून सुद्धा पुरंदरचे गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी कुठलीही दखल घेत नाहीत, याला सर्वस्वी जबाबदार हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानिस गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी आहेत, असे तोंडल गावच्या ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.
पुरंदर तालुक्यातील देवडी येथे मोफत लमपी लसीकरण शिबिर व रोग निवारण औषध वाटप सासवड प्रतिनिधी: देवडी येथे श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व डॉ. मनोज शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत औषध वाटप व लमपी लसीकरण करण्यात आले.यावेळी उपस्थित पशुपालक आणि मिलिंद (भाऊ) गायकवाड अध्यक्ष आणि डॉ. मनोज शिंदे व ग्रामस्थ यांच्या वतीने गोपूजन करून, आजाराबद्दल माहिती देऊन, औषध वाटप करण्यात आले. उत्कृष्ट पशुपालकांना कीट वाटप करण्यात आले, त्यानंतर गावातील आलेल्या जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल बाठे यांनी केले, तर उपस्थितांना मार्गदर्शन डॉ. मनोज शिंदे यांनी व शुभम काळे वेटरीना फार्मासिटिकल्स यांनी केले,  पशुपालकांना आवश्यक वाटप करण्यात आलेल्या किट मधील औषधांची माहिती डॉ. शिंदे यांनी करून दिली व  पशुपालकांच्या अडचणींचे निदान करून, त्यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर मिलिंद भाऊ गायकवाड यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या, लागेल ती मदत करण्याच्या आश्वासन दिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दादा बाठे, सरपंच निलेश यादव, बाबू भाटे, डॉ. खंडागळे व डॉ. निकम सुरेंद्र गॅब्रियल व कर्मचारी मयूर व सहकारी पशुपालक विलास बाठे, विलास चोरगे, गोकुळ नाना बाठे, राजेंद्र यादव, विजय भोसले, सुरेश भोसले, सतीश चिव्हे, संपत भोसले, संदीप बोडरे, किरण भंडलकर, अक्षय खाटपे, अनिकेत बाठे, संतोष बाठे, मोहन यादव, महादेव भोसले, गणेश भोसले, मोहन कामठे व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार प्रदर्शन राकेश बाठे यांनी केले, सूत्रसंचालन जालिंदर काळे यांनी केले, शेतकरी वर्गातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
काळदरी विद्यालयाचा वृक्षारोपण करुन वर्धापनदिन उत्साहात साजरा                                                                   सासवड प्रतिनिधी:     काळदरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळदरी येथे प्राचार्य विजय चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री सत्य साई सेवा संघ, पुणे यांच्या सहकार्याने विद्यालयाचा ३५ वा वर्धापन दिन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप करुन तसेच वृक्षारोपण करुन उत्साहात साजरा करण्यात आला.        सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व चंदुकाका जगताप यांनी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल ताकवले गुरुजी यांच्या आग्रहाखातर काळदरी परीसरात या विद्यालयाची स्थापना केली. अनेक नामांकित संस्था या दुर्गम व डोंगराळ भागात विद्यालय सुरु करण्यासाठी धजावत नसताना काळदरी, धनकवडी व दवणेवाडी परीसरातील गरीब, गरजू,कष्टकरी, शेतकरी व सामान्य माणसांच्या मुलांना विशेषतः मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून या विद्यालयाची श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या नावाने २७ जुलै १९८९ रोजी स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्थापना केली. युवकांचे मन, मेंदू, मनगट व मस्तक सशक्त व्हावे आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना चालना देण्यासाठी गेल्या ३५ वर्षापासून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यासह हवेली आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा व वाई या तालुक्यांमध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थेच्या १८ विद्यालयांच्या माध्यमातून अत्यंत समाधानकारक शैक्षणिक कार्य चालू आहे. असे मनोगत प्राचार्य विजय चिकणे यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी स्व चंदुकाका जगताप यांच्या शैक्षणिक कार्यासोबतच तालुक्यातील शेतकरी, युवक व महिला यांचेसाठी केलेल्या विविध उपक्रमांची आणि विविध संस्थांची उभारणी याविषयीच्या आठवणींना आपल्या मनोगतांमधून उजाळा दिला.         