Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from August, 2025Show All
अधिकारी कार्यालय पुणे 40 कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्त जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्कार भाऊराव पुणे सर यांना                                                                सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे ,चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने यावर्षीचा जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्काराने  भाऊराव खुणे सर यांना सन्मानित करण्यात आलेआहे .महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे भावे हायस्कूल चे जेष्ठ क्रीडाशिक्षक  भाऊराव खुणे सर गेली अनेक वर्ष सेवा करीत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूनी विविध स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे . विद्यार्थी प्रिय व शिस्तप्रिय शिक्षक ओळखले जातात. जिल्हास्तरावरील गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार सोहळा सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी  जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी दादासो देवकाते, तालुका क्रीडा अधिकारी अश्विनी शिवानंद हत्तरंगे, प्राचार्य अल्ताफ अन्वर शेख, कॉलेजचे संस्थापक ताहीर हाशी यांच्या शुभहस्ते जिल्हास्तरी गुणवंत क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी क्रीडा भारती चे  विजयराव रजपूत, बारामती जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे  मा.प्राचार्य  रामदासी सर, शिक्षक परिषदेचे  शिवहार लहाने सर,  नितीन राऊत सर, महात्मा फुले मंडळाचे मा. अध्यक्ष मधुकरराव राऊत,  ताजने. तसेच अनेक मित्रमंडळी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सर्वांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
अधिकारी कार्यालय पुणे 40 कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्त जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्कार भाऊराव पुणे सर यांना                                                                सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे ,चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने यावर्षीचा जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्काराने  भाऊराव खुणे सर यांना सन्मानित करण्यात आलेआहे .महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे भावे हायस्कूल चे जेष्ठ क्रीडाशिक्षक  भाऊराव खुणे सर गेली अनेक वर्ष सेवा करीत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूनी विविध स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे . विद्यार्थी प्रिय व शिस्तप्रिय शिक्षक ओळखले जातात. जिल्हास्तरावरील गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार सोहळा सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी  जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी दादासो देवकाते, तालुका क्रीडा अधिकारी अश्विनी शिवानंद हत्तरंगे, प्राचार्य अल्ताफ अन्वर शेख, कॉलेजचे संस्थापक ताहीर हाशी यांच्या शुभहस्ते जिल्हास्तरी गुणवंत क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी क्रीडा भारती चे  विजयराव रजपूत, बारामती जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे  मा.प्राचार्य  रामदासी सर, शिक्षक परिषदेचे  शिवहार लहाने सर,  नितीन राऊत सर, महात्मा फुले मंडळाचे मा. अध्यक्ष मधुकरराव राऊत,  ताजने. तसेच अनेक मित्रमंडळी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सर्वांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
श्रीलंका देशाच्या आरोग्य विभागाकडून अमोल आचरेकर यांचा सत्कार                                                           सासवड पतिनिधी:बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                                     कोविड महामारी मध्ये महाराष्ट्रात केलेल्या कामाचे केले कौतुक श्रीलंका देशाच्या आरोग्य विभाकडून अमोल आचरेकर आणि चेतन सूर्यवंशी यांचा दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी श्रीलंका कोलंबो येथील आरोग्य विभागात अमोल आचरेकर आणि चेतन सूर्यवंशी यांचा कोविड महामारी मध्ये त्यांनी महाराष्ट्रमध्ये  फील्ड वर काम करत असताना, ज्या पद्धती वापरल्या त्याचा फायदा श्रीलंकेत पण झाला Covid  काळात अमोल आचरेकर यांचे प्रत्यक्ष कोविड सेंटरला भेटी देणे  कोविड रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा भरणे, त्यांना कोविड आजार याचे शास्त्रीय महत्त्व पटवून देणे, या कामामुळे त्यांना श्रीलंका सरकारच्या आरोग्य विभागाने निमंत्रण दिले होते त्यानुसार, त्यांचा श्रीलंकेच्या आरोग्य विभाग आणि तेथील आरोग्य मंत्र्यांचे स्पेशल सेक्रेटरी ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स Dr. प्रगीत यांचे कडून सत्कार करण्यात आला ,आणि त्यांच्या पुढील अमेरिका दौऱ्यासाठी आणि त्यांच्या सुरू असलेल्या कोविड उगम या संशोधनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.. असा पद्धतीने महाराष्ट्र मधील अत्यंत अभ्यासू आणि अचूक मांडणी आणि सादरीकरण करणाऱ्या अमोल आचरेकर आणि चेतन सूर्यवंशी यांचा सत्कार श्रीलंकेत होणे ही कौतुकास्पद बाब आहे.अशी माहिती  अमोल  आचरेकर  व चेतन  सुयॅवंशी यांनी  पतिनिधीला  दिली.
जय मल्हार क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्षपदी  अमोल चव्हाण                                                                  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      महाराष्ट्र राज्य जय मल्हार क्रांती संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राजुरी (ता. पुरंदर )येथील अमोल बबन चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या हस्ते अमोल चव्हाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, महाराष्ट्रातील बेरड, बेडर रामोशी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी व समाजाचे रूण फेडण्यासाठी दौलत नाना शितोळे यांनी त्यांना संधी दिल्याचे अमोल चव्हाण यांनी निवडीनंतर सांगितले. संघटनेची वाढ करण्यासोबत व्यावसायिक युवा उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.
भाजपच्या वैद्यकीय आघाडीवर डॉ. सुमित काकडे      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीच्या पुणे ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पुरंदर तालुक्यातील डॉ. सुमित काकडे यांची नियुक्ती करण्यात आली, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हा समन्वयक आमदार राहुल कुल, आणि माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मान्यतेनुसार भाजप पुणे ग्रामीण दक्षिण विभागाच्या नूतन जिल्हा पदाधिकाऱ्यांची यादी घोषित करण्यात आल्याचे, शेखर वढणे यांनी सांगितले, माजी आमदार संजय जगताप यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. डॉक्टर सुमित काकडे हे जेजुरी येथील आनंदी लाईफ लाईन हॉस्पिटल आणि आनंदी को ऑफ हॉस्पिटलचे संचालक आहेत, या व्यतिरिक्त ते ग्रामीण संस्था या सामाजिक संस्थेचे ही संचालक आहेत, या व्यतिरिक कोरोना महामारीच्या काळात त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे ते सचिव असून, रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे संचालक म्हणून माहिती कार्यरत आहेत.
जय मल्हार क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्षपदी  अमोल चव्हाण                                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     महाराष्ट्र राज्य जय मल्हार क्रांती संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राजुरी (ता. पुरंदर )येथील अमोल बबन चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या हस्ते अमोल चव्हाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, महाराष्ट्रातील बेरड, बेडर रामोशी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी व समाजाचे रूण फेडण्यासाठी दौलत नाना शितोळे यांनी त्यांना संधी दिल्याचे अमोल चव्हाण यांनी निवडीनंतर सांगितले. संघटनेची वाढ करण्यासोबत व्यावसायिक युवा उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.
भाजपच्या वैद्यकीय आघाडीवर डॉ. सुमित काकडे      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीच्या पुणे ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पुरंदर तालुक्यातील डॉ. सुमित काकडे यांची नियुक्ती करण्यात आली, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हा समन्वयक आमदार राहुल कुल, आणि माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मान्यतेनुसार भाजप पुणे ग्रामीण दक्षिण विभागाच्या नूतन जिल्हा पदाधिकाऱ्यांची यादी घोषित करण्यात आल्याचे, शेखर वढणे यांनी सांगितले, माजी आमदार संजय जगताप यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. डॉक्टर सुमित काकडे हे जेजुरी येथील आनंदी लाईफ लाईन हॉस्पिटल आणि आनंदी को ऑफ हॉस्पिटलचे संचालक आहेत, या व्यतिरिक्त ते ग्रामीण संस्था या सामाजिक संस्थेचे ही संचालक आहेत, या व्यतिरिक कोरोना महामारीच्या काळात त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे ते सचिव असून, रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे संचालक म्हणून माहिती कार्यरत आहेत.
