Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from October, 2025Show All
निधन वार्ता:                                                             श्रीकृष्ण नेवसे                                                       सासवड प्रतिनिधी:                                                   सासवड येथील जेष्ठ अभ्यासू ,पत्रकार साहित्यिक श्रीकृष्ण देवराम नेवसे (वय 59) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यांने निधन झाले, गेल्या 30 वर्षापेक्षा अधिक काळ  यांनी पुरंदर तालुक्याच्या पत्रकारितेमध्ये सक्रिय योगदान दिले, सकाळमध्ये त्यांनी अनेक वर्ष सातत्याने, लेखन करून ,आपला ठसा उमटवला ,पुरंदर मधील सीताफळ, अंजीर, भाजीपाला, स्थानिक उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी, भाऊ, असा परिवार आहे.
निधन वार्ता:                                                            राधुबाई शिंदे                                                            सासवड प्रतिनिधी:                                                   ताथेवाडी ता. पुरंदर येथील रहिवाशी राधुबाई मारुती शिंदे (वय 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश मारुती शिंदे, विजय मारुती शिंदे, राजेंद्र मारुती शिंदे, संजय मारुती शिंदे यांच्या त्या आई होत.
वडगाव मावळ येथील शिवली या ठिकाणावरून दत्तात्रय संभाजी आडकर बेपत्ता                                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      वडगाव मावळ येथील दत्तात्रय संभाजी आडकर (वय 25 वर्ष) रा. शिवली ता. मावळ जिल्हा पुणे) उंची 5 फूट  7 इंच, चेहरा उभा, रंग सावळा, नाक सरळ अंगाने सड पातळ, उजव्या हाताचे अंगठ्यावर टाके, टाकलेले व्रण, अंगात चॉकलेटी रंगाचा हाफ टी-शर्ट, कालया रंगाची जीन्स पॅन्ट, पायात चप्पल नाही, डोक्यामध्ये काळे केस बारीक, भाषा मराठी, हिंदी बोलतो, शिक्षण दहावी हा व्यक्ती दि. 12/ 1/ 2025 पासून रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारामध्ये राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे. सदर हा मुलगा मिळून आल्यास वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा संपर्क नंबर एक वडगाव मावळ पोलीस स्टेशन 02114235 333/ 901107 96 22, पोलीस कॉन्स्टेबल भोईर 8766887512.
पुरंदर तालुक्यात शिवसेना शिंदे गट विरूद्ध भाजप सामना बेलसर गटात रंगतदार होणार                                   सासवड प्रतिनिधी: बापू  मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ आंतरराष्ट्रीय मुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये रंगतदार होणार आहेत, पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बेलसर गटात व पंचायत समितीच्या बेलसर व माळशिरस गणामधील लढती या विमानतळामुळे अत्यंत चुरशीच्या होतील अशी तरी सध्याचे चित्र आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यातच मुख्य लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे ,भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती राज्यातील सत्तेत एकत्र असली, तरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्त स्थानिक पातळीवर त्यांच्या पक्षाचे नेते याची निवडणूकीसाठी प्रतिष्ठापनाला लावताना दिसत आहेत, त्यामुळे महायुतीतच वर्चस्वाच्या संघर्षासाठी होणार आहे, त्यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते गावोगावी दवरे करून, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापवत आहेत, मेळावे, गाव भेट दौरे विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क केला जात आहे, बेलसर गट तसेच पंचायत समितीच्या बेलसर आणि माळशिरस गणावर मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार संजय जगताप यांचे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते, परंतु जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे, तर पंचायत समिती सदस्य या दोन्ही महिला व माजी आमदार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने, सध्या तरी भाजपचे पारडे बेलसर गटात व बेलसर माळशिरस मध्ये जड आहे, त्याचाच फायदा उठवत मतभेद व अंतर्गत कुरगुडीचा फायदा आमदार विजय शिवतारे यांनी घेतला असून, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना या मतदारासंगामध्ये खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, विमानतळाचा प्रश्न, सासवड ते रिसेपिसे पर्यंत काम चालू असणारे रोडचे यामध्ये सामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रामुख्याने पुढाऱ्यांनी सध्या तरी तीन गटातील प्रयत्न शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्गासाठी अनुकूल असे वातावरण मिळालेले नाही, परंतु भाजपमधील विमानतळाच्या व सासवड रिसेपिसे पर्यंत रोडचे काम चाललेली यासाठी प्रत्येक वेळी लक्ष देऊन सोडवणूक केली आहे, परंतु शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याकडे फारसे लक्ष दिले जात नाही ,तर आत्ता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गाव भेट दौरे चाललेले असले तरी, तीनही पक्षाला खूप झगडावे लागणार आहे ,तर प्रामुख्याने लढत शिवसेना शिंदे गट व भाजपमध्येच सामना रंगतदार होणार आहे, बेलसर गटातून दत्ता झुरंगे विजयी झाले तर बेलसर गणात सुनिता कोलते तर माळशिरस गणामध्ये आरती यादव या काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते, त्यावेळी शिवसेनेला मोठा धक्का बसला होता, तर आता ही निवडणूक शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट,शी लढत प्रतिष्ठेची व राजकीय दृष्ट्या अस्तित्वाची बनली आहे, बेलसर गट सर्वसाधारण राखीव झाल्याने, यामध्ये पुरुषाचे वर्चस्व पस्थापित झाले असून, गुडघ्याला बाशिंग बांधल्याने प्रचार जो चालू सुरू झाला आहे या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार विजय शिवतारे, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, संभाजी झेंडे, जालिंदर कामठे, भाजपचे माजी आमदार संजय जगताप, बाबा जाधवराव, गंगाराम जगदाळे व माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी शरद पवार गट विजय कोलते, सुदाम इंगळे, माणिक झेंडे यांच्या भूमिकेतील लक्ष लागले आहे, तर सध्या तरी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपकडून जिंकून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सध्या जोरात चालू आहे, बेलसर हा माजी आमदार संजय जगताप यांचा बालेकिल्ला समजला जातो त्याला सुरूग लावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट यांनी जोरदार पद्धतीने व्यहरचना केली जात आहे, हा गण सर्वसाधारण साठी राखीव झाल्याने, या गणांमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे, राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजला जाणारा बेलसर हा गण सर्व साधारण झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलेल्या अनेकांची विकेट पडली आहे, यामध्ये प्रामुख्याने राजकारणापासून अलिप्त असलेले यांना सुद्धा चालून आलेली संधी निर्माण झाल्याने, प्रस्थापित असणाऱ्या ज्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत, माळशिरस गण सर्वसाधारण झाल्याने, मोठी चुरस निर्माण झाली आहे ,तर बेलसर मध्ये सुद्धा सर्वसाधारण असल्याने, चुरस जास्त प्रमाणात निर्माण झाली आहे. विधानसभेला एकत्र आलेले महायुती सह महाविकास आघाडीतील घटक पक्ष सुद्धा आमने सामने येण्याची दाट शक्यता आहे, ज्या गावात उमेदवारी असेल त्या ठिकाणी बहुद्देश गाव एक होऊन, त्यांना मतदान करीत असतात मग त्या ठिकाणी तू कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिले जात नाही, असा या गणाचा इतिहास आहे, या गणांमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मतदाराच्या थेट गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे, उमेदवारी अध्याप निश्चित झाली नसताना सुद्धा मतदारांना आपलेसे करण्यासाठी विविध युक्ती या कार्यकर्त्या मार्फत लढविल्या जात आहेत, तर विमानतळ व सासवड रिसेपिसे पर्यंत होणाऱ्या रोडच्या कामामुळे बेलसर गट व बेलसर आणि माळशिरस गणातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या ठिकाणी ममता बाल सदन आश्रमामध्ये भाऊबीज निमित्त दिवाळी फराळ वाटप सासवड  प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       समता कृती प्रतिष्ठान व साप्ताहिक समता कृती यांच्या वतीने गरिबाची दिवाळी उपक्रमांतर्गत ममता बाल आश्रम कुंभारवळण ता. पुरंदर येथील मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला, या उपक्रमाचा प्रारंभ जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आला.गेली 31 वर्षापासून दिवाळी सणाचा फराळ एकत्र करून, येथील मुलांची गोड दिवाली करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक दिगंबर कदम, महेश पेशवे यांनी सांगितले. जेजुरी पोलीस ठाणे मधून सकाळी साडेदहा वाजता या उपक्रमास प्रारंभ झाला, साकुर्डे, बेलसर, भोंगळे मळा, बेलसर, पारगाव वाघापूर मार्गे कुंभारवळण येथे सायंकाळी उपक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी अध्यक्ष एडवोकेट राहुल कदम, एडवोकेट सचिन कदम, शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे, माजी प्राचार्य पोपटराव ताकवलेे, माजी सैनिक दिलीप दोडके, परेश पेशवे, बाळासो कुंभार, सुहास बेंगाळे, संदिप टिळेकर, सुजाता गुरव, ममता बालक सदनचे प्रमुख दिपक गायकवाड, विद्यमान सरपंच मंजुषा गायकवाड, पत्रकार ए.टी माने, पत्रकार बापू मुळीक, ममता बाल सदनचे कर्मचारी वर्ग, बहुसंख्येने मुलींची उपस्थिती आदी उपस्थित होते. शेतकरी देवानंद जगताप, उद्योजक नारायण होले यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले. रघुनाथ वावळ यांनी सूत्रसंचालन केले.
पुरंदर तालुक्यात भाऊबीज अनोखी पद्धतीनुसार  साजरी तर सासवडच्या तुकाई माता मंदिरात रंगले दिवाळी पहाट चे स्वर....                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज  :                                                                                सासवडकर रसिकांसाठी भाऊबीजेचे निमित्त साधुन शहरातील लांडगे आळीतील तुकाई माता मंदिरात स्वर साधक प्रस्तुत भूपाळी ते भैरवी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथीलप्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने याचे आयोजन केले गेले होते. पुरंदरमधील स्थानिक कलाकार व मंडळींनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण केले. सुवर्णा होले, मच्छिंद्र दीक्षित, गुलाब बुध्ये, संजय काटकर, स्वरा व ज्ञानेश्वरी दीक्षित या गायककलाकारांनी विविध रचना सादर करून टाळ्या घेतल्या,    प्रथम तुला वंदितो ने सुरू झालेल्या या संगीत प्रवासातनिघालो घेऊन दत्ताची पालखी, पायोजी मैने राम रतन, एक राधा एक मीरा, ऐशी लागी लगन, ए मेरे वतन के लोगो अशा विविध स्वरूपातील गीतांचे सुंदर सादरीकरण झाले. पांडुरंग श्रीरंग भज रे मना या भैरवीने व आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.प्रख्यात तबला वादक राजेंद्र दुरकर यांच्यासह समद पठाण, चंदुलाल तांबोळी, स्वप्नील जगताप, मच्छिंद्र दीक्षित या वाद्यवृंदानी सुंदर संगीत साथ दिली. ह भ प बाळासो फडतरे (गुरुजी) यांचे समयोचित सूत्र संचालन कार्यक्रमाची उंची वाढवून गेले.     मध्यंतरात माजी आमदार संजय जगताप , औदुंबर महाडिक यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या नीलिमा दिदी यांनी मान्यवरांचे भाऊबीज निमित्त औक्षण केले.माजी आमदार  संजय  जगताप,शेखर वढणे,सुहास लांडगे, संजय चौरे, ॲड भगवान होले, डॉ राजेश दळवी, मोहन बागडे, अनिल कदम, आनंद (भैय्या )जगताप, हेमंत ताकवले ,बापू मुळीक,दत्तात्रय  भोगळे,जगदिश शिदे,इंदिरा पवार, कल्याणी चिंबळकर, हरीशेठ शेवते संगीता लांडगे, सखाराम लांडगे, ॲड सुदाम सावंत, ॲड नितीन जाधव, डॉ संदीप होले , मोहनअण्णा जगताप, माऊली गिरमे, तानाजी सातव यांसह मोठ्या संख्येने रसिकांनी या सुंदर कार्यक्रमास हजेरी लावली.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 3,400 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,311दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक   मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                              पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवारी दि.22 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,400 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,311 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 3,400 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,800 तर सरासरी 3,100 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,311 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,500 तर सरासरी 2,905 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले,सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर आदी उपस्थित होते. गुळाला 4,450रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 296 बॉक्स 59 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,450 कमाल दर 4,100 रुपये तर साधारण4,225 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,800,3,400,3,100. बाजरी 2,600,3,500, 3,050. गहू 2,500,3,311,2,905. तांदूळ 1) 4,500,5,300,4,900.2)4,200,4,800,4,500.हरभरा 4,800, 5,410,5,105.