काळदरी येथील श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,  काळदरी या उपक्रमशील विद्यालयाच्या ३५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रथमतः संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर श्री सत्य साई सेवा संघ, पुणे यांच्या सहकार्याने पेरु, चिक्कू, वड, पिंपळ यांसह विविध फुलझाडांची २०० रोपे व थिंक शार्प फाउंडेशनच्या वतीने ७५ झाडे विद्यालयातील परीसरात वृक्षारोपण करण्यासाठी उपलब्ध करुन दिली. उपलब्ध सर्व २७५ झाडांचे विद्यालयाच्या परीसरात श्री सत्य साई सेवा संघ, पुणे यांचे ९५ सेवेकरी, काळदरी गावातील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मदतीने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण झाल्यानंतर सर्वांना श्री सत्य साई सेवा संघ, पुणे यांच्यावतीने आयोजित मिष्टान्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.          या कार्यक्रमासाठी पुणे परीसरात विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले ९० सेवेकरी तसेच विद्यालयातील शिक्षक  पांडुरंग दुर्गाडे,  संजय भिंताडे,  सुनिल घोडके,  शिवाजी गोडसे,  पांडुरंग जाधव,  अशोक भगत,  सुनंदा टकले, कविता शेलार,  किसनराव राऊत, पूनम कुंभार, यादव यांचेसह मदतनीस प्रमिला घोडके व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी प्रा. संतोष नवले यांनी सूत्रसंचालन केले तर  बाळू पोमणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
निधन वार्ता शिवराम वांढेकर                                     सासवड प्रतिनिधी: दि. 29 भिवडी (ता. पुरंदर) येथील शेती व्यावसायिक शिवराम अनंतराव वांढेकर (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.     त्यांच्या मागे बंधू, पत्नी, तीन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे.    सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोहन वांढेकर ,चिंतामणी हॉस्पिटलचे डायरेक्टर डाॅ.लक्ष्मण वांढेकर यांचे ते बंधू होत. तर प्रेसिडेंट हॉटेलचे मालक राजेंद्र वांढेकर, विजय वांढेकर व प्रगतशील शेतकरी, क्रिकेटपटू संजय वांढेकर यांचे ते वडील होत. बातमी सोबत फोटो पाठवीत आहे. फोटो ओळी -शिवराम वांढेकर
श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर कानिफनाथ महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्नश्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर दुमदुमला कानिफनाथ महाराज की जय चा जयघोष                    सासवड प्रतिनिधी: दि.29 बोपगाव (ता. पुरंदर )येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर श्री चैतन्य सदगुरु कानिफनाथ महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रकट दिन सोहळ्यानिमित्त श्री सदगुरू शंकर महाराज मठ केडगाव अहिल्यानगर मठाधिपती गुरुवर्य अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ३०१ यज्ञकुंड द्वारे दत्तयाग व नवनाथ याग यज्ञ सोहळा पार पडला. यावेळी हजार भाविकभक्तांनी गडावर उपस्थित राहून कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी गडावर सर्वत्र कानिफनाथ महाराज की जयघोष दुमदुमत होता.    श्री चैतन्य सदगुरु कानिफनाथ महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन  श्री नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे ,उपाध्यक्ष दिपक फडतरे ,सचिव जयवंत फडतरे ,खजिनदार नागेश फडतरे ,संचालक शिवाजी जगदाळे  ,प्रकाश(नाना)फडतरे  ,प्रकाश(आप्पा )फडतरे , सुरेश फडतरे ,महादेव फडतरे ,नितीन फडतरे, रमेश फडतरे,मंगेश फडतरे, सोनबा फडतरे, व्यवस्थापक संतोष गोफणे , पांडुरंग बाठे व  बोपगावकर ग्रामस्थ यांनी केले.     दत्तयाग व नवनाथ याग प्रसंगी उद्योजक दयानंद फडतरे, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, शिवसेना नेते दादासाहेब जगदाळे आदींसह  पुरंदर मधील  बहुसंख्य शाळा, विद्यार्थी ,शिक्षक, बोपगावकर ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.     यावेळी  महेश शिरसठ, तुषार घुले, प्रसाद हरपळे, स्वप्निल सातव, ऋषिकेश कामठे, गोकुळ धावडे यांनी महाप्रसाद पंगतीसाठी अन्नदान केले.    यावेळी श्री चैतन्य सद्गुरू कानिफनाथ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त पहाटे ४ ते ५.५० वा. काकड आरती व भजन, पहाटे ५ ते ६ वा. सहस्त्र दुग्धधारा महाभिषेक, स. ६ वा. महाआरती, स. ६.१५ ते ६.