Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from September, 2025Show All
पुरंदर तालुक्यातील सासवड शहर भाजपाची नवीन कार्यकारणी जाहीर                                                  सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    सासवड शहर भारतीय जनता पार्टीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. सासवड शहर भाजपचे अध्यक्ष आनंद (भैय्या) जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी लवकरच 550 पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले.सासवड शहर भाजपा कार्यकारणी खालीलप्रमाणे- व्यापार सेल: अतुल लांडगे - कामगार सेल: अनिल जगताप  - आयुष्यमान भारत सेल: नंदकुमार जगताप  - उद्योग सेल: वैभव सूर्यवंशी  - कायदा सेल: ॲड. सौरभ वढणे  - ट्रान्सपोर्ट सेल: माधव शिवरकर  - सहकार सेल: दीपक जगताप  - युवती आघाडी: सिद्धी शेलार  - माजी सैनिक सेल: किरण पुरंदरे  - राजस्थान प्रकोष्ठ: हेमंतकुमार जैन  - किसान मोर्चा अध्यक्ष: जालिंदर जगताप, सरचिटणीस: अभिषेक जगताप  - अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष: सुरेश रणपिसे  - अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष: ॲड. अशपाक बागवान  - आदिवासी मोर्चा अध्यक्ष: निखिल चिव्हे  शहर प्रवक्ते: राजन   जगताप, मंदार टिळेकर, भूषण मचाले, केतन खळदकर  महिला मोर्चा:  - अध्यक्षा: सोनाली गिरमे  - उपाध्यक्षा: वसुधा आनंदे, स्नेहा शेवाळे, अमृता म्हेत्रे, योगिता जाधव, प्रिया जगताप  - सरचिटणीस: जयश्री चौरे, मयुरी जगताप  - चिटणीस: सोनाली निघोल, स्वाती गिरमे, केतकी पायगुडे  - कोषाध्यक्षा: विद्या जगताप  युवा मोर्चा:  - अध्यक्ष: तेजस चवरे  - सरचिटणीस: करण जगताप  शहर कार्यकारणी:  - उपाध्यक्ष: प्रमोद बोरावके, संदीप राऊत, संदीप जगताप, उदयराज जगताप, संतोष जगताप, विराज जगताप, स्वप्नील जगताप, निखिल दिवसे, हर्षद जगताप  - सरचिटणीस: जयेंद्र निकम, राहुल भोंडे, मयूर जगताप  - सचिव: दीपक शिवरकर, सागर गाडगे, मनोज वढणे, ओंकार महागावकर, कुणाल भोंडे, सौरभ जगताप, अक्षय मारणे, योगेश खोपडे  - कार्याध्यक्ष: हर्षवर्धन पायगुडे  या पत्रकार परिषदेला सासवड शहर भाजपा अध्यक्ष आनंद (भैय्या) जगताप, सासवड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, जयेंद्र निकम, राहुल भोंडे आणि मयूर जगताप उपस्थित होते.
संघटन करून टोळीने गुन्हे करणाऱ्या आरोपी यांच्या विरोधात सासवड पोलीस ठाणे यांच्याकडून बीएनएसएस चा 111 चा दणका                                                                   सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला केसर युक्त विमल पान मसाला तसेच गुटखा वाहतूक होणार असल्याबाबत ची खबर राजगडचे पोलिस अंमलदार यांचे कडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने जेजुरी नाका सासवड येथे यशस्वीरीत्या नाकाबंदी करून, एकूण 11,65,600/- इतक्या किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सासवड पोलीस ठाणे यांच्याकडून सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे पकडण्यात आलेला होता, दाखल गुन्ह्यात 1) सिद्धेश्वर उत्तम काळे (वय 17 वर्षे,) चालक,  राहणार सांगली 2) चेतन पांडुरंग खांडेकर, (वय 22 वर्षे,) 3) बाबू धुळा काळे,( वय 23 )राहणार सांगली यांच्या विरोधात भारतीय न्याय जनता कलम 123, 223,274,275, 3(5 ) सह अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2),27(3) 30 (2),59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन, वर नमूद आरोपीत हे बऱ्याच वर्षापासून, इतर आरोपीत यांच्यासोबत संघटित टोळी सक्रिय करून अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न करून, त्यांच्या विरोधात  संघटित टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करणे व नियंत्रण  ठेवणे या कायद्याअंतर्गत  भारतीय न्याय सहिंता कलम 111 हे वाढीव कलम लावणे बाबत प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना सादर करण्यात आला होता, त्यास माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी परवानगी दिलेली आहे.अशी माहिती ऋषींकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सुरेखा कामथे  यांची केद्रप्रमुख पदी निवड                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शिवरी (ता. पुरंदर) येथील रहिवासी व कोडीत येथील प्रभारी मुख्याध्यापक सुरेखा भरत कामथे यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली आहे, त्याची वाळूंज केंद्र प्रमुख पदी निवड झाली असून, कामठे यांचा शैक्षणिक संघटनात्मक अनुभव पाहता, त्यांच्या नेतृत्वात केंद्राच्या कामकाजाला नवीन गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एम. बी. ए. बी. एड पदवीधर असे कामथे याचे शिक्षण झाले असून, त्यांनी गेली पस्तीस वर्षे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे, कामथे यांना गुणवंत शिक्षक, तसेच समता कृती प्रतिष्ठानचा ही पुरस्कार मिळाला असून ,त्यांनी पदवी तर शिक्षक संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदावरही काम केले आहे. संघटनात्मक कार्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका बजावलेली त्यांनी आहे.
सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू पुरस्कार गणेश तोटे यांना प्रधान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचनालय रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने, देण्यात येणारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू पुरस्कार वाघिरे महाविघालय सासवड येथे  राज्यशास्त्र प्रथम वर्षातील विद्यार्थी गणेश संजय तोटे यास राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ व खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वाघिरे महाविघालयात सासवड येथे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या गणेश तोटे ह्याचे मूळ गाव भिंगारी पनवेल असून, तो गेल्या आठ वर्षापासून फिटनेस जिम येथे पावर लिफ्टिंग खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. त्यांनी आतापर्यंत 12 वेळा राज्य अजिंक्य पद मिळवले आहे, याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित (दादा )पवार, मानद सचिव एडवोकेट संदीप कदम, सदस्य वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, क्रीडा शिक्षक प्रितम ओव्हाळ,यांनी गणेश तोटे यांचे अभिनंदन केले आहे. वाघीरे महाविद्यालयातील प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळेच, मला हे आत्ताचे गुणवंत खेळाडू पुरस्कार जो मिळालेला आहे त्यांचे सर्वश्री हे वाघिरे कॉलेजचे क्रीडा शिक्षक व प्राचार्य यांना जात आहे, अशी सर्व माहिती गणेश तोटे यांनी प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील दुचाकीच्या धडके मध्ये महिलेचा मृत्यू                                                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       भिवरी (ता. पुरंदर) येथे दुचाकीच्या धडकेमध्ये ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला, नंदाबाई कृष्णा घाटे (वय 60) राहणार घिसरेवाडी भिवरी( ता. पुरंदर )असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दि. 4 रात्री नऊच्या सुमारास नंदाबाई घाटे गणपतीच्या आरतीसाठी येत असताना, रस्ता ओलांडताना गराडे कडून भिवरीकडे भर धाव वेगात येणारी मोटरसायकल क्रमांक एम एच 12 डब्ल्यूएस 16 89 या दुचाकी वरील चालकाने मागील बाजूने, त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी घाटे यांना सासवड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासंदर्भात मृत घाटे  यांचे पुतणे शेखर रघुनाथ घाटे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केला असून, अज्ञात मोटरसायकल चालका विरोधामध्ये सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सासवड पोलिसांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील सुरेखा कामठे केंद्रप्रमुख पदी              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        शिवरी (ता. पुरंदर) येथील रहिवासी व कोडीत येथील प्रभारी मुख्याध्यापक सुरेखा भरत कामठे यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली आहे, त्याची वाळूंज केंद्र प्रमुख पदी निवड झाली असून, कामठे यांचा शैक्षणिक संघटनात्मक अनुभव पाहता, त्यांच्या नेतृत्वात केंद्राच्या कामकाजाला नवीन गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एम. बी. ए. बी. एड पदवीधर असे कामठे यांचे शिक्षण झाले असून, त्यांनी गेली पस्तीस वर्षे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे, कामठे यांना गुणवंत शिक्षक, तसेच समता कृती प्रतिष्ठानचा ही पुरस्कार मिळाला असून ,त्यांनी पदवी तर शिक्षक संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदावरही काम केले आहे. संघटनात्मक कार्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका बजावलेली त्यांनी आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी बनवले अडीच हजार बीज गोळे                                                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        माझी वसुंधरा अभियानांतर्गत सासवड( ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि नगरपरिषद यांच्या वतीने, विघालयात बीज गोळे कार्यशाळा पार पडली. या उपक्रमामध्ये सुमारे 250 विद्यार्थ्यांनी अडीच हजार बीज गोळे तयार केले. यासाठी स्काउटर शितल बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहावीच्या विद्यार्थ्यांनी आंबा, चिंच,  सीताफळ अशा विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया वापरल्या, नगर परिषदेचे शहर समन्वयक राम कारंडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सेवानिवृत्त आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी माजी वसुंधरा अभियानाचे महत्त्व सांगितले, तर आरोग्य निरीक्षक प्रकाश तुळशी यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण बीज संवर्धन आणि पर्यावरण पूरक जीवनशैली बाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य रेणुका सिंग मर्चंट यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगितले.