पुरंदर तालुक्यातील सासवड करांचा दीपसंध्याला उदंड प्रतिसाद                                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहामध्ये रविवारी दि. 19 रोजी पुरंदर मेडिकल असोसिएशन, ग्रामीण संस्था पुरंदर- हवेली व रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या वतीने दीपावली निमित्त दीपसंध्या २०२५ च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विनायक खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पराग चौधरी यांनी निवेदन केले, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून प्रतिबिंबित करणारी रचना माझी मैना, गावाकडे राहिली ही छक्कड सूर नवा ध्यास नवा फेम विक्रम कदम यांनी गायली, वन्स मोर मागत या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तसेच जी युवा संगीत सम्राट फिल्म व सेक्स फोनिस्ट जेजुरीचे प्रथमेश मोरे यांनी दर्जेदार सॅक्सो फोनचे वादन केल्या नंतर, सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. राधा ही बावरी, परदा हे परदा, दा गाता रहे मेरा दिल, मल्हारवाली मी होणार सुपरस्टार आणि विनल देशमुख व रूपाली घोगरे व विक्रम कदम गायकांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. यावेळी माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते, भाजपचे युवा नेते बाबाराजे जाधवराव, राजेंद्र काळे, प्रदीप पोमण, अनिल उरवणे, पुरंदर मेडिकल अध्यक्ष डॉ. प्रवीण जगताप, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रमोद धनावडे, भाजप डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुमित काकडे, डॉ. संजय रावळ, डॉ. सचिन निरगुडे, डॉ. शर्मा केंजळे, डॉ. विनायक बांदेकर, डॉ. संदीप होले, शरद पाडसे, डॉ. उमाकांत ढवळे, संदीप टिळेकर, केशव काकडे, सुनीता कोलते, अशोक टिळेकर, बंटी जगताप, तानाजी झेंडे,पत्रकार ताकवले हेमंत, गणेश मुळीक,जीवन कड, संभाजी महामुनी,  बापू मुळीक, ए. टी. माने, दत्ता भोगले,जगदिश शिदे, संदिप जगताप आदी उपस्थित होते. सह्याद्री हॉस्पिटल हडपसर व आनंदी मल्टी पेशालिटी हॉस्पिटल जेजुरी यांनी या प्रायोजकत्व स्वीकारले.
पुरंदर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र वीर येथे दर्शनासाठी लक्ष्मीपूजनाच्या निमित्त भाविकांच्या रांगा                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    अश्विन अमावस्या तसेच लक्ष्मीपूजन सणाचे अवचित्य साधून, श्री शेत्र वीर ता. पुरंदर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी देऊळ वाड्यामध्ये सकाळपासून रांगा लावल्या होत्या, दीपावली सणानिमित्त देऊळ वाड्यात रोज संध्याकाळी फुलांची आरास करण्यात येत असून, दगडी कासवावर आकर्षक रांगोळी काढण्यात येते, अमावस्येच्या निमित्ताने पहाटे साडेचार वाजता देवाला अभंग स्नान घालून, महापूजा करण्यात आली, सकाळी सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला, सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकातर्फे देवाला अभिषेक करण्यात आले, सकाळी दहा वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या, देऊळ वाड्यामध्ये दगडी कासवावर सालकरी, गोसावी मंडळीचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता, सकाळी बारा वाजून पंधरा मिनिटांनी धूप आरती होऊन, मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला .दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दिवाळी पाडव्याला देवाचे सोन्याचे दागिने परिधान करण्यात येणार असून, देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरात विविध विकासकामे प्रगतीपदावर असून, श्रीनाथ बस थांब्याचे काम अंतिम टप्यात आले असल्याचेही देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अमोल धुमाळ यांनी सांगितले आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सचिव काशिनाथ धुमाळ, विश्वस्त प्रमिला देशमुख, सुनील धुमाळ, विराज धुमाळ, अमोल धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासो समगीर, जयवंत सोनावणे, अलका जाधव आदी विश्वस्त मंडळ तसेच सल्लागार मंडळ उपस्थित होते. अमावस्येला दर्शनासाठी आलेल् आलेल्या भाविकांना भगवान धुमाळ, नामदेव धुमाळ, एकनाथ सूर्यवंशी, जयसिंग होले यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ व उपाध्यक्ष अमोल धुमाळ यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
श्रीनाथ जोगेश्वरी देवस्थान ट्रस्ट घोडेउड्डाण, वीर. या ठिकाणी दिवाळी अमावस्या निमित्त भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी                                                                       सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        देवाला पहाटे 5 वाजता देवस्थान ट्रस्ट मार्फत अभिषेक करण्यात आला .नंतर सकाळी 6 वाजता देवाची पूजा होऊन देवस्थान ट्रस्ट मार्फत पोशाख करण्यात आला. या नंतर सकाळी - 08:45 ला धूप आरती होऊन देवाचा मुख्य गाभारा नऊ ते दहा एक तास बंद करण्यात आला. व दहा नंतर पुन्हा भाविकांसाठी दर्शन साठी उघडण्यात आला. पूर्ण दिवस दिवाळी अमावस्या लक्ष्मी पूजेने असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत होती. दिवाळी अमावस्या असल्यामुळे देवस्थान ट्रस्ट मार्फत मंदिर परिसरात  व मंदिराच्या शिखराला विद्युत रोषणाई अतिशय सुंदर अशी करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिरात  परिसरात आकाश कंदील व दिवे लाऊन मंदिर खूप असे सजवले आहे.श्रीनाथ जोगेश्वरी देवस्थान ट्रस्ट घोडेउड्डाण. वीर (रजि नंबर - ए २८०३/पुणे)अध्यक्ष -  संपत सिद्धू बुरुंगले.उपाध्यक्ष - सतीश बापू बुरुंगले.सचिव - किशोर तात्याबा बुरुंगले.खजिनदार - विनोद तात्याबा बुरुंगले.विश्वस्त - बापू शंकर बुरुंगले.विश्वस्त - भानुदास सिद्धू बुरुंगले.विश्वस्त -  दादा कृष्णा बुरुंगले.विश्वस्त - अशोक तुकाराम बुरुंगले.विश्वस्त - केदार तात्याबा बुरुंगले.विश्वस्त -  सुरेश सिद्धू बुरुंगले.विश्वस्त -  लक्ष्मण तुकाराम बुरुंगले.देवस्थान ट्रस्टने - अतिश सुंदर असे भाविकांचे महाप्रसादाचे व शुद्ध पिण्याचे पाण्याचे पार्किंगचे व भाविकांना स्वच्छ असे शौचालय त्या ठिकाणी पुरुष व महिलांची वेगळी अशी सोय केली आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये बोगस दस्त नोंदणीची करणारी टोळी अधिकतम सक्रिय                                                     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यांमध्ये सध्या नव्याने होऊ घातलेले विमानतळ आणि आयटी पार्क यामुळे येथील जमिनी सोन्याचा भावामध्ये त्याचा भाव झालेला आहे, त्यामुळे जमिनीचे फार मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार वाढत चाललेले आहेत, याच पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये बोगस दस्तऐवज बनवणाऱ्या काही टोळ्यांचा सक्रिय होत असल्याची दिसून येत आहे. अनेक वर्ष अशा प्रकारच्या अनेक पडीक जमिनी पाहून, त्या ठिकाणी मालक असल्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड बनावट बनवायचे असून, दुसऱ्याला ती जमीन विक्री करायची, काही जमिनीचे मालक मृत असून, त्यांची वारस नोंदी झालेल्या नाहीत, त्यांच्या नावावर खोटी वारस नोंद करून, ती जमीन विक्री केली जात आहे, अशा प्रकारच्या अनेक प्रकार सध्या पुरंदर तालुक्यामध्ये उघडकीस येत आहेत. सासवड पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी दाखल होत असताना, बोगस खरेदी खतामध्ये शैलेश कोतमिरे, प्रियाली परदेशी, भुतडा, पल्लवी सोनवणे अशा बऱ्याच प्रकारची बोगस खरेदीखत झाल्याच्या तक्रारी दाखल झालेली असून, यातील फिर्यादी दाखल झालेल्या बोटावर मोजण्या इतक्याच घटना घडलेल्या आहेत, बोगस चाललेले दस्त हे सर्वर डाऊन, झाल्यानंतर पाच वाजेच्या पुढचे का होतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातून दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांच्या कारभारावर तर प्रश्नचिन्हच उपस्थित केले जात आहे. या दस्ता मध्ये असणारे आधार कार्ड पॅन कार्ड यावरील थंब व प्रत्यक्षात उभा राहिलेली व्यक्ती हे ते आहेत की नाही, हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी दुय्यम निबंधक अधिकाऱ्याची असते, तरीही बोगस नोंदणीचे प्रकार वाढत चाललेले आहेत त्यातून, बोगसदस्त करणारी टोळी व दुय्यम निबंधक अधिकारी यांचे सुत जुळलेची सध्या तरी कुजबूज सुरू आहे. प्रियाली परदेशी यांनी केलेल्या अर्जा नुसार आजपर्यंत तक्रार दाखल होणे अपेक्षित होते, परंतु आर्थिक हित संबंधापोटी व राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल झाला नाही असा आरोप त्यांचा आहे ,त्यातून बोगस दस्त करणारी टोळी ही एका राजकीय पक्षाशी निगडित असल्याचेही बोलले जात आहे. मांडकी येथील सुद्धा दस्तऐवज असा चुकीचा प्रकारचा करून घेणारे एजंट किरण भांडवलकर यांनी जाधव कुटुंबीयांकडून सुद्धा अशाच प्रकारच्या घटना घडवून आणलेली आहे. ही घटना सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून, सुद्धा त्यावर आरोपी कसल्याही प्रकारची दाद  देत नाही असा गंभीर आरोपही जाधव कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्यातील वीर या ठिकाणी मद्यधुंद तरुणांचा एक प्रकारे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच धुडगुस वीर देवस्थानी या अगोदरच पोलीस प्रशासनाला पत्र देऊन सावध केले पाहिजे होते ;पोलीस प्रशासन आक्रमक: सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा दाखल                                                                      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           श्री शेत्र वीर (ता. पुरंदर) या ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वीच काही ठिकाणी तरुणांनी रात्रभर मद्यधुंद अवस्थेमध्ये धुडगुस घातलेला आहे याचा त्रास भाविकांना झाल्यामुळे, पोलीस प्रशासन आक्रमक झाले असून ,पोलीस आणि सीसीटीव्ही तपासून संबंधितावर गुन्हे दाखल केलेले आहेत, लक्ष्मीपूजन अमावस्ये निमित्त वीर येथे भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. या निमित्त तालुक्याचे जिल्ह्यातील बैलगाडा मालक येथे दर्शनाला येतात, पानवडी, कोडीत, गराडे, नारायणपूर आणि इतर काही भागातून रात्री मुक्कामी बैलगाडी घेऊन, बरेच युवक वीरला आले होते, त्यातील 50 ते 60 युवकांनी सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी दि. 21 पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये वीर परिसरातील देवस्थान या ठिकाणी गोंधळ घातला. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता मंदिर बंद होऊन, देवाला विश्रांती दिली असताना, यावेळी मद्यधुंद अवस्थेत या तरुणांनी प्रचंड हुलडबाजी केली, त्यातील बहुसंख्य युवक हे मद्यपान करून आले होते, त्यांनी फटाके फोडले, एकमेकांना शिवीगाळ केली, दुचाकीचा आवाज करत रात्रभर आरडा ओरड केला अनेक  गावातच बैलगाड्यांनी शर्यत लावण्याचा प्रयत्नही केला, यादरम्यान, त्यांना गावातील काही जेष्ठ मंडळी आणि देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला ,मात्र त्यांचे कुणीही ऐकले नाही. तसेच रात्रीपर्यंत पोलीस चौकीला संपर्क केला मात्र तो झाला नसल्याचे, नागरिकांनी सांगितले. या प्रकारामुळे गावकऱ्यांची झोप उडाली, असल्याचेही श्री शेत्र वीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने बेकायदेशीर बैलगाडा चालकावर आणि हुलडबाजी  मद्यधुंद  तरुणावर कारवाई करण्यासाठी सासवड पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे, त्यावर पोलिसांनी संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची हमी दिलेली आहे. अमोल धोंडीबा धुमाळ.उपाध्यक्ष वीर देवस्थान ट्रस्ट. श्री शेत्र वीर येथे अमावस्येच्या पूर्वसंध्येला बेकायदेशीर बैलगाडा मालक आणि मद्यधुंद तरुणांनी रात्रभर दुडगुज घातलेला असताना याबाबत  ट्रस्ट आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून सर्वावरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कुमार कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन.