४५ श्री सदगुरु नवनाथ भक्तांच्या ओव्या गायन, स. ६.४५ ते ७.३० वा. साळुंखे बंधूंचे सुस्वर अभंग वाणी भजन, स. ७.३० ते ८.३० नवनाथ ग्रंथ ४० वा अध्याय पारायण वाचन, स. ८.३० ते  ११.३० वा. दत्त याग, नवनाथ याग होम हवन, सकाळी ११.३० ते १२ वा. १०१ भोग नैवेद्य परिक्रमा, दु.१२.३० वा. कानिफनाथ महाराज जन्म सोहळा, दुपारी १२.४५ वा. महाआरती व महाप्रसाद, दु.१ वा. कानिफनाथ महाराज मंदिर पालखी प्रदक्षिणा मिरवणूक, दु. १ ते २ वा. आखाडा व छबीना बोपगाव ग्रामस्थ, दु. २ ते ४.३० वा. साम्राज्य प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथक, सायं. ६ वा. हरिपाठ, रात्री महाआरती याप्रमाणे धार्मिक विधी संपन्न झाले.    बातमी सोबत फोटो पाठवीत आहे.फोटो ओळी - बोपगाव (ता.पुरंदर) येथील श्री क्षेत्र कानिफनाथ गडावर श्री चैतन्य सदगुरु कानिफनाथ महाराज प्रकटदिन प्रसंगी भाविक भक्त
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये भक्तीमय वातावरण                                सासवड प्रतिनिधी: श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 28 सासवड (ता. पुरंदर) येथील करा काठावरील सिद्धेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी उत्साह वातावरणात दर्शन घेतले, मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे दिवसभर संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात नाहून गेला होता, दरम्यान रविवारी दि. 27 पासूनच मंदिरात भक्तीचा जागर सुरू झाला होता ,श्री सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे भाविकांना मंत्रमुक्त केले, पहाटे पाच वाजल्यापासून रुद्राभिषेक सुरू झाले, पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते सकाळी महापुराभिषेक आणि त्यानंतर महाआरती झाली. उत्तरा देवीच्या रिश्टेबल ट्रस्ट वेंकटेश राव यांच्या वतीने अभिषेक झाला. याप्रसंगी मंदिर परिसरात आणि शिवपिंडीला फुलाची सजावट आणि शृंगार करण्यात आला, यावेळी महाप्रसाद संजय जगताप मित्रपरिवार तसेच अजित जगताप, अतुल जगताप ,तुषार जगताप, डॉ. समीर काकडे, संदीप मेरुकर, प्रा. संदीप टिळेकर, आबा जगताप, नंदकुमार जगताप, सुनील जगताप, पुनम चौधरी, राजेंद्र गिरमे यांच्यावतीने देण्यात आला. रविवारी रात्रीपासून भाविकांची जलाभिषेक सुरू होते, सिद्धेश्वर महादेव देवस्थानच्या वती_ने संदीप जगताप व सदस्यांनी कार्यक्रमाचे  नियोजन केले होते.
भिवरी येथील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केले                                       सासवड प्रतिनिधी: भिवरी (ता. पुरंदर) येथील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे ,शंकर नारायण लोणकर (वय -54 रा. भिवरी ता. पुरंदर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. लोणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल दादासो कामठे, दादासो कामठे( दोघे रा. येवलेवाडी पुणे) आणि जालिंदर निंबाळकर (पूर्ण त्याचे नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणकर यांनी एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या गट नंबर 561 मधील पाच गुंठे जमीन विक्रीसाठी काढली होती, निंबाळकर यांच्या ओळखीने विशाल कामठे आणि दादासो कामठे यांनी ही जमीन 17 लाख 50 हजार रुपयांना विकत घेण्याचे ठरवले, सुरुवातीला नऊ लाख रुपये इसारा पोटी दिले, मात्र उर्वरित तेरा लाख रुपये देण्यात टाळाटाळ करत होते, लोणकर यांनी इसार पावती रद्द करण्याची मागणी केली असता, त्यांनी नऊ लाख रुपयावर चार लाख 50 हजार रुपये व्याज मागितले, लोणकर यांनी हे व्याज दिले तरीही, त्यांनी इसारा पावती रद्द केली नाही. उलट जास्त व्याजापोटी आणखी चार लाख रुपये मागितले आणि न दिल्यास 16 गुंठे शेत जमिनीवर ताबा घेण्याची धमकी दिली, विशाल कामठे, दादासो कामठे आणि निंबाळकर यांनी शनिवारी तारीख 26 सकाळी दहा वाजण्याच्या सुमारामध्ये लोणकर यांच्या घरी येऊन शिवीगाळ केली आणि चार लाख रुपये व्याजाची मागणी केली, तसेच 16 गुंठे जमीन आपल्या नावावर करून देण्यास सांगितले, मागणी पूर्ण न झाल्यास हात ,पाय तोडण्याची आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, या त्रासाला कंटाळून लोण कर यांनी औषध पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला, सध्या लोणकर यांच्यावर सासवड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चोरगे ए.एस पुढील तपास करत आहे.