संजय वामनराव धुमाळ उपक्रमशील व गुणवत्ता शिक्षक म्हणून गौरव                                                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                  वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा बुद्रुक पुणे 4 सप्टेंबर 2025 गुणवत्ता मुख्याध्यापक शिक्षण पुरस्कार, वितरण सोहळा शिक्षण अधिकारी माध्यमिक भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, आजच्या युगामध्ये शिक्षक आणि अद्यावत राहणे ही काळाची गरज असून, नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणात केला पाहिजे व विद्यार्थ्यांना अद्यावत ठेवले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते नंदकुमार सागर, सुधाकर जगदाळे, सरपंच शोभा दलवी,  तानाजी घारे, सुनील लोणकर,ए.टी.माने,बापू मुळीक, शब्बीर शेख, दिपक फडतरे, दिपाश्री वाणी, भानुकाका जगताप, सचिन पठारे, रामभाऊ झेंडे, संतोष जगताप, संजय धुमाळ, संदीप देवकर, भैय्यासाहेब खैरे, बाबुराव गायकवाड, मा. अध्यक्ष शिक्षक लोकशाही आघाडी पुरंदर, शांताराम दळवी व इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार प्रसंगी अशोक रामा चव्हाण मुख्याध्यापक कोळीविहीरे,  सतीश रामदास कुमदाले कातोबा हायस्कूल दिवे, श्रीमंत देशराज यादव सद्गुरु नारायण महाराज माध्यमिक विद्यालय नारायणपूर, भानुदास मारुती कटके पुरंदर हायस्कूल व जूनियर कॉलेज सासवड, दत्तात्रय बाबुराव वायसे राजुरी माध्यमिक विद्यालय राजुरी, प्रशांत रमेश जगताप न्यू इंग्लिश स्कूल जेऊर, सुनंदा मोरेश्वर टकले केदारेश्वर विद्यालय कालदरी, मनोज कुमार दौलतराव कदम बाल सिद्धनाथ विद्यालय बेलसर, अश्विनी समीर कामठे वाघिरे हायस्कूल सासवड, शबाना हसन मनियार ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे, सुदाम ज्ञानदेव गायकवाड महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे, प्रशांत धोंडीबा धेंडे निवासी हायस्कूल, दत्तात्रेय एकनाथ पवार नीरा शाळा नंबर एक, रवींद्र तुकाराम कुंजीर हिवरे शाळा, छाया नामदेव कारकर शाळा माहूर, संजय वामनराव धुमाळ तोंडल, वर्षा प्रशांत माकर धनगर शाळा वाल्हे, सुवर्णा गोरख खेडेकर मावडी सुपे, मोहनलाल ज्ञानेश्वर निगडे न्यू इंग्लिश स्कूल जवळाअर्जुन, उत्तम गेनबा लकडे कृषी औद्योगिक विद्यालय चाबली, अण्णा सांगप्पा लोंढे भैरवनाथ विद्यालय वनपुरी, नितीन किसन काळे, विद्या महामंडळ प्रशाला कोथळे या 22 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भोसले सर यांनी केले व आभार दत्तात्रय गायकवाड यांनी मानले.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी आरक्षणाच्या आरक्षणासाठी ओबीसी समाज एकवटला                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     ओबीसी मध्ये पहिलीच साडेतीनशे जाती आहेत, तर या जातींना अजून पुरेशी प्रतिनिधी  मिळालेली नाही, त्यात पुन्हा एक मोठा मराठा वर्ग तुम्ही जर ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल, तर त्यासाठी कुणबी दाखले घेऊन, मराठा ओबीसी मध्ये आले तर भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ओबीसी वर अन्याय होणार आहे, याबाबतचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्याच्या प्रक्रिया या सुरू झालेल्या आहेत. त्यानुसार सासवड येथे तहसीलदार विक्रम राजपूत यांना ओबीसीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष निलम होले, तालुकाध्यक्ष चंद्रकांत गिरमे, ओबीसी सेल अध्यक्ष संजय टिळेकर, उपाध्यक्ष समता परिषद किसनराव वाघोले, यांनी विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शितल बनकर, सागर जगताप, मनोज मेत्रे, स्वाती हिरवे, मंगल म्हेत्रे, प्रिया जगताप, सचिन भोंगळे, योगेश जांभुळकर, संतोष गिरमे, आबा भोंगळे, ताजुद्दीन शेख, नितीन राऊत ,विद्या टळेकर, विजय गिरमे, किरण कुंभार, प्रल्हाद शिंदे, विजय राऊत, मोबीन बागवान, अजित गायकवाड, अतुल लांडगे, सोमनाथ दुधाळ, नितीन भोंगळे, रोहित इनामके, विजय नवले, एडवोकेट स्वाती चौखंडे, विशाल कादबाणे, एडवोकेट सचिन कदम आदी उपस्थित होते. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास मराठ्यांच्या पेक्षा 10 पट ओबीसी रस्त्यावर येण्याच्या तयारीत असल्याचे किसनराव वाघोले यांनी सांगितले. किशोर वचकल यांनी सूत्रसंचालन केले. तर चंद्रकांत हिवरकर यांनी आभार मानले.
सासवड शहरात गणेश उत्सवाचे औचित्य साधून डेंगू /हिवताप /चिकुनगुण्या आजार प्रतिरोध जनजागृती  अभियान राबविले                                                               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                         डेंगू/हिवताप /चिकुनगुण्या  आजार प्रतिरोध अभियानास सासवड नगर परिषद व आरोग्य विभाग पंचायत समिती पुरंदर यांचे मार्फत  डॉ.कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद,अपर्णा पाटील जिल्हा हिवताप अधिकारी पुणे, व  विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी पुरंदर, यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.या अभियानाचा उद्देश सात रोगास आळा घालणे तसेच स्वच्छते संबंधी प्रचार प्रसार व प्रसिद्धी करणे हा आहे. ज्ञानदीप कौशल्य विकास संस्थेचे विध्यार्थी यांच्या सहभागाने जनतेला निरोगी सवयी अंगी कारण्यास तसेच स्वच्छता स्वीकारण्यास प्रवृत्त करून जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली. त्या अनुषंगाने  मोहीम हाती घेण्यात आली. या कार्यक्रमास  प्रकाश तुळशी आरोग्य विभाग प्रमुख सासवड,  प्रकाश चवरे तालुका विस्तार अधिकारी, राम कारंडे शहर समन्वयक व फिरोज तांबोळी संतोष भोसले, ज्ञानदीप कौशल्य विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  एम. डी. ढोबळे सर व  सी. डी. ढोबळे सर तसेच  ज्ञानदीप कौशल्य विकास संस्थेच्या प्राचार्या सोनाली कामठे मॅडम,कु. श्रुतिका पवार मॅडम तसेच संस्थेतील विध्यार्थी आदी उपस्थित होते.  