विद्यार्थी रमले किल्ला बनविण्यात व किल्ल्याची माहिती घेण्यात विद्यार्थ्यांनी बनविला मुरुड  जंजिरा किल्ला.     सासवड पतिनिधी:   बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                           सासवड ( ता. पुरंदर ) येथील अल्पकाळात प्रगती केलेल्या गुरुकुल करिअर अकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी किल्ले मुरुड जंजिरा हा किल्ला तयार केलेला असून हा किल्ला तयार करण्यामध्ये पृथ्वीराज टिळेकर, जय भोईटे, हरीश भुजबळ, श्रावण भगत, धनंजय कळसकर, वैष्णवी कुदळे, वैष्णवी जाधव, पूर्वा कादंबने, प्रेम ढोणे, राज ढोणे, दत्ता धायगुडे, साईराज शिंदे, शिवम कांबळे, मंथन देवकर अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी जंजिरा किल्ला बनवण्यामध्ये सहभाग घेतला. तसेच या किल्ला बनवताना प्लॅस्टिक मुक्त किल्ला ही संकल्पना राबवली तसेच देशभक्ती व इतिहासाचा अभ्यास यामधून त्यांना करता आला. यासाठी वीस बाय दहा असा पाण्यासाठी खड्डा घेऊन त्यामध्ये दहा बाय पाच या आकारामध्ये जंजिरा किल्ल्याची उबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली. तसेच त्याची संपूर्ण माहिती त्याची वैशिष्ट्ये तसेच आपल्याला काय शिकायला मिळेल या गोष्टींचा उल्लेख विद्यार्थ्यांनी केला. इतिहासाचा अभ्यास करून जंजिरा किल्ल्यावरील प्रत्येक गोष्ट शंभर टक्के नावानिशी दाखवलेली आहे यामध्ये गोड्या पाण्याचे तळे असेल, खारे पाण्याची तळी, तोफेचे प्रकार, 18 बुरुज, राणीचा महाल, गाव मस्जिद, अशा वेगवेगळ्या गोष्टी पाण्यामधील बोटी दाखवून हा किल्ला 400 वर्ष अभेद्य कसा आहे अजिंक्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य संदीप टिळेकर,  प्राध्यापिका उषा टिळेकर तसेच शिक्षकांनी मार्गदर्शन केले. चौकट : जनरली परीक्षा झाल्यावर विद्यार्थी बाहेर फिरायला जातात. पण पण आम्ही तसे न करता परीक्षा झाल्यावर आम्ही येथे किल्ला बनवण्यास सुरुवात केली. पाचवी ते बारावी असे विद्यार्थी गुरुकुल मध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहोत. हा किल्ला बनवत असताना किल्ल्याची व इतिहासाची असणारी सांगड आमच्या लक्षात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम यांच्या कथा आम्हाला या माध्यमातून समजल्या व किल्ला बनविण्याचा प्रत्यक्ष आनंद उपभोगता आला..  विद्यार्थी जय भोईटे.हा किल्ला पाहण्यासाठी सासवड परिसरातुन लोक येत आहेत.सासवड शहरात माजी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून  सासवड सांस्कृतिक मंडळ हे गेले 19 वर्ष किल्ला स्पर्धा घेत असल्याची माहिती सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्र पंत जगताप यांनी दिली. याचबरोबर बिनिंग पुरंदर यांच्या माध्यमातूनही तालुका किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही किल्ल्या संदर्भात स्पर्धा आहेत. फोटो : सासवड ( ता. पुरंदर ) येथील गुरुकुल अकॅडमी येथे विद्यार्थ्यांनी बनविला जंजिरा किल्ला. किल्ल्याच्या बाजूस विद्यार्थी.
क-हे काठावर रंगली दिवाळी पहाट.. रसिकांनी दिली भरभरून दाद..                                                      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज  :                                                                  सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था व रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या वसू बारस  निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.एक काळ होता माणूस जागा व्हायचा तो लोकसंगीत आणि उठी उठी गोपाळा म्हणत भूपाळी त्याला उठवायची आणि मग सुरू व्हायचा रोजचा राम रगडा पण या सगळ्या दिवसभराच्या धामधुमीत इथल्या पारंपारिक लोककला त्याचं मन रिजवायच्या आता आधुनिक आणि चंगळवादाच्या पावटाळीत हा लोककलांचा खजिना हरवत चाललाय म्हणून माणसाची मन रिजवायला त्यांना पुन्हा आपली नाळ या मराठी मातीशी आहे हे दाखवून देणारा रस रुसून अनुभव असा हा भूपाळी ते भैरवी करा काठावर मोठ्या दिमाखात साजरा झाला यात पहाटेची भूपाळी जातीवरच्या ओव्या पिंगळा जोशाच होणार अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी लोकसंस्कृतीचा उपासक वासुदेव हसवणारा बहुरूपी प्रबोधनात्मक कडकलक्ष्मी नटखट गवळण विनोदातून अध्यात्म सांगणारे भारुड शिवरायांचा इतिहास जाज्वल करणारी शाहिरी लोकनाट्यातील खुसखुशीत बतावणी लावण्यवतीची रंगार लावणी आपले कुळाचार सांगणारा गोंधळी वाघ्या मुरळी नंदीबैल पोतराज धनगर ओवी शेतकरी नृत्य गजन नृत्य कोळी नृत्य आदिवासी नृत्य अध्यात्माची नाळ जोडणारी दिंडी कीर्तन महाराष्ट्र सणांची महती सांगणारा सांगणारी संपरंपरा बैलपोळा ते गुढीपाडवा ऐतिहासिक दाखले देत वर्तमानपत्रावर भाष्य करणारे छत्रपती शिवरायांचे जाज्वल्य स्वागत आणि एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी अशा रंगारंग कार्यक्रमाने लोकांची मने जिंकली. हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य संदीप टिळेकर, उपाध्यक्ष धैर्यशील देशमुख, कार्याध्यक्ष एडवोकेट भगवान कोल्हे, सचिव राजेंद्र भैरवकर, रवींद्र क्षीरसागर, उत्तम एक्के, संचालक ॲड. काळुराम धिवार तुकाराम गिरमे, विलास गळंगे, रमेश वेदपाठक, अर्जुन भोंगळे, जयश्री गिरमे, विठ्ठल सूर्यवंशी, मंदार शितोळे, शैला शेवते, तसेच रोटरी क्लब पुरंदरचे अध्यक्ष प्रमोद धनावडे, भारती गायकवाड, तुषार जगताप, ॲड. आनंद जगताप, तसेच कृष्णा शेट्टी, गुलाब गायकवाड, अभिजीत बारवकर, रफिक शेख, संदीप टिळेकर, किरण भुजबळ, डॉ. सुमित काकडे, संतोष गायकवाड, सचिन कुदळे, अनिल उरवणे, आशिष शिंदे, विश्वनाथ गायकवाड, अश्विनी जगताप, राहुल जगताप या सर्वांनी भूपाळी ते भैरवी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या  प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून दिवाळी पहाटचे उद्घाटन करण्यात आले. शाहीर अभिजीत कदम यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक पोवाडा सादर करून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे केले.यावेळी माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.  सासवडकरांच्या  सुखदुःखात नेहमीच भजनी मंडळ कार्यरत असते.आज दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेऊन लोकांना दिवाळीचा आनंद देत आहे. या निमित्ताने स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर यांचा पाचवा स्मृतिदिन सर्वांच्या लक्षात राहील असे सांगून माजी आमदार संजय जगताप यांनी उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड.दिलीप निरगुडे, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, सिद्राम भुजबळ, विजय वढणे, संदीप राऊत, दीपक जांभळे, तानाजी झेंडे, अनिल गद्रे,अनिल कदम, प्रा. डॉ. नारायण टाक आदी उपस्थित होते.