वाघीरे महाविद्यालय सासवड येथे  जागतिक निसर्ग संवर्धन् दिनानिमित्त पर्यावरण जागृती कार्यक्रमाचे आयोजन          सासवड प्रतिनिधी:       सासवड येथील वाघिरे महाविद्यालय सासवड येथे वनस्पतीशास्त्र विभाग, पाणी पंचायत खळद, तसेच् इला फौंडेशन, पिंगोरी यांच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त "पर्यावरण जागृती अभियानाचे " आयोजन करण्यात आले. या अभियानाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  राज् कुमार पवार , इला फौंडेशन व  प्रशांत बोरावके , समन्वयक् पाणी पंचायत उपस्थित होते. यावेळी प्राचार्य पंडित शेळके यांनी महाविद्यालयामधे पर्यावरण संवर्धनासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन केले, तसेच पुरंदर सारख्या कमी पाऊस असणाऱ्या विभागामध्ये असून देखील ठिंबक सिंचन तंत्रज्ञान वापरून महाविद्यालयामध्ये नवीन वृक्षलागवड व संगोपन करून बहरलेल्या वृक्षसंपदेची देखील माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले.     यावेळी  प्रशांत बोरावके यांनी पर्यावरण संवर्धनासाठी शाळा व महाविद्यालयामधे राबवीत असणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली तसेच आत्तापर्यंत पुरंदर तालुक्यामध्ये 2500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती मध्ये सहभाग घेतल्याचे नमूद केले. यावेळी  राजकुमार पवार यांनी नागपंचमी या सणाच्या निमित्ताने या सणाचे ग्रामीण भागातील सांस्कृतिक महत्व नमूद करताना सापाच्या विविध प्रजाती बद्दल विद्यार्थ्यांला मार्गदर्शन केले. यावेळी विषारी सर्प व बिनविषारी सर्प कसे ओळखावे तसेच त्यांची शास्त्रीय माहिती , समाजामध्ये असणाऱ्या मिथक आणी तथ्य तसेच सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाच्या प्रथमपचाराची तसेच आवश्यक वैद्यकीय उपचाराची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवीला.या उपक्रमाचे आयोजन वनस्पती शास्त्र विभागाने प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ.शीतल काल्हापुरे यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे परीचय डॉ. विद्या पाटणकर, सूत्रसंचालन् प्रा.शुभम ठोंबरे आणी आभार प्रदर्शन डॉ.स्वप्नील जगताप यांनी केले. प्रणिशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.भाग्यश्री मदभावीकर, वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रा.प्रियांका गायकवाड,  संतोष पवार,  संतोष लोणकर,शरद यादव,  संदीप दगडे उपस्थित होते.