पुरंदर तालुक्यात उच्चांकी बाजारभावामुळे सिताफळ उत्पादकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; सासवड येथील बाजारांमध्ये दोन क्रेट साठी 8400 तर पुरंदर मधील शेतकऱ्यांमध्ये समाधान                                             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड (ता. पुरंदर) येथील जुनी तहसील कचेरीवरील पोलीस मैदानावर भरत असलेल्या बाजारामध्ये, सीताफळाला शनिवारी (दि. 30 )उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे ,या बाजारात सीताफळाच्या दोन केरटलाच 8400 असा बाजार भाव मिळाला असून, सासवड येथील बाजारामध्ये वर्षभरातील  बाजार भाव असल्याचे ,शेतकरी व व्यापारी यांनी सांगितले आहे ,सध्या सीताफळाला एकंदरीत चांगला बाजार भाव मिळत आहे, पुरंदर तालुक्यामधील शेतकरी समाधानी आहे ,अशी पिसर्वे (ता. पुरंदर) येथील शेतकरी सोपान वायकर यांनी सांगितले आहे ,वायकर यांच्या सीताफळाच्या दोन केरेटला रविवारी (दि. 31 )7500 बाजारभाव मिळाला असून, हा बाजार भाव गेले वर्षभरातील सर्वात अधिक बाजार भाव असल्याचे वायकर यांनी सांगितले आहे, गौरव काळे उर्फ बल्ली यांनी वायकर यांची सीताफळ खरेदी केली असून, शनिवारी (दि. 30 )काळे यांनी शेतकरी संदीप कडलक यांच्या सीताफळाच्या दोन केरेटला 8400 बाजार भाव दिला असल्याचे सांगण्यात सीताफळाचे आले आहे. सीताफळाच्या केरेटला 3000 रुपयापर्यंत भाजारभाव मिळत असून, हंगाम तीन नंबर दर्जेच्या सीताफळाला 700, 800 असा बाजार भाव आहे, दोन महिन्यापासून सीताफळाचा हंगाम सुरू झाला असून, आता बाजारात जी सीताफळ येत आहे ते चांगल्या दर्जाचे आहे, सासवडच्या फळ बाजारामध्ये  फळा बरोबर पेरू, डाळींब, अंजीर, पपई या फळांच्याही खरेदीसाठी हे ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे, व्यापारी येत असतात ,असे पिंपळे येथील शेतकरी बाळासो पोमण  यांनी सांगितले आहे. सिताफळ खरेदीसाठी राजेंद्र पोटे, सुनील जगताप, महेश काळे, शरद काळे ,जालिंदर काळे,  गिरीश काळे, भाऊसो जगताप, गुप्ता सिद्धार्थ खेडेकर, अतुल धुमाळ, विशाल तळेकर, आदी व्यापारी तसेच शेतकरी संजय जगताप, कुंडलिक भापकर आदी उपस्थित होते. जुनी तहसील कचेरी येथील पोलीस मैदानावर चिखल होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यानंतर, बैठक बोलावून त्यांच्या अडचणी समजावून घेत अडचणी दूर केल्या जातील, असे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
पुरंदर मधील शाळांना मिळाले मुख्याध्यापक                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        संच माहितीनुसार 150 विद्यार्थी पट असलेल्या, शाळांना शासनाच्या वतीने पात्र मुख्याध्यापक दिले जातात, याच प्रक्रियेतून शासनाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील सहा शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नति  मिळाली आहे, यामुळे तालुक्यातील सहा जिल्हा परिषद शाळांना आता पात्र मुख्याध्यापक मिळणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद लाखे यांनी दिली. मुख्याध्यापकपदी पदोन्नती झालेले शिक्षक गावे शोभा तुकाराम कामठे (बोपगाव), जयश्री रामदास जगताप (भिवरी), संगीता शिंगणे (सुपे खुर्द), श्वेता जगताप (लोणकर) (शिवरी), विशाखा प्रताप मेमाणे (पिंपरी खुर्द), उषा केशव जाधव (निरा नंबर दोन).
गौरी समोर साकारले पांडवकालीन सिध्देश्वर मंदिर,साक्षी जगताप यांचा उपक्रम                                              सासवड प्रतिनिधी:  बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                               घरचा गौरी गणपती सजावट मध्ये साक्षी संदीप जगताप सासवड यांच्या घरी साकारले सासवडचे पांडवकालीन , सिद्धेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती गेले तीन आठवडे स्टेज उभारणीपासून, ते मंदिर बनवणे ,ते शिवलिंग व नंदी शाडू माती पासून विनायक जगताप यांनी बनवले गौराई उभ्या स्वरूपात बसवण्यात आले असून, गणपतीचा बॅकग्राऊंडला सुवर्णप्रभावळ बसवण्यात आलेली आहे ,तसेच देखावेसमोर सिद्धेश्वर महादेवांची महाकाल स्वरूपात पूजा मांडण्यात आलेली आहे  संपूर्ण ,देखावा  नैसर्गिक स्वरूप कण्यात आलेले असून, वृक्षाची लागवड दाखवण्यात आली असून, त्याचबरोबर माजी वसुंधरा अभियानाची थीम देण्यात आलेली आहे, "झाडे लावा झाडे जगवा "व "पाणी आडवा पाणी जिरवा" सासवड नगर परिषदेच्या स्वच्छ सासवड सुंदर सासवड अभियान राबवण्यात आले आहे, देखावाची संकल्पना संदिप अशोकराव जगताप देखावा बनवण्यात संपूर्ण जगताप कुटुंबीय साक्षी जगताप सिद्धी जगताप, विनायक जगताप ,विक्रांत शिंदे, निलम शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. गणेश भक्तांना देखावा पाहण्यासाठी अनंत चतुर्दशी पर्यंत ठेवण्यात येणार आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा व सभागृह व्हावे                                             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रज सरकार विरुद्ध पहिले बंड उमाजी नाईक यांनी केले, व देशासाठी फासावर गेले, त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, ते भारताचे पहिले क्रांतिवीर आहेत, पुरंदर तालुक्यातील भिवडी ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने, त्यांच्या स्मृती व इतिहास जिवंत ठेवण्यासाठी, 7 सप्टेंबर शासकीय जयंती व 3 फेब्रुवारी पुण्यतिथी कार्यक्रमास महाराष्ट्रातून समाज बांधव, लाखोच्या संख्येने उपस्थित असतात, या अध्य क्रांतिवीरांच्या सासवड येथे पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या नावाने सभागृह असावे, असे पत्र माजी आमदार संजय जगताप यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी राज्य सल्लागार गणपत शितकल, वंशज चंद्रकांत खोमणे,  गंगाराम जाधव जयमलहार संघटना उपाध्यक्ष कोर कमिटी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, उपाध्यक्ष यशवंत भांडवलकर, लालासो भंडलकर ,राज्य युवक उपाध्यक्ष साहेबराव जाधव, पुरंदर तालुका अध्यक्ष विकास भांडवलकर ,युवक अध्यक्ष अविनाश जाधव, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख खंडू जाधव ,अक्षय भांडवलकर, युवराज जाधव, उमेश जाधव, गणेश भांडवलकर, मनोज जाधव आदी उपस्थित होते.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 शासकीय जयंती सोहळा 7 सप्टेंबर रोजी पुरंदर तालुक्यात        सासवड प्रतिनिधी:  बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी सर्वप्रथम इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध बंड पुकारले आणि आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले, त्या अध्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती 7 सप्टेंबर रोजी भिवडी( ता. पुरंदर) येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे ,7 सप्टेंबर रोजी रविवार या दिवशी दुपारी 12:00 वाजता होणार आहे, स्थळ हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय भिवडी( ता. पुरंदर) येथे होणार आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने भिवडी येथे साजरा करणार आहे, या समारंभास कार्यक्रमाचे उद्घाटक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, कार्यक्रमाचे स्वागतअध्यक्ष गोपीचंद पडळकर आमदार, प्रमुख अतिथी म्हणून तर अजित पवार उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, रवींद्र चव्हाण भाजपा प्रदेशअध्यक्ष, जयकुमार गोरे ग्रामविकासमंत्री, अतुल सावे इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदामंत्री, उदय सामंत उद्योगमंत्री, शंभूराज देसाई पर्यटन मंत्री, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, नितेश राणे मत्स्य व बंदरे मंत्री, दत्तात्रय भरणे कृषी मंत्री, महादेव जानकर माजी मंत्री, प्रकाश (अण्णा) शेडगे माजी मंत्री, लक्ष्मण हाके ओबीसी नेते, प्रवीण दरेकर विधान परिषद गटनेते, प्रसाद लाड महायुती समन्वयक, विशेष उपस्थिती चंद्रकांत खोमणे नाईक (वंशज) आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक, आबासो जाधव नाईक (वंशज )शिवनेत्र बहिजी नाईक, लक्ष्मण (अण्णा) नाईक (वंशज) क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण नाईक, मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार स्वर्गवासी गिरीश बापट, स्वर्गवासी बाबुराव पाचरणे, स्वर्गवासी रामभाऊ जाधव, स्वर्गवासी सुनील (अण्णा) चव्हाण तर जीवन गौरव पुरस्कार बाबुराव अण्णा जमादार बेडर बेरड रामोशी समाज, छगन (अण्णा )जाधव ज्येष्ठ सल्लागार समिती, बाबुराव चव्हाण माजी पोलीस पाटील रिसे, रामोशी बेरड बेडर समाजाच्या मान्य झालेल्या मागण्या, अध्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती करण्यात सुरुवात झाली, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने पोस्टची भारत आणि आंतरराष्ट्रीय तिकीट प्रसिद्ध करण्यात आले, महामंडळाच्या माध्यमातून अनेक कर्ज योजना रामोशी समाजातील युवकासाठी उपलब्ध करण्यात आल्या, दिवे (ता. पुरंदर )येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक प्रस्तावित आहे चा, संदर्भातील बातमी ही जयंतीच्या कार्यक्रमात मिळणार आहे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने पुरस्कार जाहीर, करण्यात आला रामोशी बेरड बेडर समाजातील महापुरुषांची नावे राज्यातील अनेक आयटीआयला देण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात येतो ,याच धरतीवर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती, ती आज पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे, खानापूर शिवनेत्र बहिर्जी नाईक, पुरंदर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ,जत क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण, गडचिरोली वयकाप्पा नाईक या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, कामाच्या बाबतीमध्ये कृतज्ञता करून, हा सोहळा ठरणार असून, रामोशी बेरड बेडर समाजाचा इतिहासामध्ये हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल यात शंका नाही, यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रामोशी बेरड व बेडर समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, या समारंभास उपस्थित राहणाऱ्या अभंगासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, असे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव ,मल्हारी मार्तंड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मोहन मदने, गणपत शितकल, यशवंत उर्फ( बिटु) भांडवलकर, विकास उर्फ (बल्ली) भांडवलकर, अशोक चव्हाण, निलेश जाधव, ओंकार चव्हाण, अक्षय (चिकू )भांडवलकर, चंद्रकांत (भाऊ) खोमणे( वंशज), अविनाश जाधव, स्वप्निल चव्हाण, अमोल चव्हाण, अक्षय जाधव, समीर भांडवलकर, साहेबराव जाधव,  राहुल मदने ,अमित खोमणे, सुरज जाधव, लाला भंडलकर, पत्रकार प्रिंट मीडिया व सोशल मीडिया चे बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन गंगाराम जाधव सर उपाध्यक्ष कोर कमिटी महाराष्ट्र राज्य यांनी मानले.
अपशब्द भडकावण्याच्या घोषणा करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करू: पोलीस निरीक्षक सासवड ऋषिकेश अधिकारी सासवड पोलिसातर्फे बैठक                                       सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                  सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळाची बैठक घेण्यात आली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धवन्हीक्षेपकांचे नियम पाळणे, महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र रांगा ठेवणे, मिरवणुकीत भडकाऊ घोषणा करणाऱ्या अश्लील गाणी,  समाज विघातक लोकांना प्रवेश नसावा, डीजे व लेजर लाईटचा वापर टाळून, पारंपारिक वाद्याचा वापर दिलेला सूचनांचे पालन न केल्यास, कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिला. बैठकीनंतर पोलीस गणेश महासंघ व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी करून, सूचना देण्यात आल्या. या बैठकीस आमदार विजय शिवतारे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसिलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, महावितरणचे उपअभियंता गणेश चांदणे, मंडळाचे पदाधिकारी, सासवड आगार प्रमुख सागर गाडे, यासह सासवड शहरातील सर्व गणेश  मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. पोलिसांनी मंडळांना प्रमुख सूचना देण्यात आलेल्या आहेत, मूर्ती व दागिनेच्या संरक्षणासाठी स्वयंसेवक सुरक्षा सुरक्षक नेमणे, वीज जोडणी व रोषणाई सुरक्षित असल्याचे महावितरण कडून प्रमाणपत्र घेणे, मंडळ आधी पदाधिकाऱ्याकडून नावे व मोबाईल नंबरची यादी दर्शनी भागात लावणे, अशा सूचनाही करण्यात आल्या, संपूर्ण सासवड शहर व ग्रामीण भागात मद्य, विक्री दुकाने बंद राहतील, विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवावी, या काळात मध्य विक्री करताना, आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करा, गणेशोत्सव कार्यक्रम व गणेशाची विसर्जन मिरवणूक कार्यक्रम शांततेत व आनंददायी जावा, यासाठी गणेश मंडळातून चुका होऊ देऊ नका, नियमाचे काटेकोरपणे पालन करा ,याबाबत पोलीस प्रशासनाला  सूचना देण्यात आलेल्या आहेत, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी असे सांगितले. मिरवणुकीच्या रथाचा मार्गावर अडथळा होणार नाही, असा आकार असावा, मिरवणूक काळात महिला व वृद्धांना त्रास होईल, असे कोणतेही प्रकारचे वर्तन मंडळाकडून होऊ नये, रात्री बारानंतर मिरवणुकीचा कार्यक्रम थांबविला जाईल, याची दखल सर्वांनी घ्यावी, असे सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यामध्ये क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा व सभागृह व्हावे                                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रज सरकार विरुद्ध पहिले बंड उमाजी नाईक यांनी केले, व देशासाठी फासावर गेले, त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, ते भारताचे पहिले क्रांतिवीर आहेत, पुरंदर तालुक्यातील भिवडी ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने, त्यांच्या स्मृती व इतिहास जिवंत ठेवण्यासाठी, 7 सप्टेंबर शासकीय जयंती व 3 फेब्रुवारी पुण्यतिथी कार्यक्रमास महाराष्ट्रातून समाज बांधव, लाखोच्या संख्येने उपस्थित असतात, या अध्य क्रांतिवीरांच्या सासवड येथे पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या नावाने सभागृह असावे, असे पत्र माजी आमदार संजय जगताप यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी राज्य सल्लागार गणपत शितकल, वंशज चंद्रकांत खोमणे, उपाध्यक्ष यशवंत भांडवलकर, लालासो भंडलकर ,राज्य युवक उपाध्यक्ष साहेबराव जाधव, पुरंदर तालुका अध्यक्ष विकास भांडवलकर ,युवक अध्यक्ष अविनाश जाधव, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख खंडू जाधव ,अक्षय भांडवलकर, युवराज जाधव, उमेश जाधव, गणेश भांडवलकर, मनोज जाधव आदी उपस्थित होते.