कऱ्हाकाठावर रंगली दिवाळी पहाट.. सासवडला शहर पत्रकार संघाच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन         सासवड  प्रतिनिधी:बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                            माझी मैना गावाकडं राहिली. चांदणं चांदणं रातीला.. काळया मातीत मातीत.. एक राधा एक मीरा... लंबी जुदाई.. आली माझ्या घरी ही दिवाळी अशा एका पेक्षा एक सुरेल रचनांनी सासवडचां कऱ्हा काठ भल्या पहाटे दुमदुमून गेला. निमित्त होते पत्रकार संघ सासवड शहरच्या दिवाळी पहाट महोत्सव कार्यक्रमाचे आणि हे सुंदर सादरीकरण केले होते ज्योती शाम गोराणे यांच्या जल्लोष सप्त सुरांचा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाने. सुमारे तीन तासांहून अधिक काळ हा संगीत प्रवास रसिकांनी अनुभवत टाळ्यांनी प्रतिसाद दिला. माजी आमदार संजय जगताप, सौ राजवर्धीनी जगताप जिल्हा भाजप अध्यक्ष शेखर वढणे व सौ योगिनी वढणे यांच्या प्रमुख उपस्थितीसह मोठ्या संख्येने रसिकांनी या आनंददायी कार्यक्रमास हजेरी लावली.   येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात रविवारी पहाटे आचार्य अत्रे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व रंगमंच पुजा करून  विजय कोलते, प्रदिप पोमण, हेमंत भोंगळे, विजय वढणे, संजय गणपत जगताप,शेखर वढणे व शाम गोराणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. भूपाळी, वासुदेव, गोंधळ, लावणी, भक्ती गीत, हिंदी मराठी चित्रपट गीते व सोबतीला भाग्यश्री राऊत आणि ऋचा पाटील यांची नृत्ये, बाल संबळवादक हर्षल शिंदे याचे वादन कार्यक्रमाची रंगत वाढवणारे ठरले. ताकतीच्या गायिका ज्योती गोराणे व त्यांच्या समवेत भक्ती कापसे, पुजा वाणी, आरती मीठे यांच्या एका पेक्षा एक सुरेल रचनांनी सासवडचां रसिक तृप्त झाला.    शाम गोराणे यांच्या संगीत संयोजनाखाली ढोलकीपटू डॉ वैष्णवी गित्ते, पखवाज वादक ज्ञानेश्वरी क्षीरसागर, की बोर्ड हर्षवर्धन मोरे, पॅड अजय उनवणे , पाटील यांची ध्वनी व्यवस्था व सुनिता निंबाळकर आणि पंकज चव्हाण यांचे निवेदन कार्यक्रमाची उंची वाढवून गेले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात ज्येष्ठ गायिका ज्योती गोराणे, माजी आमदार संजय जगताप, भाजप जिल्हाअध्यक्ष शेखर वढणे, सासवड शहर अध्यक्ष आनंदभय्या जगताप यांचा शहर पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. शेखर वढणे व संजय जगताप यांनी यावेळी उपस्थित रसिकांना मनोगतातून शुभेच्छा दिल्या. संघाचे खजिनदार हेमंत ताकवले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अध्यक्ष सुधीर गुरव यांनी प्रास्तविक केले तर सचिव गणेश मुळीक यांनी आभार मानले. याच कार्यक्रमात संघाच्या नवीन कार्यकरणीची घोषणा सुधीर गुरव यांनी केली.    विजय कोलते, हेमंत भोंगळे, प्रदीप पोमण, राजवर्धीनी जगताप, योगिता वढणे, नीता सुभागडे, वसंत ताकवले, नंदकुमार सागर, प्रा संदीप टिळेकर, डॉ संजय रावळ, संजय चव्हाण, नंदूकाका जगताप, ॲड दिलीप निरगुडे, अशपाक बागवान, मंजुश्री निरगुडे, दत्तात्रय काळबेरे, डॉ प्रवीण जगताप, सुमित काकडे, विजय वढणे, संतोष गिरमे, प्रकाश ढवळे, मोहन चव्हाण, माऊली गिरमे, शरद बोबडे, धनंजय साबळे यांसह मोठ्या संख्येने रसिकांनी या आनंददायी कार्यक्रमास हजेरी लावली. जीवन कड, बाळासाहेब कुलकर्णी, राजेंद्र बर्गे, संभाजी महामुनी, नितीन यादव, तानाजी सातव, जगदीश शिंदे, संदीप जगताप, बापू मुळीक,अरसलान बागवान, सुनिल वढणे, गौरव कोलते, मनोज मांढरे या संघाच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले
पुरंदर तालुक्यातील दिवे आणि भिवडी गणाकडे पुरंदर तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती पद                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       पुरंदर तालुक्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सभापती आणि सदस्य पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली ,मागील जवळपास तीन वर्ष निवडणूक झाली नसल्याने, मागील आरक्षण विचारात घेतली गेली नाही, ती शितील करण्यात आली, पुरंदर पंचायत समिती साठी आठ गण आहेत ,दिवे, गराडे, निरा, कोळविहीरे ,बेलसर ,माळशिरस, वीर, भिवडी असे आठ पंचायत समिती गण आहेत ,8 पंचायत समिती सदस्य आणि सभापती पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली, त्यामध्ये सर्वात प्रथम सभापती पदाची सोडत काढण्यात आली तर सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे ,त्यामुळे पंचायत समिती गणाच्या आरक्षणामध्ये ज्या गणांना ओबीसी हे आरक्षण राखीव असेल तो पंचायत समिती सभापती पदी विराजमान होईल, हे स्पष्ट झाले आहे. सोमवार दि. 13 रोजी पंचायत समिती येथे पंचायत समिती प्रशासक आणि पुरंदर उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत आणि गट विकास अधिकारी पुरंदर प्रणोती श्रीश्रीमाळ यांच्या उपस्थितीमध्ये आठही गणाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये दिवेगणास ओबीसी सर्वसाधारण आणि भिवडी गणांमध्ये ओबीसी महिला आरक्षण सोडत निघाली त्यामुळे, आता दिवे आणि भिवडी पंचायत समिती गण मधूनच सभापती ठरणार हे सिद्ध झाले आहे. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार गट असून, 50 गराडे सर्वसाधारण महिला ,51 बेलसर सर्वसाधारण ,52 वीर सर्व साधारण, 53 नीरा शिवतक्रार नागरिकांचा मागास वर्ग महिला. सभापती पदी कोणाची वर्णी लागणार ?मागील पंचवार्षिक म्हणजेच 2017 मध्ये दिवे आणि भिवडी गणाचे सदस्य हे सभापती पदी विराजमान झाले होते, तर या दोन्ही गणातील जागा शिवसेना (धनुष्यबाण) यांनी जिंकले होत्या, प्रामुख्याने दिवेगणातील अर्चना समीर जाधव तर भिवडी गणातील नलिनी हरिभाऊ लोळे या सभापती पदी विराजमान झाल्या होत्या ,तर यंदाही दिवे आणि भिवडी गणाला सभापतीपदाची संधी आहे, आता सभापती पदी कोण वर्णी लागणार? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुरंदर तालुक्यातून सासवड ते आंबेजोगाई एसटी बस सेवा सुरू                                                                                      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड आगारांमधून गुरुवारी दि.16 पासून सासवड ते स्वारगेट इंदापूर बार्शी मार्गे आंबाजोगा ई आणि सासवड जेजुरी बारामती मार्गे अक्कलकोट बस सेवा सुरू केली आहे ,त्याबरोबरच सासवड गोंदवले बस सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे ,असे प्रवासी वर्गाने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन, आगार प्रमुख सागर गाडे यांनी केले आहे. गुरुवारी दि. 16 सकाळी सात वाजता आंबाजोगाई बस चे उद्घाटन प्रवासी महिलांच्या हस्ते करण्यात आले, आणि वाहतूक नियंत्रक महेश भोंगळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि प्रवासी वर्गाला पेढे भरून बस सेवेचा प्रारंभ केला आहे. यावेळी आगार प्रमुख सागर गाडे, नियंत्रक पोपट जैनक, कैलास जगताप, राहुल टिळेकर, अच्युत नागरगोजे, वाहक आणि इतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी स्थानक उपाहारगृहाचे मालक सारंग लोणकर यांनी उपस्थित राहून स्वत: सर्व उपस्थित मंडळींना चहापाणी केला, सकाळी स्वारगेट कडे जाणाऱ्या प्रवासी वर्गामध्ये आणखी एक बस मार्गामुळे समाधान व्यक्त केले जात आहे, या बस सेवेला पहिल्या दिवशीच 18 प्रवाशापेक्षा जास्त स्वारगेट ते आंबेजोगाई थेट आरक्षण सेवेत मिळालेले आहे, अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तानाजी सातव यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यामध्ये ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारी जेरबंद;तर सासवड पोलिसांची कारवाई सहा जनावर गुन्हा दाखल                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         टावर लाईन प्रकल्पाच्या ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारे अविनाश लक्ष्मण कोळेकर रा. दत्तनगर हनुमान वाडी आळंदी देवाची केळगाव ता.खेड ऋषिकेश अर्जुन माळी रा. दुसरा मजला साई कॉलनी बालाजी नगर चाकण यांना सासवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांचे साथीदार दिपक विनोद भगत रा. नाणेकर वाडी चाकण पुणे इतर दोन ते तीन जणांना पळून जाण्यात यश आले, याबाबत दिनानाथ नारायण गोंगारी मुख्य तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी 925 प्रशासकीय इमारत तिसरा मजला कुंभारवाडा कसबा पेठ पुणे 11 यांनी याबाबत फिर्याद सासवड पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2012 पासून थापेवाडी, गराडे मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण कंपनीने 400के. व्ही जेजुरी हिंजवडी टावर लाईन प्रकल्पाचे काम चालू केले होते, त्यानंतर प्रकल्पाचे काम कोडीत, गराडे, सोमरडी, मठवाडी, थापेवाडी या गावाच्या हद्दीत चालू होते, सन 2014 मध्ये काही कारणास्तव ते काम बंद पडले होते. प्रकल्पाचे काम कोडित मध्ये पूर्ण झाले नसून, सध्या ते बंद स्थितीमध्ये आहे. शुक्रवार या दिवशी पहाटे एक ते पाचच्या दरम्यान, चोरी करून कोडीत येथून ॲल्युमिनियमच्या चोरीच्या तारा घेऊन जाणारी गाडी सासवडच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांना मिळाली होती यासाठी, त्यांनी तपास पथक रवांना केले, या पथकाने कारवाई करून तारा चोरून, घेऊन जाणारा टेम्पो एमएच १४ एलबी 74 26 तारा तसेच चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य असं पकडले. या तीन लाख 48 हजार 750 रुपयाच्या सहाशे चाळीस स्क्वेअर मिली मीटरच्या 2325 किलो वजनाच्या तारा टेम्पो, असे एकूण पाच लाख 99,150 मुद्देमाला सह ताब्यात घेतला, त्यांचे अन्य साथीदार हे पळून गेले आहेत, या प्रकरणांमध्ये पोलीस अमलदार बापूराव म्हेत्रे, शिवानी बाबर, पोलीस हवालदार सुहास लाटणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांनी चोरीच्या ॲल्युमिनियमच्या तारांनी भरलेला टेम्पो सासवडच्या या पोलिसांनी जप्त केला, तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे करत आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी सह परिसरामध्ये खुले आम अवैध धंदे                                                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यात विशेषत सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सतत वाढत असून, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची प्रश्न गंभीर बनला आहे, अवैद्य मद्य विक्री, गांजा, जुगार, मटका व देह विक्री यासारखे बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असल्याचा, आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळील परिसरातील या अवैध धंद्यावर कारवाई व्हावी यासाठी आरपीआयचे विष्णू भोसले व सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदयकुमार जगताप यांनी वारंवार निविदने दिलेली आहेत, हॉटेल व्यवसाय कावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भिवडी येथील ग्रामस्थांनी व उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि सासवड पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढण्यात आला अशा अनेक तक्रारी देऊन, सुद्धा ठोस अशी कारवाई करण्यात आलेली नाही. मताच्या राजकारणामुळे या परिसरामध्ये कोणी लक्ष देत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केलेला आहे, या अवैध धंद्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना थेट सहभाग असल्याचा, गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत, नुकत्याच गुटक्याच्या