तुमच्या मुला मुलीवर स्वप्नही लादू नका: मुख्याध्यापक भाऊसो बडधे                                                           सासवड प्रतिनिधी: मुलांना वाढविणे आणि एक प्रकारचे घडविणे यामध्ये फरक हा आई-वडिलांनी लक्षात घ्यावा, आपण आपली अर्धवट स्वप्नेही राहिलेली आपला मुलावर लादून त्यांना घडविण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी त्यांचे अंतर्मन ओळखायला शिका, त्यांचे कल ओळखायला शिका, त्यांची स्वप्ने त्यांना पाहू द्या, तुम्ही फक्त त्यांना साथ द्या, म.ए.सो बालविकास मंदिर शाळेत पालकांना एक प्रकारे रहस्य पालकत्वाचे समजून सांगताना, मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांनी आपले विचार मांडले.सासवड (ता. पुरंदर) येथील म.ए.सो बालविकास मंदिर शाळेत पालकांचा पालक सभा उत्साहात पार पडली. पालक सभेची सुरुवात स्वागत गीत करून, सादर करताना, विद्यार्थिनी स्वागत केले. आपल्या पाल्याला वाढवणे, आणि घडवणे यातील अंतर आपण ओळख खायला शिका,पाल्यामधील सप्त गुण हे लहानपणापासूनच कळले, तर त्याचा विकास होण्यास मदत होते, पाल्याला त्याच्या कलानुसार शिक्षण घेण्याचे प्रत्येक आई-वडिलांनी मदत करावी. पाल्यामध्ये जे गुण आहेत, त्याच्या योग्य दिशेने विकास करणे, हे प्रत्येक पालकाचे आद्य कर्तव्य आहे, यासाठी प्रत्येक पालकांशी हसत खेळत संवाद साधला तर मुले ही अनुकरणातून शिकतात, त्यामुळे सल्ला देण्याऐवजी सर्वप्रथम पालकाने त्यांच्यासमोर आदर्श घालून दिला पाहिजे, ज्यामुळे पालकांचे बघूनच विद्यार्थी हा शिकेल, असेही त्यांनी सांगितले. विविध समित्यासाठी निवडी यानंतर शैक्षणिक वर्ष 2025 -26 मधील सरकारने ठरवून दिलेल्या, महत्वाच्या चार समित्यांमधील सदस्यांची निवड ही उपस्थित पालकांमधूनच, करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकासन समिती या सर्व समितीचे गठन पालक बंधू -भगिनी मधूनच करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्या योगेश टकले, उपाध्यक्ष डॉ. राकेश नामदेव आत्राम यांची निवड करण्यात आली असून, सखी सावित्री समितीचे अध्यक्ष सीमा संदीप काळे यांची निवड झाली आहे, महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष मंजुषा सुनील चोरमाले,उपाध्यक्ष पुजा कुलदिप निगडे यांची निवड झाली आहेच, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समितीचे अध्यक्ष पत्रकार बापू राजाराम मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मुख्याध्यापक भाऊसो बडधे, कुमुदिनी पांढरे, नरेंद्र महाजन, डॉ. राकेश आत्राम, सेविका रेखा कारके, सविता काळे, वृषाली राजपुरे, माता, पालक वर्ग बहुसंख्येने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मंजुषा चोरमाले यांनी केले. सूत्रसंचालन शारदा यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिना खोमणे यांनी मानले.
पुरंदर तालुक्यातील वीर या ठिकाणच्या प्रकरणातील आरोपी चार  अटक  तर आज दोन आरोपी सकाळी अटक             सासवड प्रतिनिधी: विर (ता. पुरंदर) या ठिकाणी समृद्धी बियर बार हॉटेलमध्ये घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणांमध्ये कमलेश शिवाजी धुमाळ, संदीप दादासो धुमाळ, सत्यजित प्रतापसिंग धुमाळ, शंभूराज महादेव धुमाळ (रा. सर्व वीर) यांना सासवड पोलिसांनी  दि.27जुलै रोजी अटक केली आहे. हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून या सहा जणांनी सौरभ वाघ यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मात्र या गुन्ह्यात स्पष्टपणे सहभागी असलेले माजी पंचायत समिती सदस्य दिलीप विलास धुमाळ आणि श्री शेत्र वीर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अमोल अप्पासो धुमाळ यांना आज 28जुलै रोजी सकाळी सासवड पोलीस स्टेशनने अटक केली अशी माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी प्रतिनिधीला  ही माहिती दिली.