प्रकाश चवरे यांनी जलजन्य व कीटकजन्य आजाराचे महत्त्व नमूद करून डेंगू/हिवताप /चिकुनगुण्या आजाराची सर्वसाधारण माहिती रोग लक्षणे व उपचार याची माहिती देण्यात आली तसेच नागरिकांनी आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवून निरुपयोगी टायर नारळाच्या करवंट्या मोकळे डबे बाटल्या इ. निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावावी मच्छरदाणीचा वापर करावा आपल्या घराजवळील डास उत्पत्ती स्थानके शोधून काढून नष्ट करावे व गटारी वाहती करावीत पाणी साठ्याच्या ठिकाणी रॉकेल, जळके ऑइल यांचा वापर करावा व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात आपल्या घराच्या मोठ्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत तसेच आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून डेंगू आजारापासून स्वतःचे व समाजाचे संरक्षण करण्या आव्हान करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील राजुरी या गावी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी ह.भ. प. अंकुश (बापू )भगत यांची निवड         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवडीसाठी नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली, यावेळी राजुरी गावचे भूषण जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच, पुरंदर तालुका संत सोपान काका महाराज भागवत संप्रदाय प्रसारक ट्रस्टचे सासवडचे अध्यक्ष ह.भ. प. अंकुश (बापू) भगत यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरपंच इर्षा भगत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामसेवक विश्वनाथ खंडाळे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. निवड झाल्यानंतर तंटामुक्तीचे अध्यक्ष अंकुश (बापू) भगत यांनी लगेच एक तंटा मिटवून अध्यक्ष पदाला साजेशी अशी कामगिरी करून, दाखवली. यावेळी उपसरपंच सुधाकर भगत, ग्रामपंचायत सदस्य, आजी, माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. राजुरी गावचे गाव पण टिकून ठेवण्यासाठी नेहमीप्रमाणे सर्वांना विचारात घेऊन, गावातील तंटे गावातच मिटवून व परिसरातील गावाना राजुरीचा आदर्श घेतील असा नावलौकिक तयार करून, असा विश्वास अंकुश( बापू) भगत यांनी या निवडीनंतर व्यक्त केला .याची सर्व माहिती त्यांनी प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील राजुरी या गावी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी ह.भ. प. अंकुश (बापू )भगत यांची निवड         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवडीसाठी नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली, यावेळी राजुरी गावचे भूषण जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच, पुरंदर तालुका संत सोपान काका महाराज भागवत संप्रदाय प्रसारक ट्रस्टचे सासवडचे अध्यक्ष ह.भ. प. अंकुश (बापू) भगत यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरपंच इर्षा भगत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामसेवक विश्वनाथ खंडाळे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. निवड झाल्यानंतर तंटामुक्तीचे अध्यक्ष अंकुश (बापू) भगत यांनी लगेच एक तंटा मिटवून अध्यक्ष पदाला साजेशी अशी कामगिरी करून, दाखवली. यावेळी उपसरपंच सुधाकर भगत, ग्रामपंचायत सदस्य, आजी, माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. राजुरी गावचे गाव पण टिकून ठेवण्यासाठी नेहमीप्रमाणे सर्वांना विचारात घेऊन, गावातील तंटे गावातच मिटवून व परिसरातील गावाना राजुरीचा आदर्श घेतील असा नावलौकिक तयार करून, असा विश्वास अंकुश( बापू) भगत यांनी या निवडीनंतर व्यक्त केला .याची सर्व माहिती त्यांनी प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी ज्वारी प्रतिक्विंटल 3451 रुपये तर गहू प्रतिक्विंटल 3211 सासवड उप बाजारामध्ये मोठी आवक                                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उप बाजारामध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली, बुधवारी दि. 3 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,451 रुपयाचा दर तर गहू प्रतिक्विंटला सर्वाधिक 3211 रुपयाचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिंचे, वाल्हे, राजुरी, गराडे, दिवे, यास संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, असे धान्य विक्रीसाठी येत आहे. बुधवारी सासवड उप बाजारात एक नंबर प्रतीच्या ज्वारीला कमाल 3,451 रुपये तर दोन नंबर प्रतिच्या ज्वारीला किमान 2,600 रुपये तर सरासरी 3,025 रुपये प्रतिक्विंटला गहू कमाल 3,211 तर दोन नंबरला 2,700 रुपये तर सरासरी 2,965 रुपये प्रतिक्विंटला असा दर मिळाला असे समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप ,देविदास कामठे, गणेश होले, भाऊसो  गुलदगड, पंकज निलाखे, वामन कामठे, अनिल माने, अशोक निगडे, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी आर. के .टेडर चे रूपचंद काडगे, आर. आर. टेडरचे राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, आदी उपस्थित होते. यासहनिरा बाजार समिती आवारात गुळाची आवक 246 बॉक्स म्हणजेच 49 क्विंटल असल्याची माहिती गुळ बाजाराची माहिती सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी दिली. यावेळी गुळ व्यापारी शांतीकुमार कोठडीया उपस्थित होते. उप बाजारातील धान्य आवक दर ,प्रतिक्विंटल पिक,किमान दर, कमाल दर ,सरासरी दर ज्वारी 2600,3451, 3025. गहू 2700, 3211, 2965 बाजरी आवक माहिती मिळाली नाही,  हरभरा 5200,5900,5550. निरा बाजारातील गुळाची आवक आणि दर क्विंटलमध्ये किमान दर, कमाल दर, सरासरी दर गुळ 3900, 4300, 4100.याची सव माहिती बाजार समितीचे सचिव मिलीद जगताप यांनी प्रतिनिधीला दिली आहे.