ट्रक सोडून, दिल्या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या निरीक्षकांसोबतचे संभाषण, समाज माध्यमातून प्रसारित झाले आहे, यापूर्वी एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्य धुंद अवस्थेत सुरक्षा रक्षकाला चिरडून ठार केल्याच्या घटनेमध्ये सुद्धा पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांकडून अप्रत्यक्ष मदत मिळाल्याची चर्चा होती, तसेच अवैध धंद्यामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून काही महिन्यापूर्वी दोन पोलिसांचे निलंबन ही झाले होते, तसेच जेजुरी येथील व परिसरामध्ये अवैध धंदे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फोपावलेले आहेत, पिसे,राजुरी शिवरी येथील शेतकऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये बीट अंमलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे आरोपी संगे संगणमत असल्याने, सहा सहा महिने झाले फिर्यादीचा गुन्हा दाखल करून घेत नाहीत, टाळाटा करतात आरोपी या कडून आर्थिक हितसंबंध बीट अमलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत तेव्हा त्यांना त्वरित निलंबित करावे अशी अवैध धंदेच्या बाबतीमध्ये, सुद्धा व सहा महिने झाले गुन्हा दाखल न केल्यामुळे, कारवाई करावी यासाठी सर्वसामान्य नागरिकांची याबाबत मागणी आहे. पुरंदर तालुक्यातील सर्व अवैध व्यवसाय व बेकायदेशीर सावकार की बंद करण्याची मोहीम घेणार आहेत. नागरिकांनी कोणालाही न घाबरता अशा अवैध धंद्याच्या, व्यवसायांची माहिती फोटो किंवा ठिकाणचा तपशील 9011079622 या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर पाठवावा. तक्रारीची गोपनीयता राखून संबंधितावर कारवाई, कायदेशीर पद्धतीने करण्यात येईल कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस ठाणे. पुरंदर तालुक्यातील सासवड परिसरातील कोठेही अवैध व्यवसाय किंवा बेकायदेशीर सावकारकीची स्थिती आढळून आल्यास, नागरिकांनी आम्हाला त्वरित माहिती द्यावी, त्यांच्या नावाची पूर्ण गुप्तता राखली जाईल, तसेच अवैध व्यवसाय करणारे आणि खाजगी सावकारी यांचा पूर्ण बीमोड करण्यासाठी, आमचे पथक तयार करत आहोत .असे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, कोणालाही न घाबरता वैयक्तिक मोबाईलवर क्रमांक 97 64455555 वर संपर्क साधावा. राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणच्या नगरपालिकेमध्ये 2800 हरकती प्राप्त                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीवर तब्बल 2800 हरकती प्राप्त झालेल्या आहेत, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादी कार्यक्रमामुळे सासवडमध्ये सध्या मोठी लगबग दिसून येत आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील सदस्य तसेच थेट अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी यांचा मतदार यादी कार्यक्रम 2025 रोजी जाहीर केला होता, त्यानुसार सासवड नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी नगरपरिषद आणि जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर तसेच सासवड नगरपरिषद कार्यालयात पाहणी साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तसेच प्रभाग निहाय यादी डाऊनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध होत आहे, महाराष्ट्र राज्याची निवडणूक आयोगांच्या सचिवांच्या पत्रानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याच्या कालावधीमध्ये दि. 17 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, या मुदत वाढीमुळे दहा दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे 28 हरकती प्राप्त झालेल्या आहेत एवढ्या मोठ्या संख्येने हरकती प्राप्त झाल्याने, मतदार यादी तयार करण्याच्या कामात मोठा गोंधळ उडालेला आहे, आता या प्राप्त हरकती व सूचनावर विचार करून, मतदार यादी अंतिम करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे निर्णय घेणार आहेत, अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 31 ऑक्टोबर असून, मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करून मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख सात नोव्हेंबर असल्याचे पालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले दरम्यान, पालिका कर्मचारी मतदारांच्या घरोघरी जाऊन स्थळ तपासणी करून योग्य प्रभागांमध्ये नोंदणी करित असल्याचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 3,000 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,051दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                              पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवारी दि.15 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,000 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,051 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 3,000 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,200 तर सरासरी 2,600 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,051 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,300 तर सरासरी 2,625 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले,सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर आदी उपस्थित होते. गुळाला 4,350रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 196 बॉक्स 39 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,350 कमाल दर 3,700 रुपये तर साधारण4,050 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,200,3,000,2,600. बाजरी 2,100,3,151, 2,625. गहू 2,300,3,051,2,675. तांदूळ माहिती मिळाली नाहीत,हरभरा 5,511, 3,000,4,255.
पुरंदर तालुक्यातील देवस्थान जमिनीसाठी सासवडकर एकवटले                                                               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड ता. पुरंदर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ श्री भैरव देवाच्या मालकीच्या इनामी वर्ग तीनच्या सुमारे आठ एकर जमिनीच्या व्यवस्थापन देखभाल आणि संरक्षणासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभा आयोजित केली आहे, ही सभा गुरुवारी दि. सकाळी दहा वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथे होणार आहे. या संदर्भात श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट आणि पुजारी भैरवकर मंडळींनी सोमवारी दि. 13रोजी पत्रकार परिषद घेऊन, माहिती दिली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थानची इनाम जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, देवस्थानच्या  नियमासाठी मिळालेली ही जमीन ज्या टकले कुटुंबीयांकडे करण्यासाठी देण्यात आली होती, त्यांनी ती परत करण्यास नकार दिला असून, ताबा सोडण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप मोहन भैरवकर आणि देवस्थान ट्रस्टने केला आहे, यावेळी चैत्य उत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रकाश जगताप ,गाव पाटील संग्राम जगताप, राजेंद्र जगताप यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या सामाजिक हितासाठी आणि सार्वजनिक धार्मिक संपत्तीचे संरक्षण सुनिचित करण्याच्या उद्देशाने हे सभा बोलाविण्यात आली होती. देवस्थानच्या जमिनीवरील वर्तमान स्थिती आणि कायदेशीर दर्जाची माहिती देणे, धार्मिक सांस्कृतिक परोपकारिक कार्य नियमित ठेवण्यासाठी ग्रामस्थांचे मत आणि सूचना संकलित करणे आणि जमिनीच्या सुरक्षतेसाठी व अतिक्रमण रोखण्यासाठी ग्रामस्थांचे मत घेणे हे सभेचे मुख्य उद्देश असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी माजी आमदार संजय जगताप, ट्रस्टचे उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे पुजारी राजेंद्र भैरवकर, चैत्य उत्सव कमिटीचे अध्यक्ष रविंद्र शिरसागर, मोहन जगताप, विजय जगताप, वैभव जगताप, सचिव विठ्ठल शिंदे यास ग्रामस्थ व भैरवकर मंडळी उपस्थित होते. रवींद्र पंत जगताप यांनी स्वागत करून, आभार मानले.
पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधीतांची शरद पवार यांच्याकडे धाव; खानवडी येथे फुले स्मारकात उद्या बैठक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित गावातील शेतकरी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संवाद साधून, आपली कैफियत मांडणार आहेत. बुधवारी दि. 15 दुपारी 3वा खानवडी येथील महात्मा फुले स्मारकात ही बैठक होणार आहे. पुरंदर विमानतळाबाबत 90% पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या संमती असल्याचा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केला जात आहे, मात्र शासन पेपर बाजी करत असून, स्थानिक शेतकऱ्यांनी संमती दिली नाही, केवळ खाजगी गुंतवणूकदार व व्यापाऱ्यांनी संमती दिली असा दावा प्रकल्प बाधित गावातील शेतकरी करत आहेत, त्यामुळे पुरंदर विमानतळाबाबत उलट-सुलट चर्चा होत आहेत, कुंभारवळण, एखतपुर, मुंजवडी, वनपुरी, उदाचीवाडी खानवडी येथील नियोजित 3,000 एकर क्षेत्रातील शेतकरी राजी झाले असून, पारगाव येथील शेतकरीही तयार आहेत असे सांगितले जाते, मात्र संवादासाठी शेतकऱ्याकडे आलेल्या शासकीय अधिकारी रात्री दहा वाजता नंतर जात आहेत तर विमानतळ संदर्भात रेटची माहिती सुद्धा तोंडी देत आहेत अधिकारी व एजंट शेतकरी यानी तोंडी आश्वासन देत आहेत लेखी आश्वासन  अधिकारी याकडे काहीच नाही अशा तक्रारी आता पुढे या अधिकारी समोर विश प्राशन सुध्दा करण्यात येणार आहे मग अधिकारी वगॅ व एजंट याना समजेल पुढे केले की काय होते, भूसंपादन अधिकाऱ्यांच्या समोरच शेतकऱ्यांनी तोंड झोडून घेतले, आमचा विरोध आहे, जबरदस्ती केल्यास फाशी घेऊ, असेही सांगत खिशातील दोरी प्रसारमाध्यमासमोर दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार व शेतकरी यांच्यातील बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, यात काय चर्चा होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे गुंतागुंतीच्या प्रश्नावर योग्य पर्याय काढण्याबाबत, शरद पवार यांची लौकिक असून, विमानतळाच्या प्रश्नावरही तेच अधिकार वाणीने बोलू शकतात, सात गावातील शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी केले आहे अशी माहिती  प्रतिनिधीला दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील वीर येथे महिलेचा विनयभंग            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           वीर ता. पुरंदर येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सासवड पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ही घटना गुरुवारी दि. 9 रोजी दुपारी अडीच वाजता ब्राह्मण वाडा ते धसाडेआळी कॉर्नर या दरम्यान घडली. अमोल बाळासो धुमाळ असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे, या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तिच्या मुलाला अंगणवाडीतून पायी घरी घेऊन जात होती, ब्राह्मणवाडा ते धसाडे आळी कॉर्नरच्या मेडिकल पर्यंत धुमाळणे पीडित महिलेची दुचाकी वरून पाठलाग केला, तसेच तिला दुचाकी वर बसण्यासाठी आग्रह करत होता, तिला लज्जास्पद असे कृत्य व वर्तन केल्याने पिढीता घाबरून जवळच्या मेडिकलमध्ये आसरा यासाठी गेली आणि तिने त्या ठिकाणी सर्व प्रकार तेथील नागरिकांना सांगितला. तोपर्यंत धुमाळ तेथे ही आला त्यांनी त्यानंतर घरात घुसून देखील विनयभंग केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन पवार हे पुढील तपास करत आहेत.