वाघीरे महाविद्यालय सासवड येथे जीआयएस कायॅशाळा आयोजित                                                              सासवड प्रतिनिधी:     पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सासवड येथे 26 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात भूगोल विभागाअंतगॅत भौगोलिक माहिती प्रणालीची जीआयएस या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेची आयोजन करण्यात आले होते, ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक जीआयएस तंत्रज्ञानाची ओळख व उपयुक्तता याबाबतच्या वृत्त निर्माण करण्याचा तसेच यामधील नोकरीच्या संधी यामागे मुख्य उद्देश होता, कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित; शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ. संजय झगडे सर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन म्हणून जीआयएस तज्ञ प्रा. डॉ. गणेश काशिनाथ मधे (श्री शाहू मंदिर महाविद्यालय पुणे) यांनी विद्यार्थ्यांना जीआयएस म्हणजे काय, याचा उपयोग, प्रकार, तसेच शैक्षणिक व रोजगाराच्या दृष्टीने जीआयएस मधील करियर, संधी यावर सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सॉफ्टवेअर द्वारे डेमो नकाशा तयार करणे, डेटा विभागातील विश्लेषण अशा विविध बाबीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना जीआयएस तंत्रज्ञानाचा प्रस्तुत अनुभव घेता आला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुषार घोरपडे कार्यक्रमाचे संयोजन प्रा. स्वाती भोसले, प्रा. सागर भोसले, प्रा. मनोज बोडरे, प्रा. प्रतीक्षा पोमण, प्रा. रूपाली साठे, प्रा. कपिल कांबळे, प्रा. करिष्मा बरकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुभाष नपते, इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी अनुजा सावंत या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रतीक्षा पोमण यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. स्वाती भोसले यांनी मानले. विद्यार्थ्यांनी देखील या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, भविष्यात अशा कार्यशाळेचे आयोजन करावे, अशी मागणी ही विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
पुरंदर तालुक्यातील वीर या ठिकाणच्या प्रकरणातील आरोपी अटक                                                                    सासवड प्रतिनिधी: विर (ता. पुरंदर) या ठिकाणी समृद्धी बियर बार हॉटेलमध्ये घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणांमध्ये कमलेश शिवाजी धुमाळ, संदीप दादासो धुमाळ, सत्यजित प्रतापसिंग धुमाळ, शंभूराज महादेव धुमाळ (रा. सर्व वीर) यांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून या चौघांनी सौरभ वाघ यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मात्र या गुन्ह्यात स्पष्टपणे सहभागी असलेले माजी पंचायत समिती सदस्य दिलीप विलास धुमाळ आणि श्री शेत्र वीर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अमोल अप्पासो धुमाळ यांना अद्याप अटक केलेली नाही, तर या संदर्भात वीर येथील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्या मते नाराजी आहे.
डॉ.स्वप्नील जगताप, प्रा.पूर्वाराणी जगताप, अमोल भोसले व कुचेकर यांनी शूटिंग स्पर्धेत बाजी मारली                     सासवड प्रतिनिधी:पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. २६ जुलै २०२५ रोजी वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.प्रितम ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी रायफल शुटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शूटिंगचे राष्ट्रीय खेळाडू शंतनु पांगारकर उपस्थित होते. स्पर्धेचे उदघाटन उपप्राचार्य डॉ.संजय झगडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे, मीरा चिकने, रवि जाधव, प्रा.सचिन शाह, डॉ.नितीन लगड, शैलेंद्र राऊत आदी. उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणेवरिष्ठ महाविद्यालय पुरुष गट : प्रथम क्रमांक - डॉ.स्वप्नील जगताप(वनस्पती शास्त्र विभाग) ३७ पॉईंटस, द्वितीय क्रमांक- प्रा.सुजितकुमार देसाई(सूक्ष्मजीव शास्त्र विभाग) ३५ पॉइंट्स, तृतीय क्रमांक - डॉ.सुनील शिंदे(मानसशास्त्र विभाग) ३५ पॉइंट्स. वरिष्ठ महाविद्यालय महिला गट : प्रथम क्रमांक - प्रा.पूर्वाराणी जगताप (मानशास्त्र विभाग) २५ पॉइंट्स, द्वितीय क्रमांक - प्रा.अर्चना मगर (अर्थशास्त्र विभाग) २४ पॉइंट्स, तृतीय क्रमांक - प्रा.मानसी जोशी (सूक्ष्मजीवशास्त्र विभाग) २३ पॉइंट्स. प्रशासकीय कर्मचारी पुरुष गट : प्रथम क्रमांक - अमोल भोसले(विज्ञान विभाग) २९ पॉइंट्स,द्वितीय क्रमांक - प्रमोद भोसले(परीक्षा विभाग) २७ पॉइंट्स,तृतीय क्रमांक - बालाजी ताकमोगे (कार्यालय विभाग) २६ पॉइंट्स. प्रशासकीय कर्मचारी महिला गट : प्रथम क्रमांक - कल्पना कुचेकर(कार्यालय विभाग) २४ पॉइंट्स,  द्वितीय क्रमांक - मयुरी जगताप(कार्यालय विभाग) २२ पॉइंट्स, तृतीय क्रमांक - कल्पना म्हस्के(विज्ञान विभाग) ०५ पॉइंट्स.
Load More That is All