सासवडच्या अजय गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेने केले अथर्वशीर्ष पठण सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      सासवड  येथील अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने मंडळाने विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवाचे औचित्य साधून अजय गणेशोत्सव मंडळात सामुदायिक  अथर्वशीर्ष पठण केले.म. ए. सो.  बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी  सासवड येथील श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाऊन या ठिकाणी अकरा वेळा अथर्वशीर्ष  पठण केले.  त्यानंतर सामुदायिक आरती झाली. विद्यार्थ्यांनी गणपतीची गाणी म्हटली. या उपक्रमात इयत्ता तिसरी, चौथीचे ३५० विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. शाळेचा हा उपक्रम गेल्या चौदा वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे.       श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त मंडळाने वृंदावन चा सुंदर देखावा सादर केला आहे.  वर्षभर मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. गरजू महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत केली जाते तसेच पानवडी येथे गो शाळा सुरू केली आहे. बारामती विभागातून मंडळाला सामाजिक कार्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीणशेठ पवार यांनी दिली.  दरवर्षी गणपती उत्सवाच्या अगोदर विद्यार्थी शाळेत दररोज अथर्वशीर्ष म्हणण्याचा सराव करतात आणि सुस्पष्ट उच्चारासह विद्यार्थी अथर्वशीर्ष पाठांतर करतात.  एवढेच नव्हे तर शाळेतील विद्यार्थी  आपल्या घराशेजारी राहणाऱ्या इतर शाळेतील विद्यार्थ्यांना देखील अथर्वशीर्ष म्हणायला शिकवतात. यामुळे इतर विद्यार्थ्यांचे देखील अथर्वशीर्ष पाठांतर झाले आहे.या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांचे मार्गदर्शन लाभले.        यावेळी, श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुख्याध्यापक , शिक्षक यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला होता. मुख्याध्यापक भाऊसो बडधे, अजय गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार , नरेंद्र महाजन, माणिक शेंडकर, दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे, स्वाती बोरावके, अश्विनी कदम, राणी गिरमे, राजगौरी जगताप, वृषाली राजपुरे, सविता काळे ,मंडळाचे कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे शाला समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी कौतुक केले आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातच वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत; तर रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याची गरज            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      सासवड ता. पुरंदर येथील शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस ठाण्यासमोरील चौक आणि जेजुरी नाका येथील चौकामध्ये नुकतेच नवीन वाहतूक नियंत्रक दिवे कार्यान्वित केले असताना, मात्र अनेक वाहनचालक विशेषत वाहनांचे चालक आणि दुचाकी स्वार वाहतुकीच्या नियमांना सर्रासपणे पायदळी तुडवत असल्याचे चित्र दिसत आहे, यामुळे नियमाचे पालन होताना दिसत नाही, प्रवाशांना आपला जीव मुठीत ठेवून, धोक्यात घालून, प्रवास करावा लागत आहे, वाहतूक नियंत्रक दिवे सुरू असताना, सुद्धा अनेक बेसिस्त वाहन चालक नियम तोडून पुढे जात आहेत, यामुळे नियमाप्रमाणे थांबणाऱ्या वाहन चालकासोबत वाद विवाद आणि बाचाबाची  होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, सासवड येथे दोन्ही ठिकाणी चौक असून, येथे वाहतूक नियंत्रक दिवे बसवण्यात आले असले तरी, अजूनही झेब्रा क्रॉसिंग चे पट्टे मारलेले नाहीत, यामुळे पादचाऱ्यांना रस्ता नेमका कुठून ओलडायचा हेच समजत नाही, तसेच वाहन चालकांना सिग्नल लागल्यावर नेमके कुठे थांबायचे? याबाबतही संभ्रम निर्माण होत आहे, यामुळे अपघात होण्याची शक्यता दाट आहे. रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याची जास्त गरज आहे, या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक, असल्याची मागणी स्थानिक नागरिकांचे मत आहे, या ठिकाणी त्वरित पांढरे पट्टे आणि परावर्तक पट्टे मारण्यात यावेत, यामुळे वाहन चालकांना नेमके कुठे थांबायचे याची स्पष्ट कल्पना येईल आणि पादचाऱ्यासाठी ही सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल तसेच वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या बेशिस्त चालकावर कारवाई करण्याची गरज असल्याचेही जाणवत आहे.
विद्यार्थ्यांना मिळाले बँक व्यवहाराचे धडे ...                  सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय माहूर ता. पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयात आज संत सोपान काका सहकारी बँकेने विद्यालयात येऊन बँके मधील विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार कसे केले जातात याविषयी माहिती दिली .     बँक आपल्या दारी या योजनेअंतर्गत  23जून 2025 पासून बँकेने संत सोपान काका पालखी प्रस्थान पासून हा उपक्रम सुरू केला असून या अंतर्गत आज विद्यालयात बँकेच्या आर्थिक व्यवहारांविषयी माहिती देत असताना बँकेचे कर्मचारी विठ्ठल बनकर म्हणाले , विद्यार्थ्यांनी बँकेत आल्यानंतर आपले खाते कसे सुरू करावे , बँक व्यवहार कसे करावेत , विविध खाते प्रकारा विषयी सांगताना बचत खाते , चालू खाते , चालू कर्ज खाते , याविषयी माहिती सांगितली .पैसे काढताना व भरताना च्या विविध स्लिपा कशा भराव्यात , चेक कसा भरावा , आपले स्वतःचे खाते कसे वापरावे , खातेदाराच्या सही विषयी , कागदपत्रांविषयी , कागदपत्र फेर तपासणीचे महत्त्व , आधार कार्ड वरील पत्ते व्यवस्थित असावेत ,आई-वडिलांचे नाव पत्ता , जन्मदिनांक व्यवस्थित असावा .इयत्ता दहावीचे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक असते .त्याचप्रमाणे स्थानिक पत्ता व्यवस्थित असावा ,R.T.G S ,N F T त्याचप्रमाणे I MPS च्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली .   यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक रणजीत जगताप ,विठ्ठल बनकर , निलेश ढुमे , यश जगताप हे बँकेचे कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  हनुमंत पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील  विकास राऊत , इंद्रभान पठारे ,रामचंद्र जगताप , लता गायकवाड हे शिक्षक तर कर्मचारी रामभाऊ कुंभार ,मंगल जगताप , श्रीकांत खोमणे , श्रीकांत गव्हाणे हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले  . कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते .  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र भोसले यांनी  तर आभार पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष रामप्रभू पेटकर यांनी मानले .
पुरंदर तालुक्यातील सासवडच्या अजय मंडळाचा बारामती विभागामध्ये प्रथम क्रमांक                                      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                   सासवड( ता. पुरंदर) येथील अजय गणेशोत्सव मंडळ यांचा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल पुणे ग्रामीण बारामती विभागात प्रथम क्रमांक आला असून, बारामती येथे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल व अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन, अजय मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण पवार, संजय उबाळे, संजय फडतरे, ओम पवार, कुणाल जगताप आदी उपस्थित होते. सासवडमध्ये बेवारस मृत व्यक्तींचा अंत्यविधी केले ,वीस वर्षापासून करण्यात येतो, सासवडमध्ये गरजू लोकांना 50 टक्के अनुदानावर आजपर्यंत मंडळांनी 50 शिलाई मशीन, 20 हातगाडी वाटप करण्यात आले आहे. संगमेश्वर मंदिर येथील कर्हा नदीतील गाळ काढून खोलीकरण केले, मंडळांनी अंध, मतिमंद शाळा मधील विद्यार्थ्यांना अष्टविनायक दर्शन, अशी विविध सामाजिक उपक्रम मंडळ वर्षभर राबवत असते, तसेच कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे पाळल्यामुळे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मंडळाला पुरस्कार दिला असल्याचे, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषद मुनिसिपल को ऑप क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपानराव जगताप यांची तर उपाध्यक्षपदी काळूराम भोडे यांची निवड         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड नगरपरिषद मुनिसिपल को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपानराव जगताप यांची तर उपाध्यक्षपदी काळूराम भोडे यांची निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. बागवान यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष जगताप आणि उपाध्यक्ष भोंडे यांचे संचालक मंडळातील सदस्यांनी अभिनंदन केले. या बैठकीत माजी अध्यक्षा सविता सुनील जगताप, माजी उपाध्यक्ष आशा भोंडे, यांच्यासह मोहन चव्हाण, विकास राठोड, प्रमोद भोंडे, धनराज जाधव, ज्ञानेश्वर जगताप ,राजेंद्र निरगुडे, राजेंद्र बोरावके, संगीता जाधव हे संचालक आणि इतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेच्या बेनझीर शेख यांचा पदोन्नती बद्दल सत्कार                                      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड नगरपालिकेत सहाय्यक कर निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या, बेनझीर मोहम्मद शेख यांची पदोन्नती व  ब वर्ग नगरपालिकेत निवड झाली आहे ,यापूर्वी हिंगणघाट येथे काही काळ त्यांनी काम केले असून, गेली वर्षभर नगरपालिकेत काम करत आहेत, त्यांच्या निवडीबद्दल नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी तसेच जावेद मुल्ला बांधकाम विभाग व संकेत नंदावंशी पाणीपुरवठा विभाग यांना सुद्धा पदोन्नती मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. पालिकेच्या कर विभागात काम करणारे  तसेच बांधकाम विभागातील कर्मचारी व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आदी सासवड नगरपालिकेतील कर्मचारी आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ                                                                      सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                             गणेशोत्सवाला आज उत्साहात प्रारंभ झाला, सकाळच्या प्रहार घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली, तर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळाने वाजत, गाजत मिरवणुका काढल्या, सासवड शहरांमध्ये दिवसभर गर्दीने गजबजून गेला होता, गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला, पुढील दहा दिवस विविध धार्मिक, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आले आहे. सासवड शहराची बाजारपेठ आज गर्दीने गजबजून गेली होती, विशेष सासवड नगरपालिका शेजारी चौकात तर गर्दीच झाली होती, गणेश मूर्तीचे विक्रीचे स्टॉल जागोजागी मांडण्यात आले होते, सजावटीचे साहित्य, खरेदी करण्यासाठी बालचमुक आगरी होते, दरम्यान सकाळच्या वेळी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली ,तर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळाने वाजत गाजत मिरवणुकीने जात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे, पुरंदर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या सासवडमध्ये तालुक्यातील गणेश भक्त आणि विविध मंडळांनी गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली होती ,यासाठी गणेश पूजेसाठी आवश्यक असणारे साहित्य जसे की अगरबत्ती, कापूर, धूप, हळद-कुंकू, गुलाल, चंदन, मध, अत्तर, अभिषेकाचे साहित्य, हार फुले, मूर्तीसाठी आभूषणे आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी भक्त सकाळपासूनच व्यस्त होते. याशिवाय लाईट यांच्या माळा रंगीबेरंगी पट्ट्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंची ही खरेदी केली जात होती, घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना, दुपारनंतर पूर्ण झाली तर मंडळांच्या मूर्तीची स्थापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती, प्रताप कुंभार, हरिदास कुंभार यांच्या गणपतीच्या स्टॉल मधून, गणपती घेताना विजय क्षीरसागर, विराज क्षीरसागर, अमोल शिरसागर, एडवोकेट स्वप्निल होले, व त्यांचे सहकारी मित्र, पत्रकार बापू मुळीक मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त हा बुधवारी असला तरी काही मंडळांनी मंगळवारीच मूर्तीची मिरवणूक काढून, त्या ठिकाणी सासवड शहरात ढोल ताशाच्या दनाटांमध्ये स्वागत करण्यात आले, तालुक्याच्या ग्रामीण भागातील रात्री उशिरापर्यंत मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश भक्तांनी उत्साह पूर्ण वातावरणात बाप्पाचे स्वागत केले आहे.
सासवड येथील म्हाडा वसाहतीत सोयीसुविधांचा अभाव — रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी                                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड (ता. पुरंदर) येथील सर्वे क्र. 74/1 मधील म्हाडा वसाहतीमध्ये राहणारे नागरिक गंभीर समस्यांना सामोरे जात असून, म्हाडाने दिलेल्या घरांच्या गुणवत्तेबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.म्हाडा "स्वस्त घर, स्वप्नातील घर" अशी जाहिरात करून घरे विकतो; मात्र प्रत्यक्षात या घरांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा गंभीर अभाव असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. फक्त इमारती उभ्या करून सदनिका विकल्या गेल्या आहेत; परंतु सुरक्षित परिसर, पाणीपुरवठा, वीज, पार्किंग, सोसायटी स्थापना, कार्यालयीन जागा व परिसर विकास याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे.रहिवाशांच्या प्रमुख तक्रारी:वसाहतीभोवती संरक्षक भिंतीचा अभाव.वीज व पाणीपुरवठ्याची अपुरी व्यवस्था.अंडरग्राउंड पाण्याच्या टाकीची सोय नाही.नियमानुसार पार्किंगची कमतरता.सोसायटी स्थापन करण्यासाठी कोणतीही मदत नाही, कार्यालयीन जागेचा अभाव.परिसर व सार्वजनिक सुविधा पूर्णपणे अपुऱ्या.रहिवाशांचे म्हणणे आहे की, घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे तर सुरक्षित व सोयीसुविधांनी सुसज्ज वसाहत असावी. मात्र म्हाडा "स्वस्त घर" नावाखाली फक्त बांधकाम विकत असून, नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आहे.या कारणामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या रहिवाशांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. "गरिबांच्या डोक्यावर स्वस्त घर लादले जात आहे, परंतु त्यात राहण्याजोग्या सुविधा नाहीत", अशी तीव्र नाराजी व्यक्त करून रहिवाशांनी म्हाडाकडे तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
पुरंदर तालुक्यात सासवड या ठिकाणी उपबाजारात ज्वारीला प्रतिक्विंटला 3100 दर; तर गहू प्रतिक्विंटला 3100 दर                    सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                     पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारामध्ये धान्याचे मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत असते, बुधवार( दि. 27 ऑगस्ट) रोजी ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3 हजार 100रु चा दर , तर  गहू प्रतिक्विंटला 3हजार 100चा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उपबाजारात वाघापूर, माळशिरस, गराडे, दिवे, परिचे, वाल्हे, राजुरी या सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी घेऊन, तांदूळ ,हरभरा असे धान्य विक्रीसाठी येत असतात, बुधवारी सासवड उप बाजारात एक नंबरचा  ज्वारीला कमाल 3 हजार 100 रुपये तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला किमान 2 हजार 200 रुपये तर सरासरी 2 हजार 650 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, तर गहू कमाल 3 हजार 100 रुपये तर दोन नंबर प्रतीच्या गहू किमान 2 हजार 800 रुपये तर सरासरी 2 हजार 950 रुपये प्रतिक्विंटला_ असा दर मिळाला अशी समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी माहिती दिली. सासवडच्या उप बाजारातील धान्य आवक दर प्रतिक्विंटल पीक, किमान, कमाल, सरासरी दर ज्वारी 2200,3100, 2650. बाजरी 1900,3105,2552. गहू 2800,3100, 2950. तांदूळ 4800,5500,5150.    हरभरा 5511,5600, 5555. यावेळी सभापती संदिप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, गणेश होले, देविदास कामठे, वामन कामठे, अनिल माने, अशोक निगडे, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, लिपिक विकास कांबळे यांच्यासह व्यापारी आर. के टेडरचे रूपचंद कांडगे, आर. आर. ट्रेडरचे राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश वीरकर, आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील मेजर ध्यानचंद क्रीडा प्रश्नमंजुषेत सानिका खेडेकर या प्रथम                                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय सासवड ता. पुरंदर येथील महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या, प्रश्नमंजुषा स्पर्धा 2025 पार पडली असून, महिला गटात सानिका खेडेकर हिने 100 पैकी 100 गुण व पुरुष गटात यश रायभर यांनी 80 गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला. पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे त्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांच्या हस्ते पार पडला. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती, स्पर्धेमध्ये तालुक्यातील दोनशे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता, यावेळी प्राचार्य डॉ. पंडित शेळके मनाले की, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा आदर्श आजच्या पिढीने, घेणे गरजेचे आहे ,खेळा प्रती त्यांची असलेली निष्ठा प्रेम तरुण पिढीने, अंगीकारणे गरजेचे आहे, खेळाडूंनी प्रशिक्षणाच्या आधुनिक पद्धती शिकून घेणे यश संपादन करण्यासाठी गरजेचे असून, यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. शंकर लावरे डॉ. पंडित शेळके उपप्राचार्य डॉ. बी. यु. माने, डॉ. संजय झगडे, डॉ, संदीप राठोड, डॉ. व्ही.व्ही पाटणकर आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनीषा जगदाळे प्राध्यापक सुरेखा ढोरे, प्राध्यापक प्रतीक्षा जगताप, सलोनी राऊत, श्रद्धा देवडे यांनी विशेष असे परिश्रम घेतले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: पुरुष गट यश रायभर प्रथम क्रमांक 80 गुण, रोहित कदम द्वितीय क्रमांक ७२ गुण, तृतीय क्रमांक श्रेयस जगताप 70 गुण. महिला गट सानिका खेडेकर 100 गुण, साक्षी दीक्षित 80 गुण, आर्या धुमे तृतीय क्रमांक 72 गुण.
पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील प्रभारी मुख्याध्यापिकाची त्वरित बदली करावी; तर शिक्षण विभागाची टाळाटाळा अशी ग्रामस्थांची मागणी                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभारी मुख्याध्यापिका उषा दिनकर कामथे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून, पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत ने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. शिवरी येथील जिल्हा परिषद शाळेत कामथे उषा  या उपशिक्षिका म्हणून दि. 31 मे 2023 पासून, कार्यरत होत्या. त्या सध्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून, 5 डिसेंबर 2024 पासून कार्यरत आहेत, त्यांच्या गैरवर्तनाबाबत शाळा व्यवस्थापन समितीने दि. नऊ डिसेंबर 2024 रोजी गटशिक्षणाधिकारी व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे लेखी तक्रारी केली होती, त्यांच्या मनमानी कारभाराची पूर्ण माहिती गटशिक्षण अधिकारी यांना अवगत करून दिली होती, परंतु ग्रामस्थांनी कामथे यांच्या विरोधात गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे दि. 29 जानेवारी 2024 रोजी लेखी स्वरुपात तक्रार देखील केली होती, यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, पालक, नागरिकांनी गट शिक्षणधिकारी यांची भेट घेऊन, तक्रार केली होती परंतु, त्यावेळी गटशिक्षणाधिकारी हे दि. 21 जुलै रोजी पालक व नागरिकांच्या तक्रारीनंतर स्वत: शाळेमध्ये पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी गट शिक्षण धिकारी व स्वत: प्रभारी मुख्याध्यापिका यांच्यासमोर सर्व पालकांनी व ग्रामस्थ यांनी तक्रारीचा पाढा वाचला होता, तेव्हा त्यांना बचात्मक काहीच उत्तर देता आले नाही, प्रभारी मुख्याध्यापिका कामथे यांची शिवरी शाळेतून बदली त्वरित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, ग्रामपंचायतींच्या मासिक बैठकीत प्रभारी मुख्याध्यापिकांची शिवरी गावातून लवकर बदली करण्याचा ठराव बहुमताने सहमत केला आहे, संबंधित प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष पुरंदर तालुक्यात लागून राहिले आहे, गटशिक्षणाधिकाऱ्याच्या कोर्टात निर्णय होणार का? गटशिक्षण अधिकारी वैभव डुबल यांना दोन वेळा भ्रमणध्वनी वरून, संपर्क केला असता, त्यांनी संपर्क साधला नाही ,त्यानंतर डुबल यांच्या प्रतिक्रियेसाठी कार्यालयात गेल्यानंतर, ते प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेले असून, ते सध्या नाहीत, अशी माहिती मिळाली असून, प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांचा चाजॅ असलेले लक्ष्मण लाखे म्हणाले की, आम्ही शाळेत भेट दिली आहे, नागरिकांचे म्हणणेही ऐकले आहे, ग्रामपंचायत आणि पालकांचे ठराव अर्ज मिळाले आहेत, गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल हे आल्यानंतर काय तो निर्णय घेऊ ,दरम्यान शिवरी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्याध्यापिका यांना फोन केला असता, त्या म्हणाल्या की, मी यावर काही बोलू शकत नाही, पंरतु त्यांनी संपर्क सुद्धा साधला नाही व त्या ठिकाणी अशा दुर्भाग्यपणामुळे त्यांची त्वरित बदली करावी, अशी शिवरी येथील ग्रामस्थांची मागणी असून, त्यांनी प्रत्यक्ष प्रतिनिधीला ही सर्व माहिती दिली आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये सासवड पोलीस ठाण्याचा त्यांच्याच हद्दीमध्ये रूट मार्च                                                     सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                   आत्ताच्या चालू गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव आदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सासवड शहरात रूट मार्च काढण्यात आला शहरातील श्रीनाथ चौक जयप्रकाश चौक अमर चौक चांदणी चौक बहिरम पुरा चौक बादशाही मशिद चौक चांदणी चौक कन्हैया चौक श्रीनाथ चौक ते सासवड पोलीस दलातर्फे या मार्गावर सशस्त्र रूट मार्च काढण्यात आला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक नारायण खंडागळे अर्चना पाटील यांच्यासह वीस पोलीस अमलदार दहा.होमगार्ड दोन सरकारी वाहने व दोन सरकारी दुचाकी वाहनांचा या रूट मार्चमध्ये सहभाग होता आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सासवड या ठिकाणी बैठक संपन्न                               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           सासवड (ता. पुरंदर) येथील तहसील कार्यालयामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक समिती भिवडी यांच्या वतीने 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शासकीय जयंती महोत्सवानिमित्त शासकीय यंत्रणा व स्मारक समिती यांच्या संयुक्त बैठकीचे मंगळवारी दि.26रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी भिवडी ता. पुरंदर येथील राजे उमाजी नाईक स्मारक परिसरातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली, यावेळी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण,विकास (ऊफॅ बल्ली )भांडवलकर,ओकार चव्हाण, यशवंत (ऊफॅ बिटु) भांडवलकर,  गंगाराम जाधव,गणेश पाटोळे  आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पा                                       सासवड प्रतिनिधी:  बापू मुळीक मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                           सासवड  येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवाच्या औचित्य साधून पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून सुंदर गणेश मूर्ती तयार केल्या.            शाळेतील मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करून त्यावर सुंदर रंगकाम केले. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांनी मार्गदर्शन केले.      वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणपती उत्सवाची माहिती सांगितली, गणपती बाप्पाची गाणी म्हटली. बाप्पाला दूर्वा, फुले वाहून पूजा करून आरती केली. गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला. यावेळी ' गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया' च्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून निघाला होता.        आपण तयार केलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुंदर मखर, ताटात पाना फुलांचे सजावट करून आणली होती. गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.          या विद्यार्थ्यांना  जयश्री काळाणे, संगीता कोल्हाळे, मनीषा जगताप, सुवर्णा वीर, अर्चना जाधव, सविता काळे, संगीता राऊत, दीप्ती गिरमे, शितल साळुंके , अश्विनी हळदीकर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका मेघा जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे शाला समिती अध्यक्ष ॲड. सागर नेवसे, महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी कौतुक केले.
दिवे येथे शेतक-यांसाठी नविन फळ बाजार सुरू ;पहिल्याच दिवशी  सिताफळाची विक्रमी आवक ४५०० रू क्रेटला बाजारभाव ..                                                           सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील शेतक-यांसाठी भाजीपाल्या बरोबरच  नविन फळ बाजार दिवे येथे सुरू करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी विविध फळांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. फळबाजाराचे ऊद्घाघाटन भाजपाचे नेत बाबाराजे जाधवराव व दिवे गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष ऊत्तमआबा झेंडे यांचे हस्ते झाले.सदर बाजारात शेतक-यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, सुमारे ५० पेक्षा जास्त खरेदीदारांनी यावेळी उच्चांकी बाजारभाव देत मालाची खरेदी केली.  बाजारात पहिल्याच दिवशी झालेल्या फळांची आवक विक्रमी होती. यामध्ये सिताफळ ५०० क्रेट, पेरू २०० क्रेट,डाळींब १५० क्रेट, अंजीर १०० टब, यामध्ये सिताफळाला विक्रमी बाजार भाव मिळाला तो पुढीलप्रमाणे प्रति क्रेट ५०० ते ४५०० रुपये, डाळिंबाला ३००० ते ४००० रुपये, पेरुला १२०० ते १५०० रुपये आणि अंजिराला प्रति टब ६०० ते ७०० रुपये असा भाव मिळाला.या प्रसंगी  बाबाराजे जाधवराव,उत्तम आबा झेंडे,गणपतराव शितकल, दिलीप आबा झेंडे,मा. सरपंच बापू सोपान टिळेकर,पोलीस पाटील बाळासाहेब झेंडे,माजी जि. प सदस्य संगीता ताई:" काळे, राजाभाऊ काळे,बापू जगताप दिवे गावचे सरपंच रुपेश राऊत, माजी सरपंच गुलाब झेंडे ,अमित झेंडे, सदस्य सुजाता जगदाळे, श्रद्धा काळे ,पूनम झेंडे झेंडेवाडी चे माजी सरपंच महादेव आप्पा झेंडे, समीर झेंडे ,अमर झेंडे ,शरद झेंडे आणि समस्त ग्रामस्थ दिवे पंचक्रोशी या कार्यक्रमाला उपस्थित होते. फोटोओळ: दिवे ता.पुरंदर येथे शेतक-यांसाठी नविन फळ बाजाराचे ऊद्घाघाटन करताना मान्यवर ....