पुरंदर तालुक्यातील पुरंदर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सदस्य आरक्षण सोडत जाहीर                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज  :                                                                       राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडत आदेश प्रारित केले असून, जिल्हाधिकारी पुणे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला होता, त्या अनुषंगाने वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात त्यांची आली होती. यावेळी विक्रम राजपूत तहसिलदार पुरंदर, प्रणोती श्रीश्रीमाळ गट विकास अधिकारी पुरंदर, तहसीलदार ऑफिस मधील धानेपकर प्रकाश, तर पुरंदर पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी व पुरंदर ग्रामीण भागातील नागरिक, पत्रकार व विविध पक्षांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते .पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडतेचा कार्यक्रम पंचायत समिती मधील मीटिंग हॉलमध्ये कार्यक्रम सुरू करण्यात आला. सर्वप्रथम वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर यांनी हॉलमधील उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व प्रतिनिधी व पत्रकार यांचे स्वागत केले. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा महाराष्ट्र पंचायत समिती गणामध्ये जागांची वाटप करण्यात आली. त्या जागी चक्राणूक फिरवण्याची पद्धत, नियम 2019 तसेच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र यांच्याकडील आदेश नुसार पार पाडण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे यांनी उपस्थितांना सभागृहामध्ये दिली. तसेच सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडण्याकरिता विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी मंजूर दिलेली राजपत्र, यामधून लोकसंख्या व प्रवर्गाची राखीव जागांची संख्या यांना मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे, तर विचारात घेतले जाणार आहे, असे हॉलमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांना सांगितले, व गणातील आरक्षण निश्चिती करतानाची त्या टाकून, जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याबाबत उपस्थित यांना माहिती दिली. सोडती कारकांची त्या कारणासाठी शाळेतील विद्यार्थी प्रकाश गतिबंग गुल व आदिराज देविदास तोटरे यांच्या मदतीने चिट्ट्या काढण्यात आल्या ,सर्व गणातील जागांचे आरक्षण सुरक्षित या रित्या, पारदर्शक व बरणीमध्ये टाकून, विहित कार्यपद्धतीने अनुसरून, उपस्थितांमध्ये मुलांच्या हातून उपस्थितीमध्ये सर्व नागरिक, प्रतिनिधी, यांच्या समक्ष चिट्ट्या काढण्यात आली. सोबतच्या तक्त्यात दर्शविलेल्या प्रमाणे जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. एक गराडे निवडणूक विभाग क्रमांक 50 तर निर्वाचक गणाच्या क्रमांक 99 सर्व साधारण महिला, दोन दिवे निवडणूक विभाग क्रमांक 50 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 100 नागरिकांचा मागास प्रवर्ग ,तीन बेलसर निवडणूक विभाग क्रमांक 51 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 102 सर्वसाधारण, चार माळशिरस निवडणूक विभाग क्रमांक 51 तर निर्वाचक गणाच्या क्रमांक 101 सर्वसाधारण. पाच वीर निवडणूक विभाग क्रमांक 52 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 104 सर्वसाधारण, सहा भिवडी निवडणुक विभाग क्रमांक 52 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 103 नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री. सात निरा शिवतक्रार निवडणूक विभाग क्रमांक 53 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 106 अनुसूचित जाती महिला. आठ कोळविहीरे निवडणूक विभाग क्रमांक 54 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 105 सर्वसाधारण महिला. आरक्षणाबाबत सोडत पद्धतीने नुसार, निश्चित केलेल्या गणाच्या नुसार आहे, जागेबाबत कोणतीही तक्रार असल्याचा आरक्षण प्रसिद्धी झाल्यानंतर, वि हित कालावधीमध्ये हरकती व सूचना दाखल करण्याची माहिती देण्यात आली. व वरील प्रमाणे नुसार पूर्ण प्राधिकृत अधिककारी तथा उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे व तहसिलदार विक्रम राजपूत यांनी जाहीर केले. यावेळी गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ ह्या सुद्धा उपस्थित होत्या.
शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश                                                         सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                    सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड येथील विद्यार्थ्यांनी विविध तालुका आणि जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.तालुका स्तरावरीय बुद्धिबळ, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, , कुस्ती, क्रिकेट तायक्वांदो,बॉक्सिंग, स्केटिंग  कराटे तसेच ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.१४ वर्षे व १७ वर्षे गटातील विद्यार्थ्यांनी १००, २००, ४०० आणि ८०० मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक आदी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत श्रावणी श्रीकांत मोहिते हिने प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तसेच तिची  पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले आहे. जिल्हा किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कुमार साई राहुल नागरगोजे या विद्यार्थ्याने 35 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून पुढील  विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.कुमारी प्रांजल अरुण शिंदे या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय 100 मीटर तसेच 200 मीटर धावणे या स्पर्धांमध्ये  प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचा गौरव वाढविला. कुमारी वैष्णवी तानाजी घारे हिने  जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करून उज्वल यश संपादन केले  या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक  संतोष गलांडे सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या या अशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती रेणुका सिंग मॅडम उपप्राचार्य  सुषमा रासकर मॅडम ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख उज्वला जगताप मॅडम, पूर्व प्राथमिक  विभाग प्रमुख स्वाती जगताप मॅडम तसेच जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत तसेच  शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
पुरंदर तालुक्यातील सासवड रुग्णालयांमध्ये 3856 बालकांना लस                                                                                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार  यांच्या हस्ते उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी शून्य ते पाच वयोगटातील एकूण 3856 बालकांना पोलिओ लस देण्यात आली. यामध्ये मीरा नरसिंग होम, स्वामी समर्थ मंडळ आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रुग्णालयाचे एकूण 22 लसीकरण बूथ होते. 13 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत घरी जाऊन लसीकरण करण्यासाठी 18 टीम तैनात असून, 100% लसीकरण पूर्ण करण्याची आव्हान डॉ. अकमार यांनी केले आहे. लहान मुलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना पुढील काळामध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक विकलांग येऊ नये, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. अशी माहिती, डॉ. गजानन अकमार यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड रुग्णालयांमध्ये 3856 बालकांना लस                                                                                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार  यांच्या हस्ते उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी शून्य ते पाच वयोगटातील एकूण 3856 बालकांना पोलिओ लस देण्यात आली. यामध्ये मीरा नरसिंग होम, स्वामी समर्थ मंडळ आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रुग्णालयाचे एकूण 22 लसीकरण बूथ होते. 13 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत घरी जाऊन लसीकरण करण्यासाठी 18 टीम तैनात असून, 100% लसीकरण पूर्ण करण्याची आव्हान डॉ. अकमार यांनी केले आहे. लहान मुलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना पुढील काळामध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक विकलांग येऊ नये, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. अशी माहिती, डॉ. गजानन अकमार यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त वाघिरे महाविद्यालयात विविध कार्यक्रमांची रेलचेल                 सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील मानसशास्त्र विभागाने ९ आणि १० ऑक्टोबर २०२५ रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पोस्टर प्रदर्शनातून मानसिक आरोग्याचा संदेशकार्यक्रमाची सुरुवात ९ ऑक्टोबर रोजी एस.वाय., टी.वाय. आणि एम.ए. मानसशास्त्र विशेष (स्पेशल) विषयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पोस्टर प्रदर्शनाने झाली. विद्यार्थ्यांनी मानसशास्त्रातील विविध विषयांवर अत्यंत माहितीपूर्ण आणि आकर्षक पोस्टर्स तयार केली होती. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, सासवड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण आणि राम कारंडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या पोस्टरमधील माहिती जाणून घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले.'प्रेम, मैत्री, आकर्षण आणि मानसिक आरोग्य' विषयावर डॉ. पाठक यांचे व्याख्यानजागतिक मानसिक आरोग्य दिवस अर्थात १० ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयात डॉ. सागर पाठक यांचे 'प्रेम, मैत्री, आकर्षण आणि मानसिक आरोग्य' या विषयावर सुंदर व्याख्यान झाले. डॉ. पाठक यांनी अत्यंत सोप्या भाषेत या महत्त्वाच्या विषयांचे मानसिक आरोग्याशी असलेले सखोल नाते स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरले.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य (कला विभाग) डॉ. संजय झगडे सर, उपप्राचार्य (विज्ञान विभाग) डॉ. बी. यू. माने, वाणिज्य समन्वयक प्रा. एन. एस. गिरी, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुनील शिंदे, प्रा. महेश देवकर, प्रा. पूर्वाराणी जगताप, प्रा. विजया वानखेडे यांच्यासह मानसशास्त्र विभागाचे सुमारे ५० विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी पोलीस निरीक्षक पदी कुमार कदम यांची नियुक्ती                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी कुमार रामचंद्र कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या अगोदर कुमार कदम यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक पदावर सेवा बजावली आहे, सासवडचे यापूर्वीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी यांची पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, कुमार कदम यांच्या नियुक्तीनंतर सासवड पोलीस ठाण्याला अनुभवी पोलीस अधिकारी मिळाल्याने, शहरवासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.नवीन पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत करताना काही सामाजिक व राजकीय संघटनाचे तसेच अवैध कार्यात गुंतलेल्या काही लोकांची सुद्धा सासवड पोलीस स्टेशन मध्ये ये जा सुरू झाली आहे, तरी कदम यांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा व्यक्त होत आहे. अतिशय डॅशिंग व त्याच पद्धतीने संवेदनशील पद्धतीने अधिकारी म्हणून कुमार कदम यांची सासवड पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून, विनाकारण कोणावरही अन्याय होणार नाही, तर खरा गुन्हेगार याची कायद्याच्या कसोटी मधून सुटणार नाही, असेही स्पष्ट भूमिका कुमार कदम यांची अशी ओळख असून, त्यांनी आपल्या पोलिस दलात 19 वर्षापासून कार्यरत असताना, अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत, त्यामुळेच त्यांची सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चालणारे सर्व अवैध धं दे त्या ठिकाणी रोखावेत यासाठी त्यांची मदत होणार आहे, असे सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
सासवड ,जेजुरी व फुरसुंगी, उरुळी देवाची मधील कामाचा आढावा                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीमध्ये सासवड जेजुरी आणि नवनिर्मित फुरसुंगी देवाची नगरपालिका मधील प्रलंबित विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला ,पुण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये ही बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने रस्ते ,पाणीपुरवठा योजना ,घनकचरा, व्यवस्थापन आणि कर्मचारी कमतरता या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली ,या बैठकीत माजी आमदार संजय जगताप, भाजपचे पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष बाबा जाधवराव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. संजय जगताप यांनी सासवड आणि जेजुरीचे प्रलंबित विकास कामाकडे मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले यामध्ये भुयारी गटार योजना पाणीपुरवठा योजना बांधकामांची निकष कमी करणे जेजुरीची हद्दवाढ अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता फुरसुंगी देवाची नगरपालिकेच्या व्यवस्थापनातील अडचणीवर चर्चा करताना, कर आकारणी 15 वा वित्त आणि स्वच्छ भारत अभियानाचा निधी मिळवण्यासह पी एम आर डी ए व पुणे महापालिकेकडून निधी देण्याची मागणी केली,जेजुरी नगरपालिकेतील चाळीसगाव येथून आलेल्या ड वर्ग कर्मचाऱ्यांचे जवळच्या नगरपालिकेतील स्थलांतर करण्याबाबत चर्चा झाली तसेच या क आणि ड वर्ग पदासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याची आश्वासन मिळाले .याप्रसगी नगरपालिकेतील कर्मचारी कमतरतेचा प्रश्न तातडीने सोडविण्यावर भर देण्यात आला राज्यमंत्री मिसाळ आणि जिल्हाधिकारी डुडी यांनी प्रशासकीय पातळीवर आवश्यक असलेल्या निधींची पूर्तता करणे सोबतच नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावण्याची आश्वासन मंत्री मिसाळ व जिल्हाधिकारी डुडी यांनी यावेळी दिले .या बैठकीस नगरपरिषद प्रशासन संच लागण्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा उपसचिव आणि रुद्र जेवळेकर विभागीय आयुक्त चंद्रकांत खोसे, जिल्हा.सह आयुक्त व्यंकटेश दुर्वास, सासवडचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण जेजुरीचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले फुरसुंगी उरुळी देवाचे. प्रशासक सचिन पवार ,प्रसाद शिंगटे, मार्तंड भोंडे ,विना सोनवणे ,अजिंक्य देशमुख ,यशवंतराव जगताप, सुहास लांडगे ,मनोहर जगताप ,संदीप जगताप ,विजय वढणे ,सचिन पेशवे, मयूर जगताप, भाजपचे पदाधिकारी यांच्या संबंधित अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यामध्ये रविवार या दिवशी पोलिओ लसीकरण         सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर तालुक्यामध्ये व सासवड या ठिकाणी रविवारी दि. 12 रोजी सर्व 0 ते 5 वर्ष वयोगटामधील बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत पोलिओ डोस देण्यात येणार आहे .सर्वांनी भूथवर जाऊन बालकांना दोन थेंब पोलिओचे लस द्यावी ,तसेच जे राहिलेले असतील त्यांना 13 ते 17 ऑक्टोबर या पाच दिवसांमध्ये घर भेटी दरम्यान, लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व बालकांना डोस घेण्यात यावा ,असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गजानन आकमार यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये रविवार या दिवशी पोलिओ लसीकरण         सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     पुरंदर तालुक्यामध्ये व सासवड या ठिकाणी रविवारी दि. 12 रोजी सर्व 0 ते 5 वर्ष वयोगटामधील बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत पोलिओ डोस देण्यात येणार आहे .सर्वांनी भूथवर जाऊन बालकांना दोन थेंब पोलिओचे लस द्यावी ,तसेच जे राहिलेले असतील त्यांना 13 ते 17 ऑक्टोबर या पाच दिवसांमध्ये घर भेटी दरम्यान, लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व बालकांना डोस घेण्यात यावा ,असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गजानन आकमार यांनी केले आहे.