वाघिरे महाविद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश          सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय सासवडच्या खेळाडूंनी बुधवार दि. 3 सप्टेंबर रोजी जवळार्जुन ता. पुरंदर जिल्हा पुणे येथे झालेल्या  जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत वाघिरे महाविद्यालयाच्या संघाने अटीतटीच्या सामन्यात घवघवीत हे संपादन केले. उच्च माध्यमिक विभागातील 19 वर्षीय मुले या वयोगटातील खेळाडूंनी  दैदित्यमान कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि वाघिरे महाविद्यालयाचा संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य प्रा. राजेश देशमुख, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा. संजय लांडगे, जुनियर विभागाचे फिजिकल डायरेक्टर प्रा. विकास मुजुमले,  प्राध्यापक वर्ग आणि प्रशासकीय स्टाफ,, विद्यार्थी वर्ग इत्यादींनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रा अमर होळकर, प्रा.प्रताप किर्दात, प्रा श्रीनिवास खेत्रे ,घारे मॅडम, शेख मॅडम ,पावडे मॅडम कोंढेकर मॅडम, इंगळे मॅडम, खिराप मॅडम उपस्थित होते.
सासवड परिसरातील चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले अथर्वशीर्ष पठण                                                      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीकमुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                   एम.ई.एस इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड  प्रशालेतील प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील एकूण २४०  विद्यार्थांनी अनुक्रमे कऱ्हाबाई गणेशोत्सव मंडळ, आचार्य  अत्रे गणेशोत्सव  मंडळ, सावतामाळी मंडळ , श्रीमंत नेताजी गणेशोत्सव मंडळ या चार ठिकाणी  जाऊन सर्व अथर्वशीर्षाची आवर्तने,गणपतीस्तोत्राचे पठण, बालचमुंची श्लोक स्पर्धा व सामूहिक आरती असे विविध कार्यक्रम उत्साहात सादर केले. तसेच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... या गजरामुळे सर्व सासवड परिसर  दुमदुमून गेला.  या उपक्रमाचे आयोजन प्रशालेचे शिक्षक भाऊसो येळे व अश्विनी खळदकर यांनी  केले. यामध्ये त्यांना स्वाती पांढरे,निकिता होले ,रुचिरा  गार्डी, प्रतिक्षा बोळगे, गीता पुरंदरे,नीता जगताप ,अक्षदा शिंदे, नितीन ठोंबरे,अंकिता कुंजीर,पूनम दामोदर, सुप्रिया  डगळे, व रेश्मा जगताप यांनी सहकार्य केले.  या उपक्रमाला माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर व  पर्यवेक्षिका सरोज जांगडा यांचे मार्गदर्शन लाभले.   शाळा अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन सतत करत असते. व यापुढे देखील असेच सामाजिक आणि भावनिक कार्य अविरत करत राहील असे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सांगितले.चारही मंडळांकडून मुख्याध्यापिका,शिक्षक यांचे श्री गणेशाची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.या उपक्रमाचे शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे व महामात्र प्रा. सुधीर भोसले यांच्याकडून कौतुक करण्यात आले.
ग्रंथलेखन हे समृद्ध ज्ञानाचे प्रतीक – विजय कोलते       सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      ग्रंथलेखन हे समृद्ध ज्ञानाचे प्रतीक असून, अभ्यासपूर्ण लेखन ही समाजासाठी मौल्यवान ठेवा ठरते,” अशा शब्दांत आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कोलते,यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रसंग होता शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांच्या दोन ग्रंथांच्या प्रकाशनाचा.  या समारंभात संजीवनी मराठे यांची कविता : संदर्भ आणि शोध व संजीवनी मराठे यांचे बालसाहित्य : आकलन आणि मूल्यमापन या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षपदावरून बोलताना कोलते यांनी प्रा. कोळेकर यांच्या संतसाहित्यासह विविध विषयांवरील लेखनशैलीची प्रशंसा केली. “कोळेकर सरांचे लेखन हे विद्वत्तेचे व साहित्यप्रेमाचे जिवंत उदाहरण आहे. ते खऱ्या अर्थाने ‘साहित्याचे लेणं ’ आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी केले. प्रा. कोळेकर यांनी ग्रंथलेखनामागील पार्श्वभूमी उलगडत सांगितले की, “हे लिखाण करण्यासाठी मला प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांच्याकडून मिळाली.”  समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शिरीष लांडगे, संस्थेचे सचिव शांताराम पोमण, भिगवण कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलिक आप्पा मेमाणे, प्रा. डॉ. नारायण टाक आदी मान्यवरांनी प्रा. कोळेकर यांच्या साहित्यप्रवासाबद्दल अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली. सोहळ्याला संस्थेचे सहसचिव बंडूकाका जगताप , महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे, श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, प्रा. संदीप टिळेकर, प्रा. केशव काकडे, संतोषआबा काकडे, संदीप इनामके, अमोल बेलसरे, संजय काटकर, कवी हनुमंत चांदगुडे, अनिल कदम, बिभीशन जाधव, सचिन पेशवे, ज्येष्ठ पत्रकार बाळासो काळे, नितीन राऊत, मोहन बागडे  यांच्यासह मोठ्या संख्येने सासवड , जेजुरी परिसरातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा अतुल चौरे यांनी केले तर आभार प्रा. डॉ कल्पना रोकडे यांनी मानले . ॲड दिलीप निरगुडे , सासवड यांनी ही सवॅ माहिती पतिनिधीला दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवडमधील 28 गुंड तडीपार                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        गणेश विसर्जन चार दिवसांवर आले असताना, त्या पार्श्वभूमीवर सासवड शहर पोलिसांनी दक्षता घेतली आहे, शहरातील दोन व त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 28 गुन्हेगार प्रवृत्त तयार करण्यात तीन दिवसासाठी शहरातून हद्दपार केले आहे, गणेशोत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी सासवड पोलीस प्रशासन सज्ज झालेले असून, शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ झाल्याने छावणीचे स्वरूप आले आहे. शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असून, सर्व मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेतली आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती धारकांचे हद्दपार प्रस्ताव भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्याकडे सादर करीत मंजुरी घेतली शुक्रवार दि. 5 ते रविवार दि. 7 सप्टेंबर दरम्यान, 28 जण तरी पार करण्यात आले आहेत. त्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत ,सासवड शहरात गणेशोत्सव शांततेत साजरी व्हावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे, शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, 7 पोलीस अधिकारी, ५५ पोलीस कर्मचारी, 25 होमगार्ड यांच्यामुळे छावणीचे स्वरूप आलेले आहे. गणेशोत्सव मिरवणुकीत शहरात शांतता सुरवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, 28 गुन्हेगार प्रवृत्ती धारकांना तीन दिवस शहरातून हद्दपार केले आहे. गुन्हेगार प्रवृत्तीवर पोलिसांची करडी नजर आहे, संशयास्पद प्रकार दिसून आल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी. ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन.