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधामध्ये होणार दंडात्मक कारवाई                                                      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       सासवड शहरात नगरपरिषद मार्फत उघड्यावर कचरा पडू नये, म्हणून ठिक ठिकाणी आरोग्य विभागामार्फत पथके नेमण्यात आली आहेत, सदर पथके सोनोरी रोड, गणेश मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, पुना रोड, नारायणपूर रोड अशा विविध ठिकाणी नेमण्यात आली आहेत, तरी शहरातील काही नागरिक उघड्यावर कचरा टाकताना आढळत आहेत, या संबंधी वेळोवेळी नगर परिषदेमार्फत, सोशल मीडिया, जाहीर सूचना, फ्लेक्स, जाहीर दवंडी अशा विविध माध्यमातून उघड्यावर कचरा टाकणारे आणि एकल वापर प्लॅस्टिक विरोधात होणार दंडात्मक कारवाई च्या सूचना देण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने नगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे, सदर कार्यवाही दरम्यान, उघड्यावर कचरा टाकणारे व नगर परिषदेने गोविंद स्वीट, पालखी मैदान, अस्मिता वडेवाले, पुणे रोड, न्यू महाराष्ट्र बेकरी हिवरे रोड यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. नगरपरिषदेमार्फत सर्व सासवडकर नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, कचरा इतरत्र व न टाकता, घंटागाडीतच टाकावा. एकल वापर प्लॅस्टिकचा वापर टाळावा, सार्वजनिक ठिकाणी खरेदीला जाताना कापडी पिशवीचा वापर करावा. सासवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपरिषद प्रशासन संचालनास( दि. 22) ऑगस्ट 2025 च्या पत्रानुसार, एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभाव अमलबजावणीच्या अनुषंगाने शहरात तपासणी मोहीम, राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खालील विशिष्ट क्षेत्राची तपासणी करण्यात येत आहे.1) पहिला दिवस 25 ऑगस्ट, रस्त्यावरील विक्रेते, फुल विक्रेते, दुकाने स्थानिक बाजारपेठा. 2) दुसरा दिवस 26 ऑगस्ट बस स्थानक ,घाऊक बाजारपेठ, शॉपिंग मॉल, हॉटेल्स. 3) तिसरा दिवस 28 ऑगस्ट औद्योगिक क्षेत्र, चिकन सेंटर. 4) चौथा दिवस 29 ऑगस्ट प्लॅस्टिक विक्रेते. मुख्याधिकारी यांनी पुढे असेही सांगितले आहे की, स्वच्छतेचा  बाबतीत सासवडकर नागरिक प्रथम प्राधान्य देतात परंतु, सुजाण नागरिक म्हणून सर्व शहरवासीयांनी यापुढे यावे 25 ऑगस्ट पासून, एकल वाफर प्लास्टिक बंदी विरोधात नगर परिषदेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे, नगरपरिषद उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई पुढेही चालू ठेवणार आहे, असेही मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी ही प्रतिनिधीला माहिती दिली.
प्रशासनाकडून विमानतळ बाधित शेतकऱ्यांची थट्टा फोडा आणि प्रकल्प करा या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याची चर्चा                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज                                                                             पुरंदर विमानतळाबाबत वृत्तपत्रांमध्ये  बातम्या प्रसिद्ध करून बाधित शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून, फोडाफोडी करण्याची योजना  राबविण्यासाठी पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. विमानतळासाठी एकूण 2673 हेक्टर क्षेत्र संपादित करण्याबाबत तशी अधिक सूचना 14 एप्रिल रोजी शासनाच्या वतीने काढण्यात आलेले होते व आता अचानक त्यापैकी 50 टक्के क्षेत्र वगळण्यात आल्याचे बातमी पसरवली जात आहे. परंतु याबाबत तशा प्रकारचे कोणतेही अधिसूचना किंवा परिपत्रक काढण्यात आले आहे किंवा कसे याचा किंचितसा हे उल्लेख न करता फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी हे तंत्र अवलंबल्याचे दिसून येत आहे.पुरंदर विमानतळाची घोषणा सन 2016 मध्ये करण्यात आली त्यावेळी आवश्यक जमिनीचे भूसंपादन जमीन भूसंपादन कायदा 2013 नुसार करण्याची प्रक्रिया विमानतळ प्राधिकरण मार्फत चालू होती. जमीन अधिग्रहण कायद्यानुसार सार्वजनिक प्रकल्पासाठी 70 टक्के शेतकऱ्यांची संमती कायद्याने बंधनकारक आहे परंतु सात गावातील बहुतांशी सर्वच शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध असल्याने आवश्यक टक्केवारीची संमती मिळणार नाही असे अहवाल तत्कालीन सरकारला प्राप्त झाल्याचे चर्चा होती. त्यावर उपाय म्हणून, विमानतळासाठी संपादित केले जाणारी जमीन ही औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसी कायद्यानुसार संपादन करण्याचा प्रस्ताव समोर आला. एमआयडीसी कायद्यातील कलम 32 नुसार सक्तीने भूसंपादन करण्याची तरतूद आहे परंतु राज्य शासनाला एमआयडीसी कायद्या अंतर्गत सक्तीने भूसंपादन करण्याची तरतूद असली तरी एमआयडीसी कायद्याअंतर्गत भूसंपादन करताना जमीन अधिग्रहण कायदा मधील तीन तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे ते म्हणजे 1)चार पट मोबदला 2)पुनर्वसन 3)रिसेटलमेन्ट या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय भूसंपादन करता येणार नाही याचाच भाग म्हणून सध्या शासनाने व प्रशासनाने चारपट मोबदला देणार असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे त्याचबरोबर पुनर्वसन दाखवण्यासाठी विकसित भूखंड देणार असल्याचा उहापोह केला जात आहे. स्वतःहून संमती देणाऱ्या शेतकऱ्यालाच विकसित भूखंड दिला जाईल. संमती न देणाऱ्या शेतकऱ्याला विकसित भूखंड मिळणार नाही फक्त चारपट मोबदला दिला जाईल हे कोणत्या कायद्यानुसार लागू आहे याबाबत शासनाने  व प्रशासनाने स्पष्टता देणे गरजेचे आहे.एखादा प्रकल्प राबवताना कायदेशीर तरतुदींचे पालन करून प्रक्रिया पार पाडणे गरजेचे असते परंतु पुरंदर विमानतळाच्या बाबतीत शासन व प्रशासनाकडून कायदेशिर प्रक्रिये ऐवजी चाणक्यनिती पुस्तकातील तरतुदींची प्रक्रिया राबविली जात आहे असे म्हणावे लागेल. शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचे हेतूने वेगवेगळे वृत्त प्रसिद्ध केले जाते  त्यामुळे अशा प्रकारे शेतकऱ्याला अंधारात ठेवून व चुकीची माहिती देऊन कायदेशीर  तरतुदींचे पालन होत नसल्याने याबाबत योग्य वेळी कोर्टात जाण्याबाबत विमानतळ विरोधी समिती निर्णय घेईल असा विश्वास आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड या प्राधिकरणाने सध्या एरोनॉटिकल एरिया बाउंड्री म्हणजेच धावपट्टीसाठी  1285 हेक्टर जागेची भूसंपादन करण्याची मागणी केल्याचे दिसून येत आहे परंतु याचा आधार घेऊन शब्दांचे खेळ करून शेतकऱ्यांमध्ये विमानतळासाठी एवढीच जागा भूसंपादित केली जाणार असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे दिसून येत आहे.