वाघीरे महाविद्यालयात सी.ए. क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन                                               सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील वाणिज्य व संशोधन विभागाच्या वतीने तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सी.ए. क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून पुणे येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल सी.ए. श्री. अक्षय कोरडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी , वाणिज्य विभागप्रमुख डॉ. किशोर लिपारे तसेच वाणिज्य विभागातील प्राध्यापक व एकूण १२५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. यानंतर आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी सी.ए. हे वाणिज्य शाखेतील सर्वोत्तम करिअर आहे, यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी सीए. हा सनदी लेखापाल असल्याने  देशाच्या पंतप्रधानाच्या सहीपेक्षा सुद्धा सी.ए.च्या सहीला महत्व असते.या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागतो पण योग्य मार्गदर्शन व अविरत प्रयत्न केल्यास ही परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद  केले. त्यामुळे सदर व्याख्यानातून विद्यार्थ्यांना उत्तम बौद्धिक मेजवानी मिळणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.  यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  अक्षय कोरडे यांनी आपल्या व्याख्यानात, आजच्या  जागतिकीकरणाच्या युगात सी.ए. क्षेत्रात असलेल्या संधीबाबत विवेचन केले. त्यांनी सी.ए. च्या परीक्षेचे टप्पे, त्याचा अभ्यासक्रम व सी.ए. झाल्यानंतरचे करिअर याचे विस्तृत विश्लेषण केले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, जीएसटी, करनियोजन व करविश्लेषण, गुंतवणूक इत्यादी क्षेत्रात  सल्ला व मार्गदर्शन यासाठी सी.ए. ची नितांत गरज असते त्यामुळे दिवसेंदिवस सी.ए. क्षेत्रातील लोकांची मागणी प्रचंड वाढत आहे त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सी.ए. क्षेत्रात करीअर केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन डॉ. किशोर लिपारे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. नरसिंग गिरी यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयामधील वाणिज्य विभागाने प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे केले. यासाठी डॉ.माधवी कामठे, डॉ.भाग्यश्री बोरावके , प्रा. आकाश झेंडे, प्रा. शुभम एक्के, प्रा.पूनम फडतरे,  प्रा. पूजा शेलार, प्रा. श्वेता राजीवडे,  प्रा. गौरी खोमणे, प्रा. आदिती पवार ,  संतोष लोणकर व अंकुश धायगुडे यांचे सहकार्य लाभले.
शेठ गोविंद साबळे स्मृतीदिन, जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि व्यावसायिक विकास उपक्रमांतर्गत ‘ताण व्यवस्थापन : भावनिक स्थैर्याची जडणघडण’ विषयावर कार्यशाळा                                                              सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    सासवड (ता. पुरंदर)– पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविद्यालय, सासवड येथे दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी “श्री शेठ गोविंद साबळे स्मृतीदिन”, “जागतिक मानसिक आरोग्य दिन” आणि “व्यावसायिक विकास उपक्रम”या त्रिसंधी निमित्ताने “ताण व्यवस्थापन : भावनिक स्थैर्याची जडणघडण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राबविण्यात आली. कार्यशाळेचे उद्दिष्ट मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करून, कार्यक्षेत्रातील ताणतणावाचे व्यवस्थापन आणि भावनिक स्थैर्य वाढविण्यासाठी उपयुक्त तंत्रांची ओळख करून देणे हे होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून  श्रीकांत लक्ष्मीशंकर आणि  जया नलगे, सदस्य – मासूम फाउंडेशन ,सासवड उपस्थित होते. त्यांनी ताणमुक्त जीवनशैली, आत्मसंयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि मानसिक आरोग्याच्या संवर्धनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधील   भावनिक स्थैर्य व मानसिक संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आधुनिक शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात वाढलेले ताणतणाव हे अपरिहार्य आहेत, मात्र योग्य भावनिक बुद्धिमत्ता आणि सकारात्मक विचारसरणीच्या माध्यमातून त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .एस. एम. देशमुख यांनी उत्तमरीत्या पार पाडले, तर प्रा. पी. के. म्हस्के  यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा जगताप ,प्रा. दीपाली जगताप आणि प्रा. एस. बी. बाठे  यांनी केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. आर. एस. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे शिवचरित्रकार गजाननराव मेहेंदळे यांना विनम्र श्रद्धांजली
संशोधनात सत्यनिष्ठा व जिज्ञासा जपण्याचा मेहेंदळे यांचा आदर्श – मा. प्रदीप रावत
                                        सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:
                                                                    भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे महान इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार स्वर्गीय गजानन भास्कर मेहेंदळे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. “संशोधनाच्या प्रत्येक क्षेत्रात सत्याचा शोध आणि तथ्याधारित दृष्टिकोन जोपासणाऱ्या गजाननराव मेहेंदळे यांच्या कार्याची ओळख प्रत्येक संशोधकास व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रमुख वक्ते माननीय  प्रदीप दादा रावत यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, “इतिहास म्हणजे केवळ घटनांचा अभ्यास नव्हे, तर सत्याच्या शोधाची प्रक्रिया आहे. शिवचरित्र समजून घ्यायचे असेल तर गजाननराव मेहेंदळे यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यांनी व्याख्याने वा सत्कारांपासून दूर राहून आयुष्यभर संशोधनाची अखंड साधना केली. ते आयुष्यभर विद्यार्थी राहिले आणि शिकण्याची अखंड प्रेरणा दिली. संशोधन करताना जिज्ञासा कधीही मरू देऊ नका, हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे.”
गजाननराव मेहेंदळे यांचे शिष्य डॉ. केदारनाथ फाळके यांनी त्यांच्या संशोधन प्रवासातील अनेक अनुभव व नोंदींच्या अचूकतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे जिवंत उदाहरणांसह वर्णन केले. “खऱ्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ चित्र समाजासमोर मांडण्यात मेहेंदळे यांचे योगदान अमूल्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
विशेष उपस्थिती म्हणून मा. रवींद्र शिंगणापूरकर (अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी सांगितले की, “संशोधन करायचे असल्यास मेहेंदळे यांना आदर्श मानावा. त्यांच्या जिज्ञासेची व तळमळीची परंपरा प्रत्येक संशोधकाने जोपासावी.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय  अजेय धाक्रस (अखिल भारतीय सहव्यवस्था प्रमुख, भारतीय शिक्षण मंडळ) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, “आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात नैसर्गिक बुद्धिमत्ता (NI) जोपासणे आवश्यक आहे. संशोधन हे केवळ पदवीसाठी नव्हे, तर समाजहितासाठी असले पाहिजे. समाजाभिमुख संशोधनातूनच विकसित भारताची निर्मिती होईल.”