विमानतळासाठी 56% भुसंपादनाची संमती पुरंदर मधील वगळलेल्या क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यावरील शिके काढले जाणारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी                             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                   प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी एका आठवड्यात तब्बल 56% जमीन देण्या संदर्भात सहमती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे, 26 ऑगस्ट पासून, प्रशासनांनी समिती घेण्यास सुरुवात केली असून, फक्त पाच दिवसात तब्बल 1580 एकर जमिनीच्या संपादनात शेतकऱ्यांनी होकार दिला आहे ,यात शेतकऱ्यांची संख्या तब्बल 1310 आहे, एकूण क्षेत्राच्या तुलनेत 56% क्षेत्रासाठी सहमती मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे, संमतीसाठी 18 सप्टेंबर नंतर मुदत वाढ मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे, सुरुवातीला विमानतळासाठी सुमारे सात हजार एकर भु संपादन करण्याचे ठरले होते, त्याला शेतकऱ्यांनी मोठा विरोध झाला होता चार महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलनही केले होते, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने भूसंपादन क्षेत्रात कपात करण्याचा निर्णय घेतला सुमारे चार हजार एकर क्षेत्र कमी करून, आता विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे, सुरुवातीला या सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे शिक्के मारण्यात आले होते, भूसंपादन प्रक्रिया संपादन मंडळाच्या नावाचे शिक्के मारले जातात, त्यामुळे सुरुवातीला सहमतीने व नंतर सक्तीने नेहमी घेतली जाते परिणामी शिके बसल्यानंतर त्या जमिनीचे इतरत्र व्यवहार करणे शक्य होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, जमिनीचे क्षेत्र कमी केल्यानंतर उर्वरित चार हजार एकर जमिनीवरील शिके करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, याबाबत डुडी म्हणाले विमानतळासाठी 7000 एकर जमीन घेतली जाईल, असा जाणीवपूर्वक संभ्रम काही शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात होता, प्रत्यक्षात केवळ तीन हजार एकर जमीनच संपादित केली जाईल, उर्वरित जमीन विमानतळासाठी घेतली जाणार नसल्याने, त्या सातबारा उताऱ्यावरील शिक्के काढले जाणार आहेत ,त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल मात्र शेतकरी विमानतळासाठी जमीन देण्यास तयार असल्यासच, ती घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, संपादनाला विरोध करणाऱ्यापैकी काही जण एजंट असल्याचाही संशय आहे. शेतकऱ्याकडून कमी भावात जमीन घेऊन, ती इतरत्र विकण्यास  डाव असल्याचे समजते, काहींनी गुंतवणूक आधाराकडून पैसेही घेतले ची माहिती मिळाली आहे.शेतकऱ्यांनी अशा एजंटांच्या भूलथाप्यांना बळी पडू नये, असे आव्हानही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या ठिकाणी सावित्रीच्या लेकीकडून वडिलांचे अंत्यसंस्कार                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    पुरोगामी विचाराचा वारसा सांगणाऱ्या पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा आणि कृतीचा वारसा जपत चार मुलींनी आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार केले ,पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील दिनकर हरिभाऊ कामठे (वय 77) यांचे 77 व्या वर्षी अल्पशा आजारांनी निधन झाले, त्यांना अत्यं विधीसाठी त्यांच्या मूळ गावी कुंभारवळण येथे आणण्यात आले असता, सुरुवातीला आपल्या समाजातील पुरुष प्रधान मानसिकतेनुसार, त्यांना मुलगा नसल्याने, जावयाने अत्यसंस्कार करावेत ,अशी चर्चा झाली मात्र दिनकर कामठे यांची थोरली मुलगी मिना शेडकर यांनी पिंपरी गावाच्या माजी सरपंच असून, गेली अनेक वर्ष महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम या संस्थेच्या सहसंयोजक म्हणून महिला सक्षमीकरण करता काम करीत आहेत, त्यांनी आपण स्वतःच हे सर्व विधी करणार असल्याचे, स्पष्ट केले. त्यांचे पती कृषी भूषण महादेव शेडकर यांनी याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर मिना शेडकर यांनी स्वतंत्र्य अंत्ययात्रेत मडके धरले स्मशानभूमीत मिना यांनीच अग्नी दिला, तशेच  मोहिनी घिसरे, रोहिणी धनावडे, प्रिया बोरकर या इतर तीन बहिणींच्या साथीने उर्वरित विधी केले, याबाबत उपस्थित लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या विषमतेवर आधारित पितृ सत्तेला धक्का देत मिना शेडकर आणि त्यांच्या तीन बहिणींनी केवळ पुरंदर तालुक्यातीलच नव्हे तर समाजातील सर्व महिलांसमोर एक आगळा वेगळा आदर्श उभा करत, श्री पुरुष समानतेच्या वाटेवर कृतिशील पाऊल टाकले हे मात्र नक्की आहेच.