सासवडच्या शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणातफोडली पुस्तकांची दहीहंडी.. वंदे मातरम् चा उपक्रम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक              वाचन संस्कृती वाढीला लागावी, मुलांनी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडावे, विचारांची देवाण घेवाण व्हावी या हेतूने सासवड येथील शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात पुस्तकांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. वंदे मातरम् संघटना, युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट व शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने आयोजित या उपक्रमास जेजुरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर, विश्वस्त ॲड विश्वास पानसे , वंदे मातरम् संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, प्राचार्य रेणुका सिंग मर्चंट, इस्माईल सय्यद, डॉ बाळासाहेब भगत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.    राष्ट्रीय एकात्मतेचा विचार देणाऱ्या या उपक्रमाचे  भारत माता प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. गणेश भुजबळ यांनी प्रास्तविक केले तर सुशीलाबोरुडे व चित्रलेखा केसकर यांनी सूत्र संचालन केले . श्री शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुस्तके लावलेली दहीहंडी फोडून जल्लोष केला. आकर्षक वेशभूषा केलेल्या श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी, पावसाची हजेरी, झांज पथकांच्या निनादात, भगव्या निशाण धारण केलेल्या युवती, मच गया शोर सारी नगरी च्या तालावरफोडण्यात आलेली ही हंडी विशेष लक्षवेधी ठरली    सचिन जामगे, डॉ राजेंद्र खेडेकर, ॲड विश्वास पानसे श्रीकांत पवार, बळवंत गरुड व मंगेश घोणे यांनी या वेळीमनोगत व्यक्त करत उपक्रमास शुभेच्छा दिल्या. समाजालापुढे नेणारी, विचारांची दहीहंडी ही प्रेरक असल्याचे सांगत मंगेश घोणे यांनी जेजुरी देवस्थान अशा उपक्रमांना कायम मदतीचा हात देईल असे सांगितले शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी यावेळी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले .आई वडील, देश याप्रती निष्ठा ठेवून आपले नाव मोठे करा असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले.     वंदे मातरम् संघटनेचे झहीर मुलाणी, अमित वाल्मिकी कुणाल यादव, संजय टेकवडे, विक्रम माळवदकर, ॲड स्वाती बारभाई, शलाका मोरे यांसह अनिल पाटील, सुषमा रासकर, उज्वला जगताप, विशाल शिंदे, कैलास धिवार आदी प्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.
नव्या पाटी दप्तराने हरखून गेले चिमुकले                    सासवड प्रतिनिधी :  बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज                                                                          अक्षर सृष्टी संस्था पुणे यांचे संस्थापक अध्यक्ष  सिद्धनाथ जी पवार यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवरी या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. "गुणवत्तापूर्ण शिक्षणातून उत्तम दर्जाचे नागरिक घडावेत यासाठी आता यापुढे प्रयत्न करत राहू." , असे सरपंच भाजपचे उपाध्यक्ष दिलीप आप्पा कटके पाटील यांनी सांगितले.*  "चिमुकल्यांना शैक्षणिक मदत मिळाल्यामुळे ज्ञानार्जनात मदत होणार आहे." असे मुख्याध्यापिका स्वाती दुर्गाडे  भिवरी येथे बोलताना म्हणाल्या.*  " गुणवत्तेचा वाबळेवाडी शिरूर पॅटर्न सारखी उत्तम गुणवत्तेची शाळा बनवण्यासाठी कार्यरत राहू." असे पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष संदीप कटके पाटील यांनी सांगितले.*             या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित अक्षय सृष्टी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  सिद्धनाथजी पवार  सेवानिवृत्त मुख्याध्यापक व  क्षेत्र नायगाव चे सरपंच बारीकरावजी खेसे , भिवरी गावच्या सरपंच मोनाली कटके पाटील , मा चेअरमन सहकारभूषण पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष संदीप कटके पाटील , पुरंदर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष सरपंच  दिलीपआप्पा कटके पाटील , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  अमोल बबनराव कटके पाटील* , उपाध्यक्ष सौ अश्विनीताई लोणकर* , पु.शि.प्र.म. चे संचालक गुलाबराव घिसरे , विद्यमान कार्यकारिणीतील मा सरपंच  विशाल कटके पाटील* , *मा उपसरपंच  शिवाजीराव पवार , मा उपसरपंच  तुकाराम कटके पाटील , चतुर्मुख भैरवनाथ सांप्रदायिक सोहळा अध्यक्ष  संभाजीआबा  नाटकर , मा अध्यक्ष पै  शेखरबापू कटके , मा अध्यक्ष  मोहनबापू गायकवाड ,  किरण कटके पाटील , व्हा चेअरमन  सुनील गोफणे , फौजी  दीपक कटके पाटील ,  कैलासआण्णा कटके पाटील ,  जयवंत साळुंखे ,  कुमार रविंद्र कटके पाटील , मा चेअरमन पोपट कटके पाटील , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वातीताई दुर्गाडे पोमण मॅडम , चव्हाण मॅडम , टापरे मॅडम , राणे सर व भिवरी गावातील मान्यवर उपस्थित होते.               जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवरी या ठिकाणी एकूण 150 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्कूल किट वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांची केंजळगड ते रायरेश्वर पदभ्रमंती              सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज                                                                     शिवकार्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे याही  वर्षी “सफर बारा मावळची” पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या वर्षीच्या पहिल्या मोहिमेत नामदेव गंगाराम शिंगाडे महाविद्यालयातील ५५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दोन वैभवशाली किल्ले – केंजळगड व रायरेश्वर – या दुर्गांची निवड करण्यात आली. रायरेश्वरच्या भूमीवरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, त्यामुळे या ऐतिहासिक स्थळांना भेट देणे विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरला.या उपक्रमामध्ये शिवकार्य प्रतिष्ठानचे पुरंदर विभागप्रमुख आकाश चौधरी यांचे नेतृत्व लाभले. त्यांना १० स्वयंसेवकांची साथ, तसेच मार्गदर्शक म्हणून समीर खेडेकर व राजेश खेडेकर यांचे सहकार्य लाभले. मोहिमेच्या यशात त्यांचा मोठा वाटा राहिला.शिवकार्य प्रतिष्ठानचा मुख्य हेतू म्हणजे –- इतिहास हा केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकविणे.- तरुण पिढीला गडकिल्ल्यांचा इतिहास, संस्कृती व भौगोलिक पैलू समजावून सांगणे.- “स्वराज्याचा वारसा पुढील पिढीकडे सोपविणे” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.या पदभ्रमंतीत विद्यार्थ्यांनी रायरेश्वरवर बसून शिवाजी महाराजांच्या शपथेची गाथा अनुभवली. महाराज आणि मावळ्यांमधील नात्याचा आत्मीय स्पर्श त्यांनी प्रत्यक्ष जाणला.आगामी दोन वर्षे ही मोहीम सातत्याने राबविण्यात येईल व त्यामध्ये विद्यार्थ्यांना बारा मावळ व तेथील गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक आणि भौगोलिक ठेवा प्रत्यक्ष अनुभवता येईल, असे आश्वासन पुरंदर विभागप्रमुख आकाश चौधरी यांनी दिले.या वेळी कार्यक्रमाला नामदेव गंगाराम शिंगाडे विद्यालयाचे शिक्षक सागर कोकाटे तसेच शिवकार्य प्रतिष्ठानचे साजन मुसळे, स्वप्नील पाटोळे, समीर साठे, चेतन पाटील, राज दातार, कृष्णा खेडेकर, सार्थक लवांडे, प्रज्वल खेडेकर, आर्यन खेडेकर उपस्थित होते.“गडकोटांचा इतिहास जाणून घेतला, तरच स्वराज्याचा वारसा जपता येईल."हीच प्रेरणा घेऊन सफर बारा मावळची मोहिम पुढे चालू राहणार आहे. असे मत राजेश खेडेकर यांनी मांडले.
Load More That is All