Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from November, 2025Show All
पुरंदर तालुक्यातील विमानतळ भूसंपादनासाठी पाच ते सहा हजार कोटी ची गरज                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी अंदाजे पाच ते सहा हजार कोटी रुपये लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. सात गावातील 3000 एकर भूसंपादन करण्यात येणार आहे ,जमिनीचा मोबदला वाढवून मिळावा अशी सात गावातील शेतकऱ्यांची मागणी असून, शुक्रवारी दि. 31 ऑक्टोबर रोजी डुडी यांनी शेतकऱ्यांशी याबाबत चर्चा केली. मोबदला अधिकचा वाढवून मिळावा एरोसिटीमध्ये दहा टक्क्याऐवजी अधिक जागा मिळावी, अशा सुद्धा शेतकऱ्यांनी मागणी केली, नवी मुंबई येथे शेतकऱ्यांना 22.5% जागा मिळाली मात्र, तेथे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याचे, सुद्धा शेतकरी गणेश काशिनाथ मोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले, तर त्यावेळी कुंभारवळण येथील शेती 94 टक्के बागायत असून, फक्त जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे, तर विमानतळाला संमती शेतकऱ्यांची अजिबात नाही, संमती जमीन मोजणी झाल्यानंतर एक तर शेतकऱ्यांना अधिकारी तोंडी आश्वासन देत आहेत, की विमानतळ साठी कोटीच्या रकमेमध्ये मोबदला मिळेल, त्यामुळे बहुतेक भरपूर प्रमाणामध्ये दिवाळीनंतर शेतकऱ्यांची मानसिकता बदललेली आहे ,या मीटिंगसाठी सात गावातील विमानतळाच्या क्षेत्रांमधून प्रत्येकी गावातून दहा ते बारा प्रमाणे सात गावांमधील लोक ८० ते ८५ पर्यंत पुणे या ठिकाणी ऑफिसमध्ये हजर होते, या अगोदर पारगाव या ठिकाणी भर मीटिंगमध्ये एका शेतकऱ्याने स्पष्टपणे सांगितले होते की, आमची जमीन मोजणीसाठी संमती दिली होती, तर आम्ही विमानतळाला आमची जमीन देणार नाही, पूर्णपणे तो आक्रोश होणारा एक ठिकाणचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यांनी स्वतः खिशामध्ये दोरी आणलेली होती की मी या ठिकाणी फाशी घेईल, पण विमानतळ साठी शेती देणार नाही, तो आक्रोश होणारा एक पारगावचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यांनी स्वतः खिशामध्ये दोरी आणलेली होती की मी या ठिकाणी फाशी घेईल परंतु विमानतळाला जागा देणार नाही असेही स्पष्ट शेतकऱ्यांनी केले होते, त्यानंतर एखतपूर, मुंजवडी, खानवडी या ठिकाणी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला होता की ,आम्ही जमीन मोजणी साठी फक्त संमती दिलेली आहे, विमानतळाला जर आमची परवानगी द्यायची संमतीची असेल तर त्यासाठी मोबदला हा चांगल्या स्वरूपाचा आम्हाला मिळाला पाहिजे, याबद्दल शेतकऱ्यांनी आपला आक्रोश जिल्हाधिकारी यांच्यासमोर व्यक्त केला होता, आमची शेती विमानतळाला द्यायची नाही ,अधिकारी वर्गाकडे शासनाची लेखी सध्या तरी काही नाही, त्यामुळेच सात गावातील शेतकऱ्यांना जमिनीसाठी दराची चौपट रक्कम त्यांच्या जमिनीच्या दहा टक्के जागा देण्यात येणार असल्याचीही शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी सांगितले, तरी याबाबत डुडी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची मागणी आम्ही राज्य सरकारला कळवून मोबदला किती द्यावयाचा ते राज्य सरकार ठरविणार आहे. आज वाटाघाटीची पुणे येथे पहिली बैठक झाली अजून, दोन बैठका संपन्न होणार आहेत, तर सध्या जमिनीची मोजणी झाली आहे, असाच फक्त त्याबाबत नक्की किती जमिनीचे संपादन करावयाचे आहे, याचा प्रस्ताव येणाऱ्या आठवड्यात राज्य सरकारला पाठविणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे जादा मोबदला राज्य सरकारने द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी, 240 हेक्टर जादा जमीन मिळणार विमानतळासाठी 3000 एकर भूसंपादन करण्यात येणार आहे, त्यापैकी सुमारे 100 हेक्टर जमीन ताब्यात देण्यास अद्याप संमती मिळालेली नाही, तर बाकी सर्व जमिनीची मोजणी फक्त झालेली आहे, त्या व्यतिरिक्त 240 हेक्टर जमीन देण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखवलेली आहे, त्या जमिनीची मोजणी करण्यात येत आहे, विमानतळाचे काम पुढील वर्षी उन्हाळ्यात सुरू होणार आहे ,भूसंपादनासाठी प्रक्रिया जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न राहील, त्यामुळे मोबदला देण्याचे काम हे डिसेंबर मध्ये सुरू करावे, लागणार आहे तर विमानतळाचे प्रत्यक्ष बांधकाम उन्हाळ्यात एप्रिल व मे मध्ये 2026 मध्ये सुरू करण्याची राज्य सरकारचा एक प्रकारे विचार आहे.
Load More That is All