या प्रसंगी भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष प्रा. आर. एम. चिटणीस यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. वेदांत कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील अधिष्ठाता प्रा. तांबट, एसएनडीटी पुणे परिसर समन्वयक प्रो. शितल मोरे, डॉ .  महेश कोलतमे, डॉ बाळू राठोड, डॉ. भास्कर इगवे, डॉ सारिका बहिरट व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे येथील विविध विभाग प्रमुख, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पाला प्रचंड वेग; तीन गावातील मोजणी पूर्ण पण शेतकऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मोबदला आणि परतावा न्याय असलाच पाहिजे!           सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, मुंजवडी, उदाचीवाडी आणि एखतपुर या तीन गावातील जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, तब्बल 807 एकर जमीन लवकरच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे, यामुळे विमानतळ प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असली तरी, विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या न्याय मोबदल्याच्या आणि परताव्याच्या मागण्यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे, जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारपासून कुंभारवळण आणि खानवडी या गावातील मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे, या प्रक्रियेसाठी महसूल व  सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेतील अधिकारी अशा सहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. फळझाडे, शेत विहिरी, पिकांची स्थिती आणि जलवाहिन्यांचे मूल्यांकन सध्या सुरू आहे, कुंभारवळण व खानवडी या गावची मोजणी जमिनीची ही दहा तारखेपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी दिली.तर वनपुरी व पारगाव जमीन मोजणी दि.16 ऑक्टोबर पयॅत पुणॅ होईल असे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले. मात्र मोजणीच्या गती सोबतच शेतकऱ्यांची सरकारला मागणी आहे की, आम्हीच विकासा विरोधी नाही पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होता कामा नये, जमिनीचा परतावा योग्य दिला पाहिजे, आणि तो परतावा शेतकऱ्यांच्या नावावरच असला पाहिजे, तसेच प्रत्येक बाधित शेतकऱ्याला योग्य बाजारभावानुसार मोबदला देण्यात यावा अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. मुंजवडी, एखतपूर आणि उदाची वाडी या गावातील मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी, अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जमीन दिल्यानंतर आमच्या कुटुंबाची भवितव्य काय? आमची पुढील पिढी कुठे जाणार त्याचे पुनर्वसन योग्य रीतीने कसे होणार याचे उत्तर प्रशासनाने द्यायला हवे, दरम्यान, विमानतळ प्रकल्पासाठी सात गावांमधील एकूण तीन हजार एकर जमीन संपादित होणार असून, 3,220 शेतकऱ्यांनी 2,810 एकर जमिनीची संमती पत्रे सादर केली आहेत, म्हणजेच प्रकल्पासाठी सुमारे 95 टक्के क्षेत्र जमीन ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दर निवाडा निश्चित करून, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनाचे म्हणणे आहे की, सरकारने गतीने मोजणी केली हे चांगले पण, गती सोबत न्यायही मिळाला पाहिजे, विमानतळ उभा राहावा पण शेतकऱ्यांचे आयुष्य कोलमडून नये, हीच खरी विकासाची दिशा आहे, पुरंदर विमानतळ प्रकल्प निश्चितच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला नवे बळ देईल, पण या विकासाच्या प्रवासात शेतकऱ्यांचा सन्मान, हक्क आणि न्याय टिकून ठेवणे हेच आता प्रशासना समोरचे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. कुंभारवळण येथील विमानतळ प्रकल्पासाठी संमती देणाऱ्या शेतकऱ्यांनी 18 सप्टेंबरपर्यंत 75% संमती दिली होती असे, एजंट कुंभारवळण यांच्या या ठिकाणच्या सदस्यांनी सांगितले होते, तर दि. 24 व 25 रोजी सर्व शेतकरी कुंभारवळण येथील ज्या शेतकऱ्यांनी संमती विमानतळासाठी दिली नव्हती, त्यांचे अनुकरण करून, त्या ठिकाणी 24 व 25 रोजी विमानतळ प्रकल्पाला फक्त जमीन मोजणीसाठी संमती दिली होती, तर विमानतळ प्रकल्पासाठी त्या ठिकाणी संमती ही शेतकऱ्यांची अजिबात दिलेली नाही, तर 24 व 25 रोजी दिलेली शेतकऱ्यांनी संमती यामध्ये 72% असून, सुरुवातीच्या एजंट यांच्या सांगण्यानुसार, 75% झालेली संमती तर आत्ताची 72 टक्के झालेली संमती मिळून 147% होत असून, यामध्ये खूप तफावत असल्याचे दिसून आल्यामुळे, कुंभारवळण या ठिकाणच्या एजंट विषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, त्या ठिकाणी अधिकारी वर्गाने सुद्धा त्या एजंटला जवळ करू नये, अशी सामान्य शेतकऱ्यांची मागणी ही कुंभारवळणचया  गावची आहे. गणेश काशिनाथ मोरे शेतकरी कुंभार वळण. विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी सातबारा अडचणीसाठी संपर्क साधावा, वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर.पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी आवाहन केले आहे की, सातबारा नोंदी, वारस नोंदी, नाव दुरुस्ती किंवा नकाशातील विसंगती अशा अडचणी असल्यास, त्यांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे आणि उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे हे गावोगावी जाऊन, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून, त्यांचे निराकरण करत आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे बागायती जमिनींना योग्य दर आणि न्याय परतावा मिळावा अशी मागणी केली आहे, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोजणी प्रक्रिया सुलभ झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सदस्य आरक्षण सोडत जाहीर                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषद/ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडत आदेश पारित केले असून, जिल्हाधिकारी पुणे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला होता, त्या अनुषंगाने वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी उपविभाग पुरंदर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, यावेळी सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, कार्यालय अधीक्षक गजानन नरवाडे व अधिकारी कर्मचारी व सासवड शहरातील नागरिक, पत्रकार व विविध पक्षांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते, सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025  आरक्षण सोडतेचा कार्यक्रम नगरपरिषद कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात सुरू करण्यात आला. सर्वप्रथम वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी उपविभाग पुरंदर यांनी सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांचे स्वागत केले व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा महाराष्ट्र नगरपरिषदा प्रभागांमध्ये राखीव जागांची वाटप करणे, आणि त्या जागा चक्राणूक  फिरवण्याची पद्धत नियम 2019 तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील आदेश दि. 3 ऑक्टोंबर 2025 यानुसार पार पाडण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी उपस्थितीना सभागृहामध्ये दिली. तसेच सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडण्याकरता, विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी मंजूर दिलेली ११ जुलै 2019 ते राजपत्र यामध्ये नगरपरिषदेची एकूण लोकसंख्या व प्रवर्गांनी  राखीव जागांची संख्या यांना मंजुरी प्रधान करण्यात आलेली आहे.तर विचारात घेतले जाणार आहे असेही सभागृहात उपस्थित असलेल्या नागरिकांना सांगितले. व प्रभागांमधील आरक्षण निश्चिती करताना चिट्ट्या टाकून जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याबाबत उपस्थिती त्यांना माहिती देण्यात आली. प्रभाग मधील राखीव जागांची आरक्षण सोडीतिकारकाची त्या काढण्यासाठी संत नामदेव विद्यालय शाळा क्रमांक पाच सासवड या शाळेतील विद्यार्थी आदीराज देविदास तोटरे, अर्णव सचिन होळकर आणि चरण नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते चिट्ट्या काढण्यात आल्या, सर्व प्रभागांमध्ये जागांचे आरक्षण सुरक्षितरित्या पारदर्शक, बरणीमध्ये टाकून विहित कार्यपद्धती अनुसरून, उपस्थितीत मुलांच्या हातून उपस्थित सर्व नागरिक, प्रतिनिधी यांच्या समक्ष चिठ्ठ्या काढण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षित प्रभाग निश्चित करण्यात आले,त्यानुसार सोबतच्या तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे जागा निश्चित करण्यात आल्या, अनुक्रमांक एक दोन प्रभाग क्रमांक 01 जागा: क्रमांक 01 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 01 व सर्व साधारण. तीन व चार, 02 दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला 02 व सर्वसाधारण. पाच व सहा प्रभाग क्रमांक 03,  अनुसूचित जाती महिला, 03 ब सर्वसाधारण. अनुक्रमांक सात व आठ 04, प्रभाग क्रमांक 04, अनुसूचित जाती 04, बस सर्वसाधारण महिला. अनुक्रमांक नऊ दहा प्रभाग क्रमांक 05 सर्वसाधारण महिला, 05, ब सर्वसाधारण. अनुक्रमांक 11 व 12 प्रभाग क्रमांक 06  अ सर्वसाधारण महिला, 06 व सर्वसाधारण. अनुक्रमांक 13 व 14.प्रभाग क्रमांक 07  सर्वसाधारण महिला, 07 ब सर्वसाधारण. पंधरा व सोळा प्रभाग क्रमांक 08 नागरिकांचा मागास प्रवर्ग,08 सर्वसाधारण महिला. अनुक्रमांक 17 व 18 प्रभाग क्रमांक 09   नागरिकांचा मागास प्रवर्ग, 09 ब सर्वसाधारण महिला. 19 व 20 प्रभाग क्रमांक 10 नागरिकांचा मागास प्रवर्ग, 10 ब सर्वसाधारण महिला. अनुक्रमांक 21 व 22 प्रभाग क्रमांक 11 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 11 ब सर्व साधारण. आरक्षणाबाबत सोडत पद्धतीने नुसार निश्चित केलेल्या प्रभाग नुसार आहे. जागेबाबत कोणतीही तक्रार असल्याचा आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर विथ कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याची माहिती देण्यात आली व वरील प्रमाणे नुसार पूर्ण प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे उपविभाग पुरंदर यांनी जाहीर केले.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 3,400 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर                      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                              पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवारी दि.8 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,400 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 3,400 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,700 तर सरासरी 3,050 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,700 तर सरासरी 2,950 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले,सुशांत काबले,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर आदी उपस्थित होते. गुळाला 4,100रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 220 बॉक्स 44 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,100 कमाल दर 4,000 रुपये तर साधारण4,050 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,700,3,400,3,050. बाजरी 2,500,3,100, 2,800. गहू 2,700,3,200,2,950. तांदूळ 5,200, 5,300, 5,250.  हरभरा 5,200, 5,600,5,250.तर निरा बाजार समिती भाजी बाजार 10 किलो बाजारभाव८ ऑक्टोंबर 2025 रोजीचे पावटा 500 ते 550, घेवडा 550 ,भेंडी 300 ते 350 रुपये, वालवड 450 ते 500 रुपये, मिरची 450 ते 500 रुपये फ्लावर ४०० रुपये ,कट्टा कोबी 350 रुपये ,कट्टा कारली 300 रुपये ,गवार 1000 रुपये ते 1200रुपये, दोडका 350 रुपये ,मेथी 20 ते 25 रुपये, कोथिंबीर 20 ते 25, कांदा 100रुपये तरी सध्या यासाठी निरा या ठिकाणी विजयादशमी (दसरा) या दिवशी बाजार भाजीपाल्याचा चालू झाला असून, या ठिकाणी शेतकरी व खरेदीदार यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यापुढे सुद्धा बाजार समितीतर्फे आव्हान करण्यात आलेले आहे, पुरंदर तालुक्यामधील सर्व शेतकरी यांनी नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी भाजीपाला आपला घेऊन यावा, असे आवाहन सभापती संदीप फडतरे निरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पुरंदर.
भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांता तर्फे शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांना विनम्र श्रद्धांजली; संशोधनात सहनिष्ठा व जिज्ञास जपण्याचा मेहेंदळे यांचा आदर्श प्रदीप रावत                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांतातफॅ इतिहास संशोधकांनी शिवचरित्र कार्यासवर्गीय गजानन भास्कर मेंहेदळे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, हा कार्यक्रम महिला विद्यापीठ पुणे येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एन डी टी गृह विज्ञान मार्गदर्शक प्राचार्य व भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. संशोधनाच्या प्रत्येक क्षेत्रात सत्याचा शोध कोणी तथा त्वरित दृष्टिकोन जोपासणाऱ्या गजाननराव मेंहेदळे यांच्या कार्याची ओळख प्रत्येक संशोधनास व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख वक्ते प्रदीप रावत यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, इतिहास म्हणजे केवळ घटनांचा अभ्यास नव्हे, तर सत्याच्या शोधाची प्रक्रिया आहे, शिवचरित्र समजून घ्यायचे असेल, तर गजानन मेहेदले यांचा अभ्यास आवश्यक आहे, त्यांनी व्याख्याने व सत्कारापासून दूर राहून आयुष्यभर संशोधनाची अखंड साधना केली आहे. शुभ विद्यार्थी राहिले आणि शिकण्याची अखंड प्रेरणा दिली आहे, संशोधन करताना जिज्ञासा कधीही मरू देऊ नका, हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. गजानन मेंहेदले यांच्या शिष्य डॉ. केदारनाथ फाळके यांनी त्यांच्या संशोधन प्रवासातील अनेक अनुभव व नोंदीच्या अचूकतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे जिवंत उदाहरणासह वर्तन केले. खऱ्या इतिहासाची वस्तुनिष्ठ चित्र समाजासमोर मांडण्यात मेंहेदळे यांची योगदान अमूल्य आहे, असेही विशेष उपस्थिती म्हणून रवींद्र शिंगणापूरकर आदी सभा सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी सांगितले की ,संशोधन करायचे असताना मेंहेदळे यांना आदर्श मानावा, त्यांच्या जीवन तळमळीची परंपरा प्रत्येक संशोधकाने जोपासावी, कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय धाकरस अखिल भारतीय सहव्यवस्था प्रमुख भारतीय शिक्षण मंडळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, आजच्या आरटीशियल इंटेलिजन्स युगात नैसर्गिक बुद्धिमत्ता जोपासणे आवश्यक आहे, संशोधन हे केवळ पदवीसाठी नव्हे तर समाज हितासाठी असले पाहिजे, समाजाभिमुख संशोधन आपणास विकसित भारताची निर्मिती होईल, याप्रसंगी भारत शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष प्राध्यापक आर एम चिटणीस यांनीही उपस्थिती यांची लाभली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वेदांत कुलकर्णी यांनी केले. एस एन डी टी महिला विद्यापीठ पुणे येथील विविध विभाग प्रमुख, प्राचार्य, शिक्षके तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Load More That is All