पुरंदर तालुक्यामध्ये हिवरे या ठिकाणी गुरुवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ; जालिंदर कामठे यांची माहिती तर 22 जणांचा सन्मान होणार                                        सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील आदर्श गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा वसंतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्यावतीने हिवरे येथे( दि. 4) रोजी गुरुवर्य नारायण महाराज विद्यालयामध्ये सत्कार समारंभाचे आयोजन केलेची माहिती वसंत दादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी ही माहिती दिली, ते पुढे म्हणाले की, वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष हे पुरंदरचे तहसीलदार विक्रम सिंग राजपूत आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिवरेच्या सरपंच शोभा दळवी, उपसरपंच रामदास कुदळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती एम. के. गायकवाड असणार आहेत. यात मुख्याध्यापक 1, माध्यमिक शिक्षक 11, प्राथमिक शिक्षक 6, शिक्षकेतर कर्मचारी 4 असे 22 शिक्षकांचा सन्मान होणार आहे. यावर्षी महर्षी वाल्मीक विद्यालय कोळविहीरे मुख्याध्यापक अशोक चव्हाण, उपशिक्षक कातोबा हायस्कूल दिवे सतीश कुदळे, सद्गुरु नारायण महाराज विद्यालय नारायणपूर श्रीकांत यादव, पुरंदर हायस्कूल व जूनियर कॉलेज सासवड भानुदास कटके, राजुरी विद्यालय दत्तात्रेय वायसे, न्यू इंग्लिश स्कूल जेऊर प्रशांत जगताप, श्री केदारेश्वर विद्यालय काळदरी सुनंदा टकले, बालसिद्धनाथ विद्यालय बेलसर मनोज कुमार कदम, वाघीरे हायस्कूल सासवड अश्विनी कामठे, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे शबाना मनियार, महर्षी वाल्मिक वाल्हे सुदाम गायकवाड, शासकीय निवासी शाळा प्रशांत भेंडे, जिल्हा परिषद शिक्षक निरा नंबर एक दत्तात्रय पवार, हिवरे रवींद्र कुंजीर, माहूर छाया कारकर, तोंडल संजय धुमाळ, धनगर वस्ती वर्षा माकर, मावडी सुपे सुवर्णा खेडेकर ,शिक्षकेतर कर्मचारी न्यू इंग्लिश जवळाअर्जुन मोहन लालासो निगडे, कृषी औद्योगिक विद्यालय चाबली उत्तम लकडे, भैरवनाथ विद्यालय वनपुरी अण्णा लोंढे, विद्या महामंडळ प्रशाला कोथळे नितीन काळे, यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती वसंत दादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील शरीर सौष्ठवपटू शिवम वडार सुवर्णपदकाचा मानकरी                                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथे झालेल्या 56 व्या नंदू मराठी श्री शरीरसौष्ट व्या स्पर्धेत शिवम वडार याने ८० किलोग्राम खालील वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे. वाघीरे महाविद्यालय सासवड येथील प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेला  शिवम वडार याला सुवर्णपदक, प्रमाणपत्र व १००० रोख रकमेचे पारितोषिक देऊन, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले, तसेच 65 किलो ग्रॅम खालील वजन गटात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेला पांडुरंग भोसले यांनी कास्यस्पदक जिंकले, त्यास काशस्पद प्रमाणपत्र व 500 रुपये रोख रक्कम देऊन, गौरविण्यात आले या दोन्ही खेळाडूंनी आपल्या देशाचे श्रेय आई-वडील मार्गदर्शक विशाल देवकर, प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांना दिले आहे ,दोन्ही शरीर सौष्ठ्यपट्टू आर्यन फिटनेस क्लब येथे सराव करीत आहेत,अशी माहिती प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
भाजपचे जिल्हा ग्रामीण दक्षिणची जम्बो कार्यकारणी जाहीर; महिला मोर्चा पदी स्नेहल दगडे                             ण   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणची जम्बो कार्यकारणी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी जाहीर केली. भाजपची दक्षिण कार्यकारणी खालील प्रमाणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे, बाळासो गरुड, गंगाराम जगदाळे, वैशाली सणस, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग कचरे, राहुल शेवाळे, हरिचंद्र ठोंबरे, जीवन कोंडे, संभाजी काळाणे, शिवाजीराव निंबाळकर, सुनील जागडे, अंकुश गायकवाड, जिल्हा चिटणीस दिपक तनपुरे, सागर चिंचकर, वैशाली धसाडे, आशा शिवतारे, नाना शेंडे, शहाजी कदम, गणेश भोसले, योगेश डाबी, कार्यालयीन प्रबोधनांचे प्रमुख धनंजय कामठे. जिल्हा मोर्चा अध्यक्ष युवा मोर्चा वैभव सोलनकर, महिला मोर्चा स्नेहल दगडे, किसान मोर्चा दिग्विजय काकडे, ओबीसी मोर्चा गजानन वाकसे, अल्पसंख्यांक मोर्चा आशिष ओसवाल, अनुसूचित जाती मोर्चा मयूर कांबळे, जिल्हा आघाडी व प्रकाश सोशल मीडिया संदेश धायगुडे, जेष्ट नागरिक बापू लोखंडे, कायदा आघाडी एडवोकेट गोविंद देवकाते, दिव्यांग आघाडी बाजीराव पारगे, उद्योग आघाडी सतीश फाळके, उत्तर भारतीय आघाडी नागेंद्र चोबे, वैद्यकीय आघाडी डॉ. सुमित काकडे, बुद्धिजीवी आघाडी शैलेंद्र ठकार, पदवीधर आघाडी दिपक राजपूत, राजस्थान प्रकोष्ट दिनेश शर्मा, व्यापारी आघाडी प्रवीण कुमार शहा, आध्यात्मिक आघाडी अशोक चव्हाण आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे ,व जिल्हा समन्वयक आमदार ऍडव्होकेट राहुल कुल, व माजी जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मान्यतेनुसार, भाजपा पुणे ग्रामीण दक्षिण विभागाच्या नूतन जिल्हा पदाधिकारी यांची यादी घोषित करण्यात आली. जिल्हाधिशांनी जाहीर केली यादी कायदा आघाडी एडवोकेट गोविंद देवकाते यांची निवड सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन, पुढील काळात जोमाने काम करणार आहे. चंद्रशेखर वढणे, जिल्हाध्यक्ष भाजप.
श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस प्रॉडक्ट उद्घाटन                   सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    सासवड (ता. पुरंदर) येथे आपले सर्वांचे लाडके वर्गमित्र, आमचे बालमित्र, चांबळी गावचे सुपुत्र , शून्यातून विश्व निर्माण करणारे यशस्वी उद्योजक, अभ्यासू ,समाजसेवी,बहुआयामी व्यक्तिमत्व अरुण मोहिते यांनी सुरू केलेल्या  महालक्ष्मी एंटरप्राइजेस प्रॉडक्ट वितरणाचे उद्घाटन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, दै. लोकमतचे पत्रकार हॉटेल लोणकरवाडा उद्योग समूह डायरेक्टर, शिक्षक नेते सुनील लोणकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्षक नेते संजयआबा जाधवराव, चांबळी तंटामुक्तीचे मा. अध्यक्ष नितीनशेठ शेंडकर व अरुण शेठ मोहिते उपस्थित होते. त्यांच्या व्यावसायिक वाटचालीस आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींच्या व हितचिंतकांच्या वतीने अनंत शुभेच्छा देण्यात आल्या.    वारणा डेअनी बाय प्रॉडक्ट, वृंदावन नमकीन व फरसाण, क्रिटोलो नमकीन, बाबा इलायची हनी बनी डायपर ह्या प्रॉडक्टचे अरुणशेठ मोहिते हे अधिकृत विक्रेते आहेत. ज्यांना वरील प्रॉडक्टची ग्राहकांसाठी खरेदी विक्री , घरगुती वापरासाठी खरेदी करावयाची असेल त्यांनी अरुण मोहिते मोबाईल नंबर 98 81 36 68 68 यावर संपर्क साधावा.
सासवड नगरपरिषद सासवड अंतर्गत तीन ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावाची सोय                                            सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                              पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनास प्राधान्य द्या.सर्व सासवड शहरवासीयांना कळविण्यात आनंद होतो की, गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने नगर परिषद सासवडच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.प्रत्येक वर्षी जलस्रोतांमध्ये होणारे मूर्ती विसर्जन नैसर्गिक पाणथळांवर प्रतिकूल परिणाम घडवते. पाण्याचे प्रदूषण रोखणे, जिवसृष्टीचे संरक्षण करणे व निसर्गाचे संतुलन राखणे या उद्देशाने नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आले आहेत.नगर परिषद सासवड सर्व गणेशभक्त, मंडळे व नागरिकांना विनम्र आवाहन करते की  गणेश मूर्तीचे विसर्जन कृपया नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करा.शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तींचा अधिकाधिक वापर करा.  पाण्याचे व इतर नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण हे आपले सामूहिक कर्तव्य आहे.  विसर्जन स्थळी स्वच्छता राखा व प्लास्टिकचा वापर टाळा.कृत्रिम तलावांची स्थाने पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत. नागरिकांनी सहकार्य करून एक आदर्श,प्लास्टिक मुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा.सासवड नगरपरिषदेच्या माध्यमातून गणेश भक्तांसाठी तीन ठिकाणी कृत्रिम तलावाची व निर्मल्य कलश्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये संगमेश्वर मंदिर परिसर, सोपानकाका मंदिर परिसर, वटेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी विसर्जन व्यवस्था केली आहे.तसेच सदर ठिकाणी नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी उपस्थित आहेत.या ठिकाणी  भाविकांकडून दिवसभरात 185 गणपती मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलाश चव्हाण यांनी शहरातील सर्व गणेश भक्तांना आव्हान केले आहे, कि गणपती विसर्जन कृत्रिम तलावात करून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यास नगरपरिषदेस सहकार्य करावे.तसेच निर्मल्यासाठी स्पेशल गाडी पाठवण्यात येणार आहे.आपल्या सहकार्यानेच आपण एक स्वच्छ, सुंदर आणि हरित सासवड घडवू शकतो.
एम.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल सासवड प्रशालेमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन                                              सासवड प्रतिनिधी:बापू मुळीकमुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिना निमित सन २०१२ पासून २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो . या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर व तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सरोज मॅडम, क्रीडा शिक्षक  नितीन ठोंबरे, व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  येळे भाऊसो यांनी केले  व यांनी मेजर ध्यानचंद यांचा क्रीडा विश्वातील संपूर्ण प्रवास  उपस्थितींना सांगीतला. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर यांनी विद्यार्थ्यांना   खेळाचे महत्व सांगीतले तसेच तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी सर्व खेळाडूंचे, घोष पथकाचे नेतृत्व करणारी साजिरी माने यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या नंतर अक्षरा क्षीरसागर या विद्यार्थिनी सोबत सर्वांनी फिट इंडियाची शपथ घेतली. शेवटी खेळदल या तासिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा भारतीच्या 'खेल खिलाडी खेल' या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Load More That is All